तडजोड (भाग 11) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

तडजोड (भाग 11) 

( माघील भागात आपण पाहिले वेदिका ला मुलगा बघण्यासाठी येणार होता, व कारण नसताना चीड चीड करत होता) 

आता पुढे ........

घरातील सगळे असे तयारीला लागले होते की जसे मुलाला मुलगी दाखवत नाहीत सगळं फिक्स करताय, 
अजय ला याचे नवल वाटते की हे लोक इतके कसे शूअर आहेत की मुलगा वेदीकाला पसंत करेल म्हणून, 

पण देवा मुलाचा नकार असू दे, 
अरे हे मी काय विचार करतोय 
का नकार असावा, 
माझी चिडचिड का होतेय, 
मी प्रेमात तर नसेल पडलो ना, 

त्याने शशांक ला कॉल केला जास्त वेळ न लावता जे होतंय ते सांगितलं, 
शशांक हसायला लागला, 
अरे गॅदरिंग च्या वेळी  वेदिका चे चिडणे, 
आणि आता तुझे हे विनाकारण नाहीये, 
आता कळले का किती चिडचिड होते, 
अरे प्रेमात पडलेत तुम्ही एक मेकांच्या, 
शशांक हसत म्हणाला, 

काही पण नको बोलू 
ती खुश आहे, 
अरे, 
अजय सावरत म्हणाला, 

तुला कोण म्हणे 
एकदा जाऊन बघून ये बर 
शशांक म्हणाला, 

ठीक आहे, 
अजय, 

अजय वेदिका च्या रूम मध्ये जातो, ती तयार झालेली असते, 

वा मॅडम भारी दिसताय, 
अजय 

हो का थँक्स , वेदिका

वैदू , अजय 

बोल ना, वेदिका

तू खुश तर आहेस ना ग, 
तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाल, 

आता ती आतून तुटली, 
नाही माहीत रे का 
पण मी खुश नाहीये,

फक्त आई ने समजावले म्हणून तयार झाले, 
पण मनातून जे फिलिंग पाहिजे ना ते नाहीये, ती स्पष्टीकरण देत म्हणाली, 

आता अजय ला शशांक चे थोडं थोडं पटू लागलं, 
की काहीतरी होतंय दोघांना पण 
समजत नाहीये,

त्यापेक्षा आपण दोघांनी लग्न केलं तर, अजय हसत म्हणाला,


मला हरकत नाही, वेदिका म्हणाली 

व दोघे हसू लागतात, 

बर ठरलं तर मग मुलगा कसा ही असू दे तू नाहीच म्हण, अजय 

हो चालेल पण एक सांग 
आतापर्यंत चिडचिड करणारा, तू एकदम हसू कसाकाय लागला, 
वेदिका म्हणाली, 

जशी तू चिडली होती ना गॅदरिंग च्या वेळी कारण नसताना, तसाच मी देखील चिडलो, व तू नंतर स्वतः च ठीक झाली तसा मी पण झालो, 

दोघे एकमेकांकडे बघतात, 
थोडं जाणवत त्यांना 
पण ते बोलत नाहीत, 

बाहेर तोपर्यंत सगळे तयारी करून दारात उभे राहतात स्वागतासाठी, 

बाबा वेदिका व अजय ला आवाज देतात, 

चल मुलगा तर बघून घे नकार देण्यासाठी, पुन्हा दोघे हसतात व बाहेर येतात, 


हॉलमध्ये सगळे जमलेले असतात तेवढ्यात कुणीतरी ओरडते, पाहुणे आले, 
पाहुणे आले, 

सगळे उत्सुकतेने दरवाजा जवळ येतात, 
अजय तर बघून शॉक होतो 
समोर त्याचे आई बाबा असतात, 
वेदिका चे बाबा चिडवण्यासाठी म्हणतात 
पण मुलगा कुठे आहे, 

मुलगा अगोदरच पोहोचलाय आम्ही पाठीमागे होतो, 
अजय व वेदिका चक्राऊन जातत् 
त्यांना काही कळत नाही, 

सगळे फक्त हसत असतात, 

म्हणजे मुलगा मी आहे, अजय, 

हो मग दुसरे कोण असेल, 
आम्हाला काय कळतं नाही का 
तुमचे काय चालू आहे ते, 

अजय व वेदिका ला काय बोलावे कळेना, 
ते फक्त बघतात एकमेकांना , 
व शांत उभे राहतात, 

काय करतील ते दोघे मजाक मध्ये घेतलेला लग्नाचा निर्णय तडीपार  नेतील की मध्येच सोडतील साथ, 

अनपेक्षित पाने मिळालेली लग्नाची ऑफर ठरेल का यांच्या प्रेमाची वाट ,

जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
व मला फॉलो करा 

क्रमशः .........
धन्यवाद

🎭 Series Post

View all