स्विकार भाग 5

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग ५
क्रमश : भाग ४

श्लोक आधीच थोडा चिडला होता आंणि त्याच ओघात असताना तिचा कॉल आला आणि लिटरली तो ओरडून बोलत होता .. आज पहिल्यांदा कीर्तीने त्याचा हा पीच ऐकला असेल .. कीर्ती एकदम शांत होऊन ऐकत होती . थोडीशी घाबरली आणि टचकन पाणी आले तिच्या डोळ्यातून
तेवढ्यात श्लोक ला जाणवले कि आपण कीर्तीवर उगाच ओरडतोय . समोरून तो पण एकदम शांत झाला .. दोन एक मिनिटांनी
श्लोक " हॅलो .. सॉरी . मला तुझ्यावर नव्हते ओरडायचं .. सॉरी "
कीर्ती एकदम शान्त .. तिचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न ती करत होती
श्लोक " तू रडतेय का ? रडू नको ना .. सॉरी .. चुकून ओरडलो तुझ्यावर .. अग मला तुझी काळजी वाटते .. तू गाडी चालवताना फोनवर बोलत नको जाऊस इतकंच माझे म्हणणे आहे "
कीर्ती " ठीक आहे .. ठेवते फोन "
श्लोक " हमम... सॉरी वन्स अगेन .. "
कीर्ती " डोन्ट बी सॉरी .. मीच सॉरी बोलते .. माझ्यामुळे तुमची चिडचिड झाली .. "
काय नि काय कसले काय ? श्लोक ला तिला विचारायचे होते कि मी सकाळी काय बोललो हे तुला कळले का ? ते राहिले बाजूला आणि हे झाले भलतेच ..
तेवढयात साक्षात चिन्मय श्लोक च्या ऑफिस मध्ये हजर .. पियुन आत सांगायला आला कि बाहेर चिन्मय आलेत त्यांना तुम्हाला भेटायचंय
श्लोक " हा ठीक आहे १५ मिनिटांनी पाठव आत .. तोपर्यंत चहा कॉफी , पाणी दे .. माझा एक कॉल चालला आहे इम्पॉर्टन्ट तो संपोवतो आणि भेटतो
पियुन " ठीक आहे ”
श्लोक ला कोर्टात हिअरिंग चे जे काही काम होते ते त्याने प्रायोरिटी वर पूर्ण केले .. आणि चिनू ला आत मध्ये बोलावले
चिनू एकदम डिस्टर्ब दिसत होता .. कदाचित थोडासा रडून आलाय असेच वाटत होते ..
श्लोक " ये ये .. तू कसा काय इकडे .. अचानक .. सॉरी टू कीप यु ऑन वेट .. माझे कोर्टात हिअरिंग चे काम होते ते आज आता करणे भाग होते म्हणून तुला थांबवले "
चिनू चा सगळा चार्म निघून गेला होता .. आज तो गरीब बिचारा वाटत होता .. खूप मेंटल स्ट्रेस मध्ये आहे असेच वाटत होते
श्लोक " इज एव्हरी थिंग ऑल राईट ?"
चिनू " हमम "
श्लोक " बोल काय घेशील .. कोल्ड कॉफी घेशील ?"
चिनू " मला एक नोटीस पाठवायचीय .. तुम्ही मदत कराल का मला ?"
श्लोक " कसली नोटीस .. कोणाला ?"
चिनू " डिवोर्स ची नोटीस माझ्या बायकोला पाठ्वायचीय मला "
श्लोक " काय झालंय अचानक ? कळेल का मला ?..आय मिन हा तुझा खूप पर्सनल मॅटर आहे .. कदाचीत मी कीर्ती एवढा जवळचा नाहीये तुला पण एक वकील म्हणून मी काही तरी सल्ला नक्कीच देऊ शकतो .. इफ यु इन्सिस्ट "
तेवढ्यात पियुन कोल्ड कॉफी घेऊन आला ..
श्लोक " घे कॉफी घे .. आणि थोडा रिलक्स हो .. "
चिनू च्या डोळ्यातून एक अश्रू टपकलाच .. श्लोक ला नक्की कसे वागू कळे ना .. ना तो त्याचा मित्र आहे , ना तो त्याचा नातेवाईक आहे , ना तो त्याचा क्लाएंट आहे .. आहे तर प्रत्यक्षात त्याच्या बायकोचा मित्र .. आणि त्याच्या मुळे आज तो त्याच्या बायको वर चिडला होता ...
थोडा वेळ शांतता ..
श्लोक “तुला मला नसेल सांगायचे तर मग बाहेर सारिका बसलीय तिला सांग ती तुला डिवोर्स ची नोटीस बनवून देईल . पण एकदा हे कोर्ट कचेरी सुरु झाली कि सामान्य माणसाचे लाईफ आहे त्या पेक्षा कठीण होऊन जाते .. सांगणे माझे काम आहे .. शेवटी निर्णय तुझा असेल .. पाहिजे तर थोडा विचार कर मग आपण बोलू .
चिनू " ठीक आहे .. मी थोडा वेळ शांत बसतो बाहेर .. आणि सांगतो काय आहे माझा निर्णय "
चिनू विचार करत होता .... वकील पाहिजे तर हाच कशाला पाहिजे .. ह्याला आपली घरातली सगळी रडगाणी सांगावी कि नाही सांगावी असे झाले त्याला . भावनेच्या भरात तो इथे पोहचला होता खरा पण पाऊल पुढे टाकू का नको टाकू असे झाले त्याला .
चिनू बाहेर बसायला म्हणून गेला तो तो बसलाच नाही आणि निघून गेला त्याच्या हॉटेल ला.
आणि चिनू ने श्लोक ला मेसेज केला .. आपल्यातले बोलणे कीर्ती ला नका सांगू .. मी तुम्हांला भेटलोय हे पण तिला नका सांगू .. कदाचित तिला नाही आवडणार
श्लोक पण विचार करू लागला .. आता हि गोष्ट उगाचच कीर्ती पासून लपवून ह्याला काय मिळणार आहे काय माहित ? आणि मला तो भेटला हे कीर्तीला का बरें नाही आवडणार ?
तोपर्यंत लंच टाइम झाला .. लंच च्या आधी श्लोक सॅलड खायचा .. तसा वेगळा डबा कीर्ती श्लोक ला देत असे ..
त्याने सलाड चा डबा उघडला तर त्यात एक चिट्ठी होती


