स्विकार भाग6

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग ६
क्रमश : भाग ५
एकाचे नाते संपुष्ट्टात येत होते तर एकाचे नाते फुलायला सुरुवात होत होती .. अजब योगायोग होता हा ..
चिनू चे लग्न साधारण दोन वर्षांपूर्वी झाले .. आणि लग्न झाल्या झाल्या तो बायकोला म्हणजेच ईशाला ला घेऊन ऑस्टेलियाला गेला .. दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम असतानाही आज ते दोघांचे नाते या अशा विचित्र मोड वर का घेऊन आले हा मोठा प्रश्नच होता
राहून राहून कीर्ती बॅक ऑफ द माईंड हाच विचार करत होती . चिनू जवळ एक दिवस शांत बसून बोलणे गरजेचे होते . मॅटर सॉर्ट आऊट होतात इफ व्युई प्रोपरली डिसकस्ड असाच कीर्तीचा नेहमी स्टॅन्ड असायचा . शिवाय कीर्तीला ईशा पण जितकी जवळून माहिती होती तितकाच जवळून चिनू पण माहित होता .. त्यामुळेच तर चिनू कीर्तीकडे आला होता .. सोल्युशन निघाले तर इथूनच निघेल असे त्याला वाटत होते .. या आधी हि त्यांचे छोटे मोठे भांडण झाले तर कीर्ती दोघांना समजवायची .. पण आता गोष्ट वेगळी होती आता कीर्तीचे लग्न झाले होते आणि चिनू तितक्या हक्काने तिच्याजवळ बोलायचा प्रयत्न करत होता पण त्याला करता येत नव्हते .. श्लोक ला काय वाटेल या भीतीने
श्लोक ची वेगळीच गम्माडी गंमत होती .. कीर्ती ला समजून घेतोय .. किंवा तिला सेटल होयला टाईम देउया म्हणून आलरेडी तो २ महिने थांबला होता . तिला हळू हळू आपल्या आयुष्यात सेट तो करत होता .. तर चिनू मधेच आल्यामुळे त्याला उगाच कॉम्प्लेक्स आला .. कि हा माझ्या बायकोशी इतका फ्री का बोलतो .. एवढी तोलून मापून हळूच बोलणारी कीर्ती याच्या समोर मात्र वेगळी असते ..चिनू सॊबत जास्त फ्री आणि मस्त मौला असते .. हे त्याला डायजेस्ट होत नव्हते . आणि आता जास्त उशीर न करता आपण पण थोडा रिलेशन बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे त्याला अचानक वाटू लागले ..
कीर्ती .. कीर्ती मुळातच समजूतदार ..पण थोडी बुजरी जास्त होती याचे कारण तिला असलेला फोबिया .. फोबिया म्हणजे काय तर एक प्रकारे मानसिक आजारच आहे .. मनात एखाद्या घटनेमुळे एखाद्या गोष्टी बद्दल भीती बसते ती जात नाही .. कीर्ती च्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती कि ज्यामुळे तिला ट्राफिक चा फोबिया झाला आहे . आणि या फोबिया मुळे तिच्या लाईफ वर खूप परिणाम होत होता .. आणि त्याचेच एक कारण असे होते कि तिचे लग्न बाकीच्या मुलींच्या मनाने फार उशिरा झाले होते .. तिच्या बाकीच्या मैत्रणीनींना एकेक दोन एन मुले झाली तरी हिचे लग्न त्या फोबिया मुळे होई ना .. लोकांना फोबिया म्हणजे ती थोडी वेडी बिडी आहे कि काय असे वाटायचे आणि त्यामुळे हुशार , सुंदर , समजूतदार आणि पर्मनंट नोकरी असताना देखील तिला कोणी पसंत करेना .
श्लोक चे आई बाबा दोन वर्षांपूर्वी एका कार ऍक्सीडेन्ट मध्ये गेले होते .. आणि तो एकटाच होता .. नामंकित वकील ,सेटल्ड , हँडसम आणि मित भाषी होता .. आई वडील गेल्याच्या धक्क्यातून तो कसाबसा सावरला .. त्याच्या एका जवळच्या अंकल नि त्याला लग्न करून सेट होयला सांगितले आणि त्यांनीच पुढाकार घेऊन त्याचे लग्न लावून दिले
त्यातूनच हे दोघे एकमेकांसमोर आले आणि कीर्ती च्या फोबिया सकट ती त्याला आवडली .. त्याने काही फोबियाचे कारण सुद्धा विचारले नाही आणि कोर्ट मॅरेज करायचे ठरवले .. पण कीर्ती म्हणाली कि मला प्रॉपर लग्न करायचेय .. आयुष्यात एकदाच लग्न होते असे सही करून काय मज्जा .. शिवाय तिच्या वडिलांची ईच्छा होतीच कि आपल्या मुलीला वाजत गाजत सासरी माहित होते.

