ताई (भाग १)

माझी आणि दीपाची ओळख जुनीच होती.

                  माझी आणि दीपाची ओळख जुनीच होती. कॉलेजची चार वर्षं ती माझी वर्गमैत्रिण असल्याने आम्ही खूपच जवळ आलो होतो. शेवटच्या वर्षी मी तिला प्रपोज केलं आणि तिनेही ते मान्य केले.फक्त तिची एकच अट होती की मी तिला घरी येऊन मागणी घालावी.अर्थात कोर्स पूर्ण झाला तरी कमवायला सुरुवात न झाल्याने सध्यातरी आमची इच्छा दोघातच राहिली.तिच्या घरी मी दोनचार वेळा जाऊन आलो होतो. तिची आई लहानपणीच गेल्याने तिचा सांभाळ तिच्या पप्पांपेक्षा तिच्या ताईनेच केला होता. त्यामुळे तिला ताईचं कौतुक जास्त होतं.तिच्या घरात ताईची जरब जाणवायची, त्यामानाने तिचे पप्पा फारच फ्री होते.,,,,ताई दिसायला काळीसावळीच होती. तिचे खांदे थोडे रुंद ,नाक टोकदार ,ओठ जाडसर, डोळे मात्र स्वच्छ आणि टपोरे होते आणि आकर्षक बांधा .आवाजात थोडी धार होती. पण मला पप्पांमुळे अजिबात टेन्शन नव्हतं.मी दीपा करता घरी येतो याची तिलाही कल्पना होती. ...

माझे आईवडील गावी होते. पण मला वडिलांनी वन बीएचके फ्लँट घेऊन दिला होता. त्यामुळे मला जागा घेण्याची गरज नव्हती.मी माझ्या विषयात डॉक्टरेट मिळवली. लवकरच मला एका कॉलेज मधे प्रोफेसरशिप मिळाली. दीपाला सांगितल्यावर ती म्हणाली , " तू तर लकीच आहेस बाबा. यात जवळजवळ चार वर्षांचा काळ लोटला होता. एक दिवस आम्ही चौपाटीवर बसलो असताना मी दीपाला विचारलं, " तुला विचारल़ तर राग येणार नाही ना . " तिने मानेनेच नाही म्हंटलं. मी चांचरतच विचारलं, " ताई लग्न अजून कसं झालं नाही..,,? " मला बरंच काही विचारायचं होतं. पण तिला आवडणार नाही असं वाटून मी थांबलो.
थोडा वेळ जाऊन देऊन दीपा म्हणाली, " ताई करिता चारपाच स्थळं पाहिली होती पण ती कुणालाच पसंत पडत नव्हती. का ते माहीत नाही. मुलगा पाहून गेल्यावर दोन चार दिवसातच उत्तर यायचं, आपलं जमेल असं वाटत नाही,किंवा पत्रिका जमत नाही अशी ठाशीव उत्तरं यायची. एकाच मुलानी ताई थोराड दिसते असं कळवलं होतं . ते ताईला लागलं. मग तिनी मुलं पाहण्याचं बंद केलं. ". .... मला प्रोफेसरशिप मिळाल्याने एक दिवस पेढे घेऊन मी दीपाच्या घरी गेलो. रविवार असल्याने पप्पा घरीच होते. दीपानी दार उघडलं. आश्चर्यानी ती म्हणाली, " हे काय ? अचानक ? बोलला नाहीस येणार आहेस ते. " त्यावर माझ्या खंवचट स्वभावानुसार मी म्हंटलं, " का पंचारती घेऊन आली असतीस की काय ? " तिला राग आला होता ,हे माझ्या लक्षात आलं. मी पप्पांकडे जाऊन त्यांना नमस्कार करीत म्हंटलं, " पेढे घ्या , मला सिद्धेश्वर कॉलेजमधे प्रोफेसरशिप मिळाली. " ते खूष होत म्हणाले, " वा ! सिद्धेश्वर म्हणजे प्रसिद्ध कॉलेज आहे. चला म्हणजे लग्नाचा मार्ग मोकळा झाला.",. ".