तडजोड (भाग 17) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

तडजोड (भाग 17) 

( माघील भागात आपण पाहिले रात्री भेटण्याचे प्रॉमिस करून वेदिका निघून जाते) 

आता पुढे ..............

आज वेदिका व अजय ची हळद असते, 
पांढऱ्या कुर्त्या मध्ये अजय व पिवळी साडी घालून वेदिका अजूनच खुलून दिसत होते, 

वेदिका ची हळद अ अक्षणापासून निघाल्यामुळे घरातील एकमेव अ अक्षणापासून नाव चालू होणाऱ्या  आसावरी (आत्या) 
यांनी वेदीकाला पहिली हळद लावली, 
अगोदर च गोरा रंग, 
त्यात अंगावर पिवळी साडी, 
त्या हळदीने अजूनच खुलली होती वेदिका 

यार ही खरच किती सुंदर दिसते, 
आज मारणार बहुतेक मला, 
अजय मनातच म्हणाला, 

पण या गोऱ्या रंगाची स्माईल कुठे गेली काय माहीत, त्याला पडलेला प्रश्न 

तो सारखा सारखा तिच्याकडे बघत होता, 
कधीतरी एक नजर होईल व ती स्माईल देईल म्हणून, 
पण वेदिका ने एकदाची मान खाली घातली ती विधी झाल्यावरती च वर केली, 


तेवढ्यात कुणीतरी म्हणाले 
वहिनी इतके लाजू नका, 
आम्हाला माहीत आहे सगळं 
आणि एकदम सगळे हसू लागले, 

या सगळ्या आनंदाच्या वातावरणात वेदिका मात्र तिच्याच धुंदीत होती, 


हळद लागली, 
सगळे आपापल्या कामाला निघून गेले, दिवस सर्वांचा व्यस्त च गेला, उद्या लग्न म्हणून , कुणी मेहदी काढत  होते, तर कुणी डेकोरेशन च बघत होते, थोडक्यात काय तर सगळे बिझी,

रात्री चे जेवण आटोपून सगळे पुन्हा आपोआपले व्यस्त, 

वेदिका देखील रूम मध्ये गेली, 
अजय कॉल करणार हे तिलाही माहीत होते, त्यामुळे ती सर्वांची नजर चुकवून टेरेस वर येऊन थांबली, 
पुन्हा आपण खाली दिसलो नाही तर अजय गोधळ घालेल, 
म्हणून त्याला 
मेसेज करून ठेवला, 

टेरेस वर आहे 
लवकर ये, वेदिका 


वेदिका चा मेसेज दिसताच 
अजय वरती निघाला, 
मधेच आत्या भेटल्या, 

काय नवरदेव 
कुठे निघाली स्वारी, 
आत्या 

कुठे नाही ....
ते .....
म्हणजे.....
इथेच , अजय 
त्याचा कापणारा आवाज बघून आत्या हसू लागल्या, 

अहो जवाईबापू इतके काय घाबरताय, आत्या 


नाही ना , 
म्हणत अजय निघून गेला, 


धावत वरती गेला, 
धापा टाकत म्हणतो, 
सुटलो एकदाच अजय


का रे काय झालं, 
वेदिका


अरे का 
काय झालं काय 
तुझी आत्या आहे की कोण ??
सतत लक्ष असत 
कुठे चालले 
काय करता, 
जवाईबापू हे 
जवाईबापू ते
अजय 


हा हा ..........
हो का वेदिका हसत म्हणाली, 


तू हसतेस , अजय 

अरे ती तर म्हणते ती सोबत येणार आहे माझ्या सासरी , वेदिका 


ये बाई काही नको 
ती सोबत ...
व ती जर येणारच असेल ना तर तू पण नको येऊ, 
दोन दिवसात जगन मुश्कील केलं तुझ्या आत्या ने, 
ते मामा कसे झेलत असतील काय माहीत, 
अजय वैतागून म्हणाला 

काही पण काय बोलतो रे, तुझी गंम्मत करते ती, तू गडबडतो म्हणून बाकी मनाने खुप छान आहे ती वेदिका 


