तडजोड (भाग 29) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love

तडजोड (भाग 29) 

( माघील भागात आपण पाहिले 
वेदिका  ला जर तडजोड च करायची असेल तर तिने ती अजय सोबत च का करू नये असे सर्वाना वाटते, 

आता पुढे ......


आत्या निघून गेल्यावर वेदिका विचार करू लागते, 
पण हे योग्य होईल का ???? 
अजय ला वाटेल मला च त्याची गरज लागली, 

काय करू??? 

तेवढ्यात तिला आठवले कॉलेज च्या वेळी आरती ने केलेली 
तडजोड 
त्यावेळी आरती साठी ते सोपे नव्हते 
पण तिने हिम्मत दाखवली व बाळासाठी तडजोड केली पण आज ती सुखात आहे . 

याच गोष्टीमुळे 
वेदिका अजय च्या बाबतीत पुन्हा पुन्हा पुनर्विचार करत होती. 

तिला सारखे वाटत होते 
एकदा या विषयी अजय सोबत बोलावं 
पण ती तिची हार असेल हे तिला मान्य नव्हते, 


जाऊ दे बघू 
काय होईल ते 
असे म्हणून वेदिका तिच्या कामाला लागली,

इकडे बाबा नि दाखवलेल्या प्रत्येक स्थळात अजय काही न काही खोट काढत होता, 

तुला काय आता विश्वसुंदरी मिळणार आहे का ??? 
बाबा रागात च म्हणाले 

बाबा , काही पण काय 
पण मुलगी निदान नीट तरी असावी 
कशा आहेत सगळ्या 
व त्यांच्या बायोडाटा पेक्षा 
त्यांच्या अपेक्षा ची लिस्ट मोठी आहे, 
काल तर एकीचा बायोडाटा वाचत होतो तर म्हणे मी सासू सासऱ्या सोबत राहणार नाही 
व मुलं पण होऊ देणार नाही 
अशी कुठे मागणी असते का?? 
अरे ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांना दूर करायचं , 
आणि मूल नको म्हणजे काय 
स्त्री ही बाळाला जन्म देऊन परिपूर्ण होते हे साधं कळू नये या मुलीला, 
नकोय मला असली मुलगी 
अजय रागात म्हणाला

अरे काय चुकले तिचे 
अजय ची आई म्हणाली 

आई हे तू बोलतेस काय चुकले तिचे 
अजय म्हणाला 


हो मीच बोलते काय चुकले रे तिचे 
तसे पण माझेच बग ना मी पण कुठे कधी आयुष्य जगले माझ्या मनाने मी फक्त तुझे बाबा जे म्हणेल तेच केलं, 
सासू सासऱ्याची सेवा करण्यात माझे तरुणपण गेलं ना कधी कुठली हौसमौज ना कधी कुठले सुख सोहळे ते नेहमी आजारी असायचे व मी त्यांच्या सेवेत कधीच नवऱ्या सोबत निवांत वेळ घालवला नाही 
नंतर आम्ही इथे नोकरी च्या गावी आलो तर त्यात तुझ्या संगोपनात दिवस गेले , 
हे ऑफिसमध्ये व्यस्त व मी तुझ्यात 
माझं चुकलंच मी माझ्या सासू सासऱ्यासाठी व तुझ्यासाठी माझ्या आयुष्याच वाटोळं केलं 
आई चे हे बोलणे ऐकून अजय तिच्याकडे फक्त बघत होता 


आई तुला कळतंय का ??? 
तू काय बोलतेस 
अग 
मला 
तुझ्या पोटच्या मुलाला जन्म देऊन तुला वाटोळं झाले असे वाटते 
अजय च्या डोळ्यातून पाणी वाहू लागले, 


मग काय सांगू तुला 
माझे नसेल झाले पण वेदिका चे तर झाले ना, 
ती परक्याच लेकरू पण आम्हाला ती आज तुझ्यापेक्षा जास्त जवळची वाटते, 
आणि आता तिच्या त्या बाळामुळे तिला कुणी स्वीकारत देखील नाही मग तीच वाटोळं च झालं ना, 
तुझं म्हणालास ना आता मुलं होऊ देत म्हणजे स्त्री ची परिपुर्णता आहे 
मग ती नेमकी कुठे चुकली रे 

तिने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं हे तीच चुकलं का ??? 

की तुझ्या आई बाबा ना तिने तिचे आई बाबा मानलं हे चुकलं ???? 


तिने तिचे करियर धुळीत मिळवले फक्त आई होण्यासाठी हे तीच चुकलं का ???? 

ती कुठे चुकली हे साग 
मग बोलू आपण ??

