टेडी आजोबा

पेपरच्या आतल्या पानात व्हॅलेंटाईन डे चे , लाल कपडे घातलेल्या मुलींचे, टेडी बियर चे, लाल फुगे, रोमँटिक कपल्स चे फोटो, व लाल गुलाब सांगत होते की ,आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यांची नात हर्षिता, लाल टॉप घालून मोबाईल वर, किती वाजता भेटायचं या वर मैत्रिणीशी चर्चा करत होती . मोबाईल उघडून फेसबुक पाहिले तर व्हॅलेंटाईन डेच्याच गोष्टींनी भरलेले .__________________________
टेडी आजोबा?
व्हॅलेंटाईन डे

सकाळ चे नऊ वाजले होते.
सदानंद कुलकर्णी पेपर घेऊन उन्हात जाऊन बसले.
पेपरच्या आतल्या पानात व्हॅलेंटाईन डे चे , लाल कपडे घातलेल्या मुलींचे, टेडी बियर चे, लाल फुगे, रोमँटिक कपल्स चे फोटो, व लाल गुलाब सांगत होते की ,आज व्हॅलेंटाईन डे आहे.
त्यांची नात हर्षिता, लाल टॉप घालून मोबाईल वर, किती वाजता भेटायचं या वर मैत्रिणीशी चर्चा करत होती
. मोबाईल उघडून फेसबुक पाहिले तर व्हॅलेंटाईन डेच्याच गोष्टींनी भरलेले ,काही लेखकांनी म्हातार्यांनि म्हातारी ला गजरा चॉकलेट देऊन साजरा केलेल्या व्हॅलेंटाईन च्या गोष्टी पाठवून बरेचसे लाईक्स मिळवले होते.

या सगळ्याचा परिणाम, सदानंदाना पण वाटायला लागले आपणही असे काही तरी करावे .
काल संध्याकाळी कट्ट्यावर फिरायला गेल्या गेल्या त्यांनी आपल्या मित्रांचे विचार जाणून घ्यावे म्हणून विषय ही काढायचा प्रयत्न केला, पsण यू.पी , पंजाब च्या निवडणूक आणि मोदींचे धोरण या सारख्या ज्वलंत विषयांवरून वेलेंटाइन सारख्या फालतू विषया कडे वळायला कोणच तयार नव्हते.
घरात येऊन पाहिले बायको सुमती फुलवाती भिजवत भिजवत कुणाच्यातरी डोहाळजेवणाविषयी सुने शी चर्चा करत होती.
काय बरं करावं?
ऑफिसला जाताना मुलगा व सून सांगून गेले की संध्याकाळी ते परस्पर बाहेर फिरून व जेवून रात्री उशिरा येतील. नात व नातू देखील बाहेर जाणार होते .

. घरी राहणार फक्त सदानंद व सुमती दोघच. त्यांनी मनाशी ठरवले आज संध्याकाळ निवांत आहे तेव्हा आपणही काहीतरी सनसनाटी करावे ,सुमती करता काहीतरी आणावे.
\"पण काय बरं आणावं? फेसबुक स्टोरी प्रमाणे फुलं व गजरे आणावे तsर सुमतीला फुलांची ऍलर्जी . त्यांना आठवले त्यांच्या लग्नातही फुल कमी व कलाबतूच जास्त असलेले हार त्यांना घातले होते. रात्री सुंदर गुलाबांनी सजलेल्या पलंगावर बसताच शिंकून शिंकून सुमती ने बाहेर धाव घेतली होती तेव्हा त्यांना उलगडा झाला. ऐनवेळी मग अडगळीची खोली साफ करून तिथेच रात्र काढली.

