तडजोड (भाग 30) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love

तडजोड अंतिम  (भाग 30) 

( माघील भागात आपण पाहिले 
वेदिका अजय सोबत जाण्यास तयार झाली होती ) 

आता पुढे ..................

आज वेदीकाने तिच्या आयुष्यात तडजोड केली होती, 
कारण तिला तिच्या बाळाचे भविष्य डोळ्यासमोर दिसत होते, 

वेदिका च्या आई बाबा नि वेदिका चे सर्व सामान आवरून दिले व तिला अजय व त्याच्या आई बाबा सोबत पाठवून दिले 
नेहमी लेकिसोबत असणारे तिचे बाबा आज मुद्दाम आले नाहीत, 

वेदिका बाळासाहित तिच्या हक्काच्या घरी आली होती 
घरी तीच खुप कौतुक झालं 
आई व बाबा नि उत्साहाने तिचे व बाळाचे सामान तिच्या रूम मध्ये लावले . 


अजय च्या आई ला तर आकाश ठेंगणे झाले होते 
त्यांना नातवाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले होते, 
त्या सारखी सारखी त्या बाळाची व वेदिका ची दृष्ट काढत होत्या 
बाबा तर हसत म्हणाले इतकी दृष्ट नका काढू 
तुमची च लागायची, 

सगळे हसले 
अजय हे सगळं बघत होता आई ने मध्ये मध्ये सांगितलेली कामे देखील करत होता पण अजूनही तो दूरच होता बाळापासून 


आई वेदिका सोबत झोपल्या तिच्या रूम मध्ये व अजय व त्याचे बाबा बाहेर, 

वेदिका ला जर झोप आली नाही तर ती नेहमी गॅलरी मध्ये चकरा मारायची व हे अजय ला माहीत होतं 
म्हणून तो सारखा सारखा गॅलरी कडे बघत होता, 
त्याच विचारात तो झोपी देखील गेला व जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली होती, 

वेदिका ने लवकर उठून सगळं आवरले, 

वेदिका   अजय  जरा इकडे या 
आई 

हो आलो 
दोघे पण येतात 

मी व तुझे बाबा थोडे कामानिमित्त बाहेर जात आहोत येऊ लवकरच , काळजी घ्या 
असे म्हणून ते दोघे बाहेर पडले 
त्यांनी अजय व वेदिका ला एकही प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही 


कुठे गेले असतील आई बाबा  

आता मी सगळे कसे करू 
बाळ काम 
मी पण माहेरी जाऊ का ते येईपर्यंत
या विचारात ती कामाला लागली, 


आतपर्यंत सगळे असायचे मग तिला कधी बाळ व काम हे दोनी बघण्याची वेळ आली नाही पण आज तिची कसोटी होती 


तिला वाटलं आता अजय देखील ऑफिस ला निघून जाईल 
पण जाऊ दे तसेही तो कुठे बोलतो 
मला 
असे म्हणून ती काम आवरू लागली 


ती किचन मध्ये गेली व इकडे दारावरील बेल वाजली 
दार उघडले बिल आले होते ते घेतले तर बाळाचा आवाज आला 
ती दरवाजा लावून 
बाळाकडे धावली 
बाळाला दोन झोके देत नाही तोच तिला आठवले भाजी आहे गॅस वर 
पटकन गॅस बंद करून येऊ म्हणून ती किचनमध्ये गेली, 
बघते तर काय भाजी पूर्ण ओट्यावर पसरली होती, 
आता तशीच ठेवली तर पुन्हा नंतर निघणार नाही म्हणून 
ती ते पाण्याने साफ करत बसली, 
तिकडे सांडलेली भाजी व इकडे रडणारे बाळ 
तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व हे सगळं अजय बघत होता हॉल मध्ये निवांत बसून 

हो बाळा येते रे 
असे म्हणत म्हणत वेदिका काम 
आवरत होती, 


थोड्या वेळाने जोरात रडणाऱ्या बाळाचा आवाज अचानक बंद झाला 

वेदिका घाबरली 
ती बाळाकडे धावली, 
ती रूम मध्ये प्रवेश करणार तोच तिचे पाऊले थांबली 
अजय ने बाळ झोक्यातून काढून हातात घेतले होते व त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते 
हे तिने दुरूनच पाहिले व ती आहे तिथे च थांबली 

तिचा राग क्षणात निघून गेला, 
अजय च्या एका कृतीमुळे ती त्यांच्यावरील सगळा राग विसरली होती, 

