स्विकार भाग 25

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग २५

क्रमश : भाग २४
बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून काळजीने श्लोक ने वॉशरूम चे दार ठोकवले
श्लोक " आर यु ओके कीर्ती .. रात्र झालीय फार वेळ पाण्या खाली राहू नकोस .. आजारी पडशील "
कीर्ती ने शॉवर बंद केला .. बाहेर आली .. किचन मध्ये जाऊन पाणी पिले आणि अंगावर घेऊन झोपली .. बराच वेळ असे वाटत होते कि ती रडतेय पण श्लोक कडे तिचे सांत्वन करण्यासाठी शब्द हि नव्हते .. तो हि गप्प बसला .
सकाळी त्याला जाग आली तर कीर्ती बेड वर नव्हती .. त्याने किचन , गार्डन , बाथरूम सगळीकडे चेक केले .. मधेच त्याला त्याच्या वरच्या रूम चे दार उघडे दिसले
श्लोक कीर्ती ला आवाज देत च्या रूम कडे धावत आला.
दार उघडल्या उघडल्या च श्लोक ला तो कॉलेज ला असतानाच्या त्याच्या रूम मध्ये यायचा तसे वाटले .. रूम छान लावलेली ..क्लीन ..सगळे फोटो फ्रेम छान अरेंज केलेल्या .. त्याचे गिटार ,, त्याचे क्रिकेटचे किट नीट लावलेलं .. पडदे स्वच्छ .. छान सुगंध येत होता .. आला आणि आनंदात तिथल्या बेड वरच तो आडवा पडला .. " माय रूम .. माय बेड .. थँक यु कीर्ती .. आणि कीर्तीला हाताला पकडून त्याने एक गिरकी डान्स मध्ये घेतात तशी गिरकी घेतली .. "
आनंद चेहऱ्यावर दिसत होता अगदी ..
श्लोक उठला आणि त्या फोटो फ्रेम कडे गेला
आणि आई कडे बघून म्हणाला
श्लोक " आई .. हि बघ रूम .. कशी छान आवरलीय .. अगदी तुला पाहिजे असायची तशी .. आणि त्याने आईच्या फोटोच्या कपाळावर किस केले .. "
श्लोक " बाबा .. हि बघा तुमची सून ...... प्रियाला तर तुम्ही बरोबर घेऊन गेले .. पण मी आणली सून तुमच्या साठी "प्रिया " तू तर बोलूच नकोस .. तुला काय घाई होती एवढी जाण्याची .. आणि माझा विचार पण केला नाहीत ना तुम्ही .. " आवाज कापरा आणि जड होतं होता त्याचा
कीर्ती ने श्लोक चा चेहरा हातात घेतला
कीर्ती " श्लोक , एक मिनिट .. माझ्या कडे बघ .. अजिबात डोळ्यातून अश्रू काढायचे नाहीत .. ह्या सगळ्या प्रेमाच्या आठवणी आपण इथे साठवून ठेवू .. इथे येऊन दुःख नाही आनंद झाला पाहिजे .. आपला आनंद साजरा करायला इथे यायचे .. आई वडिलांना मुलगा सुखात आहे हे कळल्यावर च आनंद होतो .. तू खुश आहेस हे खूप आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळायला .. त्यामुळे आज मला एक प्रॉमिस कर .. प्रिया च्या आठवणीने तू आता रडणार नाहीस .. मी आहे तुझ्या सोबतीला .. आणि या रूम मध्ये तर अजिबात नाही रडायचं .. तिच्या आत्म्याला वेदना होत असतील तुला दुःखात बघून .. कळलं "
श्लोक चे आलेले अश्रू कीर्तीने परत पाठवले
श्लोक ने कीर्तीला तिथल्याच बेड वर बसवले . तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात बघत
श्लोक " काल साठी खरंच सॉरी "
कीर्ती " अरे सॉरी नको बोलूस प्लिज .. आता होऊन गेले ते आणि बहुदा ते घडले ते चांगलेच आहे .. मला पण खरं तर खूप वाईट वाटलं कि मी इतकी स्वार्थी कशी झाले .. मला तुझ्या प्रियाची जागा घ्यायचीच नाहीये .. आणि मी काल ती घ्यायला गेले होते .. इथून पुढे असे होणार नाही याची खबरदारी आपण दोघांनीही घेऊ"
श्लोक " म्हणजे... मला कळलं नाही तुला नक्की काय म्हणयचय ते "
कीर्ती " म्हणजे फार काही नाही .. आता तरी मला तुला हेच सांगायचंय कि आपण नवरा बायको नंतर आधी चांगले मित्र बनूया .. तुझे सब कॉन्शन्स माईंड अजून मला पत्नी म्हणून स्विकारायला तयार नाहीये.. आणि मला प्रियाची जागा अजिबातच नकोय .. त्यामुळे पुन्हा अशी माझ्याशी जवळीक तू करू नकोस प्लिज ते मला सहन होणार नाही .. "
श्लोक " कीर्ती .. ऐक ना .. सॉरी तूझा काहीतरी गैर समज झाला असेल तर मी सांगतो .. आय लव्ह च्या पुढे प्रिया हा शब्द मी दिवासातुन एक नाही हजारदा बोलायचो .. कदाचित त्यामुळे तो निघाला .. सॉरी यार मला तुला दुखवायचं नव्हतं .. सिरिअसली जे झाले ते खूप वाईट झाले .. आता नाही होणार असे कधी "
