स्विकार भाग 37

Story Of Newly Married Couple


स्विकार भाग ३७

क्रमश : भाग ३६

श्लोक " हा इथे बोल .. "
कीर्ती " तिथेच बोलायचं ना .. असे ते दोघे असताना आपण इकडे बोलणे बरोबर वाटते का ?"
श्लोक " मग तिकडे मी काही बोललो असतो तर अजून चिडली असतीस ... म्हणून इकडे घेऊन आलो तुला "
कीर्ती " हमम .. बोला .. तुम्ही कधी जाणार आहेत ? "
श्लोक " अरे .. तू काय मला हाकलून द्यायलाच बघतेस कि काय ?"
कीर्ती " नाही.. म्हणजे .. मला बघवत नाहीये तुमचे हाल किती होत आहेत .. किती गरम होतय तुला .. शिवाय रात्री AC शिवाय झोप येत नाही तुला .. तू घरी जा रात्री .. किंवा तुझी मिटिंग आहे तिकडे चांगल्या हॉटेल मध्ये जा "
श्लोक " ठीक आहे " मी रात्री जेऊन जाईन .. आईच्या हातचे जेवण जेवायचंय मला "
कीर्ती " ठीक आहे .. मग तसे सांगते मी .. "
श्लोक " नको तू काही सांगू नकोस .. त्यांचा मूड जाईल .. मी अचानक फोन आला म्हणून सांगून निघून जाईन "
कीर्ती " ठीक आहे .. आता आराम करायचाय का बाबा म्हणाले तसे बाहेर जावेसे वाटतंय "
श्लोक " ते तू ठरव .. तुला माझ्या बरोबर जायला आवडत असेल तर मी यायला तयार आहे "
कीर्ती " चल मग जाऊ .."
श्लोक " तुझ्या बाबांच्या स्कुटर वर जाऊ .. मला येते चालवता स्कुटर "
कीर्ती " श्लोक .. किती जुनी आहे ती .. किक मारावी लागते ... कधी कधी रस्त्यात बंद पण पडते .. त्यापेक्षा चालत जाऊ ना "
श्लोक " नको चालत नको .... मला चालायला बोअर होते .. "
कीर्ती " ठीक आहे तू बस बाहेर .. मी चेंज करून येते .. "
श्लोक " का ?"
कीर्ती " का ? म्हणजे "
श्लोक " म्हणजे .. साडीवर च चल ना .. "
कीर्ती " नको आता मी दमलेय सकाळ पासून .. मला कधी एकदा चेंज करतेय असे झालंय "
श्लोक " ठीक आहे .. मी बसतो बाहेर "
कीर्तीने तिची बॅग उघडली तर त्यात सगळ्या साड्या च होत्या एकही ड्रेस नव्हता .. आणि घरात जे ड्रेस होते ते आता फार जुने झाले होते आणि श्लोक बरोबर घालून जायचे म्हणजे ते छान दिसणार नाही ..आणि श्लोक ने साड्या भरल्या म्हणजे सगळ्या साड्या कशा असतील याचा अंदाज आलाच असेल .. त्यातलीच एक सिम्पल रेड साडी तिने नेसली .. आणि बाहेर आली .. श्लोक एक मिनिट बघतच बसला .. हिला शॉर्ट ड्रेस घेण्या पेक्षा साड्याच घेऊन दिल्या पाहिजेत .. शी लुक्स स्टनिंग इन सारी असा एक विचार पटकन त्याच्या मनात आला ..
कीर्ती " जायचं "
श्लोक " हो .. "
बाबांच्या स्कुटर वर बसताना तिला सारखी भीती वाटतं होती .. वाटेत बंद पडली तर श्लोक ला ढकलत गाडी आणावी लागेल कि काय अशी भीती होती तिच्या मनात .. पण श्लोक मात्र आपण काहीतरी ऍडव्हेंचर करतोय असेच त्याला वाटतं होते .. मोठ्या ऐटीत पहिल्याच किक मध्ये स्कुटर चालू करून तो तयार झाला कीर्ती पण त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रॉपर बसली ..
श्लोक " अरे वाह .. इकडे सही वाटतेय रे .. किती छान आहेत तुमच्या बिल्डिंग चे लोक .. सर्व एक फॅमिली सारखे राहतात .. नाही का ?"