छे हो , दीपाला जॉब लागला की मगच. " दीपा थोडी नाराज दिसली. पण मी लक्ष दिलं नाही. आतून ताई आल्या अणि त्यानी चहा बिस्किटं आणली. त्या मात्र बसल्या नाहीत. लगेचंच आत गेल्या. मी दीपाला खुणेनी ती आत का गेली असं विचारल्यावर लक्ष देऊ नकोस असे हातवारे केले. असो पप्पांनी विचारलं ," मला वाटतं मी आता तुमच्या घरी जाऊन लग्नाबद्दल विचारायला हरकत नाही . " अर्थातच मी त्याला नकार दिला. मी मागणी घालायची होती ना. इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन मी उठलो. तेवढ्यात आतून ताई येऊन म्हणाल्या, " परवा आमच्याकडे जेवायला यायला हरकत नाही तुम्हाला . " ते ऐकून पप्पा म्हणाले , " पाहिलत, ताईला खूपच जाणीव आहे. खरंच याच तुम्ही परवा रात्री. " त्यावर ताईंकडे  पाहात मी पाहू म्हंटलं आणि निघालो. माझ्या डोळ्यांकडे पाहत दीपा माझ्या बरोबर खाली आली. मला झापत ती म्हणाली " तुला अगाऊपणानी बोलायला बरं जमतंय रे. काही जेवायला येण्याची गरज नाही ". मी मुकाट्यानी निघून गेलो.........

या घटनेला महिना दोन महिने झाले.मध्यंतरी दीपा भेटत राहिली. मी फारसा घरी जात नव्हतो . पण तिला त्याची पर्वा नव्हती.मी तिचाच आहे याबद्दल तिची खात्री झाली होती. मलाही तिच्याबद्दल तेवढंच आकर्षण होतं. दीपा भेटत राहिली तरी ताई बद्दल बोलणं टाळताना दिसली. मी ताईचा विषय काढल्यावर ती वैतागून म्हणाली, " तू हल्ली ताईची आठवण फार काढतोस. का बरं ? " ...." अगं सहजच. " ......"आपल्यामधे ताईला आणीत जाऊ नकोस.तिचं सगळंच वागणं चांगलं आहे असं नाही. " त्पावर मी विचारलं " नीट सांग ना . " तिने ते बोलणं सोडून दिलं. मीही जास्त जोर दिला नाही. पप्पाही ताईबद्दल जास्त बोलत नसत.एक दोन वेळा दीपा आणि मी फारच जवळ आलो..पण दीपाने सावरल्याने फारसा प्रॉब्लेम आला नाही. मी तर आता लग्नासाठी अधीर झालो होतो.

एक दिवस तिचा फोन आला . तिला जॉब मिळाला होता. सरकारी काम आउटसोर्स केलेल्या कंपनीकडून तिची निवड झाली होती. पण त्यासाठी तिला दूरच्या खेड्यात जावं लागणार होतं. अजून तरी केव्हा ते कळलेलं नव्हतं. दीपा आता जाणार या जाणिवेने तिचा सहवास मिळावा म्हणून तिला विचारल्याशिवाय सरप्राइज म्हणून शनिवारची सिनेमाची दोन तिकिटं काढली होती . एक दिवस तिचा फोन आला " मला तुझ्याशी काही बोलायचंय " मी तिला उत्साहाने शनिवारची शेवटच्या शोची दोन तिकिटं काढली असल्याचं सांगितल.... त्यावर ती फोन करून सांगते असं म्हणाली. तिचा फोन आला नाही. याचा अर्थ ती घरीच आहे असा मी घेतला. शनिवारी अचानक पाऊस पडला. थंड वाऱ्याबरोबर मातीचा