स्विकार भाग 44

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग ४४
क्रमश : भाग ४३

चिनू " नाही ग .. जरा डाएट करतोय .. खाऊन खाऊन खूप मस्ती आलीय असे कोणीतरी मला बोलले होते आता तीच मस्ती जरा जिरवतोय "
(पुढे)
श्लोक आणि कीर्ती हळूच हसत होते
चिनू " बरं बोल .. कशाला बोलावलेस .. सकाळी सकाळी "
कीर्ती " अरे तुझी एक बॅग राहिलीय त्या रूम मध्ये .. बहुदा काहीतरी इम्पॉर्टन्ट असावे त्यात म्हणून तुला बोलावले .. म्हटले तू शोधत असशील "
चिनू " कुठे आहे .. दे मग जातो घेऊन "
कीर्ती " ते बघ त्या रूम मध्ये आत मध्ये आहे .. घेशील तेवढी .. "
चिनू त्या रूम मध्ये चालत गेला .. बराच वेळ आतून आवाज येत नव्हता .. कसलाच ...
कीर्ती बाहेरून " काय रे .. मिळालं का सामान .. "
चिनू रडतच बाहेर आला
चिनू " हिला सांग जायला .. माझ्या आयुष्यातून पण जा सांग तिला .. मला नाही तिची नाटकं बघायची .. "
ईशा रागातच बाहेर आली " तुझ्या तर आता .. हि नाटकं वाटतात .. तुझ्या साठी मी इतकी बदलतेय तर तुला नाटकं वाटतात .. "
चिनू " नाटकं नाही तर काय ? आता डिवोर्स झालाय ना आपला .. मग कशाला हि माझ्या साठी म्हणून नाटकं करतेय ... यु आर फ्री "
ईशा "कीर्ती , बघितलेस किती तोडून बोलतोय ते .. आणि ती रागातच रुम मध्ये गेली आणि रडू लागली
कीर्ती " चिनू , काय चाललंय तुझे .. रबर इतका पण ताणू नये कि तुटून जाईल .. तुझ्या साठी ती आतून बाहेरून बदललीय .. तुझ्या लक्षात नाही येत आहे का ? आता जर पूर्वीची इशा असती ना तर एव्हाना तू बेड वरआडवा असतास आणि ती तुझ्या उरावर बसून तुला मारत असती .. आज चक्क रडतेय ती .. मला म्हणाली .. माझा जीव कासावीस झालाय .. मला त्याला एकदा पहायचंय .. तुझ्या ओढीने ती इथे आलीय आणि तू असा वागतोय तिच्याशी "
श्लोक " चिनू , कीर्ती ठीक बोलतेय .. कितीही भांडलात तरी तुम्ही दोघे एकमेकांवर किती प्रेम करताय हे दिसतंय आम्हाला डोळ्यांना .. "
चिनू तसाच धावत रूम मध्ये गेला .. आणि रूम लावून घेतली .. पाच एक मिनिटांनी जोरात आवाज येऊ लागला
ईशा " नालायक .. मला किस करायची तुझी हिम्मत कशी झाली .. सोड मला .. हात नको लावू .. "
चिनू " ए गप ए .. एकदम गप्प बसायचं .. माझी बरीच वसुली राहिलीय ती आधी मला पूर्ण करू दे .. मग बाकीचे बघू काय ते "
बाहेर श्लोक आणि कीर्ती हसायला लागले ..
कीर्ती बँकेत जाण्यासाठी तयार होत होती .. श्लोक ब्लेझर घालत होता
श्लोक कीर्ती च्या जवळ गेला .. " कीर्ती , आर यु शुअर .. अजूनही तुला आपले नातं पुढे न्यावसे नाही वाटत आहे का ?"
कीर्ती ने मागे वळून त्याला एक घट्ट मिठी मारली
श्लोक ने तिच्या चेहऱ्यावरचे केस मागे घेतले .तर तिने डोळे मिटले होते तिच्या हृदयातील धडधड त्याला जाणवत होती .. डोळ्यातून पाणी ओघळले ..
कीर्ती " तुला काय सांगू श्लोक .. तुझ्या पासून असे लांब राहणे माझ्या साठी किती कठीण आहे ते .. मला भीती वाटते कि माझे मन कधी कमजोर पडेल कि काय आणि मी माझ्या मर्यादा ओलांडून जाईन कि काय?"
श्लोक " काही गरज नाहीये याची .. मी तुला आधी पण बोललोय पण तू प्रियाचे डायरीतले लिहलेलंच डोक्यात घेऊन बसली आहेस "
कीर्ती " हो ना .. श्लोक .. माझा आत्मा मला ते विसरूनच देत नाहीये .... सॉरी श्लोक .. तुझ्या वर पण एक प्रकारे अन्यायच करतेय ना मी "
श्लोक ने तिला घट्ट मिठीत घेतले .. तू अशी जवळ रहा फक्त बाकी काही नको मला .. आणि त्याने तिच्या कपाळावर .. गालावर .. मानेवर किस केले ..
