स्विकार भाग 28

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग २८
क्रमश : भाग २७

हळू हळू कीर्ती त्याच्या मांडीवर डोके ठेवून त्याच बाकावर तिथे आडवी पडली .. तो पण तिच्या केसांमधून हात फिरवून तिला रिलॅक्स करत होता ... दोघांना एवढं तर नक्कीच माहित होते कि आपणच दोघे च एकमेकांना आहोत .. त्याला तर बिचार्याला दुसरे कोणीच नव्हतं आणि हिला आपले दुःख तिच्या आई बाबां बरोबर शेअर करायचं नव्हतं ..
श्लोक " जायचं का घरी ? झोपशील नीट तिकडे "
कीर्ती " थँक यु इकडे आणल्या बद्दल .. खूप बर वाटले मला .. आता रडावंस नाही वाटत "
श्लोक " हमम .. "
श्लोक " मी पुढल्या आठवड्याचे बुकिंग केलय.. आपण बाहेर जातोय वीक एन्ड ला .. तुला फक्त फ्रायडे ची रजा टाकावी लागेल "
कीर्ती काहीच बोलत नाही..
श्लोक " तुला अजून बऱ्याच गोष्टी मला सांगायच्यात .. .. आता आज नको सांगेन कधीतरी .. आणि एक चिनू बद्दल टेन्शन घेऊ नकोस .. त्याचा मॅटर पण मीच हॅन्डल करेन.. यु जस्ट रिलॅक्स अँड ओन्ली थिंक अबाऊट मी .. ओके "
कीर्ती " हमम... "आणि गालात हसली
श्लोक " उद्या संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची तुझी .. फोबिया साठी .. हि आज नाही मी आधीच घेतली होती फक्त सांगायची राहिली होती "
कीर्ती " हमम.. "
मग दोघे घरी आले
श्लोक " गुड नाईट " आणि तिच्या कपाळावर किस करून झोपला ..
कीर्ती पण हसत हसत झोपली .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे डॉक्टरांकडे गेले .. डॉक्टरांनी तिला नॉर्मल चेक केले .. झोप लागते का ? अजून काही त्रास होतोय का ? रात्री वाईट स्वप्न पडतात का ? झोपेतून सारखे जाग येत का ? ट्राफिक व्यतिरिक्त अजून कशाची भीती वाटते .. नक्की रोड क्रॉस करताना काय होते .. अशी सगळी माहिती विचारली
तिला बाहेर पाठवून डॉक्टर श्लोक शी बोलू लागले
डॉक्टर " श्लोक , मी त्यांना बरेच प्रश्न विचारलेत .. त्या न घाबरता प्रतेय्क प्रश्नाला समजून उत्तर देतात .. आता फक्त त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली आहे कि ज्याने त्या घाबरतात ते त्यांना खोदून विचारावे लागेल .. ते जर त्यांनी न घाबरता व्यवस्थित सांगितले कि पुढचे आपण ठरवू "
श्लोक " मग आता पुढे ट्रीटमेंट काय ?"
डॉक्टर " मनात असलेली भीती काढून टाकणे हीच ट्रीटमेंट .. पण नक्की कशाची भीती मनात आहे हे आपल्याला कळले पाहिजे .. आणि ती भीती का आहे तेही कळले पाहिजे .. "
श्लोक " मी तिला विचारू का रात्री वगैरे .. किंवा कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊन "
डॉक्टर " मला असे वाटते .. संमोहन अशी एक ट्रीटमेंट असते त्या मध्ये त्या नक्की त्या वेळी काय फील करत होत्या ते आपल्याला कळेल .. तुम्ही विचारल्यावर त्या त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना जे सांगायचंय ते सांगतील आणि जे नाही सांगायचंय ते सांगणार नाहीत .. त्यामुळे ती भीती पूर्णतः निघणार नाही "
श्लोक" ओके .. "
डॉक्टर " आपण उद्या त्यांच्यावर संमोहन करू .. "
श्लोक " त्याचा काही साईड इफेक्ट होतो का ?"
डॉक्टर " खरं सांगायचं तर .. हा एक मेंटल डिसऑर्डर आहे .. काही औषध मी लिहून देणारच आहे पण जास्त करून त्याचे सेशन घ्यावे लागतील .. त्याचा स्लॉट असा असेल
१ त्यांची नक्की भीती कशाची आहे आणि का आहे ते शोधायचे
२. ती भीती कशी घालवायची यावर ट्रीटमेंट ठरवायची
३ यात कशी अशा ट्रीटमेंट असतात कि त्या आधी लॅब मध्ये माझ्या समोर होतील .. त्यांना ज्या गोष्टीची भीती वाटते ती भीती काढण्यासाठी त्यांनी त्याच सिचवेशनला वारंवार फेस केले पाहिजे .. आणि जेव्हा त्यांना कळेल कि ह्याने मला काहीच हार्म नाही होत तेव्हा त्यांची भीती कमी होते .. आधी नाटकीय रूपांतर , कल्पनेतून त्यांना ते शिकवायचं .. मग गाईडेड फेस करायला लावायचं .. आणि मग एकट्याला फेस करायला लावायचं "
श्लोक " ठीक आहे उद्या येतो मी तिला घेऊन “
श्लोक केबिन मधून बाहेर आला तर मुद्दाम हसतच आला
कीर्ती " काय म्हणाले डॉक्टर ?"
श्लोक " डॉक्टर म्हणाले ? काहीही झालेलं नाहीये .. त्यांना रोज एकदा रस्ता क्रॉस करायला लावा .. त्या आपोआप प्रॅक्टिस होईल "
कीर्ती " नाही .. असे म्हणणारच नाहीत कारण मी त्यांना सांगितलंय कि मी रस्ता क्रॉस करताना मला पुढचं काहीच दिसत नाही .. आवाज आणि दृष्टी दोन्ही बंद होते "
श्लोक " हा त्यावर ते म्हणाले उद्या घेऊन या .. उद्या तुला ते अजून प्रश्न काढून ठेवणार आहेत ? जेवढे जास्त प्रश्नांची उत्तर देशील त्यावर त्यांचे औषध असेल "
दोघे बाहेरच डिनर करून घरी आले
कीर्ती " श्लोक .. मी तुला सांगू का ? मला हि भीती कधी पासून वाटली ते ?"
श्लोक " नको .. मुळात फार काळजी करण्या सारखे नाहीये .. ते असे आहे लहान मुलांचा आगी पासून हात भाजला कि ते पुन्हा आगीला हात लावत नाहीत तसेच तुला रोड क्रॉस करताना एकदा भीती वाटली आता ते करायलाच तुला भीती वाटते .. फार विचार करू नकोस .. आणि आता डॉक्टर ची ट्रीटमेंट फॉल्लो करून बघू आणि मग बघू .. नाहीतर मला काही प्रॉब्लेम नाहीये तुझ्या या फोबिया पासून .. उलट मला अशीच आवडतेस तू .. फक्त याचा इफेक्ट तुझ्या कॉन्फिडन्स वर नको पडायला आणि मी आजू बाजूला नसताना तुला प्रॉब्लेम नसावा म्हणून मी याकडे बघतोय "
कीर्ती " थँक यु श्लोक .. तुला सांगते .. मी खूपदा प्रयत्न केलाय पण नाही होत माझ्या च्याने रोड क्रॉस "
श्लोक " इट्स ओके अग .. त्याला Agoraphobia असे म्हणतात
तिचे मन डायव्हर्ट करण्यासाठी विषय बदलतो
श्लोक " कीर्ती तुला एक सांगू .. तू मला प्रश्न विचारला होतास कि मी तुलाच का सिलेक्ट केले .. मी इकडे शहरात तू तिकडे गावात .. अशा गावात कि तिकडे जाण्याचा माझा काहीच संबंध नव्हता .. तरी पण मी आलो .. मी तुला पाहिलं .. आणि तूला माझ्या जीवनात मी आणलेय .. "