स्त्री ही अशीच असते ओ 

तिला कधीच अपेक्षा नसते तिच्यासाठी कुणीकाही करावं पण ती जे तुमच्यासाठी करते त्याच तुम्ही कौतुक जरी केलं ना ती भरून पावते ओ 

आज खुप थकली का ग ......
तुझ्या हाताला खुप चव  हवं बर .....
तू नको काळजी करू मी आहे तुझ्या सोबत .....
तू आहेस म्हणून मी आहे .....
असे छोटे छोटे वाक्य ही तिला स्वर्ग सुखाची अनुभूती देऊन जातात, 

तिच्या जवळच्या लोकांना कुणी वाईट बोलले तर तिला वाईट वाटते व  त्याच लोकांना कुणी जीव लावला तर ती त्यांना डोक्यावर घेते 


वेदिका चे पण हेच झाले होते अजय च्या हातात बाळ बघून ती आनंदाने बागडू लागली व तशीच मागे फिरली 

तिने तिचे सगळी कामे आवरून घेतली पण अजय ला तर बोलत नव्हती मग आता त्याला जेवायला कसे बोलवणार म्हणून ती बाहेर गेली, 

बघते तर काय अजय ने बाळ हॉल मध्ये आणले होते व तो त्याच्या सोबत खेळत होता 
वेदिका जवळ जाऊन उभा राहिला अजय बाळात इतका गुंग होता की त्याला काहीच कळत नव्हते, 
वेदिका येताच तो म्हणाला बाळराजे तुमच्या मम्मी ला सागा आम्हाला भूक लागली, 

वेदिका काहीच न बोलता जेवण घेऊन आली, 

तू पण घे ना अजय 

मी घेईल नंतर वेदिका 

आता घे अजय 

हम्मम्म्मम वेदिका 
वेदिका व अजय ने सोबत जेवण केले 

दिवसभर अजय बाळासोबत खेळत होता व वेदिका काम करत होती 

आता रात्र झाली वेदिका ने ठरवले होते की अजय वर कुठलीही जबरदस्ती नको म्हणून ती रूम मध्ये जाऊन झोपली, पण दरवाजा लावला नाही 
अजय ने 11 वाजेपर्यंत हॉल मध्ये टीव्ही पहिला व नंतर तो रूम मध्ये आला , 

बेड वर वेदिका झोपलेली होती 
आता काय करावं 
हा विचार करत तो बाळाच्या बाजूनं झोपला 
वेदिका व बाळ गाढ झोपेत होते 
पण अजय ला झोप येत नव्हती 
त्या बाळाचा स्पर्श 
त्याचे बोट पकडणे, 
आज दिवसभर त्याला मांडीवर घेऊन बसने व आता देखील अजय चा त्याचा केसातून नकळत फिरणारा हात 
हे अजय ला पुन्हा पुन्हा आठवत होत, 
तो  मनात च हसत होता,

खरच बाबा होणं किती सुंदर आणि सुखदायक असते ना जर मला हे अगोदर माहीत असत तर एकदा काय मी दहा वेळा माफी मागितली असती वेदिका ची, 

अजय च्या डोळ्यातून पाणी वाहू लागले खरच मी किती  मूर्ख ना आता याचे गेलेले ते बालपण पुन्हा थोडीच येणार आहे, 
माझ्या सारखा कमनशिबी बाप मीच असेल 
आज अजय रात्रभर झोपला नाही, 

सकाळी वेदिका उठाण्यापूर्वी त्याचे सगळे आवरून तो बाळ उठण्याची वाट बघू लागला, 

अजूनही वेदिका च्या मनात राग होता 
ती त्याला सारखे इग्नोर करत होती 
तो प्रत्येक वस्तू तिच्या हातात देत होता माघण्यापूर्वी च 
तिच्या पुढे पुढे करत होता अगोदर करायचा तसे, 
तिलाही छान वाट होते 
पण तिला अजय च्या तोंडाने कबूल करून घ्यायचे होते, 

सकाळची सर्व कामे आवरून नास्ता जेवण सगळं आवरून तिने बाळ झोपी घातले, 
आज अजय ऑफिला देखील गेला नव्हता, 

त्यांचे हे अबोल युद्ध चालूच होते, 
वेदिका किचनमध्ये काहीतरी आवरत होती व अजय ला , 
घरात कुणी नाही बाळ देखील झोपलेले व किचन मध्ये फक्त ते दोघे या विचाराने च वेदिका मोहरून गेली, 
तिने तिचे काम अर्धवट टाकत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात अजय ने तिचा हात धरला, 
अजय सोड, वेदिका 

