स्विकार भाग 43

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग ४३
क्रमश : भाग ४२
घरी आई बाबा आल्या मुळे कीर्ती खूप खुश होती
आज सर्व जण मॉल ला फिरायला आले होते .. श्लोक ने सिनेमाची टिकेट्स , शॉपिंग , पिझ्झा बर्गर सगळं सगळे त्यांना आनंदात करत होता .. असेच बोलत रस्त्यावर चालत होते तर रस्ता क्रॉस करायचा होता तर श्लोक आई बाबांना घेऊन पुढे गेला होता आणि कीर्ती मागे राहिली .. आई बाबांच्या गडबडीत तो लिटरली तिला विसरला .. ..
आई बाबांना हॉटेल मधल्या एका चेअर वर बसवून त्यांच्या हातात बॅग्स देता असताना त्याला कीर्ती एकटी रोड क्रॉस करू शकत नाही हे आठवले आणि तो वाऱ्याच्या वेगाने हॉटेल च्या बाहेर धावत आला .. तर समोर कीर्ती मोबाईल वर बोलत बोलत प्रॉपर रस्ता क्रॉस करून चालत येत होती .. ती स्वतः तिच्या विचारात इतकी बिझी होती कि तिला सुद्धा कळले नाही कि ती इतक्या आरामात रोड क्रॉस करतेय .. आणि बोलता बोलता श्लोक च्या शेजारी येऊन उभी राहिली
श्लोक तिच्या कडे आवासून बघत होता आणि हि त्याला खुणेने विचारत होती कि काय झाले
श्लोकला मनातून इतका आनंद झाला होता .. त्याने तिथेच तिला मिठीत घेतले .. आणि गालावर किस केले ..
तिने फोन कट केला .. " काय हे श्लोक .. हे काय ? रस्त्यात "
श्लोक " कीर्ती ... माय डार्लिंग ... यु युअरसेल्फ जस्ट क्रॉस द रोड "
कीर्ती " ओह माय गॉड .. श्लोक .. मला कळले पण नाही " आणि तिने पण त्याला घट्ट मिठी मारली .. तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागले .. "कसे काय झाले हे श्लोक ? इट्स बिकॉज ऑफ यु .... आय नो इट्स बेकॉझ ऑफ यु "
श्लोक " आय लव्ह यु .. लेट्स सेलेब्रेट .. आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला ..
खूप आनंद .. खूप आनंद काय असतो ते आता दोघांनाच माहित .. सर्व चांगले होत होते ..
श्लोक ने डॉक्टरांना फोन करून सांगितले कि काय झाले
डॉक्टर " ते काय आहे न मिस्टर श्लोक .. त्या एकट्या आहेत हि भीती त्यांच्या मनात बसली होती .. कदाचित आता तुम्ही त्यांच्या बरोबर सदैव आहेत याचा विश्वास त्यांच्या मनाला बसला असेल .. स्वतःवरचा तुमच्या बरोबर असण्या वरचा विश्वास वाढल्यामुळे आणि संमोहन मध्ये माझ्या एक ल क्षा त आले कि त्यांच्या बरोबर घडलेला प्रकार आणि त्या वेळेची त्यांची मानसिक स्थिती त्यांनी कुणा बरोबर शेअर केलीच नव्हती आणि त्यामुळे त्या आतल्या आत कुढत होत्या .. घाबरत होत्या .. शिवाय माझ्या पिल्स पण त्यांना उपयोगी पडल्या .. तरी पण अजून २ महिने काळजी घ्या अचानक एकटे सोडू नका .. आता त्या एकट्याने जायचा प्रयास करतील आणि पुन्हा काहीतरी निमित्ताने भीती वाटली तर पुन्हा घाबरतील .. "
श्लोक " हो नक्कीच .. मी आहेच काळजी घ्यायला .. थँक यु डॉक्टर "
उद्या पूजा होती .. कीर्तीची आई एकेक सामान काढून ठेवायला सांगत होती .. भटजीला लागणारे सामान बाजूला काढून ठेवले .... श्लोक ने पूर्ण घराला झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवले .. थोडी लाइटिंग पण लावली .. बाबांनी केळीचे खांब दाराला लावून घेतले .. जेवणाच्या ऑर्डर्स गेल्या .. सर्वांना आमंत्रण गेली .. खूप छान वातावरण आणि पॉसिटीव्हिटी चे वलय घरात तयार झाले होते ..
भल्या पहाटे उठून कीर्ती ने घरा पुढे मोठी रांगोळी काढली .. नववारी साडी घातली .. सर्व लग्नातले ट्रॅडिशनल दागिने घातले .. श्लोक ने पण शेरवानी घातली .. हातात ब्रेसलेट , गळ्यात चेन एकदम .. क्लीन शेव .. मस्त दिसत होता ..