गंध आणि ओलसरपणा वातावरणातील मादकता वाढवीत होता. आता मी तिकिटं काढल्याचा शहाणपणाच केला असं वाटू लागलं......... रात्रीचा शो आणि बरोबर दीपासारखी रूपगर्विता. ती रस्त्याने जाताना तिच्याकडे एकदा पाहणारा माणूस पुन्हा वळून पाहातच असे. ओव्हल शेप चेहरा , चकचकीत डोळे , थोडंसं अपरं नाक , नाजूक शिडशिडित बांधा , टोकदार पण नाजूक छाती आणि लाल गोरेपण तिला शोभून दिसत होतं. खरंतर आकर्षक वर्णन करायला मी काही लेखक नाही. यातच तुम्ही समजून जा. . मी फारच अधीर झालो होतो. हाफ डे असल्याने वेळ झाल्यास दीपाकडे राहण्याचा माझा मानस होता. मी दीपाला फोन लावूंन पाहिला. तीनचार वेळा लावल्यावरही " ये नंबर मौजूद नही है किंवा धिस नं. इज नॉट रीचेबल " असली उत्तरं आल्याने माझा विरस झाला. घाईघाईने गाडी काढली. पावसाची रिपरिप चालूच होती . मला थंडीपेक्षा पावसाळा आवडतो. त्यात मादकता जास्त असते. . वातावरणाचा परिणाम दुसरं काय ....? दीपाच्या सोसायटीत एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे दोन पार्किंग्ज. तिचं घर माझ्या घरापासून सहासात किलोमिटर लांब होतं. तुम्हाला वाटत असेल की माझ्या आईवडिलांचा काहीच रोल नाही की काय . मी प्रत्येक खबर आईपर्यंत पोचवीत असे. अगदी दीपाचे फोटो आणि व्हीडीओ सुद्धा. आई खूष होती. इतकी सुंदर मुलगी आपल्या घरात येणार म्हंटल्यावर तिचे सारखे फोन यायचे. कधी कधी दीपा पण आईशी चॅटिंग करीत असे. मी जवळ जवळ अर्ध्या तासाने दीपाच्या सोसायटीत शिरलो. जाताना गजरा न्यायला विसरलो नव्हतो. कारण आमचा तो एक कार्यक्रम असायचा. थेटरच्या अंधारात तिच्या केसात गजरा माळणं आणि हक्काचं चुंबन घेणं‍ . याची तिलाही नशा येत असे. मी अजूनपर्यंत तरी स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करीत नसे. पण दीपाचे पप्पा मात्र करीत आणि मला ऑफरही करीत. पण माझा नकार पक्का असे. आठ वाजत होते . मी दीपाच्या घरावरची बेल वाजवली. पप्पांनी दार उघडलं. आत शिरत मी दीपाबद्दल विचारलं आणि सिनेमाला जाणार असल्याचंही बोललो . पण पप्पांनी मात्र दीपाने जॉब जॉइन केल्याचं सांगितलं.. विरस आणि राग या दोन्ही भावना माझ्या चेहऱ्यावर दिसत असाव्यात. पप्पा म्हणाले, " आत्ताच तर सात वाजता गेली ती. तुम्हाला फोन करायचा खूप प्रयत्न केला तिनी. पण तुमचा फोन नॉट रीचेबल येत होता. " माझ्या खिशातला गजरा सुकत चालल्याचा मला भास झाला. माझे खांदे निराशेने पडले असावेत. पप्पा माझ्याजवळ येऊन खांद्यावर हात ठेवीत म्हणाले " टेक इट ईझी, अविनशराव. आपण तिला परत फोन लावू. " मी कपाळावरचा घाम पुसला. सगळी मादकता आणि आकर्षण एका क्षणात उतरलं..........

