स्विकार भाग 39

Story Of Newly Married Couple


स्विकार भाग ३९

क्रमश : भाग ३८

सर्वांची गाणी म्हणून झाली .मनीष तिकडूनच माईक वर बोंबलू लागला " आता आपल्या समोर आपल्या सोसायटीची लता मंगेशकर उर्फ माझि कीर्ती ताई गाणे म्हणणार आहे "
कीर्ती " नको .. मानेनंच सांगत होती
पक्या " श्लोक भाऊजी , तुम्ही सांगा ना तिला .. ती छान गाणे म्हणते .. "
कीर्तीचा बाबा " चला रे मुलांनो आता बराच वेळ झाला .. आता आटपा .. "
तेवढयात ईशा " काका ... थांबा हो .. हा कार्यक्रम खास आपण श्लोक आणि कीर्ती साठी केलाय ना .. मग त्या दोघांनी नको का एकेक गाणे म्हणायला .. किंवा दोघात एक डुएट म्हटले तरी चालेल आम्हाला .. हो कि नाही पोरांनो "
मनीष " ए ईशा ताई .. तू पण म्हण ना एक गाणे "
ईशा " अरे .. मी म्हणायला म्हणेल ते पण बेसूरा आवाज ऐकून तुझ्या भाउजीचे कान फाडायचे नाहीत मला ... तसेही माझा चिनू नाहीये इथे आता .. तो असता तर गाणेच काय मी आणि त्याने मिळून डान्स पण केला असता "
सगळे हसायला लागले
श्लोक ने कीर्ती ला मेसेज टाकला " स्टेज इज यूअर्स .. कम ऑन "
कीर्ती " तू पण म्हणशील का माझ्या बरोबर .. "
श्लोक " नको .. .. मी पाहिजे तर कॅसिओ वाजवतो तू गाणे म्हण "
कीर्ती " तुला कॅसिओ पण येतो वाजवायला "
श्लोक " अरे .. तुला अजून बऱ्याच गोष्टी माहित नाहीयेत माझ्या .. "
श्लोक जागे वरून उठला आणि पक्याला त्याने सांगितले मी कॅसिओ वाजवतो .. कीर्ती गाणे म्हणेल
लाजत .. ओढणी सारखी करत .. आपला लव्ह बाईट कोणाला दिसणार तर नाही ना म्हणून ओढणी सारखी करून येत होती
श्लोक " कोणतं गाणे म्हणणार आहेस ?


दिल तो है दिल, दिल का ऐतबार, क्या कीजै - (२)
आ गया जो, किसी पे प्यार, क्या कीजै - (२)
दिल तो है दिल, दिल का ऐतबार, क्या कीजै

यादों में तेरी खोई, रातों को मैं ना सोई
हालत ये मेरे मन की, जाने ना जाने कोई
बरसों ही तरसी आँखें, जागी है प्यासी रातें
आई हैं आते आते होठों पे दिल की बातें
प्यार में तेरे, दिल का मेरा कुछ भी हो अंजाम
बेक़रारी, में है इक़रार, क्या कीजै
आ गया जो, किसी पे प्यार, क्या कीजै - (२)

छाया है मन पे मेरे मदहोश रैना तेरे
घेरे हव तनको मेरे तेरी बाहो का फ़ेरे
दूरी सही न जाये, चैन कहीं ना आये
चलना है अब तो तेरी पलको के साये साये
बस ना चले रे शाम सवेरे लेके तेरा नाम

