तडजोड (भाग 19) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love

तडजोड (भाग 19) 
(माघील भागात आपण पाहिले वेदिका ची पाठवणी चालू होती ) 

आता पुढे ..........

सर्वाना भेटून झाल्यावर वेदिका बाबा कडे आली, 
मुलीला वधू च्या वेशात बघून बापा चे काळीज फाटते म्हणतात ते आज बघितलं, 

दोघेही एकमेकांना बिलगून रडू लागले, 
नेहमी खंबीर , वाटणारे बाबा आज कोसळले होते, 
तिचे बालपण, तरुणपण, तिचे हट्ट, बाबा चा केलेला घोडा, 
तिचा वाढदिवस, ती आजारी असताना जागून काढलेल्या रात्री बाबाच्या डोळ्यासमोरून चक्रा सारखे फिरत होते, 
आज त्यांचा पोटचा गोळा 
ते दुसऱ्याच्या हातात देत होते, 
त्या बाप लेकीची ती घट्ट मिठी 
आई सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण वेदिका ने घट्ट मिठी मारली बाबा ना, 

शेवटी अजय चे बाबा जवळ आले व म्हणाले, 

अहो सुनबाई सोडा त्यांना, 
जर त्यांना तुम्ही सोडले नाही तर ते  गाडीत कसे  बसणार, 
त्यामुळे डोळे पूसा व बाबा ना देखील सोबत घ्या

बाबा 
असे काय बोलताय हे अजय ला कळेना, 

ते पुन्हा म्हणाले, 
चल अजय तुझ्या दुसऱ्या बाबा ना देखील सोबत घे, 

सगळे एकमेकांकडे बघू लागले, 

अजय ची आई पुढे आली व म्हणाली हो हो 
मुलीला सासरी पाठवताना सगळे आहेत की नाही मग आम्हाला स्वागताला देखील सगळे हवेत, 

अहो असे कसे 
अशी प्रथा नाही आमच्याकडे
व घरी पाहुने आले आहेत ते काय म्हणतील, 
आणि ते बर दिसत का ?? 
घरी पाहुणे व आम्ही असे मुलीसोबत , 
वेदीकाची आई म्हणाली, 

आम्ही कुठे कायमच थांबा म्हणतोय , 
आणि तसेही जवळच तर आहे
तुम्हांला जेव्हा वाटेल तेव्हा परत या,

चला तर 
एक सरप्राईज आहे 
तुमच्या लाडक्या लेकीसाठी, 
अजय चे बाबा म्हणाले, 

अहो तुम्ही जा, 
मी थांबते, 
पाहुणे काय म्हणतील, 
आपल्याला शोभते का असे मुली सोबत जायला, 
वेदिका ची आई म्हणाली, 

अहो वहिनी तुम्ही लोकांचे काय घेऊन बसलात, व मी लोकांसाठी नाही चला म्हणतोय, 
तुमच्या लेक जावयासाठी चला 
म्हणतोय, 


शेवटी सगळ्यांनी  खुप आग्रह केला आणि वेदिका चे आई बाबा देखील निघाले सोबत, 

वेदिका आई बाबा सोबत त्यांच्या गाडी कडे वळली, 
मॅडम इकडे चला 
अजय हसत म्हणाला, 

वेदीकाच्या देखील लक्षात आले, 
आपण नकळत बाबा माघे निघालो होतो 

हो .....

वेदिका 

आई बाबा सोबत येताय म्हणल्यावर 
आता वेदिकाला थोडं बर वाटल, 
ती गाडीत बसली, 
थोडे अंतर गेल्यावर 
त्यांची गाडी अजय च्या घराकडे न जाता दुसरीकडे च निघाली,

तिने माघे बघितले तर आई बाबा ची गाडी देखील दिसत नव्हती, 
 
अरे हे इकडे कुठे जातोय आपण, 
ड्राइव्हर काका तुम्ही रस्ता चुकलात का ??
वेदिका 

नाही ओ ताई 
काका, 

मग हा रस्ता अजय च्या घरी नाही जात , वेदिका 

दुसऱ्या रस्त्याने जातोय आपण, काका 

असे कारण सांगून त्यांनी एका नवीन घरासमोर गाडी थांबवली

घरासमोर मस्त गार्डन होते, पूर्ण घर फुलांच्या माळा व लायटिंग ने सजवलेले होते, सगळीकडे सुंदर डेकोरेशन केले होते, 

काकांनी अजय व वेदिका ला उतरण्यास सांगितले, 
फुले अंतरलेल्या रस्त्याने ते दोघे घराच्या दरवाजात आले, 
बघते तर काय दोघांचेही आई बाबा अगोदरच हजर होते स्वागतासाठी, 

आई बाबा ना बघून वेदिका ला आनंद झाला, 
तुम्ही अगोदर कसे काय पोहोचले , वेदिका 

जादू ने, बाबा 

सगळे हसू लागले

आई ने दोघांचे औक्षण केले व त्यांना आत घेतले, 

अजय , वेदिका व वेदिका चे आई बाबा याना काय होतंय ते अजूनही कळत नव्हते, 

अहो काय हे, 
हे घर कुणाचे आहे, 
वेदिका ची आई म्हणाली 


हे घर वेदिका व अजय चे आहे, 
अजय ची आई म्हणाली 


त्यांचे घर पण का ???
आई 

सांगतो सांगतो 
सगळं सांगतो 
अगोदर खाली बसा सगळे, 
अजय चे बाबा 

सगळे खाली बसले, 

हे बघा यांचा नवीन संसार, 
त्यात हे शिकलेले ,
दोघेही जॉब ला ,
 त्यांना आमची मते पटतीलच
असे नाही, व मग वाद, भांडणे, मग अबोला त्यापेक्षा त्यांना थोडे दिवस एकमेकांना समजून घेऊद्या, 
त्यांना त्यांच्या मानाजोगे जगू द्या, 

त्यांना आमची अडचण नाही तर आधार वाटला पाहिजे, 
म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की थोडे दिवस त्यांना त्यांचा स्पेस देऊ , 
काय म्हणता, 


कुणी काही बोलणार तोच वेदिका म्हणाली मला बिल्कुल आवडले नाही आणि काका तुमची  आम्हाला कधीच अडचण  होणार नाही ,
उलट तुमचा आधार राहील आम्हाला, 
सुख दुःखात तुमची साथ मिळेल, 
आणि स्पेस तर तुम्ही आम्हाला या अगोदर च दिलीये व या पुढेही देणार, 
त्यामुळे 
ते काही नाही आम्ही तुमच्या सोबत च राहणार, 

हो बाबा 
आम्ही वेगळे राहणार नाही,  
अजय 

अरे .....

मी काय म्हणतो हे ऐकून तरी घ्या 
आम्हाला जगू द्या ना थोडे दिवस एकमेकांसाठी, 

आतापर्यंत आम्ही आमचा संसार ओढला आणि आता तुमचा ओढावा लागेल, 
मग आम्ही एकमेकांसाठी वेळ कधी द्यायचा 
ते काही नाही निदान 1 वर्ष तरी मला माझ्या बायको सोबत निवांत राहू द्या, बाबा पलटी मारत म्हणाले, 


सगळे हसू लागले, 
वेदिका व अजय चा नवीन घरातील प्रवास अनुभवण्यासाठी 
सोबत राहा 
फॉलो करा,

🎭 Series Post

View all