स्विकार भाग 48

Love Story

साधारण रात्री दोन वाजता कीर्तीला जाग आली तर श्लोक छान झोपला होता .. ती उठली आणि तिच्या साइड चा नाईट लॅम्प लावून प्रियाची डायरी वाचू लागली
डायरी वाचून तेच कळत होते कि दोघे किती एकमेकांवर प्रेम करत होते .. प्रिया ने किती स्वप्न बघितली होती लग्नाची .. सुखी संसाराची .. वाचता वाचत कीर्ती च्या डोळ्यातून पाणी यायला लागले " का देव एवढा या दोघांशी निष्टुर वागला .. का त्यांची स्वप्न देवाने मोडली ? असेच तिला वाटून दुःख होत होते .


तेव्हड्यात तिला एक लेटर दिसले जे तिने श्लोक साठी लिहले होते

हे स्वीट हार्ट ,
कशा आहे बाबू ?? ये ना शोना .. मला तुझी खूप आठवण येतेय .. कधी तुला पाहतेय ..असे झालेय .. आज रात्री व्हिडीओ कॉल कर .. मला तुला बघायचंय .. आणि लवकर ये .. बस झाला अभ्यास तुझा .. असे होणाऱ्या बायकोला सोडून कसा अभ्यास करतो रे .. नाहीतर मी येईन हा तुझ्या इथे .. मला आता तू हवाय ..
श्लोक .. ऐक ना .. तुला हे लेटर लिहतेय पण पाठवेन कि नाही मला माहित नाही .. कारण तू हसशील माझ्यावर .. आणि मला म्हणशील काय बावळट आहे .. शोनु .. मला ना खूप अस्वथ होतय .. मी आई ला पण बोलले या बद्दल तर आई ने सांगितलं कि काही टेन्शन घेऊ नकोस .. आता श्लोक आला कि माझ्या वाढ दिवसाला आपली एंगेजमेंटच करायची .. मी तर म्हणत होते डायरेक्ट लग्नच करू पण बाबा म्हणाले श्लोक ला नोकरी लागू दे मग करू लग्न .. श्लोक तू लवकर नोकरीला लाग ना .. म्हणजे आपले लवकर लग्न होईल ..
तू म्हणशील हिला काय झाले आह एवढी घाई का करतेय .. घाईच तर करायचीय मला .. मला जर काही झाले आणि मला मरण आले तर .. आपले लग्न राहून जाईल ..
श्लोक मी परवा माझ्या फ्रेंड्स बरोबर एका रिसॉर्ट ला ट्रिप ला गेलो होते .. तिथे एक बाबा भविष्य सांगत होता .. माझ्या सगळ्या मत्रिणींनी त्यांना विचारले .. माझा नवरा कसा असेल ? कुठे असेल ? असे सगळी मज्जा चालू होती .. सगळ्या मला पण त्या तुझा हात दाखव म्हणून मागे लागल्या .. मी म्हटले मला तर माहितेय ना माझा नवरा कुठे आहे ते .. मग मी कशाला विचारू ? तर त्या म्हणाल्या दाखव ना .. तो काय सांगतोय ते तर बघू
मी पण मज्जा म्हणून माझा हात दाखवला तर त्याने माझा हात हातात घेतला आणि चमकून माझ्या कडे बघितले