आता मात्र अजय पूर्ण हतबल झाला 
उभा असलेला अजय टेबल वर बसला 
अगोदर शांत च बसला फक्त डोळ्यातून पाणी येत होते 
काही काळाने तो बोलू लागला 
तुला काय वाटते ग आई मी खुप खुश आहे का ??? 
मला नाही येत तिची आठवण 
मान्य आहे मी चुकलो 
मी मूर्ख आहे 
मी च गाढव आहे 
पण ती एकदा म्हणू शकत नव्हती 
की अजय जास्त नाटक करू नको मला भेटायला ये, 
मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत 
मी मुद्दाम तसे वागायचो पण ती पण मला समजावून सांगत नव्हती 
व त्या दिवशी मी देखील हॉस्पिटलमध्ये धावत पळत आलो होतो 
पण तुझं च बाळ आहे ना मग तुझ्यासारखे च दिसणार 
या ओळी ने मी मोडून पडलो ग 

तुम्हाला काय वाटत मी ऑफिस मधील कामामुळे तिला विसरलो 
तर बिल्कुल नाही 
मला तिची आठवण येऊ नये म्हणून मी ऑफिसमधील कामात स्वतः ला गुंतून घेत होतो

तुम्हा बायकांना खुप सोपं वाटत ग सगळं पण तुम्ही रडू शकता, भांडू शकता दुसऱ्याला सगळं सांगू शकता पण आमचे काय 
लग्न करून वेदिका घरी आली 
अग माझं आयुष्य तिच्या सोबत चालत होत 
ती माझं जगणं, हसणं सगळं होऊन बसली 
तिची सवय झाली मला ती समोर जरी दिसली नाही ना तर मी कासावीस होयचो 
पण तिला याचे काहीच वाटत नव्हते 
ती तुमच्यात व जो जगातही आला नाही त्या बाळात गुंतून गेली 
एका जित्या जागत्या माणसाला
तसेच तडफडत सोडून 
मी नाही म्हणत यात माझी चूक नाही कारण ही अवस्था प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एकदातरी येतेच 
फक्त त्यांना त्या परिस्थितीसोबत स्वतः जुळवून घेता येत व मला ते जमलं नाही, 

पण मला चूक सुधारण्याचा एक चान्स ही तिने देऊ नये, 
अगोदर घटस्फोट तिने च माघीतला 
व आता लग्न देखील तीच स्वतःहून पहिले करतेय 
हे सगळं करण्यापेक्षा तिने येऊन माझ्या कानाखाली जरी मारली असती ना ग 
व म्हणाली असती ना की मी नाही सोडणार तुला 
तुला मला सोडायचे असेल तर सोड 
तरीही मी काहीच बोललो नसतो ग 
इतका तिचा माझ्यावर अधिकार आहे व तो आयुष्यभर राहील 
मी ती सोडून कुणाचा विचार देखील करू शकत नाही 
फक्त माझं मन दुखावलं आहे तिने 
आणि हो आई तिने सॉरी म्हणावं अशी माझी मुळीच अपेक्षा नाही फक्त तिने मला माफ केले तरी खुप झालं 

असे बोलून तो शांत झाला 

आता मात्र आई बाबा ना कळून चुकले 
दोघेही एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत फक्त अजय मध्ये अजूनही थोडा मी पणा आहेच 
तर ती कसा दूर करायचा ????


शेवटी आपण सगळे वैदिकांच्या घरी जाऊ हे ठरते,

वेदिका च्या घरी निरोप पाठवला जातो की अजय व त्याच्या घरचे येत आहेत, 

वेदिका ला प्रश्न पडतो ते का येत असतील 
पण आत्या सांगतात कुणी काही बोलणार नाही जे काही बोलायचे ते मी च बोलेल , 


सगळे हॉल मध्ये बसतात वेदिका बाळाला झोपी घालून ती देखील बाहेर येते 

वेदिका व अजय समोरा समोर एकमेकांना बघून च तुटून जातात, 
वेदिका तर इतकी तुटते की पटकन जाऊन अजय ला सांगावं की थांबावं हे सगळं व मला घेऊन चल अस सांगावं त्याला पण आत्या चे शब्द आठवून ती शांत बसते, 

इकडे अजय विचार करतो वेदिका एकदा म्हण अजय मला घेऊन जा 


आत्या बोलायला चालू करतात 
आतापर्यंत जे झालं ते झालं 
पण तुम्हा दोघांना देखील त्या लेकरासाठी एकत्र यायचे असेल तर आमची काही हरकत नाही 

वेदिका तुझे काय मत ??? 
आत्या 

मी तयार आहे अजय सोबत जायला 

वेदिका चे हे शब्द ऐकताच अजय खुश झाला पण त्याने कुणालाच दाखवले नाही, 

अखेर केली होती वेदीकाने तिच्या आयुष्याशी तडजोड ......................

खरे तर आज शीर्षक सार्थ झाले व कथा संपायला हवी  पण एक लेखिका म्हणून 
समाजाला काही सूंदर मेसेज देण्याची ईच्छा आहे, 

मग भेटुयात पुढील अंतिम भागात 
ही तडजोड आयुष्यभर तडजोड ठरेल की कधी कधी संसारात केलेली तडजोड देखील सुंदर रूप धारण करते, 

भेटू अंतिम भागात 

धन्यवाद

🎭 Series Post

View all