

आठवणींचा हिंदोळा
पाहूनी अस्तास जाणारा सुर्य सांजवेळचा
अलगत उलगडत जातो कप्पा आठवणींचा
विलोभनीय सूर्यास्त तुला खुप आवडायचा
तो पाहूनी तू माझे अस्तित्व ही विसरायचा
उधाण सागरावर पडलेली सूर्यकिरणे सोनेरी
अनुभवले हे क्षण दोघांनी बसूनी किनारी
आपण दोघांनी पाहिली स्वप्नं खुप सारी
आजही ते सारे आठवूनी मनास येते उभारी
हिंदोळ्यावर बसूनी येते तुझी खुप आठवण
तू येशील या आशेने बांधला एक हिंदोळा अजून
आजही तुझ्यासाठीचं धडधडते हे बावरे मन
कसे सांगु तुला? तुझ्याविना अपूर्ण माझे जीवन