त्याच्या एक्सप्रेशन बघून असे वाटू लागले कि मी बहुदा कोणाचा तरी खून वगैरे करेल कि काय असे त्याचे एक्सप्रेशन होते .. तर दोन मिनिटे माझा हात बघून त्याने मला भविष्य सांगितलेच नाही आणि मला म्हणाला " गाडी चालवू नकोस ..कोणतीच गाडी चालवू नकोस " मी त्यांना म्हटले " बाबा बाकीच्यांना नवऱ्या बद्दल सांगितले मला पण माझ्या नवऱ्या बद्दल सांगा ना " तर तो म्हणाला .. मला तुझ्या भविष्यात नवरा दिसत नाहीये .. तो असे का म्हणाला असेल मला माहित नाही .. माझा तर मूडच गेला होता .. मी घरी आल्यावर आई ला सांगितले कि आज असे असे झाले तर आई म्हणाली " असे काही नसते .. नको तो विचार करू नकोस .. लवकरच तू माझि सून होणार आहेस ..
श्लोक आई ने तर मला समजवलेय पण आज मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं आहे .. देव न करो त्या बाबा चे म्हणणं खरे ठरले तर उद्या मी तुझ्या आयुष्यात नसले तर .. तर काय ?
तर मी तुला आधीच सांगून ठेवते .. माझी आठवण काढून अजिबात रडायचं नाही .. मला रडका तू अजिबात बघायला नाही आवडणार .. माझ्या साठी झुरत बसू नकोस .. माझ्या पेक्षा छान, सुंदर मुलीशी लग्न कर .. आणि छान सेटल हो .. खूप मोठा वकील हो .. तुला वकील झालेलं मला बघायचंय .. आई बाबांचे नाव रोशन कर ... मी जर बायको झालेच तर आपले ठरलच आहे अक्खी क्रिकेट ची टीम च तयार करायचीय आपल्याला .. पण मी जर नसले तर हे काम कोना दुसऱ्या मुलीचे नक्कीच नाहीये तर तिला जास्त त्रास देऊ नकोस .. माझ्या मुळे तिच्या डोळ्यांत पाणी जर आले ना तर बघ हा मी परत येईल तुझ्या आयुष्यात .. तुझी मुलगी बनून .. मग असा बदला घेईन असा बदला घेईन कि नाके नौ आणेल तुझ्या ..
हा हा हा .. कसला भारी जोक आहे ना .. म्हणजे तुझी बायको माझि आई असेल .. निदान पुढच्या जन्मात तरी मला आई बाबांचे प्रेम मिळेल ..
श्लोकु मला विसरू नकोस काय कधीच .. मला नेहमी तुझ्या मनाच्या कोपऱ्यात जागा ठेव .. आणि मग उरलेल्या जागेत तुझी बायको अड्जस्ट कर .. पण जागा रिकामी ठेवू नकोस ..
उद्या जर मी नसले तर माझ्या आठवणीने रडू नकोस
उद्या जर मी नसले तर घरात कुढत बसू नकोस
उद्या जर मी नसले तर बिन लग्नाचं राहू नकोस
उद्या जर मी नसले तर बायको वर अन्याय करू नकोस
तीच मना पासून स्वीकार कर
तू जितका आनंदी राहशील तेवढी मी तुझ्यातून मुक्त होत जाईन
मला माहितेय माझ्या सारखे प्रेम करणे दुसरी ला जमेलच असे नाही पण तू आहेच असा गोड .. माझा गोडुला .. तुझ्या वर कोण प्रेम नाही करणार .. ती पण करेलच ..
काय हे बोलतेय मी .. आणि लिहतेय मी मला माहित नाही .. असेच जे मनात आले ते तुला लिहून पाठवते ..
बोक्या लवकर ये तुझी मांजर वाट बघतेय इकडे .. मिस यु अँड वॉन्ट टू किस यु ... उम्म्म हा ...
Only Yours
तुझी प्रिया
आणि जर मी असताना तू दुसऱ्या कोणाकडे बघितलेस तर .. तर ... तुला माहितेय मी काय करेन... डोन्ट इव्हन थिंक ऑफ इट .. यु आर ओन्ली माईन ..