पप्पांनी दीपाला फोन लावायचा प्रयत्न केला. पण फोनने कसमच खाल्ली होती, की लागायचंच नाही म्हणून.दोन तीन वेळा प्रयत्न करुनही फोन लागेना. तेव्हा माझा पेशन्स संपला. मी चिडून म्हणालो, " पाहिलत, हे असंच ही करते. हेच माझ्या हातून झालं असतं तर ही काय वाट्टेल ते बोलली असती मला. काय झालं होतं मला काल नाहीतर परवा भेटली असती तर. " ......माझा त्रागा त्यांना समजत होता. " खरतर, मला मिळणारं सूख नाहीसं झालं होतं .म्हणून माझी चिडचिड होतहोती.तेवढ्यात आतल्या दरवाज्यातून ताई बाहेर आल्या. मी रागान त्यांच्याकडे पाहिलं. एखाद्या तरुण माणसासमोर तमाशा करणं, कोणालाही आवडतं. तो तुमच्या इतकाच विचलीत होऊन तुमची बाजू उचलून धरतो. मी ताईंकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. अचानक माझं मन म्हणालं अरे तिला यायला सांग ना. दीपा नही तो दीपाकी ताईही सही. माणसाचं मन इतकं थर्ड क्लास विचार करीत असेल असं वाटलं नाही. मी जोरात मान झटकीत स्वत:शीच पुटपुटलो.मी काही असलं करणार नाही. ते पप्पांनी ऐकलं असावं. ते चटकन म्हणाले," अहो काय करणार नाही तुम्ही......? " मी काही नाही म्हणालो पण मग खिशातून तिकिटं काढून ती टीपॉय वर आपटत म्हणालो. " याचं काय करणार ,फेकून देऊ. ? या दीपाला अक्कलच नाही, " मनातला सुप्त विचार आता बलवान होत होता. आणि सभ्य विचार घाबरटपणाने विरले होते. मग मनाने सुचवलं ,अरे ती बघ तयार होऊन आल्ये. . मी ताईंकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. आज त्या जास्तच आकर्षक दिसत होत्या. ताईंनी मला चांगलीच फूस लावली होती. मग माझ्या मनात आलं, ताई आली तर तर तर .......???. ताईने मेक अपही चांगला केला होता. एव्हाना त्यानी लावलेला गुलाबाचा मादक परफ्यूम खोलीभर दरवळू लागला. तेवढ्यात पप्पा म्हणाले, " असं काय करता ?, मी शेजारी विचारुन येतो, शेजारचे मि. आणि मिसेस दाबके जातायत का ते......" असं म्हणून तिकिटे उचलण्यासाठी ते खाली वाकले. पण ताईच मधे म्हणाल्या, " ते किती वयस्कर आहेत , आणि सिनमा तरुण जोडप्यांसाठी आहे. विचार करा जरा. " पप्पांनी तिकिटं खाली ठेवली.त्यावर मी तिकिटांकडे न पाहता उठलो आणि म्हणालो," चला मी निघतो . " त्याचा आश्चर्यकारक परिणाम होईल असं वाटलं नव्हतं.... अचानक ताई म्हणाल्या ," चला मी येते तुमच्या बरोबर... चालेल ना ? ..पाठमोरा झालेला मी मान मागे वळवून आश्चर्यचकितपणे त्यांच्याकडे पाहू लागलो. पप्पाचं तोंड भीतीवजा आश्चर्याने उघडे राहिले. धक्का आणि अमान्य निर्णय याने त्यांची कुतर ओढ होताना मला जाणवली पण माझ्या मनासारखं घडत असल्याने मी भोळसट भाव तोंडावर आणले.जाणारा मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन बसलो. पप्पांच्या कपाळावर क्षणभरापुरती आलेली आठी माझ्या नजरेतून सुटली नाही. कदाचित मी पुन्हा येऊन बसलो हे त्यांना आवडलं नाही.किंबहुना मला विषयाचं वळण अपेक्षित होतं असं त्याना वाटल्याचं मला दिसलं.मी तसंच जायला हवं होतं , पण बरेच दिवसांबद्दलचं ताईंचं आकर्षण मला जास्त प्रबळ वाटलं. काहीतरी विचारायचं म्हणून मी ताईंना चांचरतच ( खोटेपणाने) विचारलं," तुम्ही खरंच येणार आहात ....? मी काय तिकिटं फाडून मोकळा होईन. " पण पप्पाचा विश्वास बसलेला मला दिसला नाही. त्यानी मान फिरवली. असं म् हणून तिकिटं काढून फाडायला घेतली. ताई पटकन माझ्या हातातून तिकिटं काढून घे त म्हणाल्या, " मी म्हंटलं ना येईन म्हणून, होय की नाही हो पप्पा ? " ... ते मान खाली घालून न पटताही म्हणाले, " अं ! हो हो .."