कीर्ती " हमम "
श्लोक गाडी चालवतोय .. त्याला रस्ते माहित नाहीयेत ..रस्ता दिसेल तिकडे तो चालवत होता .. एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली ..
श्लोक " हे तुझे कॉलेज आहे ना .. "
कीर्ती " हो .. तुला कसे माहित ?"
श्लोक " आता गावात एकच कॉलेज असेल त्यामुळे अंदाज लावला "
मग त्याने कीर्तीच्या बँके जवळ गाडी थांबवली .. हि तुझी बँक आहे ना "
कीर्ती " हो .. तुला कसे माहित ?"
श्लोक " अग आता गावात एकच ब्रांच असणार ना .. नाव तर माहीतच आहे ना मला "
कीर्ती " भारी आहेस तू .. पण रस्ते कसे माहित एवढे ?"
श्लोक " मी आलोय आधी इकडे .. फिरलोय पण "
कीर्ती " काय ?"
श्लोक " हो .." आणि बोल बोलता कीर्तीच्या बाबांच्या ऑफिस च्या इथे गाडी थांबवली .. आणि तिथल्या एका टपरी वर गाडी थांबवली .. एक चहा आणि दोन वडापाव ऑर्डर दिले त्याने
श्लोक " इथला वडापाव खूप छान असतो "
कीर्ती " हो .. खूपच .. आणि हे समोर आहे ते ... "
श्लोक "... तुझ्या बाबांच ऑफिस .. मला माहितेय "
कीर्ती " शक्यच नाही .. एवढे सगळे अंदाजे नाही सापडू शकत .. "
श्लोक हसला .. " मग तुला सांगतोय तर मी केव्हा पासून कि मी तुला लग्नच्या आधी पासून ओळखतोय म्हणून "
कीर्ती " म्हणजे .. कधी पासून ?"
श्लोक वडापाव आणि दोघात एक चहा पियुन दोघे घरी निघाले .. हा नारळ पाणी वाला आहे ना ते लक्षात ठेव .. मी याच्या बद्दल तुला लवकरच सांगेन
कीर्ती " तू ना .. सांगून टाक ना पटकन .. कोर्टात केस सोडवावी तसे एकेक पुरावे सादर करतोय "
श्लोक " आयला ... सही .. मार्किंग केलेस हा .. मी खरच असे वागत आहे .. त्याचे काय आहे ना .. हे सगळे मी तुला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकल्यावर सांगायचे होते .. पण तू ना फार रिजिड आहेस "
कीर्ती " श्लोक गाडी एक मिनिट थांबवं ना .. घरी गेल्यावर बोलायला मिळणार नाही "
श्लोक ने गाडी साईड ला घेतली आणि तिथल्याच एका बाकावर ते दोघे बसले
कीर्ती " आपण इकडे आल्या पासून माझी खूप चीड चीड होतेय ... तुझ्या आणि माझ्या स्टेट्स मधला फरक मला प्रकर्षाने जाणवतोय .. तुला होत असलेला त्रास मला बघवत नाहीये .. आणि हेच सत्य आहे .. आपली जोडी हि विजोड आहे .. आता तूच काहीतरी यातून मार्ग काढ "
श्लोक " मी काय मार्ग काढणार ..म्हणून तर तुला मी प्रश्न विचारला .. कि बाकीचे सगळे सोड .. फक्त माझा विचार करून सांग .. तूच काही निर्णय घेत नाहीयेस .. नुसतीच झुलवतेय मला .. "
कीर्ती "काहीही काय .. मी कशाला झुलवू तुला "
श्लोक " बरं .. मी एकटाच झुलतोय”
कीर्ती " श्लोक . सॉरी ... तुझ्या लेव्हल ची मी नाहीये .. तू चुक केलीस माझ्या शी लग्न करून .. आणि आता ह्याचा मला खूप त्रास होतोय ... "
श्लोक " तू परिस्थितीचा विचार करू नकोस असे मी तुला कितीदा सांगतोय .. तुला कळतच नाहीये का मी काय बोलतोय ते .."
कीर्ती " चल घरी जाऊ .. बराच वेळ झाला .. घरी आई वाट बघत असेल "
