ताई (भाग २)

लवकरच मी झोपेच्या आधीन झालो........

लवकरच मी झोपेच्या आधीन झालो. .......
... . .मस्त सकाळ झाली. नाही म्हंटलं तरी ताईंनी माझंं थोडं का होईना समाधान केलं होतं. मग मी सगळंच विसरलो आणि आईला फोन लावला. रविवारी माझा शिरस्ताच होता. .....


आईशी काही वेळ बोलल्यावर मला जरा बरं वाटलं. कामावरही माझं फारसं लक्ष नव्हतं. मला वाटतं मी दीपाशी फारच तोडून वागत होतो. चूक माझीच होती . ताईंच्या मोहात मीच पडलो होतो. अचानक माझ्या मनात आलं , जे घडलं त्याबद्दल पप्पाना आणि दीपाला तिनी सांगितलं तर. ताईला मी बजावायचं विसरलो होतो. मला अचानक हलकासा घाम येतोय असं वाटू लागलं. आणि असुरक्षितही ........मी दीपाला फोन लावायचा प्रयत्न करु लागलो. तिचा फोन बिझी आला. मग लक्षात आलं की आपण ताईंचा नंबरही घेतला नाही. कामात अतिशय काटेकोर वागणारा मी अशी सीली मिस्टेक कशी काय करु शकतो. पण पप्पांचा फोन नं. माझ्याकडे होता. पप्पाना फोन केला आणि त्याना कळलं असलं तर ? ..... ते भडकून काही बोलले तर आत्ताच दीपाशी लग्न मोडेल. आईचीही निराशा होईल. असो. दीपाला विचारलं नाही हे बरं झालं. तुला काय करायचाय ताईचा नंबर. रविवार कसातरी घालवला. सोमवारी कॉलेजमधे गेलो. गेल्याबरोबर प्रिन्सिपलने बोलावल्याचं समजलं. मला त्यांची भिती वाटत नसे. तरीही उत्सुकता होतीच. त्यांच्या शिफारशीनीच तर लागलो होतो. दरवाजा उघडून मी गुड मॉर्निंग म्हंटलं. मला बसायची खूण करीत म्हणाले," अवि, अरे घरी सगळं ठीक आहे ना ? मला तर तू disturb वाटतोस. मी चांचरत म्हणालो, " नाही तसं काही नाही. " मी असं म्हणताच त्यांनी माझ्यापुढे फाईल टाकली आणि म्हणाले, मग हे काय आहे ....?". मीच पाठवलेली फाईल होती. फाईल मधले कागद सुरवातीला लिहीलेले होते. बाकी कागद कोरे होते. सरांनी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनी पाहिलं. " काय समजलं ना. दुसरं कोणाची फाईल असती तर मी काय केलं असतं माहिती आहे ना..... घेऊन जा ती फाईल अपडेट करुन पाठव. " मी फाईल घेऊन उठलो दरवाजाकडे वळलो आणि त्यानी विचारलं, " अवि, काही प्रॉब्लेम असेल तर सांग. पाहिजे तर थोडी रजा घे. " मी येस सर म्हणालो आणि बाहेर पडलो.