चॉकलेट आणावे तर दोघांना शुगरचा त्रास म्हणून तेही बाद. साडी घ्यावी तर रंग व पोत याची विशेष माहिती नाही मग शेवटी मनाशी काही ठरवून ते संध्याकाळी बाजारात जायला निघाले.
सुमती कुठल्याश्या मंदिरात भजनाला गेली होती. ती यायच्या आधी जाऊन यावे म्हणजेच सरप्राईज दिले जाईल.
सुमतीबाई भजनातून घरी आल्या तेव्हा सदानंद यांना घरी पाहून म्हणाल्या - \"तुम्ही आज फिरायला नाही गेलात?\"
\"आज लवकरच घरी आलो ग, घरी कोणी नाही न.\"
\"बरं मी साडी बदलून येते मग. ‌,चहा ठेवते.\"
\" नको नको,-- राहू दे जरा हीच साडी. छान दिसते बस जरा, मी चहा करतो\" म्हणत त्यांनी सुमतीला झोपायच्या खोलीत जाऊ दिले नाही.
रात्री झोपायची वेळ झाली तेव्हा सदानंद सुमतीच्या जवळ जात म्हणाले \"ए-- जरा डोळे मीट ना.\"
\"हे काय लहान मुलांसारखे.\"
\" मिट. तर.....,\"
\"बरं-- मिटले....\"
सुमती चा हात धरून त्यांनी झोपायच्या खोलीत नेले व एका हाताने दिवा लावला
\"हं-- उघड आता.\"
सुमती ने डोळे उघडताच किंकाळी मारली व सदानंद रावांना जोरात मिठी मारली, अचानक मारलेल्या मिठीने सदानंद राव गडबडले व पडता पडता वाचले पण --मनातून आनंदले, चला भीती पायी का होईना जवळ तर आली..
एक-दोन मिनीटातच सुमतिने परत वळून पाहिले जवळ जाऊन हात लावून पाहिले
अहो \"हे सरप्राईज आहे का? येवढा मोठ्ठा अस्वल ??कोणा करता आणलय?\" सुमती च्या आवाजातले आश्चर्य जाऊन हळूहळू रागात परिवर्तित व्हायला लागले.
\"कोणी सांगितलं हे असलं काही आणा म्हणून? अहो मुलं काय म्हणतील ?बरं मुलांचं जाऊ द्या, पण बाहेर लोक काय म्हणतील, जप करायच्या वयात टेडी खेळणार,\"?
आता सदानंदांना उत्साहाच्या भरात आपण काहीतरी चूक करून बसलो असे वाटायला लागले .
,दुकानात त्यांनी बऱ्याच गोष्टी पाहिल्या हा मोठ्ठा टेडी पहात असताना दुकानदाराने विचारले \"किसके लिये लेना है साहब \"? त्यांना बायकोसाठी सांगायची लाज वाटली म्हणून नाती साठी सांगितले तेव्हा दुकानदाराने हा मोठा टेडी पकडवला. रिक्षात घालून ते घेऊन आले व खोलीत पलंगावर आणून ठेवला.
बाहेर येऊन सुमतिने विचारले,
\"आता हा बिछान्यात ठेवला तsर तुम्ही कुठे झोपणार ?\"
त्यांचा हिरमुसलेला चेहरा पाहून सुमती ला दया आली एवढ्या प्रेमाने आणलाय, त्यांनी टेडी वरून हात फिरवू न म्हंटले
\"खूप मऊ नरम आहे हो, आणि अगदी तुमच्यासारखाच भोळा भाबडा,\" असे म्हणून हळूच टेडी मध्ये ठेवून सदानंदांना झोपायला जागा करुन दिली.
सकाळी त्यांची नात हर्षिता फोन चार्जिंगला लावायला आजी आजोबांच्या खोलीत आली. खोलीतला टेडी? पाहून जोरात ओरडली,
\"अय्याSS, किती क्यूट आहे ,आबा, तुम्ही आणला ? आजी साठी ,व्हॅलेंटाईन गिफ्ट?वाह,s आजी ?..
...\"अगं जरा हळू शेजारी-पाजारी ऐकू जाईल..
आवाज ऐकून
मुलगा व सून ही पाहायला आले, आता सुमती बाईंना लाजल्यासारखे झाले. सगळे बाहेर गेल्यावर त्यां सदानंदां कडे पाहून हळूच, म्हणाल्या
\"हॅप्पी वॅलेन्टाईन माय डियर टेडी ..\"
__________________________