तडजोड (भाग 18) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love

तडजोड (भाग 18)

(माघील भागात आपण पाहिले अजय व वेदिका गप्पा मारत बसलेले असतात व केव्हा 12 वाजले त्यांना च कळले नाही) 

आता पुढे ..............

तू किती वाजले बघितलेस का? वेदिका 

हो बारा, अजय 

अरे चल लवकर झोपुयात पुन्हा सकाळी जाग आली नाही तर गोधळ होईल, वेदिका 

ये बस ना यार अजून पाच मिनिट , अजय 

तुला कळतंय का पाच मिनिट पाच मिनिट करत करत दोन तास झालेत, वेदिका 

होऊ दे ना हा क्षण पुन्हा येणार आहे का आपल्या आयुष्यात 
उद्यापासून नवीन आयुष्य चालू होईल, 
खुप काही बदलेल , अजय 


ये आता च तर म्हणालास ना काहीच बदलणार नाही, 
व लगेच कल्टी 
हे बर आहे तुझं , वेदिका 

तसं नाही ग 
म्हणजे बग ना 
आता तू माझी हक्काची बायको होणार आहेस, 
व सगळ्यात छान काय वाटते मला माहित आहे का?
अजय 

काय ??
वेदिका 

तुझ्या नावासमोर माझे नाव लागणे, ही फिलिंग च खुप भारी असते , कुणीतरी आपल्यासाठी आपल्या घरी आपली जबाबदारी बनून येणार, अजय 

ये..........

हिरो 
मी माझे नाव नाही बदलणार बर, 
माझ्या बाबा चे नावच लावणार मी आयुष्यभर, 
वेदिका 

हो नको लावू 
तुझे लेकरू लावेल माझे नाव 
व तो जोरजोरात हसू लागतो, 


चल , तुझी गाडी ट्रॅक वरून घसरण्यापूर्वी खाली जाऊ, 
वेदिका 

चला मॅडम, 
आता काय, 
तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं 
उठ म्हणलं की उठ 
बस म्हणलं की बस अजय 


बस नौटंकी, नाटक नको करू, 
असे म्हणून तिने अजय ला हाताने ओढत खाली नेले, 


सगळे झोपले होते, 
अजय व वेदिका देखील आपल्याला रूम मध्ये निघून गेले, 


वेदीकाला अजय चे प्रेम त्याच्यात झालेला बदल स्पष्ट जाणवत होता, 
वेडा कुठला, 
असे म्हणून ती त्याला आठवून मनाला च हसत होती,

अखेर उजाडला तो दिवस 
ज्या दिवशी हे दोघे खऱ्या अर्थाने एकमेकांचे झाले, 

सगळीकडे सनई चौघडे वाजू लागले, नातेवाईक मित्रमंडळी, आप्तेष्ट यांनी मंडप भरला, 
फुलांच्या पायघड्या टाकण्यात आला, 
शुभ मंगल सावधान ......
म्हणत ते बांधले गेले कायमचे, 

लग्नानंतर चे विधी आटोपून, 
नवरी निघण्याची तयारी चालू झाली, 

मुलगी जवळ दिली काय किंवा नातेवाईकात दिली काय शेवटी ती जाणार तर परक्या घरी, 

आयुष्यात कधीच डोळ्यात पाणी न आणणाऱ्या वेदिका च्या बाबा च्या आज पहिल्यांदा पाणी आले होते, 

आज त्यांचे पाखरू त्यांच्या छत्रछायेखालून निसटून 
सासरी निघाले होते, 

प्रत्येक बापाला 
हा क्षण खुप जड जातो 
जेव्हा तो स्वतः च 
काळीज दुसऱ्याला देतो

माहीत होतं मुलगी 
म्हणजे परक्याचे धन 
पण आज कसे सावरवे 
हे तुटलेल मन 

कधीच न झुकणारा बाप 
लेकीच्या हट्टापुढे नडला
लहान पोरासारखा बाप
आज धायमोकलून रडला 

खरच मुलगी वडिलांच्या सर्वात जवळची असते, 
ती च त्यांची आई होते, 
तीच गुरू होते
तिच कधी कधी डॉक्टर बनून 
त्याचे पथ्यं सांभाळते , 

आणि प्रत्येक बाबा कसे जरी असले तरी ते मुलीच्या लग्नात राडतातच , 

क्रमशः ........

फॉलो करा 
लाईक करा 
कमेंट्स करा 
शेअर करा, 

सोबत राहा 


धन्यवाद

🎭 Series Post

View all