तडजोड (भाग 5) प्रेमानंतर चे विदारक सत्य

A love story

तडजोड (भाग 5) 

(माघील भागात आपण पाहिले आरती च्या  प्रॉब्लेम वर अजय काहीतरी तोडगा काढू म्हणत होता ) 


आता पुढे ...............

अजय ला देखील काही सुचत नव्हते ,
पण या दोघीसमोर तो हे दाखवू पण शकत नव्हता.
त्यांना दोघींना समजावून तो रूम वरती आला,
काही केल्या त्याच्या डोक्यातून आरती चा विषय जात नव्हता 
खुप राग येत होता त्याला तिचा पण तिला असे वाऱ्यावर सोडू देखील शकत नव्हता काही झाले तरी वेदिका सोबत राहून राहून तिच्याशी पण चांगली मैत्री झाली होती .

स्वतः च्या विचाराच्या तंद्रीत तो कॉट वर पडला,
 तो इतका विचारमग्न झाला होता की त्याचा रूममेट शशांक ने त्याला दोन वेळा आवाज दिला हेही त्याला समजले नाही,


शशांक जवळ येऊन त्याला हलवतो, 
ये हिरो काय झालं, 
पोरी चा चक्कर आहे का ???
मला सांग आपण सेटिंग लावून देतो.
एकदम भारी 
काय 
व हसतो, 

आता अजय अजून चिडतो 
प्रत्येक टेन्शन चे कारण या मुलीच कशा असतात यार, 
शशांक कडे बघत म्हणतो, 

ये बॉस मी मजाक करत होतो 
खरच पोरी च मॅटर आहे का ? 
शशांक विचारतो 

हो ना यार 
पण मी कुणाला सांगू शकत नाही 
जाऊ दे ना '
अजय इग्नोर करत म्हणतो. 


तसा शशांक ला पण इंटरेस्ट नसतो तो पण जाऊ दे चल मेस वर जाऊ जेवायला 
शशांक म्हणतो .

हो चल अजय तयार होतो पण सहज पुटपुटतो पण आरती चे वाईट वाटते. 

आरती हे नाव ऐकताच 
शशांक दोन पावले माघे येतो
काय झालं आरतीला 
तो काळजीने म्हणाला.

अरे काही नाही सहज ,अजय 

आता शशांक चे मन कुठेच लागेना जेवणात पण त्याचे लक्ष नव्हते. 
काय झाले असेल तिला या विचाराने त्याला परेशान केलं होतं .

अजय च्या नजरेने ही गोस्ट हेरली 
तो शशांक ला म्हणाला. 
तुला आरती बद्दल इतकी काळजी का वाटतेय,
मला कारण कळेल का?

विवेक ने मेन मुद्याला हात घातला 
हे कळताच शशांक बोलता झाला .

माहीत नाही यार 
पण पहिल्या नजरेत ती आवडली 
खुप विसरायचा प्रयत्न केला 
पण ओढला जातोय तिच्याकडे 
जीव जडलाय यार तिच्यात.

हे ऐकून अजय अवाक झाला 
त्याच्या मनात आलं .
आरती ची प्रतिस्थिती याला कळू न देता त्यांचे लग्न लावून दिले तर ......

पण दुसऱ्याच क्षणी विचार बदलला त्याने नको हे चुकीचे आहे.
त्यापेक्षा शशांक ला खरे काय हे सगळं सांगून बघू जर त्याचे आरती वर खर प्रेम असेल तर तो तिला जशी आहे तशी स्वीकारेल.

त्याने शशांक ला घडलेली सगळी घटना सांगितली .
शशांक ने शांतपणे सगळं ऐकून घेतलं .
व तो म्हणाला मी आरती ला स्वीकारायला तयार आहे .

अजय चा त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता.माणूस प्रेमात आंधळा होतो हे ऐकलं होतं पण आज अनुभवलं 
तो स्वतः ला च म्हणाला. 

तोपर्यंत वेदिका आरतीला डॉक्टर कडे घेऊन गेली होती. 
पण ओळखपत्र व इतर काही फॉर्मलीयटीज मुळे त्यांना माघे यावे लागले. 
त्या दोघी होस्टेल वर आल्या आरतीने काहीच खाल्ले नव्हते.
वेदीकाने खुप आग्रह केला पण ती फक्त बसून होती एकटक नजर लावून.

तेवढ्यात अजय चा कॉल आला 
आरती ला घेऊन ये बाहेर भेटू, 
त्यांना कारण माहीत नव्हते पण तरीही त्या भेटायला आल्या.

समोर शशांक व अजय होते 
कुणी काही बोलणार तोच 
शशांक म्हणाला.
मला आरती ची परिस्थिती माहीत आहे व तरीही मी तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे.

हे शब्द ऐकताच वेदिका भडकली,
तुम्हाला मुलीचे आयुष्य म्हणजे खेळ वाटतो का रे ?
एकाचे खेळ मांडला व आता दुसरा त्याचा तमाशा बनवायला निघालाय का??
अरे तिच्या मनाचा विचार करा कुणीतरी ,
व अजय ही मदत केली का तू 
आणि हा कोण रे , 
तो पण एक पुरुष च आहे ना 
आज म्हणेल लग्न करतो 
व उद्या म्हणेल चुकलं माझं 
मग 
याने पण साथ सोडली तर ती काय करेल.
एवढे बोलून वेदिका रडू लागली, 

अजय ला पण आपण चूक केली की काय असे वाटू लागले, 
पण तेवढ्यात शशांक म्हणाला 
वेदिका please  
Try 2 understand 
I love her 

 मी प्रेम करतो तिच्यावर, 
ती जशी आहे तशी स्वीकारेल व आयुष्यभर साथ सोडणार नाही.

कुणी काही बोलणार तोच आरती म्हणाली मी लग्नाला तयार आहे. 


वेदिका कुणाला काहीच न बोलता तेथून निघून जाते, तिच्या माघे आरती पण जाते. 


आरती होस्टेल वर येते 
वेदिका तिला काहीच बोलत नाही 
खुप विनवण्या केल्या नंतर वेदिका बोलती होते 
तिला कळत नाही का केलं असेल आरती  ने असे ??

आरती सांगू लागते हे बग वैदू 
माझ्या आयुष्याची मी हाताने माती केली पण माझ्याकडे दुसरा मार्ग देखील नाही 
असे समज की मी शशांक सोबत तडजोड करतेय.

जेव्हा आयुष्यात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतात तेव्हा त्या वाईटमध्ये जी थोडी चांगली गोस्ट असेल (मान्य आहे ती पूर्ण चांगली नसेल) 
पण थोडी जरी असेल तरी ती स्वीकारावी. 
यालाच तडजोड म्हणतात 
वेदीकाने अनुभवलेली तिच्या आयुष्यातील पहिली तडजोड होती ही.

आरती चे ठीक आहे तिने स्वार्थ बघितला पण शशांक चे काय त्याने का केली असेल तडजोड, 
की त्याचाही काही स्वार्थ असेल या माघे 
या विचारात वेदिका आता अडकून पडली होती.

क्रमशः ...........


पुढील भाग लवकर मिळवण्यासाठी फॉलो करा, व सोबत राहा 

धन्यवाद

🎭 Series Post

View all