स्विकार भाग 47

Story Of Newly Married Couple


स्विकार भाग ४७
क्रमश : भाग ४६
कीर्ती " प्लिज नको ना जाऊस .. दूर "
श्लोक " अग .. बाहेर सगळे वाट बघत आहेत .. चल बघू "
कीर्ती " मी ...किस... करू का तुला ? तुला आवडेल का ?"
श्लोक " अरे यार कीर्ती . मी जातोय बाहेर .. तू ये मागून .. "आणि तो ताडकन उठला बेड वरून आणि वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन निघाला पण
श्लोक " चल ना.. अस तुला एकटीला सोडून नको वाटतंय मला जायला बाहेर "
कीर्ती उठली आणि वॉशरूम मध्ये धावतच गेली आणि फ्रेश होऊन बाहेर आली ."
कीर्ती " चल .. " आणि सॅन्डल घालू लागली
श्लोक ने तिला कमरेत हात घालून जवळ ओढली आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकी फुक मारली .. तसे तिने डोळे घट्ट मिटले .. श्लोक ने जवळ जात हळूच तिला किस केले .. दे लॉस्ट इन द मोमेन्ट ...
पाच एक मिनिटांनी श्लोक " ओपन युअर आईज .. एमटी युअर हेड .. आपण दोघे लिगली हजबंड अँड वाईफ आहोत .. नको त्या विचारात फसू नकोस .. मी थांबलोय कारण मला तू मना पासून माझी झालेली पाहिजेस .. आणि रोज असे बक्षीस मिळणार असेल तर मी रोज एक गाणे म्हणून दाखवायला तयार आहे " हसू लागला
कीर्ती पटकन उलटी फिरली आणि दोन्ही हाताने चेहरा झाकला
श्लोक " जायचंय का बाहेर ? का अजून काही ... "
कीर्ती " काय रे .. गप ना "
श्लोक " आता मला रोज इथलाच किस पाहिजे .. काय ? गालावर किस करायला काय मी लहान बेबी आहे ?"
दोघांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती आणि आनंद पण .. मस्त हातात हात घालून बाहेर खुशीत आले ..
रिचर्ड " अरे काय रे .. तुम्हा दोघांना काय लाज शरम आहे कि नाही .. आम्ही सगळे इथे बसलोय आणि तुम्ही दोघे आत गेलात .. "
श्लोक " शट अप रिचर्ड .. ती जरा लो फील करत होती म्हणून गेलेलो "
ईशा " हो का ? मग आता काय जादू केली ? मॅडम चा चेहरा एकदम खुललाय "
कीर्ती " गप ग ईशा .. काही पण बोलते .. "
विकी " आता कीर्ती गाणे म्हण .. डिनर इज रेड़ी .. आपल्याला जेवायला जायचंय "
कीर्ती " मग राहू दे ना .. मी नंतर कधी तरी म्हणेल "
सर्वजण " नाही .. आम्हाला तुझे गाणे ऐकायचंय .. "
कीर्ती " ठीक आहे .. "
ति कोणते गाणे म्हणणार आहे ते श्लोक ला सांगितले तर तो खूपच खुश झाला
श्लोक " सीरिअली .. इझ इट युअर फेव्हरेट सॉंग "
कीर्ती " खूपच ... मी कॉलेज मध्ये असताना हे स्टेज वर म्हटले होते "
श्लोक " आय कान्ट बिलिव्ह .. मी पण ह्या गाण्यावर गिटार वाजवली होती .. आणि म्हटले होते
कीर्ती " मग तू पण म्हण ना माझ्या बरोबर "
श्लोक .. " ठीक आहे .. तू सुरु कर.. "
ल ला ला ल ल ला..
तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा
तू है जहाँ,मैं हूँ वहाँ
अब तो ये जीना, तेरे बिन है सज़ा
हो मिल जाएँ इस तरह, दो लहरें जिस तरह
हो मिल जाएँ इस तरह, दो लहरें जिस तरह
फिर हो न जुदा, हाँ ये वादा रहा
ल ला ला ल ल ला

मैं आवाज़ हूँ तो, तू है गीत मेरा
जहां से निराला मनमीत मेरा
मिल जाएँ इस तरह,
दो लहरें जिस तरह
हो मिल जाएँ इस तरह,
दो लहरें जिस तरह
फिर हो न जुदा, हाँ ये वादा रहा
श्लोक तिच्या बाजूला उभा राहिला आणि तिच्या कडे बघत
श्लोक
किसी मोड़ पे भी ना, ये साथ टूटे
मेरे हाथ से तेरा, दामन न छूटे
कीर्ती
ल ला ला ल ल ला
कभी ख्वाब में भी तू मुझसे न रूठे
मेरे प्यार की कोई खुशियाँ न लूटे
श्लोक
मिल जाएँ इस तरह, दो लहरें जिस तरह हो मिल जाएँ इस तरह,
दो लहरें जिस तरह
फिर हो ना जुदा, हाँ ये वादा रहा
तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा
तू है जहाँ, मैं हूँ वहाँ अब तो ये जीना,
तेरे बिन है सज़ा
कीर्ती
तुझे मैं जहां की नज़र से चुरा लूँ
कहीं दिल के कोने में तुझको छुपा लूँ
श्लोक
कभी ज़िंदगी में पड़े मुश्किलें तो
मुझे तू संभाले, तुझे मैं संभालूँ हो
कीर्ती
मिल जाएँ इस तरह, दो लहरें जिस तरह हो
मिल जाएँ इस तरह, दो लहरें जिस तरह
फिर हो न जुदा, हाँ ये वादा रहा
doghe
तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा तू है जहाँ,
मैं हूँ वहाँ अब तो ये जीना, तेरे बिन है सज़ा हो
ल ल ला ला ला
फिर हो न जुदा, हाँ ये वादा रहा ये वादा रहा

https://www.youtube.com/watch?v=hjfzFVw2Zjo
श्लोक तिच्याकडे एक टक बघत होता आणि ती पण त्याच्याकडे एकटक बघत होती .. गाणे सम्पले तर सगळे टाळ्या वाजवू लागले
आणि सर्वानी दोघांना चारी बाजूने घेरलं .. विकी आणि रिचर्ड ने तर श्लोक ला खांद्यावर उचलूनच घेतले
रिचर्ड " माझ्या आयुष्यात जर मी कोणते चांगले काम केले असले ना तर ते मी श्लोक ला फ्रेंड बनवला .. आय जस्ट लव्ह टू लिस्टन युअर सॉंग्स "
विकी " श्लोक .. नुसता तूच नाही रे .. तुझी बायको पण भारी आहे .. हे बघ .. लिटरली गुज बम्प्स आलेत मला " कीर्ती आणि श्लोक दोघे एकमेकां कडे बघत होते .. आजचा दिवस दोघांना स्पेशल झाला होता .. आज एक मिनिट पण दुरावा सहन होत नव्हता .. दोघांनाही असे वाटतं होते कि आपल्या हट मध्ये जाऊन एकमेकांच्या सहवासात बसावे..
अर्पिता " कीर्ती किती वर्षांनी तुझे गाणे ऐकले .. यार तुम्ही दोघे एकदम म्युसिकल आहात .. कुठून शोधलास एवढा परफेक्ट हजबंड "
विभा " हो ना .. कीर्ती .. सॉरी हा पण खूपच रोमँटिक आणि हँडसम आहे ग तुझा नवरा .. "
ईशा " ए विभा ... अर्णव दादांनी ऐकलं ना तर तुझे काही खरं नाही ?"
विभा " काही नाही ग .. तो फक्त चार भिंतीच्या आतच रोमँटिक होतो .. त्याला सांगावे लागेल .. जरा शिक श्लोक कडून काहीतरी "
अर्पिता " आमच्या कडे तर गाण्याची ऍलर्जी आहे जणू .. विजय ला बोअर होते .. गाणी ऐकायला "
कीर्ती " रोमँटिक वगैरे नाही ग .. फक्त एकच आहे कि गाणी ऐकायला आणि म्हणायला दोघांना आवडतात
सगळ्या जणी सेल्फीज घेत होत्या ..
