तडजोड (भाग 26) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love

तडजोड (भाग 26) 

( माघील भागात आपण पाहिले अजय व वेदिका चे नाते आहे त्या ठिकाणी होते) 

आता पुढे ..................

प्रत्येकजण स्वतः ला स्वतः च्या जागेवर बरोबर च मानत होता, त्याचबरोबर त्यांना एकमेकांना गमवण्याची 
भीती वाटत होती म्हणून कुणी काही बोलत च नव्हते, 

आता अजय च्या मनात वेदिका बरोबरच त्याच्या आई बाबा विषयी देखील राग निर्माण झाला होता तो आता कुणालाच बोलत नव्हता, 

वेदिका चे देखील काही वेगळे नव्हते ती अजय विषयी मनात राग धरून होती, 

वेदिका ची सासरी जाण्याची काहीच हालचाल दिसेना म्हणून न राहवून आत्या म्हणाली 

वहिनी आपण बैठक बसवून एकदाचे काहीतरी सोक्ष मोक्ष लावून घेऊ बर 


कशाचे वहिनी 

अग कशाचे काय वेदीकाचे, आत्या 

त्यांचे काय आता, वहिनी 


त्यांचे काय म्हणजे पोरगी जायचे नाव घेत नाही जावई घरी येत नाही 
व तू आणि दादा बस अजय च्या आई बाबा च्या पुढे पुढे करत आत्या 


अहो, असे काही पण बोलू नका, वहिनी 

का
वाईट वाटतंय ना 
पण सत्य आहे हे, आत्या 


वेदिका ची आई रडू लागली, 
असे हाताने कुणी लेकी चा संसार मोडते का ??
लहान आहेत ते आपण त्यांना समजावून सांगू, वहिनी 

हो ते कळतंय मला पण ते नाहीच म्हणताय ना 
मग काय करणार 
व कशाला गुंतवून ठेवायचे, 
व तसेही अजय ने एकदा तरी यायला हवे होते असे मला वाटते, आत्या 

ताई, तुम्हांला काय वाटते त्यापेक्षा 
वेदिका ला काय वाटते ते जास्त गरजेचे आहे, वहिनी 

बोलून झाले माझे तुझ्या लेकीशी 
ती घटस्फोट घ्यायचा म्हणतेय 

आत्या चे हे शब्द ऐकताच आई पटकन आधार घेत खाली बसून रडू लागली 
शेवटी जे नको होते तेच झाले, 

आता काय करू मी, 
मला दोनी पण नकोय मुलगी माझ्या जवळ पण नकोय व दुःखात पणनकोय 
काय करू मी वेदिका ची रडू लागली, 


वहिनी सावर स्वतः ला, 
मी तुझ्या मुली चा संसार बसवून देऊ शकते, 
फक्त तुला व दादा ला खंबीरपणे माझी साथ द्यावी लागेल, 
जमेल तुला, 
आत्या वेदिका च्या आई ला विचारू लागली, 

काय सांगू हो की नाही 
पण मुली साठी काहितरी करावं लागणार होते, शेवटी वेदिका ची आई 
तयार झाली आत्या ला साथ द्यायला, 


चल उठ 
व लाग कामाला, 
अजय च्या घरी निरोप पाठव 
वेदिका ला घटस्फोट हवाय, 
आत्या 


हे करावच लागेल का??
दुसरे काही बघू ना, वहिनी 


वहिनी हे बग 
तू आता च म्हणाली ती जे म्हणेल ते व लगेच अशी पलटी 
माझ्यावर विश्वास ठेव
बग तू 
आत्या 


बर ठीक आहे उद्या सांगू, वहिनी 


उद्या नाही आत्ता च साग
तुम्ही पण ना खुप हट्टी झालात आजकाल 
वहिनी 

हो होऊ दे, 
तू फक्त ऐक माझं 
तूच म्हणतेस ना मुलं लहान आहेत मग बघू खरच लहान आहेत की अक्कल गहाण ठेवलीय यांनी, 
असे म्हणून ती हसू लागते 


इथे माझा जीव जातोय व तुम्हाला हसू येतय,वहिनी 

विश्वास ठेव तू फक्त 

आत्या असे म्हणून हातात मोबाईल घेतात व वहिनीला देतात , 

नाही मी नाही 
हे आले की करू कॉल 
माझ्याकडून नाही होणार, 
वहिनी डोळ्यात पाणी आणून बोलू लागली 

झालं तुझं पुन्हा चालू, 
अग माझी माहेरची साडी मधील अलका कुबल 
विश्वास ठेव
वेदिका चा संसार बसवून च दाखवेन 
फक्त तू खंबीरपणे माझी साथ दे, 

आत्या वहिनी चा हात हातात घेत म्हणाली, 
हे बग वहिनी त्रास मला पण होतोय पण काही गोष्टी सहन कराव्या च लागतात समजलं, 

दोघीनि मिळून अजय च्या घरी कॉल करायच ठरलं, 

असे म्हणून त्या वेदिका च्या सासरी कॉल करतात, 
की वेदिका ला अजय पासून घटस्फोट हवा आहे, 

घटस्फोट हा शब्द ऐकताच 
वेदीकाचे सासूबाई ना तर भोवळ येते काही सुचण्याच्या आत 
त्या खाली पडतात 
शुद्धी वर येताच त्या नातवाच्या ओढीने वेदीकाकडे धाव घेतात, 
वेदिका व अजय चे नाते कसेही असले तरी ते टिकावे हीच त्यांची ईच्छा होती, 
त्यांना नातू म्हणजे त्यांची जगण्याची उमेद वाटत होता, 
पण आज कुणीतरी त्या उमेदिवर च बोट ठेवले होते, 


त्या धावत पळत 
वेदिका च्या घरी आल्या, 
कुणाला काहीच न बोलता सरळ वेदिका च्या रूम मध्ये जाऊन 
वेदिका ला व बाळाला कवटाळून रडू लागला, 

वेदिका ला काही कळण्याच्या आत 
आत्या व आई रूम मध्ये आल्या 
वेदिका च्या सासू ची ही अवस्था बघून 
त्यांनाही खुप वाईट वाटले पण त्यांच्याकडे दुसरा मार्ग च नव्हता सध्या तरी, 


काय असेल आत्या च्या मनात 
कुठे बसवतील त्या वेदिका चा संसार अजय सोबत की शोधतील नवीन वाट??????

जाणून घेण्यासाठी सोबत राहा

🎭 Series Post

View all