दिल धड़कता है बार बार क्या कीजै
आ गया जो, किसी पे प्यार, क्या कीजै - (२)
दिल तो है दिल, दिल का ऐतबार, क्या कीजै
https://www.youtube.com/watch?v=5NYAsEn6-Uo&ab_channel=SaregamaMusic
श्लोक कॅसिओ वाजवत तर होता .. एक नजर जी तिच्या वर रोखली होती कि तिच्या गाणे म्हणता नाच्या सगळ्या हालचाली बघत होता .. आणि कीर्तीने तिच्या मनातील भावना गाण्यातून त्याला सांगितल्या होत्या.
ईशा ला काय झाले माहित नाही पण तिच्या डोळ्यांच्या कडा चिनू च्या आठवणीने ओलावल्या होत्या .. तो रागात तिचा फोन पण उचलत नव्हता ..
गाणे झाल्यावर सगळे मंत्र मुग्ध झाले होते ..
पाच मिनिटांच्या अंतराने सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या .. पण त्या टाळ्या ऐकयला कीर्ती मॅडम होत्या कुठे .. ती ईशाला घेऊन लगेच खाली गेली होती .. आणि श्लोक च्या भोवती अजूनही सोसायटी मधल्या पोरांनी गलका घातला होता ..
श्लोक च्या कॅसिओ वाजवण्या वर पक्या इतका खुश झाला ..
पक्या " भाऊजी .. तुमच्या सारखा छान मला पण शिकवा .. हे गाणे मला माहीतच नव्हते "
तिथलेच एक काका " काय मग कसे वाटले गाणे .. आमच्या वेळेचं आहे .. मुक्कदर का सिकंदर मधले .. माझा फेव्हरेट सिनेमा होता .. काय जावई बापू "
श्लोक " हो .. छान आहे .. नक्कीच "
काका " बाकी आमची कीर्ती आहेच सद्गुणी .. तिला अशी गाणी शांत आवडतात .. उगाच धांगड धिंगा करत पण नाही त्या ईशा सारखा "
श्लोक " ईशा चांगली मुलगी आहे .. फुल ऑफ एनर्जी .. काही लोकांना एक्सप्रेस होयला वेळ लागत नाही आणि काही लोक एक्सप्रेस करू नाही शकत .. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या ठिकाणी चांगलेच असतात .. सॉरी तुम्हांला राग आला असेल तर ईशा मला बहिणी सारखी आहे "
बाबा " चला रे मुलांनो आता आटपा हा पसारा .. झोपूया .. पक्या तू झोप माझ्या बरोबर आज इथे "
श्लोक " नाही नको काका .. तुम्ही इथे कशाला झोपताय .. आपण करू खाली मॅनेज .. आणि तो हि लगेच खाली निघून आला "
ईशा थोडीशी नाराज होती आणि रडत होती .. कीर्ती तिचे डोळे पुसत होती " होईल अग सगळे ठीक .. थोडा वेळ जाऊ दे ना .. त्याला पण थोडा विचार करू दे ना .. आणि तू पण एवढी निष्काळजी कशी राहिलीस .. काका कोणत्या कागदावर सही घेत आहेत हे नीट पाहायचेस ना "
ईशा " अग , बाबा .. बाबा असे माझ्याशी वागतील असे वाटलंच नाही ग मला "
कीर्ती " ठीक आहे .. आपण काढू यातून काहीतरी मार्ग"
श्लोक खाली आलेला दिसला तशी ईशा ने तिचे अश्रू लपवले
ईशा " खूप छान झाले गाणे .. तुमची दोघांची जोडी अमेझिंग आहे .. गॉड ब्लेस यु बोथ "
श्लोक " थँक यु .. आणि तुमच्या दोघांची पण जोडी खूप छान आहे .. यु बोथ आर मेड फॉर इच अदर "
ईशा " थँक यु .. चल .. कीर्ती मी निघते "
श्लोक " थांब .. मी स्कुटर वर सोडतो तुला” आणि श्लोक ने गाडीची चावी घेतली आणि बाहेर पडला .. एका दिवसात तो इतका घरात रुळला होता कि त्याला आता बाबांच्या गाडीची चावी कुठे असते ते माहित झाले होते ..
