तडजोड (भाग 16) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

तडजोड (भाग 16) 

(माघील भागात आपण पाहिले वेदिका व अजय पुन्हा एकत्र आले होते) 


आता पुढे ...............


निरोप समारंभ संपून सगळे आपापल्या घरी गेले, 
आता फायनल एक्साम देखील झाल्या असल्यामुळे तिथे थांबून फायदा नव्हता, 
त्यामुळे अजय व वेदिका देखील घरी आले, 

रोज बोलणे त्यांचे चालू होते फक्त घरी आल्यामुळे भेटणे थोडे कमी झाले होते, 

रविवार चा दिवस होता व वेदिका च्या आत्या ला सुट्टी होती, 
म्हणून त्या सगळ्यांना भेटण्यासाठी आल्या, 

वेदिका ची आत्या म्हणजे त्याच्या घराचा कणा आजही त्यांचे निर्णय त्यांना विचारून घेतले जायचे, त्यांचा धाक होता असे नव्हे पण त्या नेहमी बरोबर च निर्णय घेतात म्हणून, 


आत्या खुप दिवसांनी आली म्हणून आई ने छान मेनू बनवला होता, सगळे जेवायला बसले तितक्यात , 

अजय चा कॉल आला वेदिका ला , 

नंतर बोलते म्हणून तिने कॉल कट केला, 

तिने कॉल ठेवला व हळूच आत्याकडे पाहिले , आत्या तिचे बारीक निरीक्षण करत होती, 
नेमकी तीच गोम आत्याने हेरली, 

अरे दादा,
हे नंतर बोलते कधी बंद करायचं .....आत्या 


म्हणजे, 
दादा 

म्हणजे हे दो दिल एक जाण कधी एकत्र करायचे, ति वेदिका ला चिमटा काढत म्हणाली, 

आत्या तू पण ना .....
वेदिका 


हो हो मी पण तेच म्हणते लवकरच मुहूर्त बघून लावून देऊ लग्न.........वेदिका ची आई म्हणाली, 

चला मॅडम 
भरा बॅग......
आत्या हसत म्हणाली, 

पण त्यांच्या या माजकने वेदिका मात्र कोसळली, 
व विचार करू लागली 
कसे असते ना मुलीचे जीवन त्या भातुकलीच्या खेळाप्रमाणे, 
तिला लहानपणापासून जपलं जात, शिकवलं जातं मोठं केलं जातं, व अचानक अनोळखी लोकांकडे सोपवून परकं केलं जातं, 

लहानपनी कुणी माझ्या वस्तू ला हात जरी लावला तरी मी राडायचे आज त्या वस्तू एका क्षणात परक्या झाल्या, 
मुलगी म्हणजे परक्याचे धन म्हणूनच तिला वाढवले जाते, 
का तिला च  सगळं सोडून जावे लागते, 
वेदिका काही पण विचार करू नको ती परंपरा आहे, तुला देखील पाळावीच लागेल, 
आता काय त्या अजय ला घर जावई करून घेते का प्रॉपर्टी मध्ये वाटेकरी........
व तीच हसू लागली, 


बाबांनी अजय च्या घरी कॉल करून मुहूर्त काढायला सांगितला, सर्वानुमते अखेर एक तारीख फिक्स झाली, 

लग्न जसे जसे जवळ येत होते तसा तसा त्यांचा तयारीचा वेग वाढू लागला, 
वेदिका च्या बाबा नि चोख बंदोबस्त केला होता, शेवटी एकुलती एक मुलगी होती त्यांची, 

उद्या लग्नबसत्यासाठी जाऊयात असा अजय च्या घरून निरोप दिला व कोण काय घेणार यासाठी धावपळ चालू झाली, 
अजय व वेदिका ने त्यांना काय, रंग, सगळं फायनल करून ठेवले होते, 

आता विशेष म्हणजे त्यांचे प्रत्येक मुद्यावर एकमत होत होते, भांडण हा भाग जवळजवळ नाहीसा झाला होता त्यांच्या आयुष्यातून, 
सगळीकडे आनंदी आनंद होत, 
दोनी कुटुंब एक मेकांच्या परिचयाचे असल्याने कुठली च अडचण येत नव्हती, 
शेवटी सगळे विधी एकत्र करू म्हणून ठरले, पण कुणाच्या घरी करायचे, 
शेवटी हो नाही 
हो नाही करत आत्या ने मध्यस्ती केल्यावर , 

वेदिका च्या घरी सगळे विधी करूयात हे ठरले, 

अजय व त्याचे काही मोचकी माणसे वेदिका च्या घरी आले, 

नेहमी हसणारी वेदिका 
आता थोडी शांत वाटत होती, 
तिच्यामध्ये अचानक झालेला बदल कुणाला कळो न कळो पण अजय ने हेरला होता,

ती हसत होती पण मनातून नाही 
तिचे डोळे काहीतरी बोलत होते, नजर शोध घेत होती कशाचा तरी, 

अजय सकाळपासून ती एकटी कधी भेटेल याची वाट बघत होता, 
पण प्रत्येकवेळी कुणी ना कुणी असायचे तिच्या सोबत,

तितक्यात वेदिका त्याला एकटी जाताना दिसली, 

ये हिरोईन,
अजय तिला हाताने रूम मध्ये ओढत म्हणाला, 


अरे हळू तुला कळतंय का बघेल कुणी, वेदिका 

बघू दे, माझी हक्काची बायको आहे तू आता, अजय 

हम्मम्म्मम , वेदिका, 

हेच फक्त हम्मम्म्मम , 
या हम्मम्म्मम चे च कारण जाणून घ्यायचे आहे, 
अजय 


Please सोड जाऊ दे ना,  वेदिका 

जाऊ देण्यासाठी थोडीच पकडलय ,पण एका अटीवर अजय

बोल पटकन, वेदिका 

रात्री टेरेस वर ये , व तुला काय झालंय ते खरं खर सांग 
Please अजय, 

हो नक्की वेदिका, 

प्रॉमिस , अजय 

हो पक्का प्रॉमिस , वेदिका 


अजय ला रात्री भेटायचं प्रॉमिस करून वेदिका निघून जाते, काय झाले असेल वेदिका ला , 
का पडला असेल तिचा चेहरा, ती मनातून खुश तर असेल ना की असेल काहीतरी दुःख खोलवर लपलेलं , 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
खुप साऱ्या लाईक व कमेंट्स करा, 
व मला फॉलो करा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all