बोल बोलता भटजी घरात आले .. भटजींनी पूजा मांडली .. घरातील मोठ्यांना नमस्कार करायला सांगितला तसा कीर्तीच्या आई बाबांना दोघांनी वाकून नमस्कार केला आणि पुन्हा पूजे ला बसायला जाणार तर कीर्तीने त्याला त्याच्या रुम मध्ये नेले आणि आई बाबांच्या फोटो ला नमस्कार करायला सांगितले .दोघे एक मिनिट शांत पणे फोटो कडे बघत बसले .. भरल्या डोळ्यांनी खाली आले आणि प्रसन्न मनाने पूजेला बसले ..
एक दीड तास पूजा चालू होती .. घ रा त एकेक पाहुणे यायला लागले .. श्लोक चे फ्रेंड्स . चिनू .. श्लोक च्या ऑफिस मधला स्टाफ , गावावरून पण कोण कोन आले .. श्लोक च्या बाबांचे मित्र .. सर्व जण येऊ लागले .. पूजा झाल्यावर सर्वांना चहा पाणी दिले आणि मग लगेच लग्नाचा गोंधळ घालायला सुरुवात झाली .. श्लोक ला हे सर्व नाविनच होते पण तो सर्व आनंदात करत होता .. दोघेही एकमेकांना आनंदात बघत होते .. समाधानी होते... आहे त्या नात्यात .. कसलीच कमतरता भासत नव्हती ..
मग जेवण.. गिफ्टस देणे घेणे झाले आणि सर्व जण फोटो काढून जाऊ लागले .. एकेक करून सर्व जण निघून गेले .. आई बाबा पण आशीर्वाद देऊन निघून गेले ..
श्लोक " कीर्ती , पूजा झाली खूप छान वाटतंय ना "
कीर्ती " हो ना .. मन प्रसन्न झाले .. खूप रिलॅक्स वाटतंय "
श्लोक " हो ना .. घरी सांगायला कोणच नव्हते .. मला काहीच माहित नव्हते अशी काही पूजा करायची असते ,, तुझ्या आई बाबांनी सां गि तले ते बरे झाले नाही का "
कीर्ती " हमम .. "
श्लोक " कीर्ती नववारी साडीत एकदम मस्त दिसत होतीस आज .. मला सगळेच सांगत होते कि कीर्ती किती खूप सुंदर दिसतेय म्हणून "
कीर्ती " हो ना .. थँक यु .. आणि तू पण काही कमी दिसत नव्हतास .. मस्त एकदम .. माझ्या बँकेतल्या मैत्रणी एकदम फिदा झाल्या होत्या तुझ्यावर .. थांब हा आलेच असे म्हणत तिने लिटरली त्याची नजर काढून टाकली ..
श्लोक " हे काय करतेय ?"
कीर्ती " तुझी नजर काढतेय .. माझ्या चिकण्या नवऱ्याला कोणाची नजर नको लागायला "
श्लोक " ओये .. चिकणा ना .. "
कीर्ती " मग काय .. हँडसम हंक "
श्लोक " अरे वाह आज काही खरं नाही बुवा .. बायकोच्या तोंडातून माझी स्तुती ऐकायचा दिवस आहे .. "
कीर्ती " मग तू आहेच तसा .. तुझ्या बरोबर मी खूप खूप खूप खुश आहे .. "असे म्हणून तिने त्याच्या खांद्यातून गळ्यात हात टाकून .. टाचा वर करून कपाळावर किस केले .
श्लोक " स्वीट हार्ट .. तुझ्या मुळे मी आनंदात आहे .. तुझ्या मुळे मी माझे दुःख विसरलोय .. माझा एकटेपणा .. माझी घुसमट संपलीय .. तू असल्याने मला जगायला काहीतरी कारण मिळाले .. " त्याने तिच्या कपाळावर कपाळ लावले .. आणि दोन्ही हाताने हलकेच तिला उचलून घेतले
कीर्ती " मी पण खूप एकटी होते रे .. माझ्या फोबिया मुळे माझे लग्न होईल अशी आशाच मी सोडून दिली होती "
श्लोक " हम भी अकेले तुम भी अकेले .. मजा आ रहा है कसम से "
https://www.youtube.com/watch?v=dEDPrOoHA0E&ab_channel=LyRicalWoRld
I feel love..
When I look into your eyes
I believe..
If you move out from my sight
I’ll be losing, I’ll be losing..
Grip on you, Grip on you..
देखो करीब से
मिले हैं नसीब से
आएगा पल ये फिर कहाँ
आज अचानक तुमसे मिले हम
ये तो नहीं है बेवजह
पुछो ज़रा इस दिल से
हम हैं मिले मुश्किल से
कल फिर ना हम जो यहाँ
गज़ब का है दिन सोचो ज़रा
ये दीवानापन देखो ज़रा
तुम हो अकेले हम भी अकेले
मज़ा आ रहा है कसम से.. कसम से..

अल्फाज़ क्या कहूं मैं
बेचैन सी रहूँ मैं
तू बिन कहे ये हाल जान ले
मौसम मोहब्बतों के
लम्हे ये चाहतों के
अपने लिए बने हैं मान ले
फिर क्यूँ फासला मैं कहाँ और तुम कहाँ
गज़ब का है दिन सोचो ज़रा
ये दीवानापन देखो ज़रा
तुम हो अकेले हम भी अकेले
मज़ा आ रहा है कसम से, कसम से
बराच वेळ दोघे एकमेकांच्या सानिध्यात बसले ... आणि एकमेकां पासून पॉसिटीव्ह एनर्जी घेत होते ..