कीर्ती ने ईशाला पुन्हा एकदा मिठी मारली आणि कानात सांगितले " ह्याव अ ग्रेट नाईट .. "
कीर्ती " शट अप .. " आणि दोघी खळखळून हसल्या
श्लोक " ईशा .. तुझ्या बाबांकडे जाऊ आधी म्हणजे मला बोलता येईल त्यांच्याशी ?"
ईशा " श्लोक .. नका .. मला त्यांचे तोंड पण बघायचे नाहीये ?"
श्लोक " अरे .. डोन्ट वरी .. घेऊन चल मला घरी तुझ्या ?"
ईशा तिच्या माहेरी घेऊन श्लोक ला गेली
ईशा " आई .. हे मिस्टर श्लोक .. आपल्या कीर्तीचे हजबंड "
ईशाची आई " अरे वाह !! नमस्कार ... कीर्ती कशी आहे ? कीर्ती आणि ईशा अगदी लहान पणा पासूनच्या मैत्रिणी आहेत "
श्लोक " हो .. बोलली मला कीर्ती .. आणि चिनू पण "
ईशाची आई चिनू चे नाव ऐकताच जरा शांत झाली
तेवढयात ईशाचे बाबा बाहेर आले
ईशा ला त्यांचा चेहरा बघावा वाटतं नव्हता .. ती उठून आत गेली .. शेवटी श्लोक ने उठून त्याचे विझिटिंग कार्ड त्यांना दिले .. बघूनच वाटतं होते कि कोणीतरी पुढारी आहेत म्हणून
ईशा " ह्यांच्याशी नीट बोला .. तुमचा जावई नाहीये तो " आतूनच ओरडली
ईशाच्या बाबांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले
ईशाचे बाबा " बोला .. काय काम काढलेत एवढया रात्री ... आणि त्यांनी घड्याळात बघितले तर १२ वाजत आले होते "
श्लोक " हो .. जरा उशीरच झाला .. ते मी उद्या सकाळी निघणार आहे तर उद्या वेळ नव्हता म्हणून आता आलो "
बाबा " बोला ?"
श्लोक " का ? तुम्ही असे केलेत ? आणि कसे केलेत ? "
बाबा " म्हणजे ? हा माझा वयैक्तिक प्रश्न आहे ?"
श्लोक " नाही .. मी चिन्मय चा वकील आहे .. तुमच्यावर केस टाकणार आहे तो .. तुम्ही त्याला फसवून त्याच्या कडून आणि त्याच्या बायको कडून अनवधानाने डिवोर्स पेपर वर सही करून घेतलीत म्हणून "
बाबा " नकोय .. मला तो जावई म्हणून... माझ्या मुलीला नीट सांभाळत नाही तो .. दोन महिने मुलगी माझ्याकडेच राहिली होती .. "
श्लोक " मुलीचा संसार कसा चांगला व्हावा हे बघायचं का लग्न कसे मोडायचे ते बघता तुम्ही ? कारण इलेक्शन ला उभी राहण्यासाठी कास्ट बदलायची काहीच गरज नाहीये .. इतके तर तुम्हांला माहित असेलच .. राजकारण नवीन नाही तुम्हांला ... त्यामुळे कारण सांगा पटकन .. एकदा का कोर्टात केस गेली तर तुमची आहे ती इज्जत पण जाईल .. कारण मी आत्ता पर्यन्त एकही केस हरलो नाहीये .. आणि हि तर माझ्या बहिणीची केस आहे असे समजा तुम्ही "
बाबा " दोघेही मूर्ख आहेत .. कोणत्या पेपर वर सही करतोय हे हि बघत नाहीत .. ईशाचे भवित्यव्य त्याला सोडले तर चांगले आहे .. मी पण बाप आहे तिचा "
श्लोक " चुकताय तुम्ही ? तसे असते तर आता ती तिच्या सासरी ना जाता तुमच्या बरोबर असती .. आज तुमचे तोंड बघायला तयार नाहीये ती "
बाबा " तिला मी इलेक्शन ला उभी करतोय .. बघा माझि मुलगी कुठे जाईल .. त्या चिनू बरोबर सडतेय ती "