कदाचित ताईला नाराज करणं त्याना परवडण्यासारखं नसावं. ताईंच्या अंगाचा पर्फ्युम मिश्रित वास माझ्या नाकात शिरला. पावसाला बाहेर उधाण आलं होतं. सुरवातीचाच पाऊस एवढ्या जोरात पडताना प्मोरथमच पाहत होतो.पप्पा समोर नसते तर मी ताईंना जवळ ओढल्याच असत्या. माझ्या अंगात ताई एखाद्या व्हायरस सारख्या भिनत चालल्या होत्या. ...... "ताई अतिशय practical वागते.
पहिल्या पासूनच ती तशी आहे. " पप्पा नक्की कोणत्या भावनेने बोलले मला कळलं नाही. मी म्हणालो, " चला तर मग आपल्याला निघायला हवं.
दहा मिनिटातच आम्ही निघालो. जाताना पप्पा म्हणाले " सांभाळून जा, आणि यायला उशीर होणार असेल तर आजची रात्र इथेच राहिलात तरी चालेल. चार खोल्या आहेत काय? " मला पप्पांची कींव आली.. ताईना नाराज करण्याची संधी ते हेतूपूर्वक घेत नव्हते. गाडी पर्यंत ताई माझ्या बरोबरीने चालत होत्या . त्यांच्या मांसल दंडाचा स्पर्श मला जाणवत  होता. मी गाडी उघडली ताई माझ्या शेजारी फ्रंट सीटवर गाडीत बसल्या मी चोरट्य नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. त्या आनंदात दिसल्या त्याना घाम का येत होता कळलं नाही. त्या प्रथमच एका तरुण पुरुषा बरोबर बाहेर जात असाव्यात. तुम्ही म्हणाल ही काय पटावळ लावल्ये पुढे सांगा की. गाडी सुरू केली. ताईंना चोरट्या नजरेने मी न्याहाळत होतो. पंधरावीस मिनिटांमधे आम्ही थेटरजवळ पोहोचलो. गाडी लावली आणि कशीतरी लॉक करुन धावतच थेटरमधे शिरलो. मल्टिप्लेक्सचं नाव होतं. " दी रेनी मल्टिप्लेक्स" . आता ताईंचा हात हातात घेऊन मी बिनधास्त चालत होतं. अधूनमधून ताईंचा होणारा स्पर्श आणि गंध मला सुखावीत होता. या सगळ्यात माझ्या मनात एकदाही दीपाचा विचार आला नाही. चित्रपट मराठी होता. नाव होतं " रेशमी नाती " . आम्ही ऑडिटोरियम मधे पोहोचलो.आमच्या सिटा शेवटच्या लाईन मधली एका कोपऱ्यातल्या होत्या. सिटकडे जाताजाता माझा हात आता ताईंच्या गळ्यात गेला त्यांनीही माझ्या हातात हात गुंफला. आम्ही स्थानापन्न झालो. जेमतेम आम्ही धरुन चारपाचंच जोडपी होतो. अंधार झाला चित्रपट चालू झाला. मी अंधारातच ताईंच्या कानात कुजबुजलो. " ताई गजरा आणलाय , तुमच्या केसात मी माळला तर चालेल का ? " प्रतिक्रिया रागीट येईल या अपेक्षेने माझी छाती धडधडली. पण तसं काहीच झालं नाही. उलट ताई  लाजत थोड्या पाठमोऱ्या होऊन म्हणाल्या ," माळा.... " माझा जीव भांड्यात पडला . तरीही थरथरत्या हाताने मी तो माळला. माझा हात त्यांच्या केसांवरुन गळ्यावर फिरला . केसातला वास आणि गुलाबाचा पर्फ्यूमयाने मी धुंद झालो. . ताई रोमांचित होत होत्या . त्यांनी चेहरा हळूहळू माझ्याकडे वळवला आणि त्या माझ्या मिठीत विसावल्या .  त्या माझ्या केसांतून  हात फिरवित राहिल्या. त्यांच्या ऊष्ण आणि अधीर श्वासांनी मला वेढलं.  मी त्यांना म्हणालो, " आय लव्ह यू ताई, आय रियली लव्ह यू...." " ताई म्हणू नका गायत्री म्हणा ," ..त्यावर त्या अधिकच बिलगल्या परंतू लगेचंच भानावर येऊन बाजूला पण झाल्या. लवकरच लाईट लागले. मध्यंतर झाला होता. इतर जोडपीही हळूहळू एकमेकांपासून बाजूला झाली.. त्यांना मी तुम्ही काही खाणार का म्हंटल्यावर नाही म्हणाल्या. तरीही बाहेर जाऊन दोन चोकोबार आणले..


