तडजोड (भाग 9) प्रेमानंतर चे विदारक सत्य

A love story

तडजोड भाग (9) 

(माघील भागात आपण पाहिले वेदिका अजय च्या वागण्याने खुप दुखावली गेली होती )

आता पुढे...............

वेदिका ला स्वतः च्या वागण्याची खुप चीड येत होती, 
तिला सारखे सारखे वाटत होते की " मी का गेले तिथे,

त्याची पर्सनल लाईफ आहे, 
व मी त्यात इंटरफेअर का करावं, 

तिला इतका राग आला की ती न जेवता च झोपी गेली, 

तिकडे अजय प्रॅक्टिस करून रूम वरती गेला, 
पण त्याला सतत तोच प्रसंग आठवत होता , 
त्याला अपराधी वाटत होतं 
कळत होतं काहीतरी चुकले पण काय ते कळत नव्हते,

त्याला नेमकं कशाचे वाईट वाटत होते,
 वेदिका चे त्याच्यावर हक्क गाजवणे,
 की
 तिला ढकललं त्याचे, 
त्याला काही कळेना, 
त्याचे कुठेच मन लागत नव्हते, 
तो जेवण न करता तसाच झोपला, 
शशांक रूम वर आला, 
अजय ची अवस्था बघून , 
मग कॉल कर ना वेदीका ला शशांक म्हणाला, 

पण काय बोलू कॉल वर अजय, 

तिला खुप वाईट वाटले असेल ना रे, 

दोघे एकमेकांचा विचार करताय हे बघून शशांक ला हसू आले, व त्याने काय ओळखायचे ते ओळखले, 

अजय काही कॉल करत नाही पण तसाच झोपी जातो, 

दुसऱ्या दिवशी ते कॉलेज ला जातात पण वेदिका कॉलेज ला येत नाही, 
का ????
नसेल आली ती, 
अजय चे कुठेच मन लागत नाही, 
आज तो प्रॅक्टिस ला पण जात नाही , 
कदाचित कधीच येणार नाही मी असे देखील सांगून टाकतो, 

ये शशांक आरती ला कॉल करून विचार ना वेदिका का नाही आली, अजय,

का पण जाऊ दे ना 
तुला काय करायचं , शशांक

कर ना please,  अजय 

शशांक आरती ला कॉल करतो,

व वेदिका  ची चौकशी करतो, तेव्हा त्याला समजते, वेदिका आजारी आहे, 

हे ऐकताच अजय तिला भेटण्यासाठी विनंती करू लागतो, 

वेदिका आजारी असूनही आरती तिला घेऊन

येते अजय ला भेटण्यासाठी बाघेत, 

सर्वत्र शांतता असते, 
कुणीच कुणाला बोलत नाही, 
पण मग काहीतरी बोलावं म्हणून शशांक बोलतो, 
ये आरती चल मी तुला पूर्ण बाग दाखवतो, 
आता बाग,
 बाग असते 
तिला काय बघायचं ती कंटाळा करत बोलते.

शशांक पुन्हा तिला फोर्स करतो व घेऊन जातो,
आता फक्त अजय व वेदिका , आणि सोबतीला भयाण शांतता, 
कुणीच कुणाला बोलत नाही, 
बोलायचे दोघांना असते पण सुरवात कोण करेल????
व कुठून हे कुणालाच कळतं नाही, 
दोघांची नजरेला नजर होते, 
सॉरी , सोबत बोलतात, 
नाही मीच सॉरी, पुन्हा सोबत, 

दोन वेळा सोबत सोबत बोलले म्हणून आता ते हसायला लागतात, 

तेवढ्यात अजय, वेदिका चा हात हातात घेतो व म्हणतो, 
ये वैदू खरच सॉरी, 
माझं चुकलं, 

आपला दुसरा हात अजय च्या हातावर ठेवत वेदिका नाही रे माझेच चुकले, मीच खुप ओव्हर रिऍक्ट झाले, 
तू फक्त डान्स तर करत होतास 
पण मी इतके नव्हते करायला पाहिजे, 

नाही रे तुझे बरोबर होते, 
ती मुलगी व तिचा ग्रुप कसा आहे माहीत असूनही,
मी अडकलो होतो त्यांच्यात, 
अजय आपली चूक कबूल करत बोलला, 

तुमचे आभार प्रदर्शन झाले असेल तर आम्ही येऊ का आता.

शशांक हसत हसत म्हणाला , 
 वेदिका हातातील हात सोडवत 
ये रे , 
असं म्हणते, 

चला, म्हणजे एकदाच संपलं सगळं, 
शशांक पुन्हा त्यांना चिडवत म्हणाला, 

संपलं कुठे, 
आता तर चालू झालंय, 
आरती पुन्हा चिडवण्यासाठी म्हणाली, 
हे दोघे आपली फिरकी घेताय 
हे लक्षात येताच अजय म्हणतो, 
चला कॉलेज सुटलं , 
निघुयात, 

सगळे निघून जातात, 
वेदिका व अजय आज जोडले गेले होते पुन्हा एका नव्या ऋणानूबंधाने , 

टिकेल हा बंध असाच ??????
की 
येईल मध्ये आणखी वादळ ????
"जाणून घेण्यासाठी 
सोबत राहा,फॉलो करा,

🎭 Series Post

View all