तडजोड (भाग 4)प्रेमानंतर चे विदारक सत्य

A love story

तडजोड (भाग 4) 

(माघील भागात आपण पाहिले वेदिका अजय ला कॉल करते पण तिला पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाही) 

आता पुढे .........

अजय ने कॉल कट केला व मग वेदिका झोपी गेली तिला जाग आली ती सकाळीच 

आपले सगळे आवरून 
ती कॉलेज ला गेली 
तेव्हा तिला तिथे  अजय भेटला 
तो मस्त छान खुशीत होता 
Hi 
कशी गेली रात्र त्याने विचारलं 
वेदिका काहीच बोलली नाही 
ये येडू तुला बोलतोय 
ती पुन्हा शांत 

बर सॉरी 
रागावलीस का 

अरे रात्री पार्टी चालू होती व तू कॉल केला मग मी नाही बोललो तुला जास्त 
तो स्पष्टीकरण देत म्हणाला 

हो 
ती शांतच 

अरे बोल ना तो 

काय बोलू 
तुला काही वाटते का रे 
इथे आपण शिकण्यासाठी आलोय की मजा मारायला 
थांब घरी सांगते 
वेदिका तावातावाने म्हणाली 

ये होस्टेल गर्ल 
तुला काय कळणार रूम वरील मजा 
व आपलं ठरलंय बर इथले काही घरी सांगायचे नाही नाहीतर बग मग तू 
पुन्हा म्हणशील सांगितले नाही 

व ऐक ना पुढच्या वेळी तुला पण घेऊन जाईल बाहेर जायचे असेल तेव्हा 
अजय म्हणाला 

नको तूच जा वेदिका म्हणाली 

अरे खुप मज्जा येते 
तू येऊन बग 
तो म्हणाला 

हो का रे 
पण मॅडम खुप कडक आहेत नाही सोडणार बाहेर 
ती म्हणाली 

तू नको काळजी करू मी आहे ना मी करतो मॅनेज 
तो म्हणाला 

दोघेही खुश होऊन 
क्लास मध्ये निघून गेले 

हॉस्टेल, कोलेज, भेटीगाठी हे चक्र त्यांचे चालू होते 

एक दिवस अचानक अजय म्हणाला उद्या आम्ही सगळे मित्राच्या फॉर्महाऊस वर जातोय येणार का ?

वेदिका हो पण मॅडम 

मी करतो बरोबर 
अजय 

हो पण मला एकटीला नाही सोडणार मैत्रिणीला पण घेऊ का ?? 

घे की 


हो चालेल 
जाऊ मग 

दुसऱ्या दिवशी अजय होस्टेल ला येते व मी वेदिका चा भाऊ आहे तिला तातडीने घरी बोलावले म्हणून सांगतो. 

मॅडम काही सुट्टी देत नाहीत 
व अजय ला वापस पाठवतात

अजय गेल्या नंतर वेदिका घरी कॉल करते व आई ला सांगते मैत्रिणीकडे जायचे आहे 
मॅडम ची परवानगी काढून दे 
आई ला खरे वाटते. 
आई तिला व तिच्या मैत्रिणीला मॅडम ची परवानगी काढून देते

मग वेदिका व तिची मैत्रीण आरती अजय सोबत त्याच्या ग्रुप सोबत फॉर्महाऊस वर जातात.

अजय चा एक मित्र होता साई नावाचा तो व आरती अगोदरच ओळखीचे होते.


सगळे फॉर्महाऊस वर पोहोचले 
आपापल्या रूम मध्ये सामान ठेऊन ते गार्डन मध्ये आले 
जेवण करून मस्त गाण्याचा प्रोग्राम चालू होता तोच. 
आरती झोप येतेय हे कारण सांगून तिथून निघून आली. 

खुप वेळ झाला होता आरती ला जाऊन .
व आता सगळ्यांना देखील झोप येत होती 
सगळे जण 
आपापल्या रूम मध्ये गेले 
वेदिका व आरती एका रूम मध्ये होत्या 
वेदिका रूम मध्ये पोहोचली तेव्हा तेथे आरती नव्हती.
तिने कॉल केला कॉल लागत नव्हता. 
सगळीकडे शोधले पण आरती नव्हती 
मग ती अजयकडे निघाली तर 
इतक्या रात्री अजय च्या रूम कडे का जातेय म्हणून तिला कुणीतरी हटकले 
मग खोटे कारण सांगून ती माघारी फिरली 
आरतीच्या च्या विचारात च ती रूम मध्ये आली तर आरती तिला झोपलेली दिसली. 
तिने हलवून आरती ला जागे केले 
व कुठे गेली होती विचारले 
कुठे नाही इथेच तर होते आरती म्हणाली 
फ्रेश होत होते 
म्हणून आरती झोपी गेली. 

वेदिका ला मात्र झोप येत नव्हती 
कारण आरती रूम मध्ये नव्हती हे तिला पक्के माहीत होते.


ती कुणालाच काही बोलली नाही 
पुन्हा तिचे रूटीन चालू झाले कॉलेज 
होस्टेल अजयची भेट. 

एक दिवस 
ती अभ्यास करत बसलेली असताना 
अचानक आरती बाहेरून आली व रडू लागली. 
वेदिका ला काही कळेना 
तिने तिला शांत केले 
व रडण्याचे कारण विचारले 
तेंव्हा आरती सांगू लागली 
मी तुला खोटं बोलले होते. 
त्या दिवशी फॉर्महाऊस वर तू मला रूम मध्ये शोधत होती तेव्हा मी रूम मध्ये नव्हते.

मग कुठे होतीस वेदिका 
म्हणाली.

मी साई सोबत त्याच्या रूम मध्ये होते.
साई व माझी पहिलीच ओळख होती. 
पण मी कुणाला काही बोलले नाही 
पण आता ..........
व ती शांत झाली 

बर ठीक आहे मी समजावत बोलले 
पण तू का रडतेय 
हे कळेल का ????

असे म्हणताच आरती ने प्रेग्नन्सी किट वेदिका च्या हातात दिली व ती प्रेग्नंट होती. 


वेदीकाच्या  डोक्यात मुंग्या आल्या तिने ती पटकन दूर फेकली 
तिला काही सुचेना. 

तेवढ्यात आरती म्हणाली बग ना ग 
व आता साई कॉल पण उचलत नाहीये रूम वर गेले तर मिञ म्हणे तो रूम सोडून गेलाय. 

थांब मी बोलते त्याला म्हणून वेदिका ने कॉल लावला तर आता मोबाईल बंद येत होता. 

काय करावं हा मोठा प्रश्न होता 

वेदीकाचे अजय ला कॉल केला व भेटायचं आहे बोलली. 
अजय ला वाटले काही काम असेल तो लगेच तयार झाला. 

वेदिका व आरती अजय ला भेटण्यासाठी गेल्या त्यांनी अजयला सगळी हकीगत सांगितली. 
त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण कालच साई ने त्याचे ऍडमिशन ट्रास्फर करून घेतले होते. 
व सगळे कॉन्टॅक्ट देखील तोडले होते. 

आता वेदिका व अजय च्या लक्षात सगळी गोस्ट आली.

त्यांनी सगळं आरती ला सांगितलं. 
आता मात्र आरती घाबरली माझ्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय नाही हे च म्हणत होती.

काही पण बोलू नको बघू काहीतरी मार्ग काढू 
अजय म्हणाला

क्रमशः..............

काय असेल त्यांचा मार्ग जाणून घेण्यासाठी सोबत राहा माझ्या व मला फॉलो करा.

धन्यवाद

🎭 Series Post

View all