ईशा " बाबा .. एक शब्द चिनू बद्दल बोलू नका .. नावही घेऊ नका तुम्ही त्याचे .. आणि तुम्ही मला फसवलंत ना .. मी नाही उभी राहणार .. आणि त्या चिनू ला पण मी नको असेल ना तर मी एकटी राहीन .. मसणात जा तुम्ही दोघे .. "
ईशा " चला श्लोक .. निघू आपण .. "
श्लोक " ईशा .. मी बोलतोय ना .. तू थांब ..... बोलताय का ? तुम्ही का असे केलेत ते ? केस गेली कोर्टात तर उभे पण राहू शकणार तुम्ही .. एवढी बदनामी तर नक्कीच होईल "
बाबा " आमच्या राजनीतिक संघाच्या प्रमुखाच्या मुलाला ईशा पसंत आहे .. मला म्हणाला " निळ्या डोळ्यांची ऐश्वर्याच आहे .. मला तिच्याशी लग्न करायचंय .. मी सांगितले त्यांना तिचे लग्न झालंय .. तो म्हटला .. डिवोर्स करवा .. मी लग्न करेन तिच्याशी आणि त्या बदल्यात मला मंत्री बनवत आहेत .. शिवाय ईशाचे लग्न करून तिला पण पद देतील .. तिचे लाईफ बदलून टाकतील ते "
श्लोक " एक वडील म्हणून ठीक केलंय का हे तुम्ही ? चिनू आणि ईशा एकमेकांवर किती प्रेम करतात माहिती आहे ना .. तरी तुम्ही ???"
बाबा " तसेही दोघांचे वाद आहेत ? कुठे एकत्र नांदत आहेत ते .. आता बाहेरून आल्या पासून वेगळेच आहेत ते .. उलट तिला सेट करतोय मी "
श्लोक " ठीक आहे .. हे तुम्ही बोललेलं मी रेकॉर्ड केलंय .. त्याने मोबाईल वरचे रेकॉर्डिंग त्यानां दाखवले .. तसे बाबा घाबरले ..
श्लोक " आता मंत्री पद पण गेले आणि हे जर बाहेर आले ना तर तुमचा जो संघ प्रमुख आहे ना तो पण गेला .. सगळं संघच गटारात "
श्लोक " चल .. ईशा .. तुला तुझ्या सासरी सोडतो .. "
बाबा " हे ठीक नाही केलेत तुम्ही ?
श्लोक “ईशा चे नवीन डेट चे मॅरेज सर्टिफिकेट मी बनवून देईल .. कागदो पत्री डिवोर्स ला कागदो पत्री लग्न हाच उपाय करतो आता .. आणि जास्त वटवट केलीत ना तर तुमची वाट लावेन .. इतका पुरावा तर आहेच माझ्या कडे .. आणि आल्रेडी तो माझ्या ऑफिस च्या लॅपटॉप वर मेल वर पाठवून झालाय .. बॅक अप "
ईशा हसतच बाहेर आली " श्लोक .. एक नंबर ... तुम्ही .. हळू आवाजात .. फक्त बोलून ... बाबांना चीत करून टाकले तुम्ही "
श्लोक " अरे आता इथून पुढे रिटायरमेंट घेतील ते आणि घरी बसतील .. मी सांगेल ना ते सगळे करतील ते बघ "
दोघे तिकडून बाहेर पडले .. आणि श्लोक तिला सासरी घेऊन निघाला
ईशा " थँक यु श्लोक .."
श्लोक " अरे .. ईशा .. चिनू .. झुरतोय तुझ्या साठी .. बास झाले आता ..मिटवा भांडण .. कारण कीर्ती पण डिस्टरब असते तुमच्या दोघांवरून .. माझे पण वांदे आहेत ते वेगळेच आहेत .. आता तुला काय सांगू ?"
ईशा " सॉरी .. आमच्या मुळे तुमच्या लाईफ वर परिणाम होतोय "
श्लोक " अगदी तसेच नाही .. पण कीर्ती किती सेन्सिटिव्ह आहे माहिते ना तुला .. आय वॉन्ट हर फ्री फ्रॉम आलं द टेन्शन्स "
ईशा " ठीक आहे .. मी येईन तिकडे .. लगेचच नाही . पण येईन .. त्याला झोडायची ईच्छा झाली कि येईलच " आणि हसायला लागली

🎭 Series Post

View all