हाय श्लोक ,
तुम्ही बोललेले मला कळलं आहे .. मी तुम्हांला नावाने हाक मारायचा प्रयत्न करेन .. हळू हळू मी माझ्यात बदल करेन .. पण बाहेरचं कोण असेल तर किंवा मोठं कोण असेल तर तुमचे नाव नाही घेता येणार मला घेता .. चालेल का ?"
श्लोक ला कीर्ती असे काही चिट्ठी वगैरे लिहेल असे वाटलेच नव्हते .. दोन ओळींची चिट्ठी श्लोक ने शंभरदा वाचली आणि खाता खाता त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले ..
मधेच त्याला आठवले कि आज सकाळी आपण तिच्यावर चिडलो .. हे ठीक नाही केले.. त्याने पण तिला सॉरी बोलायला एक गम्मत केली .
थोड्याच वेळात चिनू चा पुन्हा मेसेज आला
चिनू " सॉरी तुमचा वेळ मी फुकट घालवला .. मी आज थोडा विचार करतो .. बघतो .. कीर्तीशी बोलतो .. ती मला छान समजून घेते आणि ती छान गाईड पण करेल .. मी तिच्याशी डिस्कस करून काय तो मग निर्णय घेईन "
श्लोक मनातच .. म्हणजे हा आता तिचे डोके खाणार .. तिला इमोशनली डिस्टर्ब् करणार .. त्याचा इफेक्टआमच्या लाईफ वर पडणार ..
श्लोक ने पटकन कीर्ती ला कॉल केला
श्लोक " हॅलो .. जेवलीस का ?"
कीर्ती " हमम .. तुम्ही ?"
श्लोक .. मी पण जेवलो .. चिठ्ठी मिळाली "
कीर्ती " हमम ... "
श्लोक " ऐक ना .. आज आपण मूवी ला जायचं का ?"
कीर्ती " हो चालेल .. किती वाजता ?"
श्लोक " रात्री ८ वाजता चा शो आहे "
कीर्ती " ठीक आहे .. मी घरी गेले कि तयार राहीन "
श्लोक " ठीक आहे .. मी टिकेट्स बुक करतो "
श्लोक ने मुद्दामून तिची संध्याकाळ बिझी करून घेतली .. म्हणजे चिनू जवळ बोलायला तिला वेळ नाही मिळणार
थोडया वेळाने कीर्तीच्या बँकेत एक बुके वाला आला बिग बुके विथ लव्हली रॉयल रेड रोझेस अँड व्हाईट लिली .. आणि कीर्ती ला देऊन गेला
कीर्तीच्या बॅंकेतल्या सगळ्या मैत्रिणी तिला चिडवू लागल्या
मैत्रिणी " ओह.. कीर्ती .. हाऊ रोमँटिक .. बघ बघ कोणी पाठवलय .. "
बुके वर एक छोटुसे ग्रीटिंग कार्ड होते.
त्यावर मजकूर होता
I wanted to say somthing else but its sorry for now for getting you into tears .. will you forgive me my dear wife.
मैत्रिणी “ सो स्वीट .. कुठला नवरा असा सॉरी बोलतो ग .. यु आर लकी गर्ल "
कीर्ती ला कसे रिऍक्ट करू ते समजतच नव्हते ..
नुसतीच खाली बघून हसत होती .. खूप स्पेशल वाटत होते तिला .. पण असे का ? सगळ्यांसमोर शी बाबा .. आता बँकेत सांगळे मला चिडवत बसतील .. ह्यांना पण काही कळत नाही .. हे करायची काय गरज होती .. सरळ मोबाईल वर .. नाहीतर संध्याकाळी घरी आल्यावर तरी बोलले असते तरी चालेले असते ना .. काहीपण करतात
तेवढ्यात कीर्तीला चिनू चा कॉल आला
चिनू " हॅलो .. कीर्ती आता बोलू शकतो काय ?"
कीर्ती " जास्त वेळ नाही पण बोलू शकतो "
चिनू " बाय द वे तुझा आवाज एकदम खुश वाटतोय .. काय खास बात "
कीर्ती पटकन हसलीच ..
असे असतात हो मित्र आवाजावरून लगेच कळते कि समोरचा आनंदी आहे का दुखी आहे ते
चिनू " तुझा मुड एकदम भारी दिसतोय .. "
कीर्ती " हो .. ह्यांनीं मला सरप्राईझ म्हणून ऑफिस मध्ये रेड रोझेस चा बुके पाठवलाय .. कसे रिऍक्ट करू तेच कळत नाहीये "
चिनू : सो स्वीट .. हाऊ रोमँटिक "
कीर्ती " आता मी काय करू .. तेच मला कळत नाहीये "
चिनू " अरे at लिस्ट थँक यु तरी बोललीस कि नाही .. "
कीर्ती " नाही रे .. आणि त्यांनी एवढे स्पेशल पाठवलंय तर मी पण काहीतरी स्पेशल करेन ना "
चिनू " ठीक आहे .. तू करशील छान मॅनेज मला माहितेय .. तू उगाच गैर समज होऊ नाही देणार .. "
कीर्ती " काय झालंय ? नक्की चिनू तू बोलशील तेव्हा कळे ल ना मला .. असे कोड्यात नको बोलूस "
चिनू " मला काहीच कळत नाहीये .. मी नक्की कसा वागू ? काय करू ?"
कीर्ती " ईशाला कॉल कर .. "