उरलेला चित्रपट आम्ही  जेमतेमच पाहिला . मध्यंतरा आधीची पुनराव्रुत्ती झालीच होती. चित्रपट संपला आम्ही बाहेर आलो . हातातला हात ताई पण सोडायला तयार नव्हत्या. वीसपंचवीस मिनिटांनी आम्ही घरी पोहोचलो. ताईंचा चेहरा समाधानाने उजळला होता. गेटजवळ गाडी थांबवून मी गुडबाय म्हणालो, " गुडबाय ताई, सॉरी , गायत्री ! " ......असं म्हणून मी निरोप घेण्यासाठी खाली उतरलो. त्यावर ती म्हणाली," हे काय आज इथे राहताय ना ..... ? " तिला जवळ घेत म्हणालो, " पुन्हा केव्हातरी. ..."
त्यावर ती म्हणाली," पुढच्या शनिवारी या. रात्री राहा सकाळी दीपा पण येईल. गप्पा वगैरे मारु तिला घेऊन बाहेर जेवायला जाऊ. " मी म्हंटलं ," हो ,पण दीपा रविवारी येणार असेल तर मीही रविवारी येईन. शनिवारी येऊन काय करु. " ....... " हो पण आत्ताचं राहणं उधार राहीलं, त्याचं काय ? आणि पप्पाना काय सांगू . या की आपण तिघे मिळून गप्पा मारु. मधेच तोडीत म्हंटलं ," पप्पा कशाला हवेत ? ते काय गप्पा मारणार ? पण दोघंच असलो तर बिघडणार आहे का ? .." ...."खरंतर तुम्ही आज राहायला पाहिजे होतं. " ती आग्रहाने म्हणाली. ती एवढा आग्रह का करीत होती मला समजेना , कदाचित मला ते पुढे कळावं अशी योजना असावी. खरं म्हणजे मी आजचं मरण पुढे ढकलंल होतं असं मला पुढे घडलेल्या घटनांवरुन वाटलं. असो मी तिला जवळ घेऊन ओझरता किस देऊन निघालो.... काय कोण जाणे पण तिच्या डोक्यात वेगळंच चाललं असावं असं वाटतं. असलं फीलिंग मला दीपा बरोबर कधीच आलं नाही कदाचित आम्ही.दोघांनी एकमेकाना स्वीकारलं असावं . नाहीतरी दीपाची आणि माझी चार वर्षांची जवळीक होती. त्यामुळे ती माझ्यात पूर्णपणे मिसळली होती. इथे तसं नव्हतं ताई व्हायरस होत्या. अचानक संसर्गा सारख्या आणि एकच दिवस जवळीकीला झालेला होता..एकमेकांची ओळख जेमतेमच झालेली. मी गाडी स्टार्ट केली आणि निघालो. ताईंनी हात हालवला. पण डोळे मात्र कठोर वाटले। घरी पोहोचलो तर दीड वाजला होता. अचानक फोन वाजला . दीपाचा फोन होता. ," अरे मी पुढच्या रविवारी घरी येणार आहे. म्हणजे माझा प्रोजेक्टही संपेल आणि मी तुझ्याबरोबर भटकायलाही फ्री असेन. " मी ठीक आहे म्हंटलं त्यावर ती म्हणाली, " ए, रागावलास ? अँम सॉरी यार. " मी फोन बंद करुन टाकला. तिचा दोनतीन वेळा फोन आला पण मी बंद केला. अंथरुणावर पडल्या पडल्या मला ताईंचे कठोर डोळे आठवले. अचानक मला दीपाशी प्रतारणा केल्यासारखं वाटलं. मी विचलित झालो. मी ताईंशी एवढा उत्तेजित होऊन का वागलो मला कळेना. पण तिचा प्रतिसाद मिळाला होता .  तशीही ती नामानिराळी होणारी होती . तिच्या कठोर डोळ्यांचा अर्थ मला असा लागला .
