तडजोड (भाग 6)प्रेमानंतर चे विदारक सत्य

A story about love

तडजोड (भाग 6)

(आपण माघील भागात पाहिले वेदिका ला आरती व शशांक यांच्या वागण्याबद्दल खुप प्रश्न पडले होते )

आता पुढे .........


आरती ने तिची बाजू स्पष्ट केली होती पण शशांक चे काय ???
त्याने का केले असेल असे ,
वेदिका ला या प्रश्नाने सारखे हैराण केले होते.

दुसऱ्या दिवशी कॉलेज ला गेल्यावर तिने अजय ला हटकले .

ये हॅलो ......
मला बोलायचे आहे तुला, 
वेदिका. 

हम्मम्म्मम्म्म बोल ,
अजय 

रागावलास , वेदिका 


नाही रे तुझ्यावर रागवाव इतका अधिकार नाही माझा तुझ्यावर ,अजय 

म्हणजे काहीच अधिकार नाही का ????
वेदिका 


म्हणजे आहे का ????
अजय 

दोघेही एकमेकांकडे बघत असतात ,
 आपण दोघे काय बोलतोय हे न कळल्यावर 
दोघेही हसू लागतात.

सॉरी, वेदिका 

ये गप सॉरी बिरी काही नकोय मला तुझं 
पण तू भारी चिडते बर 
आय मिन 
तू चिडल्यावर भरीईईईईई दिसतेस, अजय 

चल हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू, 
बर ऐक ना, वेदिका 

बोल ऐकतोय, अजय 

शशांक का तयार झाला असेल रे लग्नाला, 
वेदिका 

का म्हणजे, 
तुला अजूनही शंका वाटतेय , अजय 


तसे नाही 
पण जर तो देखील साई सारखा वागला मग, वेदिका 

आपण एकदा बोलूयात का पुन्हा शशांक सोबत, अजय 

दोघांच्या संमतीने एकदा शशांक शी बोलायचे ठरले, 

अजय ने शशांक ला कॉल करून बोलावून घेतले, 
असे अचानक बोलावण्याचे कारण शशांक ला समजले नाही.

हाय, 
वा दोघेही सोबत 
शशांक म्हणाला.

तिघेही हसले, 
बर का बोलावले मला, शशांक 

अजय व वेदिका एकमेकांकडे बघत असतात, 

दोघांनाही शांत बघून 
शशांक ओळखतो काहीतरी आहे 
तो शांतता भंग करत बोलतो 
तुम्हांला दोघांना काय बोलायचे असेल ते स्पष्ट बोला,

अजय ला काय बोलावे ?
कसे बोलावे सुचेना ? 
वेदिका च सुरवात करते, 
हे बघ शशांक 
तू गैरसमज करू नको 
पण मला सारखा प्रश्न पडतोय 
तू का लग्नाला तयार झालास, 
कारण काय? 
हे बग ती आताच सावरली तर सावरले पुन्हा तिला जर तुझी सवय लागली व तू सोडून गेलास तर ती पुन्हा कधीच सावरू शकत नाही, 

 शशांक शांतपणे म्हणाला 
झाले तुझे बोलून, 
अग एखाद्याला आयुष्यभर साथ देण्यासाठी त्याच्यावर प्रेम करण हे पुरेसे नाही का ??
मला माहित आहे आरती फक्त तडजोड करतेय .
पण मी प्रेम करतोय तिच्यावर 
माझं प्रेम आयुष्यभर माझ्या सोबत राहील हे पुरेस आहे मला 
आणि चूका कुणाकडून होत नाहीत, 
पण चूक झाली म्हणून सोडून देणं प्रेम नव्हे तर ती चूक सुधारून त्या व्यक्तीला पुन्हा उभे करण म्हणजे प्रेम ,
असे मला वाटते, 

तिची तडजोड माझी 
आयुष्यभराची साथ बनेल. 

जेव्हा तू आयुष्यात कधी कुणावर प्रेम करशील तेव्हा मला नक्की समजून घेशील आता नाही. 

शशांक चे बोलणे ऐकून 
अजय व वेदिका आश्चर्यचकित झाले 
त्यांना काय बोलावे कळेना .

खरच कुणी कुणावर इतकं प्रेम करू शकत 
वेदिका मनातल्या मनात म्हणाली. 

चल येते मी,
 वेदिका 
अजय व शशांक चा निरोप घेते .

होस्टेल वर आल्यावर ती आरती च्या गळ्यात पडते ,
आरतीला काही कळत नाही 
काय झाले 
पण दोघी फक्त हसतात व वेदिका फ्रेश होण्यासाठी निघून जाते.


पुन्हा त्यांचे रूटीन चालू होते. 
वेदिका व अजय चे कॉलेज, भेटणे,गप्पा चालूच असतात, 
आता हळूहळू त्यांना एकमेकांचे स्वभाव, रुसने, फुगणे, कळू लागले 
मॅडम ची परमिशन घेऊन त्यांनी आरती चे कॉलेज देखील बंद केले. 

दिवसमाघून दिवस जात होते तशी सगळ्यांची चिंता वाढली होती 
आतापर्यंत झाकले पण आता पुढे काय ??

सत्य जगासमोर आल्यावर काय करायचे 
कुणाकुणाला काय उत्तर द्यायचे ??

क्रमशः ...............


काय असेल आरती व शशांक  च्या नात्याचे भविष्य, 
स्वीकारतील त्या नवजाताला 
की नाकारतील त्याचे अस्तित्व 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all