श्लोक ला कोर्ट मॅरेज यासाठी करायचे होते कि त्याच्या बाजूने साधा आशीर्वाद दयायला पण कोणी नव्हते .. तर हा सोहळा कोणा बरोबर साजरा करायचा . तरी पण कीर्ती साठी तो तयार झाला .. हळदी पासून सगळे विधी करत कीर्तीचे आणि श्लोक चे लग्न झाले ..
एकदमच दोघे एकमेकांना नवीन होते त्यामुळे निदान एक दोन महिने तरी दोघांनी एकमेकांना देणे गरजेचे होतेच ..
हळू हळू कीर्ती नवीन शहरात , त्याच्या घरात सेट होत होती.. दोघे मोजकेच बोलायचे पण आनंदी होते .. एकमेकांना काय आवडतंय याचा विचार करून वागत होते.
संध्याकाळी नेहमी प्रमाणे कीर्ती श्लोक च्या आधी घरी आली .. पटापट संध्याकाळचे जेवण तयार केले .. तिला आज काहीतरी स्पेशल करायचं होत .. पण काय करू हेच कळत नव्हतं .. अजून साधे थँक यु फॉर फ्लॉवर्स असा पण मेसेज तिने पाठवला नव्हता ..
ती वॊर्डरॉब ओपन करून बसली .. नक्की काय घालू .. साडी घालू काय ? असा विचार करत होती .. पण मुव्हीला जाताना साडी म्हणजे कदाचित ऑड वाटेल आणि श्लोक म्हणेल हिला काही कळते कि नाही .. त्याला नक्की मी काय घातलेलं आवडते हेच तिला माहित नव्हते .. त्याने कधी तू छान दिसतेयस असे पण बोलला नव्हता .. त्यामुळे काय केले तर त्याला स्पेशल वाटेल हेच तिला कळत नव्हते .
तेवढयात श्लोक आलाच ..
श्लोक " तू अजून तयार नाही झालीस ? "
कीर्ती वॊर्डरोब कडे बघतच म्हणाली " नक्की काय घालू तेच कळत नाहीये "
श्लोक हलकाच हसला .. " मी काही मदत करू का ?"
कीर्ती " चालेल "
श्लोक ने त्याच्या वॊर्डरॉब मधून एक पॅकेट काढून तिला दिले ..
श्लोक " हे मी तुझ्यासाठी आणले होते पण देण्यासाठी चान्स नाही मिळाला .. बघ तुला आवडते का ? आवडले तरच घाल .. मला पण नक्की तुझी चॉईस काय आहे ते माहित नव्हते मी समोर दिसले ते घेऊन आलेलो .. आणि नाही आवडले तर इट्स ओके .. तू नाही ... " तो बोलतच होता .. त्याला प्रेशर आले होते .. जर नाही आवडले तर कीर्तीला राग नको यायला कि असा ड्रेस आणला वगैरे .. कारण तशी ती काही मोठया शहरात लहानाची मोठी झाली नव्हती
कीर्ती ने शांतपणे ते पॅकेट घेऊन वॉशरूम मध्ये गेली आणि आतमध्येच तिने ते पॅकेट ओपन केले आणि बघूनच एक गोड स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर .. खूप छान , नाजूक , एलिगंट असा लॉन्ग वन पीस होता .. अगदी तिला आवडेल असाच .. जास्त भपका नाही .. सिम्पल यट एलिगंट ..
कीर्ती लगेच बाहेर आली आणि तो बघतच बसला .. खूप छान दिसत होता तिला तो ड्रेस ..
कीर्ती " थँक यु .. खूप छान ड्रेस आहे आणि बुके पण खूप छान होता .. स्पेशली ते ग्रीटिंग टच माय हार्ट "
श्लोक " थँक यु .. आणि तू खरोखर खूप छान दिसत आहेत या ड्रेस मध्ये .. "
श्लोक " ठीक आहे .. आपल्याला अर्धा तासात निघायला हवे .. नाहीतर सुरुवात जाईल "
दोघे जेवले आणि मुव्हीला गेले . आज पहिल्यांदा असे ते मुव्हीला एकत्र गेले होते .. दोघे हातात हात घालूनच फिरायचे .. तेवढी सवय झाली होती दोघांना .. कीर्तीच्या फोबिया मुळे तिला तिचा हात पकडल्याशिवाय तिला एकटीला सोडत नसायचा तो .. दोघे खूप छान दिसत होते .. खुश होते .. एकत्र सेल्फी घेत होते .. मुव्ही बघताना एका इमोशनल सिन ला दोघांचे हात आपोआप घट्ट झाले होते .. जसे कि आय विल बी आल्वेज देअर फॉर यु असे प्रॉमिस च करत होते एकमेकांना ..