चिनू " ए कीर्ती .. एक नंबर गाणे म्हणलेस ग "
श्लोक " चिनू .. आणि माझे कसे वाटले तुला ? "
चिनू " तुम्ही काय बुवा .. आम्हांला नवरा म्हणून वेगळाच आदर्श घालून देताय .. आमच्या बायका बघा कशा आमच्याकडे बघताय .. " खाऊ कि गिळू " आज रात्रीचे पण वांदे करून टाकले तुम्ही "
तसे सगळे हसायला लागले
मॉमी " आज काही खर नाही बुवा .. रोमान्स इज इन द एअर .. मी उगाच आले तुमच्यात .. "
माया " हो ना यार .. मला पण संजू ची खूप आठवण येतेय .. काश कि मी त्याला पण बोलावले असते "
मॉमी " अरे यार तुला आठवण काढायला तुझा बॉयफ्रेंड तरी आहे .. माझ्या कडे तो पण नाहीये "
दोघे एकमेकांकडे बघून खुश होते कि बघायलाच नको
श्लोक कानातच " मग तिकिट्स बुक करू का ?"
कीर्ती ने मान नकारार्थी हलवली .. श्लोक पुन्हा कानात " मला झुलवतेस का ?" हसतच
कीर्ती " नाही .. मी प्रेम करायला शिकतेय .. तुझ्या सारखं "
मग रात्री सगळ्यांनी मिळून गप्पा मारत डिनर केले. सगळ्या मित्र मैत्रिणींची मैफिल छान रंगली .. सगळे आठवणींत हरवले .. कितीही आठवणि काढल्या तरी प्रिया चा विषय कोणत्याही आठवणींत निघणार नाही असे सर्व फ्रेडन्स बघत होते .. कीर्ती आज श्लोक मय झाली होती .. एवढ्या सगळ्या गडबडीत पण ती तो काय जेवतोय .. पोळ्या खाल्ल्या कि नाही असे सगळ्याकडे लक्ष होते तिचे .
जेवण झाल्यावर सगळे डायनिंग मध्ये गप्पा मारत बसले होते .. तेवढ्यात श्लोक ला कोणाचा तरी कॉल आला होता .. आणि तो फोनवर बोलत होता .. बोलता बोलता त्याचे लक्ष कीर्तीवर होते आणि कीर्ती पण मैत्रिणींच्यात बसली होती तरी त्याच्या कडे बघत होती ..फोन वर बोलता बोलताच दोघांची नजरा नजर झाली तसे त्यांने ओठांचा पाऊट करून तिला फ्लायिंग किस पाठवला.. आज बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत होता .. असे काहीतरी त्याने पहिल्यांदाच केले होते .. आणि तेही कॉल वर असताना म्हणजे जरा अतीच होते कारण नेहमी कोर्टाच्या केस बद्दल बोलत असला कि तो अजिबात तिच्या कडे बघायचा पण नाही .. त्याची अशी ऍक्शन पाहून तिला धस्सच झाले आणि उगाचच तिने आजू बाजूला बघितले कि कोणी हे पहिले तर नसेल ना .. आणि डोळ्यांनीच त्याला गोड हावभाव करून झापत होती ..
डिनर आणि खूप साऱ्या फोटोस काढून छान मेमरीज तयार करून मग उद्या सकाळी सर्व जण क्रिकेट खेळायचे आहे तर शार्प आठ वाजता ब्रेकफास्ट करून तयार रहा असे ठरवून आपापल्या रूम मध्ये गेले ..