श्लोक " थँक यु .. फॉर बीइंग सो रिअल विथ मी .. थँक यु फॉर टेकिंग केअर ऑफ मी .. थँक यु फॉर स्टेइंग विथ मी .. थँक्स फॉर ऍक्सेप्टइंग मी विथ माय पास्ट "
कीर्ती " थँक्स फॉर ऍक्सेप्टइंग व्हिलेज गर्ल लाइक मी .. थँक्स फॉर एक्सपेंटिंग मी विथ माय फोबिया .. थँक्स फॉर अंडरस्टॅण्डिंग माय फिलीन्ग्स "
मग असेच पुन्हा बरेच दिवस गेले मध्ये .. रुटीन .. खूप छान चालले होते
इकडे चिनू ने स्वतःला कामात झोकून दिले होते .. स्वतःच्या घरी जात नव्हता .. का कीर्तीला भेटायला येत नव्हता .. ईशा चा तर फोनच घेत नव्हता .. पक्का देवदास झाला होता .. ईशा ने सासू बाईंना चांगलंच पटवले होते .. हल्ली मॅडम घरात कधी कधी साडी घालू लागल्या होत्या .. प्रॉपर कानात , गळ्यात मंगळसूत्र घालून त्यांच्या बरोबर बाजारात जाऊ लागली .. केस काळे झाले .. बॉय कट वाला लूक केसांनी स्टेप कट झाला .. घरात सगळे जेवण नाही केले तरी कधी सलाड .. कधी चटणी .. कधी पिस्ता . पिझ्झा असे नवीन डिश बनवू लागली .. मुळात त्याही चांगल्याच होत्या पण मुलासारखी वावरणारी सून बघून डोकं फिरायचे त्यांचे .. त्याही चिनू ला फोन करून थकल्या पण चिनू घरी यायला मागत नव्हता ..
एक दिवस अशीच सकाळी कीर्ती च्या घराची बेल वाजली .. तर समोर ईशा तेही साडी घालून .. त्या साडीत पण तिचे ऍब्स दिसत होते .. असली हॉट आणि क्युट दिसत होती ..
कीर्ती " अरे तू .. कसली सुदर दिसतेय यार .. सॉलिड मेक ओव्हर हा .. साडी म्हणजे काय बघायलाच नको रे बाबा "
ईशा " त्या नालायकाला घरात बोलावून घे .. मी आलेय म्हणून सांगू नकोस .. नाहीतर येणार नाही तो .. "
कीर्ती " अग पण काय झाले ?"
ईशा " त्याला घरी घेऊन जायला आलेय मी "
श्लोक " अरे ईशा .. कसली भारी दिसतीय तू साडीत .. आज काही खरं नाही बाबा चिनू चे "
ईशा " आज त्याचे खरंच काही खरं नाहीये .. त्याला असा घेणार आहे ना मी आता .. लै थकवलंय त्याने मला .."
श्लोक " अरे काय भांडता यार तुम्ही दोघे .. “
ईशा " त्याला मी सांगतेय तो ऐकतच नाहीये कि बाबांनी माझ्या अनवधानाने त्या पेपर्स वर सही करून घेतली .. आणि म्हणू न आता गेले ३ महिने मी त्याला हवय तसे वागतेय तरी तो मला भेटायला तयार नाहीये "
कीर्ती " ठीक आहे .. बस तू .. मी त्याला बोलावून घेते "
श्लोक " ईशा .. हे घे हे सर्टिफिकेट आहे मॅरेज सर्टिफिकेट .. तुला मी गावी आलेलो तेव्हा बोललो ना कि आपण पुन्हा मॅरेज सर्टिफिकेट बनवू म्हणजे ते valid धरले जाईल .. आणि गरज पडली तर पुन्हा लग्न करा ... त्यात काय आहे .. "
कीर्ती " हो चालेल .. आपण तुमचे परत लग्न लावून देऊ "
ईशा " आधी बोलावं त्याला .. कधी एकदा त्याला बघतेय असे झालंय मला .. नालायकाला ३ महिन्यात बघितले पण नाहीये मी "
श्लोक आणि कीर्ती दोघे हसू लागले
कीर्तीने चिनू ला अर्जंट काम आहे लवकर ये असे सांगून त्याला लगेच बोलावून घेतले
चिनू पण आलाच लगेच
चिनू " काय झाले ग ? तू बरी आहेस ना ?"
कीर्ती " हो मी बरी आहे ? आणि हे काय चिनू .. कसला बारीक झालाय .. पोट बघ किती आत गेलंय .. आणि हे काय दाढी वाढवलीस .. काय ईशाच्या आठवणीत देवदास झालास काय ?"
चिनू " नाही ग .. जरा डाएट करतोय .. खाऊन खाऊन खूप मस्ती आलीय असे कोणीतरी मला बोलले होते आता तीच मस्ती जरा जिरवतोय "

🎭 Series Post

View all