असू दे तुझी छान तुझ्याकडे, अजय 


बर ते जाऊ दे , तुझे तोंड का पडले, ये बग खरं खरं सांग, 
तुला जर नको असेल हे लग्न तर अजूनही आपण थांबू 
पण तू नाराज नको राहू रे, 
Please बोल , 
आता तुझी प्रत्येक गोस्ट तू मला हक्काने सांगू शकते, 
अजय 


माहीत नाही रे काय होतंय पण खुप वेगळं वाटतंय, 
सगळी माणसे तुटतील , माझे घर माझ्या बालपणी च्या आठवणी, या घरावरील माझा हक्क, सगळंच संपेल, 

पुन्हा नव्याने सगळं सुरू होईल, नवीन माणसे, नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या, मला जमेल का रे सगळं नीट व नाही जमल तर 
आई च्या पंखाखाली वाढलेली मी तक धरेल का रे तुझ्या संसारात, 
आदर्श सून, 
आदर्श पत्नी 
म्हणून भूमिका निभावता येईल का रे??

असे बोलून  ती रडू लागली, 

ये वेडे, अजय तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला, 
अग तू परक्या घरी थोडीच जातेय ते घर तुझं असेल हक्कच, 
व एका आई चा पदर संपला तर काय झालं दुसरी आई मिळेल ना तिकडे, 
आई कोण म्हणतं तुला जबाबदारी पेलवणार नाही 
माझी स्मार्ट बायको आहेस तू तुला सगळं जमेल व मी आहे की तुझ्या सोबत व राहिला तुझ्या माहेरी येण्याचा प्रश्न तर मॅडम जेव्हा वाटेल तेंव्हा येत जा, 
नाही आपण दोघेही येत जाऊ मग तर झालं, 

मला जास्त काही माहीत नाही पण एक ठामपणे सांगू शकतो, 
लग्नानंतर तुझ्या आयुष्यात कुठलाच बदल होणार नाही, 
ना वागण्यात 
ना बोलण्यात 
ना राहणीमानात 
तुला जसे वाटेल तसे राहा, 
तुझे आयुष्य तुझे असेल त्यावर फक्त तुझा अधिकार असेल, 
अजय तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, 
 आता वेदिका ला बरे वाटले, 
तिच्या मनात कालपासून चाललेली घालमेल थांबली होती, 
ती भीती नाहीशी जरी नसली झाली तरी कमी नक्कीच झाली होती, 


किती छान ना, 
आज आपल्या आयुष्यातील मित्र मैत्रीण म्हणून  शेवटचा दिवस, 
उद्या आपण नवरा बायको होणार , 
खुप लोक तरसतात मैत्री चे नाते
प्रेमात रूपांतरित करायला पण सगळ्यांना च हे शक्य होत नाही, 
पण आपले किती सहज सोपे झाले ना, अजय 

हो ना , 
मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता, 
तू जोडीदार म्हणून भेटशील, वेदिका 


ये..........
नशीबवान आहेस तू...
अजय 

हो आहेच मी नशीबवान 
जे मला आता कळले तुझ्या बोलण्यातून, वेदिका, 

हम्मम्म्मम, 
मलाच हे पटत नाही रे की मुलीने लग्न झाले की स्वतः ला बदलून टाकावे, 
उलट तिने तिचे अस्तित्व जपावे 
घरातील माणसाची मने जोडत, 
तिने सासर व महेर यातील दुवा बनावे, 
तिने घरात स्वतः चे स्थान इतके मजबूत करावं की ती नसताना तिची उणीव भासली पाहिजे, 
अजय 

नक्कीच 
आणि मी तुझ्या सगळ्या कसोट्यावर उतरण्याचा प्रयत्न करेन 
फक्त तू सोबत राहा, वेदिका 


मी कुठे जातो आता तुला सोडून, 
अब जीएगे तो साथ साथ 
ओर मरेंगे भी साथ साथ ,अजय 

काहीपण काय बोलतोस वेदिका 

दोघांचे बोलणे खुप वेळ चालले होते, रात्री चे 12 कधी वाजले त्यांना कळलेच नाही, 

हळूहळू गुंफली गेलेली ही प्रेमाची वीण आणखी घट्ट होईल की नजर लागेल तिला कुणाची, 

जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
फॉलो करा, 
खुप साऱ्या लाईक व कॉमेंट्स करा, 

क्रमशः ......

धन्यवाद

🎭 Series Post

View all