वाण नाही पण गुण लागला !

काही वेळा खेळता खेळता मुलं नसते उद्योग करून ठेवतात आणि जीवाला हा घोर लावतात. अशाच एका उपद्व्या?

नऊ दहा वर्षाचा असेल तो तेव्हा. रात्री आठ साडे आठ ची वेळ. मुलांचे होमवर्क वगैरे चाललेलं मधूनच हसणं खिदळणं पण चालू होता. मी बहुतेक स्वयंपाक करत होते. नवरा ऑफिस मधून आला नव्हता.अचानक शांत झालं सगळं ( आमच्याकडे शांतता generally वादळापूर्वीचीच असते). मग दोघांचीही कुजबुज, दबका आवाज, काय झालं वाटेपर्यंत टोटल panic होऊन पळतच आला.

"आई हे बघ काय झालंय. " आता almost रडायला आलेला. त्याने खेळता खेळता टॅग स्ट्रिंग बोटा भोवती आवळलेली.सुरुवातीला दोघं मिळून काढायचा प्रयत्न करत होते तर ती जास्तच आवळली गेली. कात्रीने कापायचा प्रयत्न निष्फळ ठरला. आता बोट काळनिळं झालेलं. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. मुलांना पटापट जॅकेट्स घालायला सांगितली. तो तर फुल्ल on चालु झालेला, " I may have to lose my finger. It's turning blue..."

गाडी नवरा घेऊन गेलेला. मी Uber book करायला लागले. मिनिट मिनिट महत्त्वाचं होत.  इकडे ह्याचा वेगळाच सुर लागला.

" Call Dad""अरे करते नंतर. मला Uber तर book करू दे.

"First call him. He should know, his son is in danger. "

"हो ..हो.." इकडे Uber waiting time संपता संपत नव्हता. 

"हो नाही, आत्ता कर. He is my father.  Legally he is bound to be told about this immediately.. "

इकडे मला डोक्याला हात लावायला पण फुरसत नव्हती. तेवढ्यात msg आला. दोन मिनिटात Uber आली. आम्ही गाडीत बसलो. आणि मग मी त्याच्या Father la phone करून सांगितलं. पाच मिनिटात ER madhe घुसलो. तिकडे जो attendant होता त्याने मी काही explain करायच्या  आधीच त्याने क्षणभर त्याच्या बोटाकडे बघितलं. आणि त्यांच्याकडच्या स्पेशल scissors ने टॅग string कापून टाकली. "When did it happen?"

"Twenty minutes back."

"Ok wait for fifteen mins, if he feels normal you are good to go"

दोनच मिनिटात बोटाचा रंग पूर्ववत व्हायला लागला. तेवढ्यात त्याचा Father पण आला धापा टाकत. पंचवीस तीस मिनिटाचा सगळा घोळ एका सेकंदात सुटला! पण त्या तेवढ्या दहा एक मिनिटात येवढ्या वेदना आणि घाबरलेला असतानाही "Legality..."  बोलायला नाही विसरला पठ्ठ्या . तीन चार वर्षे इकडे (US) राहून वाण नाही पण गुण लगेच लागला.