गेल्या आठवड्यापासून मी दीपा आणि तिच्या घरच्यांमधे फार गुंतलो होतो. त्यामुळे कामाचं महत्व मी विसरलो होतो. असं पुन्हा व्हायला नको.मला जरा वाईटच वाटलं. असो मी कामाकडे लक्ष दिलं.कॉलेजच्या वेळात तरी दीपाचे फोन कटाक्षानी टाळण्याचं मी ठरवलं. दिवस चांगला गेला. घरी आलो. आज अचानक एकटेपणाचा कंटाळा आला....... काहीतरी करायचं म्हणून मी टेबल आवरायला घेतलं. असली कामं दीपा आली कीच होत असतं. शिव्या देत देत सगळा फ्ल्याट स्वच्छ करायची. मग ती मुद्दाम म्हणायची ," व्यवस्थितपणा रक्तात असावा लागतो. तो शिकवून येत नाही समजलास ना ,,? मग तिची मी थट्टा करायचो, " तू काही बोललीस का, मला ऐकायला जरा कमी येतं......वगैरे " मग ती मला मारायला धावायची. असो. मी पुस्तकं आणि डायऱ्या नीट रचून आहे तिथेच ठेवल्या. माझी आई सांगायची, आवरायचं नसेल ना तर निदान आहेत त्या वस्तू नीट रचून तिथेच ठेवाव्यात, चांगलं दिसतं तरी. मग मी खण उघडले . तेही साफ करावेत म्हणून पण ओसंडून वाहत होते. माझी साफ करण्याची ताकद संपली होती. मुख्य म्हणजे मला जेवायला जायचं होतं. तरीही काही कार्ड पाहीली. त्यात एक हाताला लागलं ते दीपाच्या पप्पांचं होतं. वर त्यांचं नाव आणि नंबर होता.कोणतंही कार्ड उलटून पाहायचं ही मला लागलेली संवय होती. हो, सवयीवरुन आठवलं. मी दोन वर्षांपुर्वी सुटीच्या दिवसात महिना दीडमहिना एका खाजगी डिटेक्टिव्हडे कामाला होतो..तो सांगायचा हातात आलेला कागद म्हणजेच पुरावा उलटूनही बारकाईने पाहावा . काहीतरी जास्त माहिती मिळते . कधी फोन नं. असतो तर कधी हिशेब किंवा एखादं नाव खरडलेलं सापडतं. ते नेमकं महत्वाचं असतं. आत्ताही तेच झालं फोन नं आणि त्याला फुली काढलेली. मी ते कार्ड घाईघाईने खिशात टाकलं..खण तसेच बंद केले. आणि घर बंद करुन जेवायला निघालो. जिथे मी जेवायला जायचो तिथला मालक माझी गाडी असल्याने नमस्कार करीत माझे स्वागत करायचा. माझ्यासारखा गाडीवाला माणूस त्याच्या हॉटेलात जेवायला येतो ही त्याच्या द्रुष्टीने अभिमानाची गोष्ट असावी. मी ऑर्डर दिली. अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली . पप्पांच्या कार्डामागचा नंबर ताईंचा तर नाही. त्यांचाच असणार. मला ती कल्पना आवडली. माझा आनंद गगनात मावेना.मी कधी एकदा जेऊन घरी जातो आणि ताईंना नंबर लावतो, असं मला वाटलं. मी उतावीळपणावर ताबा ठेवला. मग तो दुसऱ्याच कोणाचा नंबर निघाला तर दुसऱ्या दिवसापासून माझं काम व्यवस्थित चालू झालं. दिवस फारच व्यग्रतेत गेला. घरी आलो आणि ताईंचा वाटणारा फोन लावला. " Hallo," ताईंचाच आवाज होता. मग मी नाटक केलं. " अरे ताई तुम्ही का ? सॉरी चुकून लागला. " असं म्हणून मी बंद करण्यासाठी टच करायच्या आतच ताई म्हणाल्या. " अविनाशराव, माझा नंबर कसा मिळाला ? " ...... मी तत्परतेने उत्तर दिले.." चुकून लागलाय. माझ्या सहाय्यकाला मी फोन लावीत होतो. तुम्हाला कसा काय लागला कोण जाणे..ठीक आहे मी बंद करतो. " त्यावर त्या घाईघाईने म्हणाल्या," थांबा ऐका. तुम्हाला येत्या शनिवारी न येता रविवारी आलात तरी चालेल. फक्त आमचा अलिबागला वाडा आहे तिकडे जायचंय , दीपालाही सांगितलंय.."....."अहो पण मला सोमवारी कॉलेजला जायचंय... " एक दिवस मारा की दांडी. माझ्यासाठी, .....माराल ना..? "........." बघतो ...." .आणि फोन बंद केला. नाहीतरी प्रिन्सिपल म्हणालेच आहेत, थोडी रजा घ्या.. मी जेवणासाठी बाहेर निघालो. ताईंसाठी मी दांडी मारणार . शक्यच नाही. मी जेऊन घरी आलो. पावसाचा जबरदस्त आवाज येत होता . मला चित्रपटाच्या दिवसाची आठवण झाली.  मी एक प्रकारच्या नशेतच घरी पोहोचलो..आणि दीपाला फोन लावला. रात्रीचे नऊ वाजत होते. तिनी फोन उचलला नाही. कदाचित ती जेवत असावी. दीपाला पुन्हा फोन लावला. "अरे आत्ताच मी जेऊन आले. बोल"......" काय ग , आपल्याला अलिबागला जायचंय ? " ......... " तुला काय माहीत ? " ,,,,,,"अगं ताईना फोन केला होता तेव्हा त्या म्हणाल्या. " .... " पण तुला नंबर कोणी दिला तिचा  ? ताई पासून सांभाळून राहा.." आणि तिने फोन बंद केला. तिला राग आला असावा. मी परत फोन केला पण तिनी कट् केला.मीच तिला सगळं सांगणार होतो. बरं झालं सांगितलं नाही ते .



