Jan 27, 2021
प्रेम

तडजोड (भाग 8) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Read Later
तडजोड (भाग 8) प्रेमानंतर चे विदारक सत्य

तडजोड (भाग 8) 

(माघील भागात आपण पाहिले 
वेदिका अजय सोबत डान्स करण्यास नकार देते व निघून जाते ) 

आता पुढें .............

वेदिका व अजय असे भांडण करून निघून गेल्यामुळे सगळ्यांचा मूड खराब होतो, 

बघू रात्रीतून काही होते का ?
असे सांगून शशांक वेळ मारून नेतो, 

इकडे अजय रूम वर पोहोचतो 
व फ्रेश होण्यासाठी जाणार तोच त्याचा मोबाईल वाजतो, 

Hello 
Who is speking, ajay 

Am priya .........

Will you be my dance partner?

Ya sure 
Ajay, 


अजय च्या आनंदाचा पारावर उरत नाही 
प्रिया कॉलेज ची सगळ्यात सुंदर मनाली जाणारी (मुलांच्या दृष्टीने) मुलगी होती, 

आणि ती मुलगी डान्स साठी स्वतः हुन विचारतेय , 
म्हणल्यावर कोणता मुलगा नाही म्हणेल, 

अजय हो म्हणून मोकळा होतो, 
आज त्याला वेदिका ची साधी आठवणही येत नाही, 


इकडे वेदिका मात्र त्याच्या कॉल चा wait करत बसते, 
तिला नेहमीप्रमाणे तो माझी समजूत काढेल असेच वाटत होते, 

पण अजय ला याचे भानही नसते, 

दुसऱ्या दिवशी अजय लवकर च कॉलेज ला जातो व प्रिया च्या ग्रुप सोबत प्रॅक्टिस देखील चालू करतो 


वेदिका कॉलेज ला येते व लेक्चर करते, 
तिला अजय कुठेच दिसत नाही , 

ती कॅम्पस, कॅन्टीन सगळीकडे शोधते 
पण तो कुठेच नसतो, 

Hi 
अजय ला पाहिलस का ???
ती राघव ला विचारते , 

हो अग 
तो प्रिया सोबत डान्स करतोय , 

प्रिया सोबत डान्स हे ऐकून वेदिका खुप चिडते, 
याला दुसरी मुलगी मिळाली नाही का ?
डान्स करायला असे मनाशी बोलून प्रॅक्टिस हॉल गाठते, 

इकडे अजय व प्रिया ची प्रॅक्टिस चालू असते, 
दिल खो गया हो गया किसिका , 
......................

वेदिका ला येताना बघताच अजय तिला हात वर करून बोलावतो, 

वेदिका जवळ येते व म्युझिक सिस्टीम बंद करते, 

कुणाला काही कळत नाही , 

हे काय करतेस, अजय 

बंद केलंय 
दिसत नाहीये, 
वेदिका, 

अरे हो पण का ?????
अजय 

आपण इथे शिकायला आलोय 
डान्स करायला नाही, वेदिका 


तू काय बोलतेय कळतंय का??अजय 

मध्येच प्रिया बोलते, 
अजय ईला जायला सांग 
अगोदरच सगळं कॉलेज म्हणते 
ही तुझी girl friend आहे, 

 

Girlfriend  व माझी 
अजय हसायला लागतो, 

आता वेदिका खुप चिडते, 
व सरळ अजय चा हात पकडून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, 

अजयला हे आवडत नाही 
तो तिच्या हाताला जोराचा झटका देतो व प्रिया तिला साईड ला ढकलून अजय ला घेऊन जाते, 

प्रिया व तिचा ग्रुप अजय ला घेऊन निघून जातो, 

वेदिका इथे एकटीच राहते, 
तिच्या डोक्याला मार लागतो पण तिला याचे भान देखील नसते, ती तसेच रक्तबंबाळ डोकं घेऊन होस्टेल ला जाते, 


तिला बघताच आरती खुप घाबरते, 
ती शशांक ला कॉल करून बोलावून घेतले, 


आरती तिला खुप प्रश्न विचारते, 
पण वेदिका काहीच बोलत नाही, 
मुळात वेदीकाला स्वतः ची खुप चीड येत असते, 
मी का गेले असेल तिथे ,ती फक्त रडत असते, 

ये माझी स्ट्रॉंग गर्ल 
काय झालं, शशांक 

काही नाही,  वेदिका 

हो 
मग का भांडण केलंस, शशांक 

भांडण आता वेदिका शॉक झाली तिला वाटलं याला कसं कळलं, 

मला सगळं माहीत आहे काय झालं शशांक, 

वेदिका रडू लागली, 
माहीत नाही रे काय झालं, 
पण माझेच चुकलं त्याची लाईफ आहे काय करायचं त्याने ठरवावं , 
मी उगाच भांडत बसले, 

ये वेडा बाई ,
आयुष्यात अस उगाच काहीच होत नाही प्रत्येक गोष्टीला एक कारण असते बर , 

आणि हो काही दिवसांनी हे, अजय च्या पण लक्षात येईल तुझं चिडणे उगाच नव्हते व तो हसत निघून जातो, 

वेदिका विचारात पडते काय कारण असेल??? 
मी का इतकी चिडले, 
पण कारण काहीही असो ,
तो जे वागला ते चुकीचं च आहे, 
मी उगाच त्याला चांगलं समजत होते ,
तो वाईटच आहे ,
त्याला प्रत्येकी व्यक्ती सारखीच वाटते त्याच्यासाठी कुणीच स्पेशल नाही होऊ शकत,

अश्रू सोबत आठवणी ही 
कायमच्या वहाव्यात
नको असलेले क्षण देखील
कायमचे मिठावेत


नको कुठला बंध
ना कुणाची ओढ
जेव्हा बंध चअडकून
 गेलेला असतो विजोड


सहनशक्ती पलीकडे ना 
कुणासाठी झुरावे
निष्काळजी हृदयाचे 
का स्मरण करावे 

येतात आणि जातात 
आयुष्यात कुणी
त्याचीच आस का 
असावी मनीं
 
जाणून घे फरक आता 
खऱ्या चेहऱ्याचा
काळजी असणे व दाखवने
या दुतोंडी पनाचा

का  ढाळावे अश्रू 
जर कदर नसेल 
जो तुम्हांला विसरून
दुसऱ्या सोबत हसत असेल

व हेच आज सत्य होते वेदिका साठी 
तिला अजय ची प्रत्येक गोस्ट आज खोटी वाटत होती, 
खरच अजय खोटं वागला असेल का????
की त्यालाही येत असेल वेदिका ची आठवण जाणून घेण्यासाठी सोबत राहा व मला फॉलो करा, 
धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,