Jan 27, 2021
प्रेम

तडजोड (भाग 7)प्रेमानंतर चे विदारक सत्य

Read Later
तडजोड (भाग 7)प्रेमानंतर चे विदारक सत्य

तडजोड (भाग 7) 
(माघील भागात आपण पाहिले जरी आरती चे कॉलेज बंद केले होते तरीही सत्य कधी ना कधी बाहेर येणार यांचा विचार करून त्यांना भीती वाटत होती) 

आता पुढे .............

अजय व वेदिका कॉलेज ला असतात, 
पण लेक्चर चालू असतानाच वेदिका ला होस्टेल वरून मॅडम चा कॉल येतो.

हॅलो वेदिका का ??

हो मॅडम बोला ना, 

आरती स्टेप्स वरून पडली लवकर ये, 

वेदिका घाबरली ती चालू लेक्चर मधून अजय ला घेऊन हॉस्टेल वर आली, 
तोपर्यंत डॉक्टर आले होते, 
डॉक्टरांनी आरती ला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला सांगितले 
वेदिका व अजय ची तिला ऍडमिट करायची हिम्मत काही होत नव्हती. 
आता काय करावे, 
या सगळ्या गडबडीत ते शशांक ला सांगायचे विसरले होते, 

अजय ने शशांक ला कॉल केला 
व घडलेला प्रकार सांगितला, 

तू काळजी करू नको 
अजय, 
मी सांगतो त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन ये, 

आरती ला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तिची कंडिशन खुप क्रिटिकल होती, 
नर्स एक पेपर घेऊन 
आली व आम्ही दोघांपैकी एकाला वाचवू शकतो बाळ किंवा आई, 
सगळेच हिरमुसल्या गत एकमेकांकडे बघत होते,
तुम्ही आई वाचवा 
वेदिका घाईत म्हणाली, 
हो पण बाळाच्या बाबाच्या साईन लागेल या दोन ठिकाणी तेव्हा हे शक्य आहे, 
वेदिका व अजय एकमेकांकडे बघत होते, वेदिका अजय ला साईन करायला सांगणार तोच,

शशांक पुढे जातो व पेपर वर साईन करतो, 
नर्स, तसे तर दोन्ही वाचतील असेच प्रयत्न करा म्हणतो, 
त्याला डोळ्यात व बोलण्यात खुप विश्वास जाणवत होता, तो अजूनही शांत होता कुठलीही घालमेल जाणवत नव्हती, 


शेवटी अथक परिश्रमाने 
डॉक्टर ने आई ला वाचवले, 

आनंद मानावा की दुःख अशी परिस्थिती होती, 
आरती ने खुप त्रास सहन केला पण तिच्या तडजोडीनेच पुन्हा तिला आयुष्य मिळून दिले, शेवटी शशांक चे प्रेम जिंकले होते, 
स्वच्छ मनाने, व निर्मळ हृदयाने माघीतली गोस्ट मिळते हे आज सिद्ध झाले होते, 
या सगळ्या गडबडीत 
त्यांच्या परीक्षा जवळ आल्या, 
ते अभ्यासाला लागले, 
मग पुन्हा आरती कॉलेज ला येऊ लागली,
मस्त चालले होते त्यांचे 
पुन्हा अगोदर प्रमाणे रूटीन 
आयुष्यात अनेक चढउतार बघितल्यामुळे, 
वेदिका व अजय खुप शिकले होते 
विशेषतः वेदिका ती आता अगोदर प्रमाणे चिडचिड करत नव्हती, 

परीक्षा झाली, 
निकाल पण छान लागले, 
त्यांचे सतत भेटणे बोलणे चालूच होते, 

एकदिवस वेदिका च्या बाबाच्या मित्राचे लग्न होते, 
घराचे सगळे आले हे पण दोघे गेले, 
लग्न आटोपून वेदिका चे बाबा म्हणाले, 
तुम्ही दोघे जा 
आम्ही थांबतो, 

अजय व वेदिका बस ने निघाले, 
यापूर्वी त्यांनी कधी असा प्रवास केला नव्हता, पण रिझर्वेशन नल्यामुळे त्यांना साध्या बस नेच प्रवास करावा लागला त्यात पण जागा मिळाली नाही, 
हा त्यांचा पहिला अनुभव होता पण विलक्षण होता, 
गर्दीत कुणाचा हात लागू नये म्हणून अजय ने तिला दिलेले प्रोटेक्शन, 
आज तो स्वतः च तिचा आधार बनला होता, 
नेहमी खडूस वाटणारा अजय आज वेदिका ला केअरिंग वाटत होता,

तिचा त्याच्याबद्दल असलेला राग कमी कमी होत होता, 
माणूस दिसतो तसा नसतो 
म्हणून आपण त्याच्या बाबतीत चुकतो हे आज तिला जाणवू लागले होते,

तिच्या नकळत अजय ने तिच्या मनाचा ताबा मिळवला होता 
हे तिला जाणवत देखील नव्हते, 
अजयची ही अशीच अवस्था होती 
तो जिला, बावळट, वेडी, फक्त स्वतः पुरता विचार करणारी समजत होता, 
तिचे खरे रूप त्याला आरती साठी बघायला मिळाले, 
आता तिचे भांडणे, रुसने, त्याच्यावर हक्क गाजवणे त्याला आवडायचे, 
पण ते दोघे याला मैत्री समजत होते, 
आता आपल्यात छान मैत्री झाली हेच ते घरी सांगत होते, 

असेच छान दिवस जात होते, 
त्यात त्यांची गॅदरिंग जवळ आली, 
सगळीकडे संगीतमय माहोल झाला, कुणी डान्स मध्ये, तर कुणी नाटकात, कुणी गायनात तर कुणी एकाकीकेत भाग घेतला, 
अजय व वेदिका चा ग्रुप देखील भाग घेणार होता, 
त्यांनी वेदिका व अजय ने सालस परफॉर्म करावा असे सुचवले, 

सालसा, वेड लागले की काय घराचे काय म्हणतील, वेदिका 

काय म्हणतील म्हणजे, 
तुम्ही अगोदरचे फ्रिन्ड्स आहात, 
आणि त्यात तुमचे फॅमिली रिलेशन पण चांगले आहे मग काय प्रॉब्लेम शशांक म्हणाला, 

मला काही प्रॉब्लेम नाही, अजय 

मला आहे , 
हवे तर एखादे नाटक करू 
पण डान्स नको, वेदिका 

तू कधी ऐकते का???
तुझं आपलं वेगळं च काही असतं , 
असे बोलून तो निघून जातो, 

मला कशातच भाग नाही घ्यायचा , वेदिका असे बोलून निघून जाते, 

झालं सुरू होणापूर्वी च संपलं सगळं, 
कस होईल रे यांचं, 
हे खरंच बालपणी चे मित्र आहेत यावर मला शंका येतेय, व सगळे हसतात 
चला निघू 
बघू रात्रीतून काही होते का ????

होतील का हे दोन टोक एकत्र, 
की ती देखील असेल एक तडजोड जाऊन घेण्यासाठी सोबत राहा व मला फॉलो करा, 

क्रमशः ...............


धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,