श्लोक "तुला एक सांगतो आता फायनल .. मी जर चिडलो ना तर मग रडकुंडीला आणेल मी तुला .. प्लिज डोन्ट ट्राय माय पेशन्स "
कीर्ती " मी काय करू .. श्लोक .. प्रिया ची जागा... "
श्लोक " मूर्ख ... जस्ट शट अप .. प्रियाचे नावही मला तुझ्या तोंडात नकोय .. यु नो व्हॉट .. यु आर an इडियट .. चल घरी जाऊ "
श्लोक " तू एक काम कर .. मी आलो होतो तुला तुझ्या आई बाबांना भेटवायला .. आणि घेऊन जाणार होतो .. पण आता सांगतो .. मी एकटाच जाईन .. तू रहा इकडे .. मी राहीन तिकडे .. तुला पाहिजे तर डिवोर्स पेपर्स पाठवतो ... मी बघतो माझे काय करायचे ते "
पुन्हा प्रियाचे नाव घेऊन ती कारणं सांगतेय हे ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती ..
कीर्ती " श्लोक .. माझे ऐकून तर घे .. "
श्लोक " आय डोन्ट वॉन्ट टू "
श्लोक ने गाडी स्टार्ट केली आणि दोघे घरी आले .. घरात मस्त जय्यत जेवणाची तयारी होती .. आई बासुंदी आणि पुरी बनवत होती ....
दारातच कीर्ती ला ईशा ने तिला गाठले ... ईशा ला जसे कळले ती इकडे आलीय तशी ती दोघांना भेटायला आली ..
ईशा " वेलकम श्लोक ... आज रात मस्त पार्टी करेंगे .. मी इथल्या सगळ्या पोरांना अरेंजमेंट्स करायला सांगितलेत .. कीर्तीच्या टेरेस वर मस्त गाण्याच्या भेंड्या , गेम्स वगैरे खेळू "
श्लोक " सॉरी ईशा मला एक अरजन्ट काम आहे .. मला आताच्या आता जायला लागेल "
आई " जेवण टाळून नये असे .. कीर्ती सांग ना तू "
कीर्ती काहीच बोलत नाही
बाबा " जमले तर थांबता नाही का येणार ? वरती मुलांनी छान तयारी केलीय .. त्यांचा मूड ऑफ होईल "
ईशा " ते काही मला माहित नाही श्लोक .. तुम्ही थाम्बणार आहेत म्हणजे आहेत .. कीर्ती ला पण एक रात्र तरी माहेरी राहू द्या "
श्लोक " ती थांबणारच आहे .. मी माझ्या ऑफिस च्या कामाला जातोय ..."
ईशा " प्लिज .. मी कोणाच्याच जास्त मागे लागत नाही यु आर स्पेशल फॉर मी बिकॉज यु आर हिरो ऑफ माय जान कीर्ती .. "
श्लोक काहीच बोलला नाही आणि आत मध्ये गेला .. बॅग उचलून निघू लागला ..
कीर्ती तेव्हड्यात आता आली .. " श्लोक , थांबून जा आता .. आता तशीही रात्र झालीय .. घरी जाई पर्यंत एक वाजेल.. "
श्लोक " मी जातोय आता .. बस झाले .. तुझ्या तोंडावर ख़ुशी आणायला म्हणून मी इथे आलोय पण तूला खुश पाहणे म्हणजे नामुश्कील काम आहे .. सगळ्यातच तुला प्रॉब्लेम आहे .... चल बाय .. टेक केअर .. तुला यायचं असेल तेव्हा फोन कर .. मी येईन तुला घ्यायला .. आता जातो कारण भांडणे माझा स्वभाव नाहीये ....आणि तुझ्या शी भांडायचे हे सर्वात कठीण काम आहे माझ्यासाठी .. "
कीर्ती ने त्याचा हात पकडला " श्लोक , प्लिज थांब .. मी .. मला .. इकडे .. मी तुला कसे सांगू .. "
श्लोक " तू काय डोक्यावर पडलीय का ? मगा च पासून मी कधी जाईन त्याची वाट बघतेय .. आणि आता निघालोय तर जाऊ नकोस असे सांगतेय .. "
कीर्ती " सॉरी .. मला काहीच समजत नाहीये .. कसेतरी होतंय .. तू निघालास तर मनात काहीतरी अस्वथपणा आलाय ... असे का होतंय ?"

🎭 Series Post

View all