तडजोड (भाग 22) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love

तडजोड (भाग 22)

(माघील भागात आपण पाहिले सर्वजण अजयची जेवणासाठी वाट बघत असतात) 

आता पुढे .......................

सर्वजण अजय ची वाट बघत असतात, आता वेदिका ला  खुप 
बोर झाले, तिने वाट बघून बघून, 
आई बाबा ना जेऊन घ्यायला सांगितले, 

पण तिला सोडून ते तरी कसे जेवणार, 
म्हणून सगळे तसेच थांबले, 
आता त्यांच्या आनंदात विरजण पडले होते 
ते फक्त खोटं हसू चेहऱ्यावर घेऊन वावरत होते, 

ते सगळे वाट बघत असतात व अजय येतो, 

त्याला बघून सगळे खुश होतात, 
पण तो कामाने खुप थकला होता 
त्याची कुणाशीच बोलायची ईच्छा नव्हती, 
तो चेहऱ्यावर जबरदस्ती चे हसू आणून , 
मी जेवण करून आलोय, 
तुम्ही जेऊन घ्या 
म्हणून निघून गेला, 

बघितलं आई हे असं असत याचं 
याला माहीत होतं मी त्याला सोडून जेवण करणार नाही ,
मग तरीही एक कॉल करून सांगता नाही आले का त्याला, 
मी वाट बघते याचे भान देखील असू नये, 

वेदिका अजय च्या आई ला म्हणाली, 

अग तू पण ना , 
काहीही पकडून बसते, 
काम असेल थकले असतील, 
तू समजून घ्यायचे, मध्येच वेदिका ची आई म्हणाली, 


झालं मी काहीही बोलले की तू मलाच रागावणार म्हणजे त्याच्या चुका तुला खरच दिसत नाही की तुला त्या बघायच्या च नसतात, वेदिका 

असे कसे त्याला कळायला नको का???
ती एकटी असते घरी व आता तर वेदिका ला कुणी बोलूच नका तिची चूक असो की नसो, 
नाहीतर मी घेऊन जाते तिला आमचा सोबत, अजय ची आई सुने ची बाजू घेत म्हणाल्या, 


जाऊ द्या ना आई, 
तुम्ही सगळे नका मनावर घेऊ त्याचे हे वागणे नेहमीचे आहे, वेदिका 


वेदिका सगळ्यांची समजूत काढते व त्यांना जेऊ घालते, 

खुप उशीर झालाय आज इथेच थांबा सगळे, वेदिका 

नाही जातो आम्ही, वेदिका ची आई 

तू कधी ऐकणार आहेस का????

वेदिका, 


मुलगी इतकी म्हणतेय तर थांबू ना ?? वेदिका चे बाबा 


हो तुम्हांला मित्रा सोबत गप्पा मारायला मिळतील ना , 
वेदिका ची आई , 

आता सगळे हसतात 
व शेवटी सगळ्यांनी 
एकमेकांना फोर्स केल्यामुळे सगळे थांबतात, 


गप्पात कसा वेळ निघून गेला त्यांचे त्यांनाच कळले नाही, 
सगळे खुश होते, पण वेदिका अजूनही अजयच्या च विचारात होती, 
तिला खुप राग आला होता 
तिला जाब विचारायचा होता त्याला,
 पण हे सगळे असताना ती तेही करू शकत नव्हती, 
त्यामुळे शांत राहणे हा एकच पर्याय तिच्याकडे होता, 

सगळे मस्त गप्पा मारत मारत हॉल मधेच झोपी जातात, आज वेदिका तिथे च झोपली त्यांच्या सोबत, 

अजय ये अजय, 
अरे बाहेर तरी ये, 
सकाळी उठल्यावर त्याची आई त्याला आवाज देते 


पण सकाळी सगळे उठाण्यापूर्वी अजय निघून गेलेला असतो, 

सावरा सावर करण्यासाठी , 
वेदिका आई ला सांगते, 

आई त्याला खुप काम होते मग तो सकाळीच गेला, 

असे कसे, 
आई वडील आलेत तरी वेळ नाही मग काय कामाचा तो पैसा, अजय ची आई 


हो आई 
पण त्याला प्रमोशन मिळाले ना मग काम खुप असते, वेदिका 

हो पण ते काय कामाचे 
जर आपले सोबत नसतील तर, 
रात्री उशीरा आला म्हणाल उद्या सकाळी चार चांगल्या गोष्टी सांगू त्याला, पण नाही तो उठण्यापूर्वी च गायप, मग कुणाला सांगू, 
आई 


हो आई कळतंय मला, पण जाऊ द्या ना
असेल त्याचे काम , 


झालं उंदराला मांजर साक्षी 
मग आम्ही काय बोलणार, 
झाले दोघे एकत्र, 
अजय च्या आई च्या या बोलण्यावर सगळे हसू लागले, 

पण काही म्हणा 
माझा अजय खुप नशीबवान आहे त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली, 
सुखाने संसार करा, असे म्हणून त्यानि वेदिका ला जवळ घेतले, 

वेदिका च्या मनात खरच काही नसेल का??
तिचे मन मान्य करत असेल का अजय चे असे वागणे, 
जाणून घेण्यासाठी 
सोबत राहा, 
लाईक करा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all