लवकरच मी झोपेच्या आधीन झालो. ......उरलेला चित्रपट जेमतेमच पाहिला मध्यंतरा आधीची पुनराव्रुत्ती झालीच होती. चित्रपट संपला आम्ही बाहेर आलो . हातातला हात ताई पण सोडायला तयार नव्हत्या. वीसपंचवीस मिनिटांनी आम्ही घरी पोहोचलो. ताईंचा चेहरा समाधानाने उजळला होता. गेटजवळ गाडी थांबवून मी गुडबाय म्हणालो, " गुडबाय ताई, सॉरी , गायत्री ! " ......असं म्हणून मी निरोप घेण्यासाठी खाली उतरलो. त्यावर ती म्हणाली," हे काय आज इथे राहताय ना ..... ? " तिला जवळ घेत म्हणालो, " पुन्हा केव्हातरी. ..."
त्यावर ती म्हणाली," पुढच्या शनिवारी या. रात्री राहा सकाळी दीपा पण येईल. गप्पा वगैरे मारु तिला घेऊन बाहेर जेवायला जाऊ. " मी म्हंटलं ," हो ,पण दीपा रविवारी येणार असेल तर मीही रविवारी येईन. शनिवारी येऊन काय करु. " ....... " हो पण आत्ताचं राहणंउधार राहीलं, त्याचं काय ? आणि पप्पाना काय सांगू . या की आपण तिघे मिळून गप्पा मारु. मधेच तोडीत म्हंटलं ," पप्पा कशाला हवेत ? ते काय गप्पा मारणार ? पण दोघंच असलो तर बिघडणार आहे का ? .." ...."खरंतर तुम्ही आज राहायला पाहिजे होतं. " ती आग्रहाने म्हणाली. ती एवढा आग्रह का करीत होती मला समजेना , कदाचित मला ते पुढे कळावं अशी योजना असावी. खरं म्हणजे मी आजचं मरण पुढे ढकलंल होतं असं मला पुढे घडलेल्या घटनांवरुन वाटलं. असो मी तिला जवळ घेऊन ओझरता किस देऊन निघालो.... काय कोण जाणे पण तिच्या डोक्यात वेगळंच चाललं असावं असं वाटतं. असलं फीलिंग मला दीपा बरोबर कधीच आलं नाही कदाचित आम्ही.दोघांनी एकमेकाना स्वीकारलं असावं . नाहीतरी दीपाची आणि माझी चार वर्षांची जवळीक होती. त्यामुळे ती माझ्यात पूर्णपणे मिसळली होती. इथे तसं नव्हतं ताई व्हायरस होत्या. अचानक संसर्गा सारख्या आणि एकच दिवस जवळीकीला झालेला होता..एकमेकांची ओळख जेमतेमच झालेली. मी गाडी स्टार्ट केली आणि निघालो. ताईंनी हात हालवला. पण डोळे मात्र कठोर वाटले। घरी पोहोचलो तर दीड वाजला होता. अचानक फोन वाजला . दीपाचा फोन होता. ," अरे मी पुढच्या रविवारी घरी येणार आहे. म्हणजे माझा प्रोजेक्टही संपेल आणि मी तुझ्याबरोबर भटकायलाही फ्री असेन. " मी ठीक आहे म्हंटलं त्यावर ती म्हणाली, " ए, रागावलास ? अँम सॉरी यार. " मी फोन बंद करुन टाकला. तिचा दोनतीन वेळा फोन आला पण मी बंद केला. अंथरुणावर पडल्या पडल्या मला ताईंचे कठोर डोळे आठवले. अचानक मला दीपाशी प्रतारणा केल्यासारखं वाटलं. मी विचलित झालो. मी ताईंशी एवढा उत्तेजित होऊन का वागलो मला कळेना. पण तिचा प्रतिसादही मिळाला होता. ती तशी वखवखलेली वाटली. पुरुषी स्पर्शासाठी आसुसलेली. तरीही नामानिराळी होणारी. तिच्या कठोर डोळ्यांचा अर्थ मला असा लागला .
 

(क्रमशः)