Sep 20, 2020
प्रेम

तडजोड (भाग 23) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Read Later
तडजोड (भाग 23) प्रेमानंतर चे विदारक सत्य

तडजोड (भाग 23) 

( माघील भागात आपण पाहिले अजय लवकर निघून गेला होता ऑफिस ला कुणालाच न सांगता तो निघून गेला होता) 

आता पुढे ...............................


वेदिका ने आई ची समजूत काढली पण तिच्या मनाचे काय त्यात तर राग होताच ना, 

तिने सर्वाना व्यवस्थित जेऊ घालते, तिचे मन नव्हते लागत कशात  पण तिने कुणाला दाखवले नाही, 
गप्पा, हशी मजाक सगळे झाले, 
व सगळ्यांना निरोप देऊन वेदिका  रूम मध्ये येऊन पडली, 

तिची आई सगळे आवरून गेली होती, पण फक्त थोडे भांडे बाकी होते, पण तिला कधी झोप लागली तिलाच कळले नाही, 


तिला जाग आली ती दारावरील बेल ने च 

किती वेळ झाला बेल वाजवतोय, 
तू बहिरी झाली होती का ??? 
अजय 

अरे झोपले होते, वेदिका 

छान नवरा काम करतो व तू मस्त झोपा काढ, अजय 


अरे मी कुठे म्हणते तू काम नाही करत, मग माझ्या झोपेचा व तुझ्या कामाचा काय संबंध, वेदिका 

तसा तुझा माझ्या कुठल्याही गोष्टी शी संबंध असतो का, अजय 


हो ना नसतो ना , 
अरे आपले आई बाबा आले होते दोघांचे , एखादा सुट्टी घेतो 
पण नाही सुट्टी तर दूर तुला लवकर यायला देखील जमले नाही, किती कमाल आहे ना, 
वेदिका 

हो कमालच आहे व ते तुला नाही कळणार त्यासाठी मेहनत करावी लागते, प्रमोशन मिळवावे लागते, 
तुझ्यासारखे नाही टार्गेट देखील पूर्ण नाही होत, 
अजय 

हो ना मी तर टार्गेट देखील पूर्ण नाही करत ना, 
असे म्हणून वेदिका रडू लागली, 

ये तुला रडायचे असेल तर तू please दुसरीकडे जाऊन रड, इथे नको अजय 


वेदिका निघून जाते, 

आता त्यांचा रोजचा दिवस वादाने उगवत होता, व वादानेच मावळत होता, 
ते दोघे एकमेकांशी बोलत देखील नव्हते, पण आपल्यात कितीही वाद होऊ दे आई बाबा ना सांगायचे नाही हे त्यांनी ठरवले होते, आपण बाप होणार आहोत कमीत कमीत या खुशीने तरी अजय ला आनंद होईल असे वाटत होते पण तेही फोल ठरले, 
मुळात त्या बाळामुळेच वेदिका बदलली, 
त्या जगात न आलेल्या बाळाची तो नकळत बरोबरी करू लागला, 
सगळे वेदिका चे लाड करताय हे त्याला खटकू लागले, 
अजय ने प्रत्येक व्यक्तीबद्दल मनात खुप गैरसमज करून घेतले, 
पण वेदिका ला जाणीव देखील नव्हती या सगळ्याची, 
ती खुश होती तिच्या जगात, 


आई बाबा वेदिकांला जास्त प्रेम करू लागले, 
त्या बाळामुळेच माझी सगळी माणसे हिरावली गेली असा अजय चा समज झाला, 

वेदिका खुश नसते, 
तिला सतत कसले तरी टेन्शन वाटते हे अजय च्या आई ला जाणवले, 
त्या जास्त वेळ वेदीका कडे येऊ लागल्या पण त्यांना काही हाती लागेना, 
शेवटी मुलीचे पहिले  बाळंतपण माहेरी असते असे सांगून त्यांनी वेदिका ला माहेरी पाठवण्याचे ठरवले,

अगोदर वेदिका माहेरी जाण्यासाठी तयार नसायची पण आता अजय व तिच्यातील दुराव्याने कळस गाठला होता, 
त्यामुळे ती पटकन जाण्यासाठी तयार झाली, 

अजय च्या आई बाबा नि तिला माहेरी सुखरूप नेऊन सोडले, 
कमीत कमी आता तरी अजय ला आपली कमी जाणवेल असे तिला वाटत होते, 
पण मनाने तुटलेल्या अजय ला त्याचे भान देखील नव्हते, 

आज वेदिका ला त्याच्या आदराची सर्वात जास्त गरज होती, तिच्या बाळाच्या वाढणाऱ्या हालचाली तिला त्याला कुतूहलाने सांगायच्या होत्या, 
तिच्या बाळाचा जनवनारा सहवास तिला त्याच्याकडे व्यक्त करायचा होता, 
तिचे आईपण तिला शब्दात मांडायचे होते 
पण कसे??? 
साधा एक कॉल करून विचारपूस देखील न करणाऱ्या अजय ला ती कशी सांगणार होती तिच्या मनातील तळमळ, 

पण तिला तिच्या बाळावर या गोष्टी चा विपरीत परिणाम देखील होऊ द्यायचा नव्हता, 
म्हणून ती स्वतः ला जास्त गुंतत होती आवडणाऱ्या गोष्टी मध्ये, 

 

एका स्त्री ला जर आयुष्यात सर्वात जास्त पतीच्या आधाराची गरज वाटत असेल तर ती त्या मासिक पाळी च्या  चार दिवसात, 
व गरोदरपणात 
कारण या दिवसात तिच्यात खुप हार्मोनल बदल घडत असतात, 
यात ती कधी कधी खुप भावनिक देखील होते, 
कारण नसताना रडते, 
किंवा उगाच उदास होते, 

कधी कधी  खुप समाधानी होते तर कधी निराश, 

हे प्रत्येक स्त्रीत होणारे बदल होते, 

पण वेदिका ला अजय ने समजूनच घेतले नाही, 
तो फक्त त्याचे काम, नाव पैसा यात गुंतला होता, 

खुप प्रयत्न करूनही अजय माघारी परतत नाही हे लक्षात येताच वेदिका ने देखील आपला मार्ग निवडला, 

काय असेल वेदिका चा नवीन मार्ग, 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा,

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,