तडजोड (भाग 25)
(माघील भागात आपण पाहिले वेदिका ला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते व आता पुढे ................
अजय चे आई बाबा वेदिका कडे गेले होते,
पण अजय मात्र अजूनही ऑफिसमध्ये च होता,
त्याला वेदिका कडे जावेसे वाटत होते पण त्यांच्यातील मी पणा व पुरुषी अहंकार त्याला असे करू देत नव्हता,
काय करू काय नको असे करत करत तो हॉस्पिटल कडे निघाला,
मी स्वतःहून तर माघार घेत नाहीये ना,
तिला वाटेल मला गरज लागली तिची व कसा आला मग माझ्या मागे पळत
असे च म्हणेल का ती
काय करू
या विचारात च तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला,
तिथे विचारणार वेदिका नावाचे पेशंट कुठे ऍडमिट आहे,
तर त्याच्या कानावर शेजारच्या रूम मधून शब्द पडले,
अभिनंदन वेदिका
तुला मुलगा झाला,
अजय ची आई बोलत होती
आई कुणासारखे दिसते माझे बाळ ,
वेदिका
कुणासारखे काय विचारते
तू जन्म दिलास ना मग तुझ्यावरच जाणार,
व हट्टी पण अगदी तुझ्यासारखे च आहे,
असे म्हणून सगळे हसू लागले,
त्यांचे बोलणे ऐकून
अजय जागीच थांबला
अरे मी किती मूर्ख होतो वेड्यासारखा पळत आलो
इथे तर माझी गरज पण नाहीये,
गरज तर सोडा साधे नाव पण घेत नाहीये कुणी माझे,
अजय च्या डोळ्यातून पाणी वाहू लागले,
त्याचे मन त्याला बाळाचा चेहरा बघून जा सांगत होते तर
डोके त्याचा पुरुषी अहंकार जागे करत होते,
त्या दोघांमध्ये तो हॉस्पिटल च्या बाहेर पडला,
खिन्नपने घरी आला
व विचार करू लागला,
इतक सोपं होतं का वेदिका ला सगळं विसरणं कमीत कमी आज तरी तिने मला कॉल केला असता तर,
तिला खरच गरज नाही वाटत का माझी, जाऊ दे आता तिला गरज असेल तर येईल पण मी नाही जाणार,
हळूहळू दिवस जात होते
बाळ देखील मोठे होत होते,
वेदिका आता बाळात इतकी गुंतली होती की तिला अजय चे भान देखील राहिले नव्हते,
तिचा दिवस व रात्र बाळात जात होते ,
फक्त वेदिका च नाही तर घरातील सगळी माणसे बाळात गुंतली होती,
थोडक्यात काय तर बाळाने सर्वाना कामाला लावले होते,
वेदिका चे घर आनंदाने भरून गेले होते,
अजय चे आई बाबा देखील दिवसा आड चक्कर मारायचे, पण ते वेदिका ला सासरी घेऊन जाण्याचे काही नाव घेत नव्हते,
तिकडे अजय त्याच्या कामात व्यस्त होता, पण त्याला वेदीका ची आठवण येत होती, वेदीकासाठी जगण्याची नवीन उमेद निर्माण झाली होती पण अजय चे काय तो तर आजही तिथेच होता तिची वाट बघत ,
तो फक्त बोलून दाखवत नव्हता पण कुठेतरी तो मनात तिची वाट बघत होता,
येणार प्रत्येक दिवस येत होता तसा च मावळत देखील होता,
आता वेदिका चे बाळ सहा महिन्यांचे झाले होते
वेदिका आता पूर्णपणे आई झाली होती, बाळाची खाण्यापिण्याची झोपण्याची, खेळण्याची प्रत्येक वेळी ती सांभाळत होती,
तिला तिच्या बाळापुढे जगाचा विसर पडला,
तिला तिच्या बाळापासून आता कुणीच दूर करू शकत नव्हते तिला त्यात कुणी नको देखील होते त्यातच अजय विषयी तिच्या मनात खुप राग होता,
त्याने कमीत कमी मी मेले की जिवंत आहे हे बघायला तरी यायला हवे होते, असे ती आई बाबा ला नेहमी सांगायची,
असेच दिवस जात होते प्रत्येकजण स्वतः च्या जागेवर स्वतः ला बरोबरच मानत होता,
वेदिका ला वाटायचे अजय चुकला त्याने यायला हवे होते
अजय ला वाटायचे वेदिका ने तरी कुठे बोलावले,
वेदीकाच्या आई बाबा ना वाटायचे त्या दोघांच्या प्रश्न आहे आपण मध्ये नको बोलायला,
अजय च्या आई बाबा ना वाटायचे
जे चालू आहे ते चालू देऊ
उगाच दोघांचे नाते तुटले तर नातवाला पण मुकावे लागेल
त्यापेक्षा आहे तो आनंद उपभोगू
पुढचे बघू पुढे,
कुणीही कुणाला कशाचाही जाब विचारत नव्हते, ते घाबरत होते एकमेकांपासून दूर जायला,
व हे असेच चालू होते निरंतर,
वेदिका बाळात व्यस्त व आई बाबा वेदिका मध्ये,
खुप वेळा असेच होते जेव्हा जुनी नाती घट्ट असतात तेव्हा त्या जुन्या नात्याच्या ओलाव्यानेच नवीन नात्ती तक धरून राहतात,
पण कधी कधी असेही होते जुन्या नात्याच्या ओझ्याखाली नवीन नाती दबली जातात मग ती कधीच उभारी घेत नाहीत,
काय होईल वेदिका व अजय चे,
जुन्या नात्याच्या ओलाव्यात नवीन नाते तक धरून राहील
की दबेल ओझ्याने,
जाणून घेण्यासाठी सोबत राहा,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा