तडजोड (भाग 15) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

तडजोड (भाग 15) 

(माघील भागात आपण पाहिले वेदिका व अजय प्रवासात झोपी गेले होते )

आता पुढे .................

वेदीकाला अचानक जाग आली व  स्वतः ला अजय च्या खांद्यावर झोपलेले बघून ती पटकन बाजूला सरकली, 
ती इतकी जोरात सरकली की तिच्या सारकण्याने अजय पण जागी झाला, 
काय झालं ग ...
अजय, 

काही नाही , वेदिका स्वतः ला सावरत म्हणाली, 

पण दोघांच्याही लक्षात आले होते की त्यांना नकळत डोळा लागला होता, 

विषयातर करण्यासाठी अजय म्हणाला, आलेय जवळ थोडेच बाकी आहे, 

हम्मम्म्मम , वेदिका 


इच्छितस्थळी पोहोचल्यावर वेदिका ला हॉस्टेल वर सोडून अजय रूम वर निघून गेला, 

नेहमीचे रूटीन चालू झाले, 
आता त्यांचे भांडण कमी होत होते, 
ते एकमेकांची काळजी करू लागले, 
एकमेकांपासून काहीच न लपवता ते एकमेकांची साथ देऊ लागले, 
ते आता जपत होते एकमेकांना , 

कॉलेजमध्ये अजूनही त्यांचे नाते माहीत नव्हते, 
फायनल एक्साम झाल्या 
दोघांनाही पेपर छान गेले, 
कॉलेज ने शेवटच्या वर्षातील मुलांना निरोप देण्यासाठी एक प्रोग्राम अरेंज केला, 
त्या प्रोग्राम मध्ये कुणीही भाग घेऊ शकत होते, 
वेदिका ने ठरवले अजय ला सरप्राईज द्यायचे, 

तिने आरती व शशांक ला देखील आपल्या बाजूने ओढले, 
डान्स मध्ये परफेक्ट असणारी वेदिका डान्स चा डी देखील माहीत नसलेल्या अजय साठी आज परफॉर्म करणार होती, 
ती रोज कॉलेज सुटले की काही न काही कारण सांगून अजय ला टाळायची, 

तिला तसे करायचे नव्हते, पण त्याच्यासाठी तर करत होती ती सगळं, 

प्रॅक्टिस करून आली की ती खुप थकायची , मग कधी बोलायची अजय शी नाहीतर कधी न बोलता च झोपी जायची ती खुप व्यस्त होती तिच्या आयुष्यात पण तिला याचे भान राहिले नाही की कुणीतरी आहे तिच्या आयुष्यात जे फक्त तिची वाट बघते, तिचा वेळ त्याला हवा असतो, तीच कौतुक तीच रागावणं , तीच हट्ट करण सगळं काही अजय मिस करत होता, 

तो हळू हळू तुटत होता आतून , 
तो नकळतपणे दूर जात होता तिच्यापासून, 
कारण त्याला सवय झाली होती तिची,
तो आता तिच्याशिवाय जगू च शकत नव्हता, 
तो अडकला होता तिच्यात, 

इकडे वेदिका मात्र खुश होती तिच्या डान्स मध्ये, 

रोज टाळने, बोललं तर बोलायचं नाहीतर नाही, 
असे करत अजय च्या मनात खुप गैरसमज झाले, 
तो आता वेदिका चा पाठलाग करू लागला, ती ज्याला बोलेल त्याचा तो तपास घेऊ लागला, त्याचा विश्वास कुठेतरी डळमळीत झाला होता, पण याची जाणीव तो वेदिका ला होऊ देत नव्हता, 

तिची विशाल (तिचा डान्स कुरिओग्राफर) शी वाढलेली मैत्री त्याला सहन झाली नाही, 
त्यांच्यात काहीतरी चालू आहे असे त्याला वाटू लागले, 


आता उगवला तो प्रोग्राम चा दिवस, 
सगळे छान मेकअप करून आले, वेदिका ने देखील जांभळ्या रंगाचा घागरा घातला, 
एका हातात खुप बांगड्या व दुसरा हात तिने मुद्दाम मोकळा ठेवला होता, त्यावर लोंबणारे कानातले घालून ती तयार झाली,
सगळे येऊन थांबले होते, प्रोग्राम चालू देखील झाला, पण वेदिका चा पत्ता नव्हता, अजय आज मुद्दाम तिला न सांगता निघून आला होता, व तिला देखील त्याला सरप्राईज द्यायचे होते म्हणून ती त्याला काहीच बोलली नाही, 

कुठे गेली असेल ही,अजय विचार करू लागला, 

अजय तिला सगळीकडे शोधू लागलो, 
तितक्यात कुणीतरी म्हणाले विशाल कुठेच दिसत नाही कुठे आहे, 
विशाल नाही, 
म्हणजे वेदिका व विशाल सोबत तर नाहीत, 

तेवढ्यात त्याचे लक्ष गेटकडे गेले तिकडून वेदिका व विशाल येत होते, 

म्हणजे विशाल वेदिका ला आणायला गेला होता तर, 
अजय ला मनात खुप वाईट वाटले, 


ती अजय च्या जवळून गेली पण घाईत होती म्हणून तिची नजर अजय वर गेली नाही, 
किती मूर्ख ठरलो ना आपण, सगळ्यांना सांगितलं असत ती माझी होणारी बायको आहे तर काय बिघडले असते, आणि तिने काय केलं, माझ्या प्रेमाचा विश्वास घात, 

तितक्यात माईकवर आवाज आला , 

आता सादर करत आहे वेदिका, 

व सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या, 

अजय ची ईच्छा नव्हती जाण्याची पण पाऊले आपोआपच हॉल कडे वळली तो दुरूनच बघत होता व वेदिका एवढ्या सगळ्या समोर 
बोले चुडीया 
बोले कंगना 
या गाण्यांवर डान्स करत होती, 
अजय ला काही कळेल त्या अगोदरच शशांक त्याला ओढून स्टेज वर घेऊन गेला, 
गाणे संपले होते 
टाळ्या अजूनही वाजत होत्या 
तितक्यात वेदिका हातात गुलाबाचे फुल घेऊन खाली बसली 
I love u ajay, 
Love u sooooooooo much 
म्हणाली, 

तिचे शब्द ऐकून अजय च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, 
आपण काय विचार करत होतो याचा त्याला पाश्छताप झाला, 
त्याने पटकन वेदीकाला मिठी मारली व तो रडू लागला, 
वेदीकाला काही कळण्याच्या आतमध्ये पडदे टाकले गेले, 

प्रेमात खुप वेळा असेच होते, दोघेही खुप प्रेम करत असतात पण नाते गैरसमज आणि न बोलण्याने तुटते, 

मग यांचे नाते कसे असेल 
अतूट की विजोड 

जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
फॉलो करा, व 
खुप साऱ्या लाईक व कमेन्ट करत राहा,
क्रमशा ..............

🎭 Series Post

View all