तिच्या दृष्टीने तीच पण बरोबर होते .. प्रियाने त्याच्याबरोबर लग्न करण्याची स्वप्न बघितली होती .. त्याने कोणाला तिचे स्थान देऊ नये असे तिने डायरीत लिहले होते आणि या हि पलीकडे .. त्या एक क्षणाला श्लोक च्या तोंडून आलेले प्रियाचे नाव .. त्यामुळे तो क्षण पुन्हा फेस करण्याची हिम्मतच तिच्यात राहिली नव्हती .. कुठेतरी खोल त्याच्याही मनात तेच गिल्ट आहे
श्लोक " ठीक आहे .. चल निघायचं .. मला मिटिंग आहे आता एक "
कीर्ती ने त्याला हसून बाय केले
कीर्ती बाहेरूनच " ईशा .. मी आणि श्लोक जातोय .. जेवण केलेलं आहे तेवढं भूक लागली कि जेवून घ्या "
ईशा " हो .. ग डार्लिंग .. संध्याकळी भेटू .. "
दोघे त्यांच्या ऑफिस ला निघून गेले
चिनू आणि ईशाचा वाद मिटला होता आणि आता दोघे आनंदी होते .. श्लोक ला पण जरा चेंज पाहिजे होता .. त्याने सर्व मित्रां बरोबर कुणीकडे तरी ट्रिप ला जायचा प्लॅन करायला सुरुवात केली
रिचर्ड , विकी , माया , नेहा , मोमी सगळे तयार झाले .. चिनू आणि इशा पण तयार झाले .. चीनूचा भाऊ अर्णव आणि त्याची बायको विभा म्हणजे कीर्तीची बेस्ट फ्रेंड त्यांना पण बोलावले .. श्लोक ने ईशा काढून माहिती काढून अर्पिताचा कॉन्टक्ट मिळवला आणि तिला पण बोलावून घेतले..
मस्त एक हट स्टाईल वाले रिसॉर्ट बुक केले . प्रत्येक कपल ला एक हट आणि सिंगल लोकांना दोघात एक अशी अरेंजमेंट केली .. कीर्ती पण ट्रिप ला जायला खूप एक्सायटेड झाली होती ..
यावेळी पॅकिंग करताना तिनेच स्वतःहून वेस्टर्न .. काही शॉर्ट कपडे बॅगेत भरले .. वन पीस , शॉर्ट पँट्स , फॅशनेबल क्लोथ्स . मॅडम एकदम रेडी
श्लोक ने त्याचे पॅकिंग केले .. खेळायचे सामान , क्रिकेटचे किट , गिटार , बॅडमिंटन असे सगळे सामान पण बरोबर घेतले .. आणि ट्रिप ची जोरदार तयारी झाली ..
श्लोक च्या गाडीत ईशा आणि चिनू आले .. रिचर्ड च्या गाडीत .. माया आणि मॉमी आले आणि अर्णव विभा डायरेक्ट तिकडं येणार होते ..
अर्पिता येते कि नाही त्या बद्दल जरा शंकाच होती कारण तशी ती कोणाशीच फारशी कॉन्टक्ट मध्ये राहिली नव्हती आणि ती दुबईत राहत होती.
श्लोक ने तिच्या नावाची हट बुक करून ठेवली होती .. नाहीच आली तर कॅन्सल करायची म्हणून
गेल्या गेल्या आधी रूम वर गेले सर्व जण .. फ्रेश झाले .. मग बाहेर लॉन वर आले .. सगळे गप्पा मारायला सर्कल करून गप्पा मारायला बसले .. नवीन लोकांशी ओळख होत होती .. कोण कोण संसारात कसे बीझी आहे .. काय करतंय वगैरे अशा फॉर्मल गप्पा झाल्या .. कीर्ती खूप खुश दिसत होती .. विभा तिची जिवलग मैत्रीण .. आज किती तरी दिवसांनी तिला भेटली होती ..
श्लोक ने अर्णव ला आणि चिनू ला मना पासून धन्यवाद दिले .. त्यावेळी दोघांनी त्याच्या बायकोचा (कीर्तीचा )जीव वाचवला म्हणून . कीर्ती , इशा , विभा पुन्हा एकदा ते सर्व आठवून भावनाशील झाल्या . आता अर्पिताची सगळे वाट बघू लागले होते .. तर समोरून अर्पिता आणि तिचा नवरा विजय आले .. कीर्ती तर धावत जाऊन अर्पिताच्या गळ्यात च पडली .. ईशा विभा .. सगळ्याच आनंदल्या .