कीर्ती खूप खुश दिसत होती .. हळू हळू तिच्या विश्वातून बाहेर पडून श्लोक बरोबर मोकळी होत होती .. पहिल्यांदा तो वॉशरूम मध्ये असला कि बाहेर बसून राहायची आता तो जरी वॉश बेसिन जवळ असला तरी स्वतःचा फेस वॉश करून यायची .. श्लोक ला पण हे जाणवायचे आणि मनोमन खुश होयचा ..
एक प्रिया होती जी कि त्याच्या परवानगी ची तिला काहीच पर्वा नसायची .. जेव्हा तेव्हा त्याच्या खांद्यावर हात टाकून .. मांडीवर बसून .. गालावर किशी देऊन मोकळी होयची .. दिवसातून शंभरदा लव यु .. मिस यु म्हणायची आणि एक कीर्ती जी कि तिचा त्याला स्पर्श कसा कमी होईल .. ते बघायची पण प्रेम मात्र करायची .. प्रिया बरोबर त्याला संयम ठेवावा लागत होता आणि कीर्ती सोबत त्याला पुढाकार घ्यावा लागत होता ..
त्याला आधी वाटत होते कि मी कीर्ती चा मनापासून स्विकार करू शकेन कि नाही .. पण आता असे झाले कि कीर्ती त्याचा स्विकार करेल कि नाही? कितिही सगळे चांगले असले तरी कीर्ती च्या मनात प्रियाचे ते स्टेटमेंट असल्यामुळे तिची ईच्छा असून ती पूर्णतः श्लोक चा स्विकार करत नव्हती .
श्लोक " तू खुश आहेस ?"
कीर्ती हाताला लोशन लावता लावता
कीर्ती " तू ना .. दर १५ दिवसांनी मला हा प्रश्न विचारतोस ? आणि चेक करतोस कि मी खुश आहे कि नाही असे का ?" आणि हसली
श्लोक " तू खुश असावीस असे मला वाटते .. आणि तेच जास्त महत्वाचे आहे माझ्यासाठी "
कीर्ती " मी खूप खूप खूप खुश आहे "
श्लोक "थँक यु " आणि त्याने तिचे गाल ओढले ..
कीर्ती " तू खुश आहेस का माझ्या बरोबर ?"
श्लोक " उम्म्म ... उम्म्म... "
कीर्ती " एवढा वेळ उत्तर दयायला ? ..
श्लोक " तू ना मला ना खूप त्रास देतेस .. कोर्टातल्या केस पेक्षा कठीण सिचवेशन मध्ये असतो मी तुझ्या बरोबर " हसतच म्हणाला
कीर्ती " हा हा हा .. सो फनी !! "
श्लोक ने तिच्याच हातातले लोशन तिच्या नाकाला लावले .. कीर्ती ने पटकन हाताने पुसले आणि एक थेम्ब त्याच्या नाकाला लावले.. तर श्लोक ने तिचा हात पकडला आणि त्याचे नाक तिच्या गालाला लावून त्याच्या नाकाचे लोशन तिच्या गालाला लावले ..
कीर्ती " नको ना .. श्लोक "
श्लोक ने तिच्या मांडीवर डोके ठेवले .. कीर्ती त्याच्या डोक्यातून हात फिरवू लागली .. त्याचे डोळे लगेच जड झाले ..
श्लोक " खूप रिलॅक्स होतंय .. "
दोघे एकमेकांच्या कुशीत झोपू लागले .. श्लोक चे डोळे झोपेने भरले होते
कीर्ती ने त्याच्या कपाळावर हात फिरवला
कीर्ती " श्लोक .. "
श्लोक " उम्म्म .. " डोळे मिटूनच
कीर्ती " श्लोक .. थँक यु .. फॉर मेकिंग माय लाईफ हैप्पी .. किती तरी वर्षांनी मी आज खूप छान हसले .. खूप छान वाटतं होते मला "
श्लोक " हमम ... डिअर .. आय एम फिलिंग सो स्लीपी .. आय एम अल्सो हैप्पी विथ यु डिअर " आणि तिला कुशीत घेऊन झोपला .. त्याच्या कडे बघत बघत ती पण झोपली "

🎭 Series Post

View all