चिनू " पण मीच का ? मीच का नेहमी माघार घायची .. आता या वेळी तर माझी चूक पण नाहीये.. "
कीर्ती " मग नकोय का तुला ती ? विसरू शकणार आहेस का तिला ?"
चिनू " नाही ना .. आणि याचाच मला जास्त त्रास होतोय .. आय एम सफरींग एव्हरी मिनिट .. आणि ती ला त्याचे काहीही नाहीये "
कीर्ती " ठीक आहे .. मी एकदा कॉल करते तिला आणि विचारते .. नक्की तिचे काय म्हणणे आहे ते .. मग आपण बोलू "
चिनू " नको नको .. तिला वाटेल मीच तुला तिच्या बद्दल वाईट सांगितले "
कीर्ती " अरे पण अशाने मॅटर सॉल्व कसा होणार .. बोलायला तर लागेलच ना .. एकतर तू बोल नहितर मी बोलते .. मग बघू पुढे काय करायचं ते "
चिनू "सॉरी कीर्ती तुला मी त्रास देतोय ना ..तुझे आताच नवीन लग्न झालय आणि हे सगळे तुला .. "
कीर्ती " अरे मित्रांना कोणी सॉरी बोलते का ?" अरे अशावेळी नाही तर कधी कामी येणार आपण एकमेकांना "
चिनू " चल बाय , बोलू संध्याकाळी "
कीर्ती " अरे हो... आज सांध्याकाळी आम्ही मूवी ला जातोय .. "
चिनू " अरे वाह .. ग्रेट .. एन्जॉय डिअर .. आणि एक श्लोक इज व्हेरी नाईस पर्सन .."
कीर्ती काहीच बोलत नाही .. आज काय लाली लावायलाच नको होती .. आज आपोआप ब्लश चढत होता .. श्लोक चे नाव ऐकूनच तिच्या पोटात गोळा आला होता ..
©सौ. शीतल महेश माने

सदर कथामालिकेचा रोज एक भाग पब्लिश होणार , दररोज दुपारी ४ वाजता.वाचनाच्या उत्कृष्ट अनुभवासाठी आजच ईरा app download करा

🎭 Series Post

View all