Jan 27, 2021
प्रेम

तडजोड (भाग 20) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Read Later
तडजोड (भाग 20) प्रेमानंतर चे विदारक सत्य

तडजोड (भाग 20) 
(माघील भागात आपण पाहिले अजय व वेदिका यांनी नवीन घरात प्रवेश केला होता ) 

आता पुढे ..…..............

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण अजूनही लेकरं लहान आहेत
त्यांना तुमच्या पंखाखाली राहू द्या, वेदिका ची आई म्हणाली 

अहो वहिनी 
आपण याना वाऱ्यावर थोडीच सोडणार आहोत?
आपण येत जाऊ की इथे आणि म्हणूनच घर मधोमध घेतलं 
सासर व माहेर दोन्ही समान अंतरावर असावे मग कुणालाच राग नको, 

आणि तसेही आम्ही आज जाणार नाही आहोत, 
सगळं नीट व्यवस्थित करून च जाऊ, 
अजय चे बाबा म्हणाले, 

सगळे हसू लागले, 

थोडावेळ बसून वेदीकाचे आई बाबा निघाले, 

आणि please आता रडू नको बर, अजय 

आता किती जरी रडली तरी मी बाबा ना थांबू देणार नाही, अजय चे बाबा म्हणाले, 

पुन्हा सगळे हसू लागले, 
वेदिका च्या आई बाबा नि सगळ्यांचा निरोप घेतला व निघून गेले, 

अजय च्या आई ने सगळे समान व्यवस्थित लावून दिले, 
दुसऱ्या दिवशी पूजा करून ते देखील निघून गेले, 
आता सुरू झाला राजा राणी चा संसारिक  प्रवास, 

दोघेही हुशार , मेहनती, महत्वाकांक्षी त्यामुळे दोघांनी जॉब करायचे ठरवले, 


स्त्री पुरुष समानता मानणारा अजय वेदीकाला प्रत्येक कामात मदत करायचा, 

त्यांनी दोघांनी घरात कामाची विभागणी व स्वच्छतेची नियमावली च बनवली होती,

उदा: जो शेवटी झोपेल त्याने लाईट बंद करावा, 
प्रिझ मधून पाणी बॉटल घेतली तर ती पुन्हा भरून ठेवावी, 
ओला टॉवेल , ओले कपडे इकडे तिकडे टाकू नये, 
ज्याला जाण्याची घाई असेल त्याने लवकर उठून आवरणे उगाच वेळेवर उठून गोधळ घालू नये, 
आपल्या वस्तू आपण व्यवस्थित ठेवाव्या , उगाच वेळेवर दुसऱ्याच्या नावाने ओरडू नये, 
सगळी बिल भरणे, 
चहा करणे, 
किराणा आणणे,
बाजार करणे, 

जो ऑफिस वरून लवकर येईल त्याने घरातील काम आवरणे, 
त्याच बरोबर एकमेकांना व्यवस्थित स्पेस द्यावी विनाकारण हक्क गाजवू नये, 
आपले आपले अकाऊंट डिटेल्स स्वतः सांभाळावे 
एकमेकांच्या कामात नाक खुपसू नये, 
दोघात काहीही झाले तरी दोघांनी ते मिटवावे उगाच आई बाबा ना त्यात आणून आणखी वाढवून ठेऊ नये, 
मतभेत  झाले तरी अबोला धरायचा नाही, 
चूक कुणाचीही असो बारीबारी ने सॉरी म्हणायचं, 
कितीही भांडण झाले तरी एकाने हॉल मध्ये झोपायला जायचे नाही, 


वरील सर्व नियम ती दोघेही ही   कटाक्षाने पाळत असे, 

अजय वेदिका ला प्रत्येक गोष्टीत मदत करायचा, 
तिच्या मीटिंग च्या वेळा सांभाळायचा, 
तिला प्रेझेन्टेशन बनवून द्यायचा, 

छान दिवस चालले होते त्यांचे, 

सणवार असेल तर एक वेळी वेदीकाच्या 
व दुसर्यावेळी अजयच्या घरी जायचे, 
नवीन जोडी चे दोन्हीकडे  भरभरून कौतुक व्हायचे, 

नवीन लग्न झालेले असल्यामुळे वेदिका चा प्रत्येक सन थाटामाटात साजरा व्हायचा


नवीन नवरीचे  सगळे कौतुक सोहळे पार पडले, 
असेच त्यांच्या लग्नाला सहा महिने झाले, दिवस मजेत जात होते, 
ना कुठली कुरबुर 
ना कुठले भांडण 
दोघांनाही एकमेकांची सवय लागली होती,
दोघीही एक मेकांना जपत होते, 
अजय जर लवकर घरी आला तर तो वेदिका ऑफिस वरून येण्यापूर्वी तिच्यासाठी काहीतरी खायला बनूऊन ठेवायचा, 
अजय सारखा पती मिळाला हे तिला खुप भाग्याचे वाटत होते, 

ती देखील त्यासाठी ,
 त्याच्या सुखासाठी, तो जे म्हणेल ते करायची, 
तिचा स्वभाव हट्टी असूनही ती त्याच्या हट्टापुढे झुकायची, 
वेदिका झुकली हे कळताच अजय ती म्हणेल तसेच वागायचा म्हणजे ती दोघे दोन टोके असूनही एकमेकांना खुप सांभाळून घ्यायचे, 

एकमेकांवर जीवापाड प्रेम असणारे, एकमेकांना सांभाळून घेणारे अजय व वेदिका का करत असतील मग आयुष्याशी तडजोड 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
लाईक करा व फॉलो करा, 
धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,