भरलेल्या डोळ्यांनी कीर्ती ने ते लेटर वाचले .. एक नजर श्लोक कडे टाकली तर गाढ झोपला होता तो .. कसे वाटले असेल प्रियाला जेव्हा तिला तिच्या मरणाच्या बाबतीत कळले होते.. किती अस्वथ झाली असेल ती या विचाराने तिला सारखे भरून येत होते आणि जोर जोरात रडावे असे वाटत होते .. बिचारा श्लोक .. हे लेटर न वाचताच स्वतः किती सावरलाय .. किती मनाने खंबीर झाला .. त्या एवढया दुःखातून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभा राहिला .. नामांकित वकिल झाला .. सगळे अगदी तिच्या मना सारखेच करतोय .. लग्नाला मुली काय त्याला हजार मिळाल्या असत्या पण त्याला मी आवडले .. किती भाग्यवान आहे ना मी .. देवाने माझ्या भाग्यात एवढं सुख टाकले ..
तेवढ्यात श्लोक या कुशीवरून त्या कुशीवर वळला .. तिने पटकन ते लेटर आणि डायरी लपवली आणि लाईट ऑफ केला .. त्याच्या डोक्यावर हात फिरवून झोपून गेली
सकाळी जाग आली तर श्लोक अंघोळ करत होता .. ती पण लगेच उठली त्याच्या घालायचे कपडे तिने काढून ठेवले ..तो बाहेर आल्यावर ती अंघोळीला गेली . पटकन तयार होऊन बाहेर आली .. आज दोघांनी ब्लु जीन्स आणि व्हाईट टी शर्ट घातले आणि स्पोर्ट्स शूज घालून क्रिकेट साठी तयार ..
सर्वांनी एकत्र नाश्ता केला आणि मग दोन टीम पाडण्यात आल्या .. मुद्दामून अशा टीम पडल्या कि नवरा बायको विरुद्ध टीम मध्ये जातील

कीर्ती ,चिनू , विजय ,नेहा , मॉमी , विभा एका टीम मध्ये

श्लोक . इशा , अर्पिता , विकी , रिचर्ड ,अर्णव एका टीम मध्ये

माया म्हणाली मी अंपायर होते

सहा ओव्हर ची मॅच ठरली ,, म्हणजे प्रतेय्काला एक ओव्हर टाकायला मिळेल

श्लोक आणि विजय कॅप्टन झाले .. टॉस झाला पहिली बॅटिंग श्लोक च्या टीम कडे आली \"

मॅच सुरु होणार तर श्लोक कीर्ती च्या जवळ जाऊन

श्लोक " आर यु रेडी ?"

कीर्ती " येस "

श्लोक " धावताना पडू नकोस काय ? आणि नसेल धावायचं तर नाही धावलीस तरी चालेल" बोल बोलता त्याने खाली बसून तिच्या शूज च्या लेस नीट बांधून दिल्या ..
विकी " श्लोक , रेडी का ?"
श्लोक " हो रे आलो .. जाऊ मी .. खेळशील ना .. चालेल ना तुला "
कीर्ती ने हसतच मान डोलावली .. तिच्या कपाळावर किस करून खेळायला गेला
तर ओपनर बॅट्समन श्लोक आणि विकी आले ..
विजय ने सर्वांना फिल्डर म्हणून उभे केले आणि स्वतः बॉलिंग घेतली .. विभा झाली विकेट किपर ..
अर्णव हसतच " विभा विकेट किपर चे काम काय आहे माहितेय ना "
विभा " बघू ना आता .. जमतय का ते "
आणि विजय ने बॉलींग करायला सुरुवात केली आणि विकी आणि श्लोक ने जे दना दन मारायला सुरवात केली .. सिक्स नाहीतर फोर चालूच होते .. श्लोक कीर्ती ज्या साईडला फिल्डिंग ला उभी होती तिकडे हळू मारायचा .. तिला बॉल लागायला नको म्हणून .. तर विकी चिडका लगेच ओरडायचा .. श्लोक " नो चीटिंग "
चिनू च्या ओव्हर ला विकी आऊट झाला ते हि कॅच आऊट आणि ते हि कॅच कीर्तीने पकडला .. श्लोक हसायला लागला .. आणि एक फ्लयिंग किस त्याने कीर्तीकडे फेकला .. मॅडम नुसतीच हसली

क्रमशः


🎭 Series Post

View all