Sep 20, 2020
प्रेम

तडजोड (भाग 2) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Read Later
तडजोड (भाग 2) प्रेमानंतर चे विदारक सत्य

तडजोड (भाग2)

माघील भागात आपण पाहिले वेदिका व अजय ला कॉलेज चे वेध लागले होते 

आता पुढे ........

वेदिका होस्टेल ला व अजय तिच्या एरिया मध्ये रूम घेऊन राहील असे अगोदरच ठरले होते .

दोघांनी पण आपापल्या सामानाच्या लिस्ट रेडी केल्या होत्या. 

वेदीकाचे बाबा म्हणाले 
तू तुझी आई,  अजय व अजय ची आई जाऊन सामान घेऊन या 
मला काम आहे.

पण फोर व्हिलर कोण चालवणार ?
वेदिका ची आई म्हणाली. 

ड्रायव्हर काका ना सोबत न्या 
बाबा नि सुचवले.

ड्रायव्हर काका ना सोबत घेऊन 
सगळी मंडळी निघाली खरेदीला.

तसे पाहिले तर वेदिका च्या बाबा ना काही काम नव्हते.
पण बायका व त्यांची शॉपिंग हा त्यांच्यासाठी खुप बोर विषय होता 
त्यामुळे ते नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करायचे यापासून.

इकडे सगळी मंडळी शॉपिंग करण्यासाठी पोहोचली.
आई म्हणाली,
 वेदिका तुला जे हवे असेल ते घे. 

वेदिका जाम खुश होती 
ती जे पाहिजे ते घेत होती 
व जे नको ते पण फक्त आवडले म्हणून घेत होती. 

आज त्यांच्या आनंदाचा 
पारावर च उरला नव्हता.

एकीकडे अजय व दुसरीकडे वेदिका मनसोक्त शॉपिंग करत होते. 
त्यांच्या आई त्यांचा हा आनंद बघूनच खुश होत होत्या. 

दोघांचीही शॉपिंग झाली 
आता बॅग घेणार कोण गाडीपर्यंत 
दोघेही एकमेकांकडे बघू लागले 
अजय हसून म्हणाला मी माझी घेणार तुझे तू बघून घे.
काय घेतलस ग इतकं हावरट 
जा रे जा, 
गरज नाही तुझी 
वेदिका बॅग उचलत म्हणाली 
दोघांच्याही आई गाडीजवळ जाऊन उभ्या होत्या. 
अजय त्याची बॅग घेऊन तिथे पोहोचला त्या मागोमाग वेदिका देखील आली, 
वाकतवाकत चार वेळा बॅग टेकतटेकत,
अजय दुरूनच हसत होता 
अजय ची आई त्याला रागावली हसतोस काय, 
तू मदत करायची ना 
तुझ्या भरोश्यावर
पाठवतोय आम्ही तिला 


ये आई ,
या एडी ची जबाबदारी देऊ नका मला ,
ती मला पण वेड करेल 
व सगळे हसू लागले. 


आता वेदिका मात्र रागावली 
तिची बॅग झटक्याने आत ठेवत 
ती गाडीत बसली. 

मॅडम रागावल्यात वाटत 
अजय तिला डीवचण्यासाठी 
बोलला.


अजून वाद वाढून गंगा यमुना वाहू नये म्हणून अजय च्या आई ने मध्यस्ती केली, 
अजय तू गप्प बस 
माझी वेदिका खुप हुशार आहे तू तिला नाही तर तिलाच तुला सांभाळावे लागेल.
आता वेदिका खुदकन हसली व थँक्स काकू म्हणून त्यांच्या गळ्यात पडली.

सगळे गाडीत बसले 
व घरी आले 
तोपर्यंत घरी घरातील सगळे जमले होते यांची शॉपिंग बघण्यासाठी.

गाडीतून उतरताच वेदीकाचे दम भरला मी दाखवल्याशिवाय कुणी माझ्या बॅग ला हात लावायचा नाही आणि ती फ्रेश होण्यासाठी निघून गेली.

इकडे अजय ने आल्या आल्या आणलेल्या सगळ्या वस्तू दाखवल्या.
सगळ्यांनी कौतुक केले 
पण प्रत्येकजण आम्हाला काय आणले हेच विचारात होता. 

शॉपिंग माझी होती का तुमची 
अजय ने या वाक्याने वेळ मारून नेली.

आता वेदिका ची वेळ होती 
ती प्रत्येक वस्तू काढत होती व शेवटी तिने दुसरी बॅग उघडली व म्हणाली आता यात फॅमिली मधील सर्वांसाठी काही न काही आहे. 
व सगळे एकदम खुश झाले 
ती पुढे म्हणाली पण हा गेम आहे मी वस्तू सांगेन तुम्ही ती कोणासाठी आहे हे ओळखायचे 
सगळे खुश झाले काही न काही मिळेल म्हणून 
तिने अगोदर साडी काढली 
व सगळे एकदम म्हणाले आई साठी 
अगदि बरोबर 
आणि तिने ती साडी अजय च्या आई च्या हातात दिली, 
मला 
अजय ची आई आनंदाने म्हणाली 
हो काकू तुम्हांला च कारण मला एक नाही दोन आई आहेत 
तिने अजून एक साडी काढली सेम त्याच कलर ची व स्वतः च्या आई ला देत म्हणाली काय आई 
आता वाटतात की नाही 
मैत्रिणी, बहिणी बहिणी 
सर्वाना खुप छान वाटले 
दोनी बाबा, वेदिका चा छोटा भाऊ, ड्रायव्हर काका , कामवाली मावशी असे सगळे झाले व गिफ्ट देखील संपले पण अजय ची लहान बहीण( आर्या )अजून बाकी होती सर्वाना वाटले वेदिका घाईत तिला विसरली 

आर्या ला हे खुप खटकले 
ती वेदीकला म्हणाली 
काय ग दीदी सर्वाना काही न काही आणले मग मला का नाही 
मी नाही का तुझी ??
कुणीच 

तेवढ्यात वेदिका तिच्या जवळ जात म्हणाली 
आता मी बाहेरगावी जाणार आहे तर तुला माझी जागा देऊन जातेय तेच तुझ्यासाठी गिफ्ट माझ्या आई बाबा ची लेक हो 
त्यांची काळजी घे 
घेशील ना ग ....
होशील का त्यांची वेदिका 
घरात एकदम शांतता पसरली 
आर्या पटकन वेदीकाच्या  गळ्यात पडली 

सर्वाना खुप कौतुक वाटले इतकुशी पोरगी किती हुशार झाली 

रात्रीचे जेवण वेदिका च्या घरी करून अजय व त्याची फॅमिली त्यांच्या घरी गेले 

उद्या ते निघणार होते अजय व वेदिका ला सोडण्यासाठी 

क्रमशः 

कसा असेल त्यांचा बाहेरच्यां जगातील पहिला दिवस 
जाऊन घेण्यासाठी सोबत राहा व मला फॉलो करा 

धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,