स्विकार भाग 38

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग ३8

क्रमश : भाग ३7
श्लोक काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हता .. आणि बॅग उचलून रूमच्या बाहेर जाऊ पाहत असतानाच कीर्तीने त्याला मागून दोन्ही हातांनी घट्ट पकडले
कीर्ती " प्लिज नको ना जाऊस .. श्लोक .. प्लिज .. तू रागात आहेस आता .. आणि रात्रीची गाडी चालवणार .. नको ना जाऊस .. प्लिज "
श्लोक ने त्याच हाताला धरले आणि तिला स्वतःकडे ओढले .. आणि घट्ट मिठीत घेतले " खाऊन टाकेन हा आता तुला .. इतका त्रास दिलास तर .. “आणि तिच्या मानेवर लव्ह बाईट सोडला
कीर्ती " आऊच ! काय हे श्लोक .. दुखलं ना.. "
श्लोक "तुला तसेच पाहिजे .. हा माझा दुसरा बाईट आहे .. म्हणून जरा जोरात केला "
कीर्ती " नाही .. हा पहिला आहे .. मला माहितेय ना "
श्लोक " दुसरा .. मी दिलाय .. मला माहितेय "
मगाच पासून कठीण क्लिष्ट विषयावर डिस्कशन चालू होते .. आता लव्ह बाईट पहिला आहे का दुसरा यावरून ते दोघे भांडत होते ..
ईशा बाहेरून दार वाजवू लागली " अरे यार .. मी इथे तुम्हा दोघांना भेटायला आले तर तुम्ही काय करताय .."
श्लोक " ए मी इथे एकटाच आहे .. कीर्ती बाहेर आहे "
ईशा " हो का .. सॉरी सॉरी "
श्लोक " यार कीर्ती .. सांग ना .. तुला माझ्या बद्दल काहीच वाटत नाही का ? "
आधी ती रूम केवढीशी .. श्लोक चा एवढा मोठा मॅन्शन सोडून या दोघांना बोलायला इथे एकांत मिळाला होता .. श्लोक इतका हळू बोलत होता कि कीर्तीच्या कानात कसे बसे जाईल .. कीर्ती त्याच्या इतकी जवळ होती कि तिचा श्वास त्याच्या कधी मानेवर तर कधी चेहऱ्यावर जाणवत होते आणि त्याला बेचैन करत होते ....जरा आवाज वाढला तर बाहेर कळेल कि दोघे आत आहेत ..
कीर्ती " काय सांगू ? तुला कळत नाही का ? दिसत नाही का माझ्या ड़ोळ्यांत ? सगळ्या गोष्टी बोलून कशा दाखवायच्या सांग बर तू .. "कीर्ती अल्मोस्ट पुटपुटली
श्लोक " मला अझमशन्स वर जगायला नाही आवडत .. आणि आता माझ्यात इतके पेशन्स पण नाहीयेत .. " श्लोक ने बोलता बोलता तिचे केस मागे घेतले
त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या पोटात लिटरली गोळे येत होते ..
कीर्ती ने एक मोठा खोल श्वास घेतला .. " श्लोक मला समजून घेशील का तू ?"
श्लोक तिच्या ओठांच्या हालचालीकडे बघत होता
शोक " कीर्ती .. तूच सांग .. नाही घेत आहे का मी ? हमम.. सध्या मला फक्त तू माझ्या बद्दल काय फील करतेस हेच जाणून घ्यायचंय मला .. तेवढी पण अपेक्षा नको करू का ?"
कीर्ती " याच उत्तर तुला माहितेय ना .. का विचारतोस ?"
श्लोक " मला माहित असलेले उत्तर जर चुकीचे असले तर अशी भीती वाटते मला .. मला तुझ्या तोंडून ऐकायचय "
कीर्ती " मला नाही एक्सप्रेस होता येत असे .. "
श्लोक " ठीक आहे मग मी जातो .. तू काय सांगायचं तुझ्या घरच्यांना ते तू बघ . मी खोटे खोटा आनंदी नाही राहू शकत "
तो म्हणत होता मी तुला सोडून जातो पण ऍक्शन विरुद्ध करत होता .. तिला अजून जवळ ओढत होता ..
कीर्ती " श्लोक .. हे काय आहे मला माहित नाही... पण तू मला मी जेव्हा पण डोळे उघडेंन तेव्हा माझ्या समोर पाहिजेस .. मी जेव्हा पण मागे वळून पाहीन तेव्हा तू माझ्या मागे पाहिजेस .. जेव्हा पण मी चालत असेल तेव्हा तू मला माझ्या सोबत पाहिजेस .. जेव्हा पण मी आंनदी असेल तेव्हा मला तुला कडकडून मिठी मारायला तू माझ्या सोबत हवा आहेस ... जेव्हा पण मी दुःखात असेल तेव्हा मला तुझा खांदा हवा आहे .. मी जेव्हा पण श्वास घेते तेव्हा तू माझा ऑक्सिजन आहेस .. तळपत्या उन्हात माझी सावली आहेस तू .... फेसाळलेल्या लाटांना किनारा गाठायची जशी घाई झालेली असते तसा माझा किनारा आहेस .. तहानलेल्या एक घोट भर कुणीतरी पाणी द्यावे तो पाण्याचा घोट आहेस .. माझा घास आहेस , माझा श्वास आहेस , माझा आयुष्य आहेस तू आणि खबरदार मला एकटीला कुठेही सोडून गेलास तर .. आणि सोडून जायची भाषा केलीस तर .. कीर्तीच्या डोळ्यातून आंसवे गळत होती .. श्लोक कधीच तिला मिठीत घेऊन तिच्या केसावर .. तिच्या पाठीवर हात फिरवत ऐकत होता .. तिचा एकेक शब्द त्याच्या हृदयात छेडत होता .. तिला घट्ट आत भरून घेत होता श्वासात तिचे अस्तित्व सामावून घेत होता ..
बाहेर ईशा " काकू , कीर्ती कुणीकडे गेलीय ? मला सांगून का नाही गेली ती ? मला भेटायचंय तिला ?"
बहुदा काकूंना माहीत होते ती आतमध्ये आहे
अग ती बाथरूम मध्ये आहे अंघोळ करतेय .. बस तू मी चहा करते तुझ्या साठी "
श्लोक " मग अशी का लांब जातेस माझ्या पासून.. मला सहन होत नाही ते "
कीर्ती " मी .. मी मजबूर आहे .. "
श्लोक " कसली ? मजबुरी .. सांगून टाक .. मला आता सहन होत नाही .. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरून जाईल "
कीर्ती " तुझी रूम आवरताना मला प्रियाची डायरी मिळालीय .. आणि मी ती वाचलीय .. त्यात तिने लिहलंय श्लोक माझी जागा तू कोणाला देऊ नकोस .. मला ते सहन नाही होणार .... म्हणून श्लोक मला आपले नाते जरी नवरा बायकोचे असेले तरी मला पुढे नाही न्यायचंय .. तू नुसता माझ्या बरोबर असलास ना तरी मी आयुष्य आनंदात जगू शकते .. आणि हे करण्यासाठी मला तुझी साथ लागेल .. तू आणि मी आपण प्रियाला आनंद मिळेल तसेच वागू .. ऐकशील माझ प्लिज "
श्लोक " मी ती डायरी वाचलीय .. त्यातला शब्द न शब्द माझा पाठ आहे ईतक्या वेळेला मी वाचलीय ... पण आज आपण त्या विषय वर नाही बोलायचं.. कारण मला ज्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला माझे कान तरसले होते त्याचे उत्तर मिळालंय .. आणि मी खुश आहे .. सो इट्स टाईम टू सेलिब्रेट अवर लव .. बाकी माझ्या वर विश्वास ठेव मी करतो सगळे ठीक .. इनफॅक्ट ते सगळे ठीक केल्यावरच मी तुझ्याशी लग्न केलय .. फक्त ते तुला माहित नाहीये म्हणून तू टेन्शन मध्ये आहेस .. टेन्शन विसरून जा .... बी हैप्पी ओके.. तुझ्या सगळ्या शंकांचे निरसन मी करणार आहे .. डोन्ट वरी .. "
श्लोक ला तिच्या गळ्या जवळ एक छोटासा काळा निळा डाग दिसला .. त्यावर हलकेच ओठ ठेवून .. तिच्या काना जवळ जाऊन .. “दुखले का खूप .. सॉरी "
कीर्ती " हो मग काय .. असे करतो का.. अजून दुखतंय मला .. “
श्लोक " पुन्हा मला वैताग देताना हे लक्षात ठेव .. "
कीर्ती " याचा बदला मी व्याजा सकट घेईन "
श्लोक कानाजवळ जाऊन " प्लिज लवकर बदला घे .. मी वाट बघतोय "
कीर्ती " निर्लज्ज !.. आता मी बाहेर कशी जाऊ .. खोटं कशाला सांगितलेस तिला .. आणि आता तू रात्री झोपशील कुठे .. रात्री खूप गरम होते .. AC शिवाय झोप येत नाही तुला .. ह्या बेड वर पाय पण पुरत नाहीयेत तुझे ? म्हणून मी तुला घरी जा म्हणत होते .. आता मी बाबांना सांगते तुम्ही टेरेस वर झोपा .. आई इकडे झोपेल आणि आपण दोघे त्या बेडरूम मध्ये झोपू "
श्लोक " काही गरज नाहीये त्याची .. मॅनेज करू इकडे .. मला तुझ्या रूम मध्ये आवडेल झोपायला जास्त .. "
कीर्ती " अरे पण .. "
श्लोक ने तिच्या ओठांवर बोट ठेवले .. " शु... आपण करू मॅनेज "
तेवढयात बाहेरून मनीष " ओ श्लोक भाऊजी , काय करताय आत .. चला आपल्याला टेरेस वर जायचंय .. आवरा लवकर .. "
श्लोक " आला माझा छोटा साला ..."
