तडजोड (भाग 13) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

तडजोड (भाग 13) 

(माघील भागात आपण पाहिले अजय व वेदिका बाघेत गेले होते )
आता पुढे ...............

आता वेदिका अजय च्या मिठीत पूर्णतः विसावली होती, 
तिला जणू हक्काचा आधार मिळाला होता, 

आणि काय ग, 
जर मी नसतो आलो तुझ्या रूम मध्ये व तुला बोललो नसतो तर तुला खरच जाणीव नसती झाली 
तुझ्या प्रेमाची, अजय म्हणाला, 

ये मला काय दोष देतोस तुला तरी कुठे झाली होती, कालपासून तोंड पाडून बसला होतास,पण एक शब्द पण बोलला नाहीस, वेदिका, 

तसं नाही ग राणी , 
पण मलाच कळले नाही कधी तुझ्या प्रेमात पडलो, ते शशांक सांगितले म्हणून कळले , अजय 

आता दोघे हसू लागतात, 
कसे आहे ना आपलं हे अव्यक्त प्रेम वेदिका म्हणाली, 

अव्यक्त, मग आता काय करतोय, 
अजय तिला चिमटा काढत म्हणाला, 

मी मैत्रीण होते तर सांभाळल्या जात नव्हते तुला, आता तर मी बायको झालेय त्यामुळे जरा जपून, वेदिका, 

अरे यार, जपून तर तू राहा, 
माझे मस्त आहे जे आहे ते सगळं तुला माहीत आहे, खोटं बोलणं नको आणि एक खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं नको, अजय, 


पण एक लक्षात ठेव, आपले कितीही भांडण झाले ना , तरी बोलणे बंद नाही करायचे बर, 
मला अबोला नाही आवडत, वेदिका 


हो ग बाई 
तुझ्यावर कधीच रागवणार नाही, 
चिडणार नाही भांडणार नाही 
तू फक्त माझ्या आई बाबा ना जीव लाव, अजय 


ये हॅलो , 
ते फक्त तुझे आई बाबा नाहीत माझे पण आहेत, वेदिका 

काही नको 
तुझे काका काकू च राहू दे, 
आई बाबा नको, 
उगाच माझी बहिण बनू नको 
अजय तिला चिडवण्यासाठी म्हणाला, 

थांब तू, नंतर बघते तुला, 
मी बोलणार च नाही आता तुझ्याशी ती त्याचा हात जोरात झटकत म्हणाली, 

ये...... अग हळू .....
तू तर आताच मारायला लागली मला, परमेश्वरा काय वाढून ठेवले ते अजून माझ्या नशिबात, अजय हसत म्हणाला, 

आता वेदिका चे गाल लाल झाले, अगोदरच गोरा रंग व त्यात तो राग नाक मुरडत तिने तोंड फिरवून घेतले, 

 ये इकडे बग 
तू रागात काय सुंदर दिसतेस ग................
आपल्या एका हाताने तिचा चेहरा, स्वतः कडे करत अजय म्हणाला, 

आता ती खरच चिडली चल बर घरी जाऊ, वेदिका 

एवढी काय घाई आहे जाऊ ना थोड्या वेळाने, तो तिला खाली बसवत म्हणाला, 

तुझे हे रूप मी आज पहिल्यांदा बघतेय, 
इंटरेस्टिंग हहहहहहह, 
वेदिका 


हो का मॅडम , 
तुम्ही मैत्रीण होता आता बायको झालात, इंटरेस्टिंग ना ......
तो पुन्हा तिची उडवत म्हणाला, 

तुला वेड लागलंय का रे 
भानावर ये 
जरी मी बायको झाले 
तरीही मी अशीच राहणार आहे व तुला बोटावर नाचावणार आहे समजलं, वेदिका 

ये जाऊ दे ना , कोण कुणाला नाचवले हे नंतर डीसाईड करू 
आता फक्त हा क्षण जगू दे मनमोकळा, अजय 


तुला खरच वेड लागलंय, वेदिका, 

तू काही पण म्हण, पण मला नेहमी वाटायचं आपल्याला पण कुणीतरी सोबत असावं ज्याला मनातलं सगळं शेअर करता येईल कुठलीही आडकाठी न ठेवता, आणि व्यक्ती देखील समजून घेईल, 
कुणीतरी फक्त आपल्यासाठी तिचे राहते घर, तिची माणसे, तिच्या आवडत्या वस्तू सगळं काही सोडून येणार आहे, व तीच जग फक्त आपण असणार आहे हे खुप वेगळं फिलिंग असत ग तुला नाही कळणार, 
आता खऱ्या अर्थाने तू माझी जबाबदारी आहेस, 

मग बायको या चार ओळी तुझ्यासाठी ,
  
क्षण हा आनंदाचा 
असाच अनुभवू 
तू माझी अनं मी तुझी 
अशीच साथ देऊ

पावसाच्या या सरीने 
बंधन तुटले 
एकमेकांच्या ओढीने 
क्षणात अंतर मिटले 

वेदिका फक्त बघत होती सारखी त्याच्याकडे हा खरच इतका चांगला आहे , 

आज पुन्हा नव्याने भेटत होती ती 
नव्या अजय ला जो की पतिरूपाने जवळचा भासत होता तिला, 

गॅदरिंग च्या वेळी तिचे चिडणे उगाच नव्हते, हे शशांक चे बोलणे आज पटले होते तिला, 

तुला चल म्हणते हहहहहह अजय, 
त्याला एका हाताला पकडून ओढत गाडीपर्यंत आणण्यात एक वेगळीच मजा वाट होती तिला, 

ती ओढत अजय ला गाडीजवळ घेऊन आली, 

कोण ठरेल यांच्या प्रेमात सरस 
आणि कोण घेईल नेहमी माघार प्रेमात असो की भांडणात ????
जाणून घेण्यासाठी सोबत राहा माझ्या, 

वाचकाने विनंती आहे कथा आवडल्यास लाईक व कमेंट्स नक्की करा, 
आपला प्रतिसाद लेखकाला प्रोत्साहन देतो,

🎭 Series Post

View all