तडजोड (भाग 3) प्रेमानंतर चे विदारक सत्य

A love story

तडजोड (भाग 3) 

(माघील भागात आपण पाहिले वेदिका व अजय ला बाहेरगावी शिक्षणा साठी दुसऱ्या दिवशी घरचे नेऊन घालणार होते )

आता पुढे ...............

उद्या बाहेर शिकण्यासाठी जायला मिळणार याच आनंदात दोघे झोपी गेले. 
अनोळखी जग, 
अनोळखी लोक ,
कसे असतील याचे भान देखील याना नव्हते त्यांना फक्त जाण्याची खुशी होती.

वेदिका ने तर 5 चा अलार्म लावून ठेवला होता आई ला  जाग जर आली नाही तर 
पण पोटची पोरगी उद्या दूर जाणार या चिंतेने ती आई झोपलीच नाही रात्रभर .

आज आई सकाळीच उठली 
वेदिका च्या आवडीचे सर्व पदार्थ तिच्या बॅग तिने भरून ठेवल्या.

आई थोडी शांतच होती पण वेदीकाला या शांततेची जाणीव देखील नव्हती .
उलट आई काळजी करू लागली की ती म्हणायची ये आई मी काय लहान आहे का आता. 

तेव्हा आई म्हणायची 
तुला आई ची काळजी आता नाही कळणार तू आई झाली की मग कळेल. 

वेदिका तिचे आवरून खाली आली नेहमी आई ला ओरडायला लावणारी वेदिका आज न सांगता आवरून तयार झाली.

अजय त्याचे आई बाबा देखील पोहोचले .
सगळी तयारी झाली 
व वेदिका ची आई म्हणाली तुम्ही च जा 
मी नाही येत 
पोरीला सोडून मागे नाही येऊ शकणार मी, 
तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले आज ती काय सासरी जातेय का ??
शिकण्यासाठी जातेय व जास्त दूर नाही फक्त 60 कि मी आहे 
तुला आठवण येईल तेव्हा जात जाऊ आपण भेटायला. 
सगळे एकदम हसायला लागतात वेडी कुठली 
तिचे बाबा आई ला म्हणाले 
चल 
नाही हो 
नाही हो 
करत करत शेवटी निघाले सगळे.
अगोदर वेदिका च्या हॉस्टेल ला तिचे सामान टाकून मग ते अजय च्या रूम वर गेले. 
वेदिका च्या होस्टेल चे नियम ऐकून 
आई खुश झाली 
म्हणजे सुरक्षित राहील मुलगी इथे 
ती मनातल्या मनात म्हणाली.

मुलांना सगळ्या गोष्टी समजावून सांगून 
त्यांचे आई बाबा परतीच्या प्रवासाला निघाले.


अजय रूम वर 
व वेदिका होस्टेल मध्ये आपापले सामान लावत होते. 
त्यांना एक मेकाची आठवण किंवा भानही नव्हते.
सर्व सामान लावून झाल्यावर सगळ्या मुलींना मॅडम ने खाली बोलावले.
सुजाता मॅडम होत्या त्या 
खुप कडक शिस्तीच्या होत्या त्या 
सर्व होस्टेल त्या एकट्या सांभाळत होत्या. 
त्यांनी प्रत्येक मुलीला स्टेज वर जाऊन आपले नाव सांगायला सांगितले.
सगळ्यांनी नावे सांगितली 
वेदीकाने देखील 
मग त्यांनी प्रत्येकीला आपल्या रूममेट सोबत मैत्री करायला सांगितली. 
खुप वेगवेगळ्या भागातून मुली आल्या होत्या व वेगवेगळ्या शाखेच्या देखील होत्या तिने  हे जग पहिल्यांदा अनुभवल होत.

सगळ्यांशी ओळख झाली मग सगळ्यांनी जेवण केले या सगळ्या प्रकारात खुप वेळ निघून गेला. 

रात्री चे 11 वाजले होते 
आता तीघरी कॉल ही करू शकत नव्हती.
म्हणून ति झोपण्यासाठी बेड वर पडली.
झोप काही येत नव्हती 
ती फक्त या कुशिवरून त्या कुशीवर झोपत होती.
खुप प्रयत्न केला पण झोप काही लागेना.
मोबाईल बघितला तर 12 वाजून गेले होते 
काय करू 
मग अजय आठवला 
त्याला आली असेल का झोप 
की तोही माझ्यासारख्या झोपेची वाट बघत असेल 
कॉल करू का ?????

असा विचार करत करत तिने त्याला कॉल केला. 
दुसऱ्याच रिंग ला कॉल उचलला गेला. 
ती म्हणाली 
झोपला नाहीस 
झोप 
अरे फक्त मज्जा 
आहे. 
सगळे नवीन आहेत मस्त पार्टी केली. 
शेजाऱ्यांच्या रूम मधील मूल पण आमच्याकडे च आलेत 
आज झोपायला 
तू झोप 
मी मस्त आहे 
माझी काळजी करू नको 
असे म्हणून त्याने कॉल कट केला 

मी तरी कुठल्या मूर्खा कडून अपेक्षा केली मला समजून घेण्याची 
अरे मला झोप येत नव्हती म्हणून तुला कॉल केला 
तुझी काळजी वाटत होती म्हणून नाही 
असा विचार करून  ती रागाने अंगावर घेऊन झोपी गेली 

क्रमशः ...............

काय असेल वेदिका च्या कॉल करण्यामाघिल कारण 
स्वतः ची झोप 
की 
अव्यक्त प्रेम 
जाऊन घेण्यासाठी सोबत राहा 
व मला फॉलो करा 
धन्यवाद

🎭 Series Post

View all