तडजोड (भाग 14) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

तडजोड (भाग 14) 

(माघील भागात आपण पाहिले वेदिका अजय ला ओढत गाडी जवळ घेऊन येते)

आता पुढे .........

वेदिका अजय ला ओढत गाडी जवळ घेऊन येते, 
चल लवकर, वेदिका 

आता इथपर्यंत तू घेऊन आलीस ना मग यापुढे पण घेऊन जा की, 
अजय हसत म्हणाला, 

जास्त नाटक करू नको 
चल, वेदिका त्याच्या हातात गाडी ची चावी देत म्हणाली, 

अजय तिच्याकडे बघतच गाडी चालू करतो, 

समोर बग , 
नाहीतर मार खाशील आता, वेदिका 

ये आपल्या भारतीय संस्कृतीत 
नवऱ्याला मारायची पद्धत नाही बर, पती परमेश्वर मानून त्याच्या पाया पडावे लागते, हाच पती साथ जन्म मिळू दे म्हणून उपवास करावा लागतो, पती जे म्हणेल तीच पूर्व दिशा असे मानावे लागते, अजय वेदिका च्या डोळ्याला डोकं मारत म्हणाला, 

हो .........

का 
विसर ह ये सगळं, 
तुला दोन वेळा जेऊ घालेन ना तेच नशीब मान, व हा जन्म कडेला घाल मग साथ जन्मा चे बघू, 
नाहीतर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल, 
ती जोरात हसू लागली, 

हो हो आता घे हसून , 
नंतर तू च तरसशील मला बोलायला, 
तसा प्रभाव आहे माझा, जो की माझ्या जवळ येणाऱ्याला प्रभावित करतो, 
तो गर्वाने म्हणाला, 


बघू ना कोण कुणासाठी तरसते, समोर बग खड्डा आहे, 
वेदिका, 

असे एकमेकांशी भांडत ते घरी पोहोचतात, 
गेट मध्ये आले की पुन्हा असे चेहरे करतात जसे काही झालेच नाही, 


मग आली का 
जोडी फिरून, 

आत्या दरवाजातच म्हणाली, 


आत्या जोडी काय ग जोडी, वेदिका 

नाही का मग , 
आमच्याकडे एक आणि एक मिळून दोन नाही जोडी होते, 
म्हणजे अजून जोडी झाली नाही का तुमची, व सगळे हसू लागले , 

आत्या तू पण ना .......
वेदिका लाजून निघून गेली, 

अरे वा दादा अरे तुझ्या पोरीला लाजता पण येत, 
आता सगळे हसू लागले व मोर्चा अजय कडे वळला, 

काय नवरदेव 
तुम्हांला नाही जायचे का असे लाजून , 
आत्या काही पण हहहहहहहहहह.....
म्हणत मागे मागे, 
आत्या अजय ला म्हणाल्या, 


त्यात काय लाजयचे, मी आपला थांबलो होतो, अजून एखादी व्हरायटी दाखवताल म्हणून, अजय आत्या ची खेचत म्हणाला , 

आता सगळे आत्या ला हसू लागले, 

काय मूल आहेत आज कालची , 
काही पण बोलतात, आत्या खोटा राग अनंत म्हणाली, 

चला मी फ्रेश होऊन येतो, 
आम्ही निघतोय संध्याकाळी, 
अजय 

हो चालेल , मी आवरून देते तुमचे, वेदिका ची आई, 

काय म्हणालात काकू, तुमचे......
अजय, 

हो मग तुम्ही आता जवाईबापू होणार ना मग एकेरी कसे बोलणार, 


ये आई असे काही असेल ना तर मी नाही करणार या येडी सोबत लग्न, 
मी दोघी घरचा मुलगा बनून राईल, हवे तर तिला बनवा दोनी कडील सून, 
I don't have any problem

पण मी फक्त मुलगाच ......

व सगळे खुश होतात, 

बर बाबा अजय म्हणत जाईल , चालेल का ????

चालेल काय काकू , पळेल 
अजय, 

मग तू पण आई म्हण काकू नको, 
वेदिका ची आई

चालतय की, 
आपले काही नाही, 
अजय 


अजय तयारी करण्यासाठी निघून जातो, 
आजचा दिवस खुप आनंदात जातो त्यांचा, 
सगळे खुप खुश असतात, 


दुसऱ्या दिवशी सगळं आवरून ते दोघे निघतात, 

प्रवास करत असताना 

अचानक वेदिका च्या डोक्यात कल्पना येते, 

ये अजय, आपली एंगेजमेन्ट झाली हे फक्त आपल्या चौघात आहे ना, 

हो , अजय 

मग आपण कॉलेज ला कुणाला सगायचेच नाही, 
काय वाटते, 
म्हणजे बग मस्त कपल सारखे राहू , 
त्यांना कुठे माहीत आहे भावी नवरा बायको आहोत, वेदिका 

ठीक आहे बघू ट्राय करून , अजय 

प्रवास थोडा दूरचा होता, व दोन दिवसांत खुप दगदग झाल्यामुळे वेदिका थकली होती, 

थोड्या वेळाने तिला डोळा लागला, आणि नकळत तिचे डोके अजय च्या खांद्यावर पडले, 

तिचा तो निरागस चेहरा, 
त्या चेहऱ्यावरील शांतता, 
वाऱ्यावर उडणारे केस, 
फक्त उडणारेच नव्हे तर अजय च्या तोंडात देखील जात होते ते, 
पण आज अजय ला तो क्षण हवाहवासा वाटत होता, 

यालाच प्रेम म्हणतात का??
एखाद्याची  लागलेली ओढ, 
त्याचा हवाहवासा वाटणारा स्पर्श, 
सगळं आयुष्य च बदलून टाकतो, 

खरच आयुष्यात बायको 
नावाचा भाग किती वेगळा असतो ना, 

आज मी माझा 
न राहिलो 
तुझ्या त्या केसासोबत 
तुझ्यात गुंतून वाहिलो 


जाणवणारी हळुवार 
तुझी स्पंदने  
कमी करत होती 
आपल्यातील बंधने 


तू घेतलेला खांद्याचा आधार आज जग जिंकल्याची अनुभूती देत होता, 
आज आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होत होता, 

या विचारताच अजय चे देखील नकळतपणे डोळे बंद झाले, 

या दोघांतील वाढत जाणार प्रेम शेवट पर्यंत टिकेल की असेल ही देखील एक प्रेमातील तडजोड प्रेमापोटी, 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
व तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, 
तुमच्या लाईक आणि कमेन्ट च्या प्रतीक्षेत .........


क्रमशः ............

🎭 Series Post

View all