तडजोड (भाग 21) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love

तडजोड (भाग 21) 

(माघील भागात आपण पाहिले वेदिका व अजय च्या संसाराची गाडी मस्त चालू होती) 

आता पुढे ..........


आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले होते, 
दोघेही एकमेकांची काळजी घेत होते, 
अजय ला जॉब मध्ये प्रमोशन मिळाले, 
प्रमोशन तर मिळाले पण। त्याच्यासोबत खुप जबाबदाऱ्या देखील वाढल्या, 
अजय कामात हुशार होता तसाच तो शांत देखील त्याला पटकन कुणाला नाही म्हणायला किंवा कामात कामचुकार पणा करायला आवडत नव्हते, 
त्यामुळे कुणी काहीही व कितीही काम सांगितले तरी तो ते पूर्ण करायचा, 

तर इकडे वेदिका ला वेगळेच वेध लागले होते ती तिच्या ऑफिस ने दिलेले टार्गेट देखील पूर्ण करू शकत नव्हती, 

ती अजय च्या आई बाबा शी जास्त जोडली गेली, त्यांचे रोज कॉल चालायचे खुप वेळ, 
तिला देखील त्यांच्या सोबत वेळ घालवायला आवडायचे, 

कधी कधी तर ती अजय ला न सांगता आई बाबा कडे जायची तिकडे दिवसभर मज्जा करून मग रात्री घरी यायची, 

ती घरी आली की तिची बडबड चालू व्हायची 
आज आम्ही हे केलं 
ते केलं ती बोलत असायची पण अजयचे लक्ष च नसायचे, 

अजय वर कामाच खुप लोड वाढला होता, तो आता घरात बिल्कुल लक्ष देत नव्हता, 

वेदिका ला च सगळं बघावं लागायचे, त्यामुळे तिची देखील चिडचिड चालू झाली, 

या सगळ्यातच तिला दिवस गेले, 
तिने ही गोड बातमी अजय ला देणं अपेक्षित होत 

पण तिला आता अजय पेक्षा 
त्याचे आई बाबा जवळचे वाटू लागले,

तिने आई ला ही गोड बातमी दिली, 

आई चा आनंद गगनात मावेनाचा झाला, 
वेदिका व अजय दोघांचे आई बाबा आज त्यांच्याकडे मुक्कामी आले, 
आज त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस होता, 

सगळे बसलेले असतात, 


मी सगळ्यांसाठी आज काहीतरी बनवते, वेदिका 

बिल्कुल नाही आज मी बनवणार, 
आता मी आजी होणार आहे त्यामुळे तुझी व बाळाची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, अजय ची आई म्हणाली, 


हो बाळ करू दे तिला काम, 
तसेही रोज फक्त माझं डोकं खायची,
 मी आजी कधी होईल ,
मी आजी कधी होईल, तुमच्या लग्नापासून तिला फक्त एकच काम होत तुझ्यावर लक्ष ठेवण्याचं आज ते संपलं, 
मी रागावायचो म्हणून ही गप्प बसली नाहीतर तिने आतापर्यंत तुझे दोन बाळंतपण केले असते, 
सगळे हसतात, 


अहो काही जिभेला हाड आहे की नाही एका बाळंतपनाला नऊ महिने लागतात याचे भान तरी ठेवा, उगाच काय आपलं 
उचलली जीभ आणि लावली टाळू ला, अजय ची आई


ते जाऊ द्या ओ 
गंम्मत करतात ते तुमची 
पण मी देखील आजी होणार आहे मग दोघी मिळून काम करू, 
बग ह ........................
वेदिका तुझ्या सासूबाई चा डाव एकट्याच आजी होणार आहे म्हणे, वेदिका ची आई हसत म्हणाली, 


अरे हो हो पण 
ते पराक्रमी वीर पुरुष कुठे आहेत, 
म्हणजे या बाळाचे बाबा, वेदीकाचे बाबाच्या या बोलण्यावर सगळे पुन्हा हसतात, 


काही काय बोलता ओ बाबा, वेदिका 


बाबा च्या बोलण्यावर लाजून निघून जाते, 
 वेदिका अजय ला आज लवकर घरी ये सांगण्यासाठी कॉल करते, 

अगोदर तो कॉल उचलत नाही, नंतर उचलतो तर प्रयत्न करतो बस इतकेच म्हणतो,

सगळी तयारी झालेली असते सर्वजण अजय ची आतुरतेने वाट बघत असतात, 
आई वेदिका ला जेवायचा आग्रह करतात पण वेदिका काही ऐकत नाही,
तिला ही गोस्ट कधी अजय ला सांगते व कधी नाही असे झालेय, 
येईल का अजय वेळेवर घरी??
वेदिका व अजय मधील निर्माण झालेला दुरावा संपेल या तानुल्याच्या आगमनाने की वाढेल आणखी दरी, 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
लाईक करा, 
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, 
फॉलो करा, 
काळजी घ्या 

धन्यवाद

🎭 Series Post

View all