तडजोड (भाग 10)
(माघील भागात आपण पाहिले
अजय व वेदिका पुन्हा जोडले गेले होते )
आता पुढे ............
अजय व वेदिका दोघेही एकमेकांची चूक मान्य करतात,
आता त्यांची मैत्री पुन्हा घट्ट होऊ लागली होती,
रोज चे रूटीन चालू झाले, कॉलेज , भेटणे, गप्पा
हाच दिनक्रम होता त्यांचा,
आता हे कॉलेज चे शेवटचे वर्ष होते, शेवटचे वर्ष म्हणलं की पुन्हा नव्याने सुरवात करावी असे वाटणारी वेळ,
एकदिवस वेदिका च्या बाबा चा कॉल आला,
काय करतेस बाळ, 'बाबा
काही नाही अभ्यास, वेदिका
उद्या घरी यायला जमेल का तुला, 'बाबा
घरी का ???
वेदिका
काम आहे थोडे तू आज ये मग आपण बोलू
तसेही उद्या रविवार आहे,
तुला सुट्टी च आहे, बाबा
हो चालेल,
येते मी वेदिका,
आणि ऐक अजय ला पण घेऊन ये, बाबा
हो, वेदिका
अजय ला का बोलावले असेल,
काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना,
काय झालं असेल नेमकं
वेदिका विचार करत होती,
चल अजय ला सांगून बघू,
ती अजय ला कॉल करते, व बाबा नि तुला व मला घरी बोलावले हे सांगते,
दोघांना सोबत बोलावले याचे वेदिका ला कारण कळत नाही,
का बोलावले असेल रे घरी,
व ते पण दोघांना सोबत वेदिका अजय ला विचारते,
ये मंदबुद्धी तू एकटी येऊ शकत नाही ये काका ना माहीतआहे म्हणून मला जबाबदारी ने तुला घेऊ यायला सांगितले असेल व तो हसायला लागतो,
चल तयारी कर जाऊ आपण,
वेदिका चे विचारचक्र अजूनही चालूच होते,
त्याचा विचारचक्रात ते घरी पोहोचले,
घरी गेल्यावर घरात काहीतरी तयारी चालू होती, पण कशाची कळेना,
तेवढ्यात आई म्हणाली,
वैदू, माझी एखादी साडी आवडते का बग उद्या तुला मुलगा बघायला येणार आहे, बाबा च्या मित्राचा मुलगा आहे उच्चशिक्षित व सुंदर आहे दिसायला, तुला नक्की आवडेल
आई एका दमात बोलून मोकळी झाली,
वेदिका ला काही कळेना, मुलगा व मला बघायला आणि हे कुणी ठरवले मला न विचारता,
तिला खुप राग आला ,
ती कुणाचेच ऐकेना,
मी जातेय परत
व मला माहित असते ना
मुलगा बघायला येणार आहे मी आलेच नसते
निव्वळ वेळ वाया घालवणे म्हणतात याला,
ती चिडून म्हणाली,
हो बाळ,
चिडू नको
कळतंय मला सगळं पण ऐकून घे ना
फक्त बघायचा कार्यक्रम आहे लग्न थोडीच आहे,
आई घाबरत च म्हणाली,
हो
आई पण मला न विचारता,
वेदिका चिडून रूम मध्ये निघून गेली,
रोज तिला चिडवणारा अजय आज शांत होता त्याला धक्का बसला होता कशाचा तरी, माहीत नाही का पण वेदिका चे लग्न हे ऐकून त्याला आनंद नाही तर वाईट वाटले होते,
वेदिका रूम मध्ये एकटी बसली होती,
आई तिच्या जवळ गेली व घाबरत तिला समजावू लागली,
हे बग बाळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ही वेळ केव्हातरी येतेच, मुलीला वडिलांचे घर सोडून जावेच लागते, मी नाही आले का तुझ्या बाबा साठी,
मुलगी दोनी घराची लक्ष्मी असते,
व आता बघायला चालू केले तर कुठे तुझे शिक्षण संपेपर्यंत एखादे चांगले स्थळ मिळेल, हो की नाही
फक्त बघून जातील ते तू घेऊन नाही,
ती आई च्या मांडीवर डोकं ठेऊन रडू लागली चुकले ग आई मी बाबा वर खुप ओरडले, पण मला नाही जायचे तुम्हांला सोडून
मला इथेच राहायचे तुमच्या सोबत आयुष्यभर,
वेडी कुठली आई तिला जवळ घेत म्हणाली,
चल बर उठ तयारी कर,
वेदिका च्या बाबा नि अजय ला तिथे च थांबायला सांगितले
मदतीसाठी,
दुसरा दिवस उजाडला,
घरातील सर्व पाहुण्याच्या स्वागताची तयारी करू लागले,
बाबा चे मित्र असल्यामुळे तयारी थोडी चोख होती,
वेदिका देखील छान साडी घालून तयार झाली,
वेदीकासाठी आणलेले गजरे देण्यासाठी वेदिका ची आई अजय ला सांगते,
अजय गजरे घेऊन रूम मध्ये जातो व दुरूनच तिच्या अंगावर फेकून देतो,
तिला अजय असा का वागतोय हे कळत नव्हते,
अजय इकडे ये
वेदिका,
काय आहे, मी काम करतोय दिसत नाही का?
अजय
हो ते दिसतेय
पण तुझे काय बिघडले, वेदिका
कुठे काय मस्त तर आहे मी, मला काय झालं, अजय
मी कालपासून बघतेय
तू चीड चीड का करतोय,
वेदिका
तुला नाही सांगितलेलं कळतं नाही का, अजय तिच्यावर जोरात ओरडून निघून जातो,
त्याला ती माणसे, ते वातावरण सगळं नकोस झालं होतं,
तो एकटाच बागेत येऊन बसतो,
व विचार करू लागतो
पण मी का चीड चीड करतोय
माझे काय आहे यात पाहुणे वेदिका ला बघायला येणार,
लग्न तिचे आहे, मग मी का ?????
चीड चीड करतोय
काय झालंय मला,
मी असा तर कधी नव्हतो,
मी प्रेमात तर नाही पडलो ना
तिच्या,
नाही नाही असे नाही होणार, आता तर कुठे मैत्री झालीये आमच्यात,
अजय विचार करू लागतो
क्रमशः ........
काय असेल अजय च्या चीड चीड करण्याचे कारण,??????
तो मुलगा पसंत करेल का वेदीकाला, जाणून घेण्यासाठी सोबत राहा