थिएटर मधून बाहेर पडतच होते कि कीर्तीचा फोन खणखणला
समोरून ईशा होती
कीर्तीने पटकन फोन उचलला
कीर्ती " ए हाय ईशा .. आता कसा काय फोन केलास ? आय मिन आता रात्रीचे ११ वाजलेत म्हणून म्हटले .. सगळे ठीक आहे ना "
ईशा " अग आता काय बोलू तुला ? माझी सगळीच वाट लागलीय .. आणि तुला विश्वास बसणार नाही .. सगळ्यात जास्त त्रास मला तुझा बेस्ट फ्रेंड चिनू देतोय "
कीर्ती "अग हो .. मी तुझ्याशी या विषयावर बोलायला कॉल करणारच होते .. "
ईशा " अग आपण आता बोलू आरामात .. आधी तो प्रॉब्लेम मध्ये आहे .. तू जिजुंना सांगून माझि काही मदत करू शकते का ? आता तूच तिकडे आहेस म्हणून मी तुला फोन केलाय "
कीर्ती लगेच टेन्शन मध्ये आली
कीर्ती " नक्की काय झालय ?"
ईशा " अग तो नालायक .. तो हॉटेल च्या बार मध्ये बसलाय .. खूप ड्रिंक्स त्याने घेतलेत आणि आता तिकडे गोंधळ घालतोय .. आता पर्यत त्या अख्ख्या बार ला कळलंय कि आम्ही दोघे एकत्र नाही राहतोय ते .. तू काही करू शकते का ? मला त्या हॉटेल मॅनेजर चा फोन आला होता ? आणि मुख्य म्हणजे त्यानेच माझा नंबर त्या मॅनेजर ला दिला आणि त्याला म्हणतोय .. माझ्या बायकोला बोलवा तरच मी इथून जाईन "
कीर्ती "अरे देवा...आता काय? हे सगळे? "
श्लोक " काय झालय ?"
इशा " तू फोन स्पीकर वर टाक .. मी बोलते जीजूंशी .. माझ्याकडे आता काही पर्याय पण नहिये .. मी तिकडे यायला निघतेय .. आले कि बघतेच त्याला बघ आता .. त्याने मला खूप त्रास दिलाय "
कीर्ती " यार तुम्ही दोघे काय असे वागता कळत नाही मला .. "
ईशा " तू आता मला लेक्चर नको देऊ .. त्याला उचलून आण तुझ्या घरी ..नालायक कुठचा .. लाज आणलीय त्याने "
कीर्ती " तू हायपर नको होऊस .. मी बघते काय करायचे ते "
आणि तिने फोन कट केला
श्लोक " काही प्रॉब्लेम आहे का ?"
कीर्तीने एका दमात सांगळे त्याला सांगून टाकले ..
श्लोक ला हे सगळे नक्कीच आवडत नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते पण करणार काय ? आणि आज तो जरा वेगळ्या मूड मध्ये होता तर हे असे झाले
शेवटी दोघे आधी त्याच्या हॉटेल वर गेले .. श्लोक ने तिला तिथंच रिसेप्शन वर बसवले आणि खाली बार मध्ये गेला .. त्याला धरून वरती घेऊन आला ..आणि त्याला कार च्या मागच्या सीट वर झोपवले आणि मग दोघे त्यांच्या घरी गेले .
गेस्ट रुम मध्ये त्याला घेऊन गेला .. त्याला बेड वर व्यवस्थित झोपवले .. त्याच्या अंगावर टाकले आणि मग त्याच्या बेडरूम मध्ये आला ..
तोपर्यंत कीर्ती नाईट ड्रेस घालून झोपायच्या तयारीत होती
कीर्ती " काही हवंय का तुम्हाला ?आय मिन कॉफी घेशील का ?" ती दबकतच म्हणाली
श्लोक गालातल्या गालात हसला .. मनात म्हणाला .. इम्प्रुमेन्ट .. "
श्लोक " तू घेणार असलीस माझ्या बरोबर तर चालेल मला .. "
कीर्ती पटकन किचन गेली कॉफी करायला .. तोपर्यंत श्लोक पण फ्रेश होऊन बाहेर आला


©सौ. शीतल महेश माने

सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार , दररोज दुपारी ४ वाजता.वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा
पुढील भागाची आतुरता आहे ?त्वरित वाचा स्विकार भाग ६ ईरा च्या सब्स्क्रिप्शन फिचर मधून आणि त्यांनतर पुढील सर्व भाग रोज हमखास !!! आजच सब्स्क्रिप्शन घ्या ...

🎭 Series Post

View all