Sep 20, 2020
प्रेम

तडजोड (भाग 24) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Read Later
तडजोड (भाग 24) प्रेमानंतर चे विदारक सत्य

तडजोड (भाग 24) 


( माघील भागात आपण पाहिले अजय च्या आई बाबा नि वेदिका ला तिच्या माहेरी नेऊन सोडले होते, पण अजय  ने अजूनही तिला कॉल केला नव्हता,)

आता पुढे ...........

खुप प्रयत्न करून देखील अजय माघारी परतत नाही हे लक्षात येताच,

वेदिका ने त्याच्यात लक्ष घालने कमी केले, 
असेही ती माहेरी होती, 
त्यामुळे तिचा जास्त संबंध येतच नव्हता अजय शी  पण जो काही येत होता त्यातही तो तिला सतत टाळायचा, 


हळूहळू दिवस जात होते, 
वेदिका व अजय मधील दरी वाढत चालली होती, 

आता घरातील बाकी लोकांना देखील हे लक्षात येऊ लागले, पण वेदिका ची अवस्था बघून कुणी काही बोलत नव्हते, 

प्रत्येक जण फक्त वेदिका खुश राहावी म्हणून प्रयत्न करत होता, सतत तिचे नाव, तिचे लाड तिच्या भोवती गराडा घालवून असायचे सगळे, नेमकं हेच अजय ला खटकायचे 
या बाळामुळे वेदिका त्याच्या पासून  दूर गेली, 
व सगळे वैदिकांच्या जवळ असा त्याचा समज झाला होता, 
तो कुणाला काही बोलत नव्हता पण त्याचे वागणे लपत देखील नव्हते, 


आज वेदिका ची सकाळपासून तब्बेत खराब होती, 
तिने आई ला कॉल करून देखील सांगितले पण दिवस जसा जसा वर येत होता 
तसे तसे तिचे दुखणे वाढत होते, 

शेवटी वेदिका च्या आई ने 
अजय च्या घरी कॉल केला, 
वेदिका ला लेबरपेन चालू झाल्यात तुम्ही या , 


अजय चे आई बाबा तातडीने निघाले, 
त्यांना अपेक्षित होत 
अजय त्यांच्या अगोदर तयार असेल पण झाले उलटे, 


मला ऑफिस चे काम आहे 
तुम्ही जा, 
असे सांगून अजय ने काढता पाय घेतला,
अजय चे बोलणे ऐकून 
आता आई खुप चिडली 

काय बोलतोय कळते का तुला??
आई 

हो आई कळते, 
पण please
आता तू तिची बाजू घेऊन लेक्चर देऊ नको, 
बाळाला  जन्म प्रत्येक स्त्री देतेच त्यात नवीन काही नाही, 
आणि मुळात तुम्ही ती प्रेग्नंट राहिल्या पासून जे एक चित्र उभा केले ना ते अगोदर बाजूला करा, 

उगाच त्रास 
तुम्हाला व मला देखील, 
अजय रागात बोलत होता, 

आई ला त्याचे शब्द खुप लागले, 

अरे तू बाबा 
होणार आहेस, 
जगातील सर्वात आनंदाचा क्षण व तू त्याला चित्र म्हणतो, 
अजय भानावर ये
तुला झाले तरी काय ???
तू कधीच वेदिका ला समजून घेतले नाहीस, 
आई चे बोलणे मधेच तोडत तो 
म्हणाला मी घेतले नाही, 

की तुम्ही मला घेतले नाही, 
सतत वेदिका वेदिका .....
तिच्या च नावाचा जप 
कंटाळा आलाय मला 
या सगळ्याचा 
आणि खरच सांगतो आई ती व तिचे बाळ मला नकोय ते माझ्या आयुष्यात, 

आता आई आणखी चिडली, 

ठीक आहे, 
यापुढे 
तू तिच्या आयुष्यात कुठलीही ढवळा ढवळ करायची नाही, 
पुन्हा सांगितले नाही म्हणशील, 
समजलं ना, 

हो नाही करत, 
अजय 


चला ओ, 
आपली सून आपल्यासाठी गरजेची आहे सध्या, 
याला राहू द्या इथेच, अजय ची आई बाबा ना म्हणाली, 


हो चल, 
म्हणून बाबा ही बाहेर जातात

ते  दोघे वेदिका च्या घरी निघाले, 

इकडे वेदिका ला तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते, वेदिका वेदनेशी झुंज देत होती पण तिला तिचे मन सांगत होते अजय येईल कारण तिला आज त्याच्या आधाराची, प्रेमाची गरज होती, 

आई बाबा निघून गेल्यावर अजय चे देखील मन लागत नव्हते, 
त्याला देखील वेदिका ची आठवण येत होती 
आता आपण वेदिका जवळ असायला हवे होते ती वाट बघत असेल आपली 
हे माहीत होते,
पण तरीही मनात विचार येत होते
तिने तरी कुठे बोलावले मला, 
तिला कुठे वाटले मला सांगावे, 
या विचारताच तो ऑफिस ला निघून गेला 

खुप वेळा नात्यात असे होते, 
दोघांनाही माहीत असते 
समोरचा वाट बघत असेल पण तरीही माघार कोण घेईल यामुळे खुप वेळा नाते तुटते, 
काय होईल वेदिका व अजय चे 
गैरसमज मिटतील की आणखी वाढतील, 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा
धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,