कीर्ती " काय ? तू मला आधी पासून ओळखत होतास "
श्लोक "आधी पासून म्हणजे फार आधी पासून नाही .. तुमच्या कडे स्थळाचा प्रस्ताव पाठवण्या आधी जवळ जवळ १ महिना मी तुला फॉलो करत होतो "
कीर्ती " छे ! काही पण काय ? असा कधी कोणी माझ्या लागलेलंच नाही .. आणि गावात तर नाहीच कारण माझ्या फोबिया च सगळयांना माहित होते .. जी स्थळं यायची ना ती सर्व कोणतरी काहीतरी सांगते म्हणून रिजेक्ट करून जायची "
श्लोक " तुला विश्वास नाही ना माझ्यावर .. "
कीर्ती " म्हणजे मी तुला कधी आधी पहिले नाही म्हणून म्हटले "
श्लोक " तू नाहीच पहिले .. मीच एकट्याने तुला पाहिलंय .. "
कीर्ती " कधी .. कुठे ... केव्हा ?"
श्लोक "सांगेन सांगेन.. वेळ आली कि सगळं सांगेल बालिके .. जरा धीर धर.. "
तिच्या डोळ्यांत वेगळीच चमक आली होती हे ऐकून त्याच्या पासून लपले नाही
--------
इकडे चिनू ने वैतागून घरी वडिलांना फोन लावून काय घडलय ते सांगायला फोन केला .. तर त्याला कळले कि ईशा तिच्या घरी न जाता त्याच्या घरी राहायला गेलीय .. आणि बाबा आनंदाने सांगत होते कि ईशाने दोन दिवसांतच आई शी चांगली गट्टी जमवलीय .. सासू बाईंना पण व्यायामाचे महत्व पटवून सांगत असते .. आता तुझी आई आणि ती दोघी मिळून सकाळी वॉक ला जातात.
चिनू ने डोक्यावर हात मारून घेतला .. आता तर डिवोर्स झालाय ना मग कशाला हि नाटकं करते .. जायचं ना स्वतःच्या घरी .. बाबांचा बोलण्यातला उत्साह आणि आनंद ऐकून त्याला ती कटु बातमी घरी सांगवली नाही ..
त्याने इशाला मेसेज टाकला
चिनू " झालंय ना तुझ्या मना सारखं .. आता माझ्या आईच्या भावनांशी अजिबात खेळू नकोस मी आधीच तुला सांगतोय .. मुक्याट्याने तुझ्या घरी निघून जा .."
ईशा चा त्यावर काहीच रिप्लाय आला नाही .. त्यामुळे त्याची अजूनच चिडचिड होऊ लागली होती .. इकडचे काम टाकून जाता येत नाही म्हणून नाहीतर ह्याने तिला हाताला धरूनच घरा बाहेर काढायला कमी नसती केली .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्लोक आणि कीर्ती पुन्हा त्या डॉक्टरांकडे गेले .. कीर्तीला थोडे दडपण आलेलेच होते .. दिसतच होते तिच्या चेहऱ्यावर साफ .. श्लोक ने तिचा हात हातात घेऊन तिला आश्वासित केले .. " काही होणार नाही .. बघ आता तू कशी एकटीने रस्त्यावर मस्त चालू लागशील आणि रस्ता तुझा तू क्रॉस करशील
डॉक्टरांनी तिला आणि श्लोक ला त्यांच्या संमोहन रूम मध्ये नेले .. तिला एका बेड वर झोपायला सांगितले .. श्लोक होताच तिच्या बाजूला ..