कीर्ती हसायला लागली " जा .. बाहेर आता तुला काय ईशा सोडत नाही .. गाणे म्हणायलाच लावेल .. सगळ्यांना "
श्लोक " तू म्हणालीस तर मी म्हणेन ..
मग जेवणा नंतर टेरेस वर बिल्डिंग मधल्या पक्या ने त्याचा कॅसिओ आणला होता .. बच्चे कंपनी .. लेडीज . जेन्टस असे सगळे जागा मिळेल तिथे बसले होते ..
ईशा होतीच .. आज ती इथेच प्रोग्रॅम होई पर्यंत थांबणार होती .. तिथून जवळच तिचे घर होते ..
श्लोक बाहेर आल्यावर अर्ध्या तासाने कीर्ती हळूच बाहेर आली ..
ईशा " अग कीर्ती ? कुठे गेली होतीस .. यार मला किती बोअर झाले "
कीर्ती " सॉरी अग अंघोळ करत होते "
ईशा " नक्की का .. का आतमध्ये .. आ .. आ .. आ "
कीर्ती ब्लश करू लागली
ईशा " काय आहे ना मला फसवणे तुला तरी जमणार नाही ... आणि काय .. लव बाईट .. दिसतोय मॅडम .. कपडे चेंज करून या बाहेर "
कीर्ती पटकन आत मध्ये गेली आणि आरशात बघू लागली .. तो लव बाईट बघून खूप लाजत होती .. पण मनांत विचार करू लागली " हा दुसरा आहे असे का म्हणाला असेल तो .. मला तर आठवत नाही त्याने या आधी असे केलेलं .. पण इशा बाहेर वाट बघत होती मग पटकन घरातला जुना पंजाबी ड्रेस घालून आली बाहेर
रात्री सगळे एकत्र पुन्हा खाली मांडी घालून जेवले .. आता श्लोक खूप खुश दिसत होता .. त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे तिचा हे त्याला कळले होते आणि त्याचे त्याच्याकडे आधीच सोल्युशन असल्या मुळे तो रिलॅक्स झाला होता..
त्याचे जेवण होतय ना होतंय तर पक्या आणि मनीष ने त्याचा हात धरून त्याला टेरेस वर नेले
पक्या त्याला त्याचा कॅसिओ वाजवून दाखवू लागला .. एकेक गाणे वाजवून दाखवू लागला .. श्लोक पण " अरे वाह .. ग्रेट असे म्हणून त्याला बूस्ट करत होता ..
मग टेरेस वर सगळे जमले आणि एकेक जण त्याच्या आवडीचे गाणे म्हणू लागला .. पक्या सगळ्यांना चं कॅसिओ ने साथ देत होता .. मनीष मध्ये मध्ये एखादे गाणे वाजवायचा .. त्याला पण त्याची हुशारी दाखवायची होती भाऊजींना
भाऊजी आपले मधेच एखादी कीर्तीकडे नजर टाकत होते ..
कीर्ती आणि ईशा शेजारी बसल्या होत्या ... मधेच त्यांची कानात खुसर पसर चालली होती .. मग कीर्ती ब्लश करायची .. आणि हे सगळे साहेब लांबूनच बघत होते .. कधी हा दुरावा संपणार असेच झाले होते त्याला ..

🎭 Series Post

View all