अलिबागला कशासाठी जायचं मला कळेना.अधून मधून दीपाचा फोन येत राहिला. पण तिलाही अलिबागला का जायचंय माहित नसावं.म्हणजे विचार ताईंचाच असावा. हा सापळा तर नसेल. काय माहित ,पण ताईंच्या प्रत्येक क्रुतीचा मला संशय येऊ लागला. सोमवारची सुटी मी मंजूर करुन घेतली. पण दीपाला आणि ताईनाही त्याबद्दल मुद्दामच बोललो नाही....शुक्रवारी रात्रीच मला दीपाचा फोन आला. ती रविवारी पहाटेच पोहोचत होती . तिने परत एकदा ताईंपासून दूर राहा असं कळवलं. शनिवारचा दिवस असाच लोळत घालवला. पावसामुळे बाहेर जाता येत नव्हतं.... मी ताईंच्या स्वप्नरंजनात मश्गुल होतो. मधेच एकदा पप्पांचा फोन आला. आता म्हातारा का फोन करीत होता कुणास ठाऊक. मी कंटाळून फोन घेतला.." येताय ना उद्या. सकाळी लवकरच या. दीपा पण पहाटेसच येणार आहे. " मी होकार दिला आणि फोन कट् केला. म्हातारा आणि मुलगी यांचा सापळा आहे तर. या आठवड्यातला एकही दिवस असा गेला नाही की ताईंच्या प्रणयाची आठवण झाली नाही. ताईंनी टाकलेला गळ माझ्या शरिरात खोल अडकला होता.

मी रविवारी सकाळी डॉट सात वाजता ताईंच्या घरी पोहोचलो. आता माझ्या बोलण्यात दीपाच्या घरी ऐवजी ताईंच्या घरी येऊ लागलं. दार अर्थातच ताईंनी उघडलं. ताई साडी नेसून तयार झालेल्या दिसल्या.
न्हायलेले सुगंधी केस खांद्यावरुन पुढे घेत त्या गोड हसल्या. पण त्याचं ते हास्य ओठांपुरतच मर्यादीत दिसलं. साधारणपणे माणूस आनंदानी हासतो तेव्हात्याचा सगळा चेहरा हसतो.मुख्य म्हणजे त्याचे डोळे हसतात. ताईंचं आत्ताचं हसणं डोळ्यांपर्यंत पोहोचलंच नव्हतं.त्यांचे डोळे स्थिर असून माझा वेध घेत होतेअसं वाटलं.अचानक मला दीपाला भेटून परत जावंस वाटलं . तेवढ्यात ताईंनी आपला पदर पुढे ओढूनपुन्हा खांद्यावर टाकला. मी काही  न बोलता सोफ्यावर बसलो.आतून पप्पाआले.त्यांनी पुजा वगैरे केली असावी. ताई आत गेल्या.मला दीपाला भेटायचं होतं.मी पप्पाना दीपा
बद्दल विचारल. ती अजून झोपली असल्याचं ते म्हणाले.तेवढ्यात दीपा आली.

(क्रमशः)