ठकबाजी. भाग १

दूर आल्यावर निर्जन रस्त्यावर ती थांबली. कीटकांचा आवाज सोडला तर एक वेगळीच शांतता होती. आरोहीने पायातील चांदीचे पैंजण काढले,एका काळ्या पिशवीत भरले आणि झाडीत टाकून दिले. कोणी तिला पाहत तर नाही ना ह्याची खात्री केली आणि झपाझप पावलं पुढं टाकत निघाली.
रात्रीच्या काळोख्या अंधारात मन घट्ट करून आरोही एकटीच घराबाहेर पडली. तिची नजर सर्वत्र भिरभिरत होती. दूर आल्यावर निर्जन रस्त्यावर ती थांबली. कीटकांचा आवाज सोडला तर एक वेगळीच शांतता होती. आरोहीने पायातील चांदीचे पैंजण काढले,एका काळ्या पिशवीत भरले आणि झाडीत टाकून दिले. कोणी तिला पाहत तर नाही ना ह्याची खात्री केली आणि झपाझप पावलं पुढं टाकत निघाली. मनात कुठेतरी तिला वाटत होते आपण चुकीचे काहीतरी करतो आहे; पण तरीही तिने पैंजण फेकून दिले. रात्रीचे बारा वाजत आले होते. आरोहीच्या आईचा फोन आला.

लक्ष्मी : " हॅलो आरोही,तू कुठे आहेस?"

आईचा आवाज ऐकून तिला प्रचंड घाम फुटला. बराच वेळ फोन वाजल्यावर तिने आईचा फोन उचलला होता.

आरोही : "आई,इथेच आहे आपल्या घराबाहेर. जरा बरं वाटत नव्हते म्हणून बाहेर आले होते."

आई: "ताबडतोब घरी ये, इतक्या रात्री कोण बाहेर पडतं का?संगितले देखील नाहीस. लगेच घरी ये बघू."

आई रागातच म्हणाली आणि फोन ठेवून दिला.

आईला प्रचंड राग आला आहे हे तिच्या आवाजावरून समजले होते.

आरोही जमेल तितक्या वेगाने घराच्या दिशेने धावत सुटली. तिला प्रचंड धाप लागली होती.

जरा घाबरतच तिने बेल वाजवली.
वैशालीने दार उघडले.

आरोहीचा चेहरा घामाने डबडबला होता.

वैशाली : "ताई, अगं काय हे ? तुला किती घाम आला आहे? काय झाले ? थांब मी आईला बोलावते."

आरोही वैशालीचा हात पकडत म्हणाली
"वैशु,प्लिज आईला नको बोलावू. , मी ठीक आहे. आई झोपली असेल.तिला त्रास नको देऊस."

वैशाली : "ताई, तुझी अवस्था बघ गं. थांब मी तुला पाणी आणते."

असे म्हणत वैशाली किचनमध्ये गेली.

आरोही खुर्चीवर बसली. तिचा श्वास जोरजोरात चालू होता. वैशालीने तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती दचकली. तिला वाटलं आईच आली. पाठी वळून पाहिले तर वैशाली होती.

आरोही:" वैशाली, तू तर मला घाबरवलंस ."

वैशाली भुवया उडवत म्हणाली .
"तुला घाबरायला काय झाले?"

ह्या प्रश्नाचे उत्तर टाळत आरोही म्हणाली
"तू आधी पाणी दे वैशु. मला खूप तहान लागली आहे. "

"ताई,प्रश्नाचे उत्तर दयायचे नसेल तर तू नेहमीच विषय टाळतेस."

"वैशाली, अगं काही नाही गं. तू पटकन पाठी हात ठेवला म्हणून घाबरली. बाकी काहीच नाही."

"ताई,नक्की ना? दुसरं काही कारण तर नाही ना?"

"डिटेक्टिव्ह वैशाली मॅडम, मला आता खूप झोप लागली आहे. तुमची चौकशी झाली असेल तर मला झोपायला जायची परवानगी देता का?"

"ताई, तुझं तर ना काहीतरीच असते बघ. बोलण्यात इतकी पटाईत आहेस की समोरच्याला चांगलं गप्प करतेस. लग्नानंतर किशोरचं काय होईल माहीत नाही."

वैशाली तिला उगाच चिडवत म्हणाली.

किशोरचे नाव ऐकले तसा तिचा चेहरा गंभीर झाला. वैशु सतत काय मस्करी करत राहतेस? मला अजिबात आवडत नाही ही तुझी सततची मस्करी."

"ताई,पण मी तर फक्त सहज म्हणाले." वैशाली.

आरोही रागात झोपायला निघून गेली.


वैशालीला , आरोहीचे वागणे पटले नाही. ताईची नेहमी मस्करी करते तेव्हा तर खूश होते मग आज का बरं असे वागली? तिच्या डोक्यात प्रश्नांची शृंखलाच सुरू झाली होती.

क्रमशः
अश्विनी ओगले.कशी वाटली कथेची सुरवात ? नक्की सांगा. कथा अवडल्यास लाईक, शेअर,कंमेंट जरूर करा. मला फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद.


🎭 Series Post

View all