दोन एक मिनिटांनी तिच्या वर संमोहन उपचार सुरु केले
तू आता शाळेत आहेस .. तू कितवीत आहेस ..
कीर्ती " मी दहावीत आहे "
डॉक्टर " आज काय आहे ?"
कीर्ती " आज माझा दहावीचा बोर्डाचा पेपर आहे .. मी , ईशा , अर्पिता , निशा आणि विभा चौघी मिळून शाळेत चाललोय .. "
डॉक्टर " तुम्ही रस्त्यावरून जाताना तुला भीती नाही का वाटतं ?"
कीर्ती " भीती ? कशाची भीती ? हा तर माझा नेहमीचा रस्ता आहे .. मी एकटी सुद्धा या रस्त्यावरून जाते .. रोजच जाते "
डॉक्टर "रस्त्याच्या पलीकडे काय आहे ?"
कीर्ती " पलीकडे ... माझी शाळा .. "
डॉक्टर " मग हा एवढा मोठा रस्ता क्रॉस करून तू जाणार एकटी .. "
कीर्ती " हो .. त्यात काय एकदम इझी आहे .. एकदा डावीकडे बघायचे मग अर्धा रस्ता क्रॉस करायचा आणि मग उजवीकडे बघायचे आणि पूर्ण रस्ता क्रॉस करायचा "
डॉक्टर " अरे वाह .. आता तूझा शेवटचा पेपर आहे "
कीर्ती " हो "
डॉक्टर " काय करतेय आता ?"
कीर्ती " मी आता पेपर देऊन नुकतीच बाहेर आले ..
डॉक्टर " मग पुढे "
(तेव्हा काय झालय ते ती डॉक्टरांना सांगतेय असे इमॅजिन करा ..)
कीर्ती " मी ईशा अर्पिता आणि विभा ने मिळून सेलेब्रेशन म्हणून ट्रिप ला अर्पिताच्या मामाकडे पुण्याला जायचा प्लॅन ठरवतोय "
ईशा " मी तयार आहे .. माझा भाऊ आपण असतो तिकडेच .. मला त्याला पण भेटता येईल आणि आपल्याला पुण्यात पण फिरवेल तो "
अर्पिता " राहायला आपण माझ्या मामा कडे जाऊ .. तो धनकावडीला राहतो .. तो पण आपल्याला फिरवेल .. आणि मला पुण्याची थोडी माहिती आहे ... मी स्वारगेट पासून मामाकडे एकटी जाऊ शकते "
मी " मला बाबा नाही पाठवणार इतक्या लांब .. "
विभा " मला पण आई नाही पाठवणार ,, आणि एवढे पैसे सुद्धा नाही देणार .. जायचं म्हणजे थोडे फार पैसे हवेत ना "
अर्पिता " अरे यार चल ना आपण खूप मज्जा करू .. कीर्ती मी येते संध्याकाळी माझ्या बाबांना घेऊन तुझ्या कडे .. ते बोलतील तुझ्या बाबांशी .. आणि विभा पैशांची चिंता करू नकोस .. ते मी बघते .. "
ईशा " हो माझ्या कडे पण माझी पिगी फुल भरलीय .. पण आता कोणी नाही म्हणू नका "
डॉक्टर " मग पुढे काय झाले ?"
कीर्ती " मी इशा , विभा , आणि अर्पिता पुण्याला जायचं आणि तिच्या मामा कडे राहायचं असे ठरले आणि सगळ्या आनंदात होतो .. बाबांनी मला एस टी स्टॅन्ड वर सोडले .. आणि बाकीच्यांची वाट बघत आम्ही उभे होतो .. तेवढ्यात अर्पिता आणि ईशा पण आल्या .. बाबा आम्हाला सारख्या सूचना देत होते .. सांभाळून रहा ग .. एकमेकींना धरून रहा .. कीर्ती कधी या आधी गेली नाहीये अशा मोठ्या शहरात .. "

🎭 Series Post

View all