नाही सोडणार मला बोलायचे आहे, व आज तुला ऐकावं च लागेल, अजय 

मी आलेय आता परत ते पण स्वतःहून त्यामुळे तुझ्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही , वेदिका 


हो नसेल अर्थ पण तरीही ऐकून घे 
Please , अजय 

जाच्या त्या करून स्वरामुळे वेदिका पिघळली व जागेवर उभा राहिला, 

मी चुकलो ग वैदू 
मला एकदा माफ कर 
मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय 
पण तुझ्या व माझ्या मध्ये ते बाळ आलं व म्हणून तू दूर गेली असे समजून मी त्या बाळाला दोष देत होतो 
पण फक्त त्याच्या  एका दिवसाच्या सहवासाने हे जाणवलं ग की बाबा होणं किती सुंदर असत 
आपला अंश आपल्या डोळ्यासमोर दिसून किती सुखदायक असत 
तू मला रागव, 
ओरड 
हवं तर मी कान पकडून सॉरी म्हणतो पण तुझ्यापासून व बाळापासून दूर करू नको, 
अजय रडत होता व वेदिका पटकन त्याच्या मिठीत आली 

मला तरी कुठे दूर जायचे होते 
पण एका स्त्री साठी तिचा नवरा तिचे सर्वस्व असतो पण मुलं तीच अस्तित्व असत 
त्यामुळे त्याला कस रे दूर करू , वेदिका 

आता कुणीच दूर नाही होणार कुणापासून 
व मला समजले की आई बाबा होणं सोपं नसत खुप काही गमवाव लागत त्यासाठी 
हे सुख उगाच नाही मिळत कुणालाही, 

बाळाच्या आवाजाने त्यांनी बाळाकडे धाव घेतली, 


दिवस मस्त केला त्यांचा व आज
खऱ्या अर्थाने ते पुन्हा एकत्र आले होते, 


दुसऱ्या दिवशी वेदिका कामे आवरत असते व अजय बाळा घेऊन हॉल मध्ये बसलेला असतो, 
तितक्यात बेल वाजते समोर बघते तर काय 
दोघांचेही आई बाबा 
आत्या सहित समोर उभे 


त्यांना बघून वेदिका ला खुप आनंद झाला, 

त्यांना सगळ्यांना बसायला सांगून वेदिका पाणी आणायला गेली अजय बाळात व्यस्त होता, 

मग बाळाचे बाबा 
आत्या 


आत्या मला माफ करा, अजय 

अरे माफी काय माघतोस 
जे झालं ते जाऊ दे 
पण एक सांगा कसे वाटले आमचे नाटक आत्या 

नाटक ........
सगळे आत्या कडे बघू लागले 

हो नाटक 
मी त्याची डायरेक्टर होते व हे सगळे माझे पात्र 
तुला व वेदिका ला धडा शिकवण्यासाठी, 
आत्या 


हो का आत्या तू पण ना 
वेदिका व सगळे हसू लागले, 


वेदिका व अजय चा संसार पुन्हा चालू झाला, 

शेवटी ताडजोतीतून उमलले होतेपुन्हा त्यांच्या संसाराचे फुल 

लेखिके चे मनोगत  : 

एक लेखिका म्हणून ही कथा लिहणे सोपे नव्हते कारण प्रत्येकाच्या आयुष्यातील परिस्थिती वेगळी असते पण ती मी मांडण्याचा प्रयत्न केला, 

दुसरे लग्न करणे हे कुणालाच शक्य नसते कारण ती शेवटी एक तडजोड च ठरते 
त्यामुळे आयुष्य जो जोडीदार आहे त्यांच्यासोबतच तडजोड करा कदाचित तुमची ही तडजोड यशस्वी होईल वेदिका व अजय प्रमाणे, 

आणि हो संसार म्हणलं की भांड्याला भांड लागणारच 
मग वार चुकवायचे की ते वार झेलून कणखर बनायचं हे तुम्ही च ठरावा 

कथा कशी वाटली नक्की सांगा 
आपल्या प्रतिक्रिये च्या प्रतीक्षेत 

@कथेचे सर्व अधिकार लेखिका गीता सूर्यभान उघडे यांच्याकडे राखीव आहेत, 

धन्यवाद

🎭 Series Post

View all