नेहा " श्लोक , कीर्ती ला बघितलेस .. किती खुश आहे ना ती .. हसताना कसली सुंदर दिसतेय "
श्लोक ने एक नजर कीर्ती वर टाकली .. तर कीर्ती ईशाला हसत हातावर टाळी देत होती .. पण डोळ्यांत पाणी तरळत होते तिच्या .. इतक्या वर्षांनी त्या चौघी जणी एकत्र आल्या होत्या
श्लोक "अग , या चौघी आणि चिनू शाळेत असल्या पासूनचे फ्रेंड्स आहेत .. ती अर्पिता आहे ना ती रुसली होती सर्वांवर आणि कॉन्टक्ट तोडला होता तिने कीर्ती बरोबर .. पण मी मुद्दामून तिला शोधून बोलावलंय .. आणि जुन्या मैत्रिणीला भेटायचा आनंद फार निराळाच आहे का?
माया " श्लोक , अरे हरवलास कि काय तिच्या हास्यात .. "
मॉमी "श्लोक यु आर लकी गाय .. कीर्ती खूप सेन्सिटिव्ह आहे .. बघ रुसलेली मैत्रीण भेटल्यावर आनंदाने रडतेय ती .. असे आनंदाचे अश्रू फार कमी जणांना येतात .. आय जस्ट लव्ह हर आईज
रिचर्ड " तिचे डोळे आणि तिच्या आय लॅशेस काही तरी वेगळ्या आहेत .. त्या बॅम्बी नावाच्या कार्टून मधल्या बेबी डिअर सारखे आहेत "
विकी " काय म श्लोक... मज्जा आहे बाबा एका मुलाची .. इतके गोड कोणी असते का ? कुठून शोधलीस रे हिला .. डायरेक्ट बायको करून घेऊन आलास "
श्लोक "अरे ए .. इथे फक्त माझ्या स्टोरी बद्दल बोलतोय का आपण .. तुमच्या लव्ह स्टोरी कधी पासून लटकताय त्या सोडवा कि लवकर .. "
तेवढयात कीर्ती आणि तिच्या मैत्रिणी ,चिनू , अर्णव आणि विजय हे लोक बसले होते तिथे आले आणि एकमेकांशी छान ओळख करून घेतली ..
श्लोक "स्पेशल थँक्स टू अर्पिता अँड विजय . ते दोघे खास माझ्या सांगण्या वरून दुबई वरून आलेत "
अर्पिता "थँक्स श्लोक .. तुझ्या मुळे मी माझ्या मैत्रिणींना भेटले .. आज खूप छान वाटतंय "
श्लोक "कीर्ती ला तुमची सर्वांची खूप आठवण येत होती .. विभा आणि अर्पिता ला ती बऱ्याच दिवसात भेटली नव्हती म्हणून हे गेट टुगेदर प्लॅन केले "
विकी "चला मग जरा फ्रेश होऊन येऊ इथे लॉन वर .. मग बसून गप्पा गोष्टी करू "
नेहा " कीर्ती मला तुला काहीतरी दाखवायचं आहे .. तू माझ्या बरोबर माझ्या रूम मध्ये येशील का जरा "
कीर्ती आणि नेहा दोघी जणी नेहाच्या हट मध्ये गेल्या
नेहाने तिच्या बॅगेतून एक डायरी काढली आणि तिला दिली .. तुला वेळ मिळाला कि हि वाच .. यात काही असे आहे कि जे श्लोक ला पण माहित नाहीये .. मी हे खरंतर आधीच दयायला पाहिजे होते सॉरी
कीर्ती " काय आहे ? कोणाचं आहे हे ?"
नेहा " हि प्रियाची डायरी .. ती गेली त्याच्या आदल्या दिवशी ती माझ्या घरी आलेली .. आम्ही दोघी पार्लर ला हेअर स्टाईल ठरवायला गेलो होतो .. श्लोक तेव्हा दिल्ली ला होता आणि २ दिवसन्नी प्रियाचा वाढ दिवस होता त्या दिवशी त्या दोघांची एंगेजमेंट करायचे ठरले होते .. श्लोक घरी नव्हता म्हणून प्रिया त्या रात्री माझ्या कडेच राहिली .. रोज डायरी लिहायची तिला सवय होती .. आणि हि डायरी ती माझ्या रुम मध्ये ड्रॉवर मध्ये विसरून गेली होती ..
मी तिला दुसऱ्या दिवशी देणार होते तर दिवस भर खूप बिझी होत्या मॅडम कारण श्लोक त्या दिवशी येणार होता दिल्ली वरून .. वेड्या सारखी आनंदात होती ती .. एंगेजमेंट , बर्थडे आणि श्लोक येणार म्हणून पाय जमिनीवर नव्हते तिचे ..
मी तिला फोन केला तर मला म्हणाली " रात्री श्लोक ला घेऊन तुझ्या कडे येईल .. डायरी घ्यायला"
आणि रात्री ती तर नाही पण ती चा ऍक्सीडेन्ट झाल्याची न्युज आली .. आणि ती गाडी चालवत असताना काका काकू मागे होते तर तेही होते त्याच गाडीत .. इतका मेजर ऍक्सीडेन्ट झाला होता .. गाडीतून बाहेर काढे पर्यंत कोणच जिवंत राहिले नाही
नेहा ने एक हुंदका भरला ,, आणि कीर्ती एकदम शांत झाली होती

🎭 Series Post

View all