कीर्ती " श्लोक .. तू वाईट मानू नकोस .. थोडासा माझा विचार कर .. त्या क्षणी तुझ्या तोंडून आलेला शब्द मला खूप काही सांगून गेला .. प्लिज मला आता त्या क्षणां ना परत कधीच फेस करायचे नाही .. मी तुझ्या वर अजिबात रागावले नाहीये .. फक्त आता नकोच .. आपण आपले नाते नवरा बायको म्हणून एकमेकांना नाहीच स्वीकारायचे .. मस्त फ्रेन्ड राहू .. एकमेकांचे सुख दुःखाचे सोबती म्हणून राहू .. जसे आता पर्यँत राहिलो .. आणि कर्तव्य म्हणून किंवा माझ्यावर कोणताही अन्याय नको होयला म्हणून आपले नाते पुढे नेण्याची काही एक गरज नाहीये .. कारण मी तुझी अवस्था समजू शकते .. लग्नाच्या डिसक्शन पर्यंत गेलेलं नाते अचानक संपुष्ठात आले .. हि गोष्ट पचवणे वाटते तितके सोपी नाहीये .. मी समजू शकते तुझ्या भावना .. "
श्लोक " प्रियाची जागा तू घेतेय असे खरंच काही नाहीये .. मी जेव्हा तुझ्या शी लग्न केले तेव्हाच आणि त्या क्षणा पासून मी खरं तर तिच्यातुन बाहेर आलोय .. माझा साठी पण हे कठीणच होते .. आणि म्हणूनच दोन वर्षे मध्ये गेली .. दोन वर्षे माझं मलाच समजत नव्हते कि मी आता का जगतोय ? कोणासाठी जगतोय ? खूप विखुरलो गेलो होतो .. घरात जीव घुसमटायचा माझा .. असे वाटायचे कुठे तरी जाऊन जीव द्यावा .. कसा त्यातून बाहेर आलोय हे माझे मला माहितेय .. पण तू आल्याने माझ्या जीवनाला अर्थ मिळालाय .. दिशा मिळालीय .. आणि खरं सांगतो .. मी तुझ्यात तिला शोधतोय का असे कदाचित तुला वाटेल पण तसेही नाहीये .. तुम्हा दोघींमध्ये जमीन अस्मान चा फरक आहे .. काल मी तुझ्या वर कोणता अन्याय होतोय वगैरे म्हणून नाही ग राणी .. मी खरंच ... कसे सांगू आता तुला मला काहीच समजतं नाहीये "
बोलता बोलता त्याने कीर्तीच्या मांडीवर डोके ठेवले .. प्लिज रागावू नकोस ना ... प्लिज डोन्ट लिव्ह मी अलोन "
कीर्ती ने त्याच्या केसांवर हात फिरवत
कीर्ती " नाही रे मी अजिबात तुझ्या वर रागावले नाहीये .. तू उगाच गैरसमज करू नकोस .. तुला असे वाटतंय का मी तुझ्या वर रागावली आहे .. मी आज उठल्या उठल्या प्रियाची माफी मागायला .. आणि आता खाली जाते तू पण तिची माफी माग .. कारण थोडा वेळ का होई ना तू हि भरकटला होतासच "
श्लोक " नाही यार इट वाजन्ट मिस्टेक .. इट वॉज अवर मोमेन्ट "
कीर्ती " हे बघ श्लोक .. माझ्या दृष्टीने तरी ती मिस्टेक होती माझी .. तुझ्या बद्दल मी काहीच स्टेटमेंट करत नाहीये .. झाल्या गोष्टीचा आपल्या रेग्युलर लाईफ वर कोणताही परिणाम नको "
आणि कीर्ती उठून खाली निघून गेली
श्लोक बराच वेळ तिथे त्या फोटो कडे बघत बसला .. कधी आई , कधी बाबा , कधी प्रिया .. तिघांकडे भरल्या डोळ्यांनी बघत बसला
श्लोक " आई बघतेस ना .. काय झाले .. .. एवढे होऊन सुद्धा ती जराही चिडली नाही माझ्यावर .. रागावली नाही आणि नाही तिने .. एवढे कोणी सहनशील असू शकते .. आज मला माझीच लाज वाटतेय .. मी तिच्या आयुष्याची वाट लावली का ग आई ?"
मनात असंख्य प्रश्न होते आणि उत्तर मात्र नव्हते .. कीर्तीने तिच्या समजूतदार पणाने तिच्या पुरते सोल्युशन काढून विषय मिटवला होता .. बराच वेळ तो खाली आला नाही म्हणून कीर्ती
कीर्ती " श्लोक .. ये खाली आता नाहीतर उशीर होईल ऑफिसला जायला .. आज आता जॉगिंग ला नको जायला .. ये खाली... मी कॉफी बनवलीय "
श्लोक ने मन घट्ट केले आणि खाली आला .. तिच्या समोर गेला .. आणि तिला घट्ट मिठी मारली त्याने .. ती एकदम स्तब्ध होती .. तिच्या कपाळावर किस केले .. तिच्या गालावर किस केले आणि तिच्या ओठावर पण हलके किस केले
श्लोक " हे बघ काही झालेलं नाही .. “
कीर्ती " श्लोक , नको ना .. आता मी काय वरती सांगितले तुला .. तू आता मुद्दामून असे वागतोय का ?"
श्लोक " बायकोला किस करणे हि चांगली गोष्ट असते आणि त्यात मॉर्निंग किस म्हणजे मग तर काय बघायलाच नको "असे म्हणून त्याने अजून एकदा तिला किस केले
कीर्ती " श्लोक .. तुला प्रिया ची ..." तिचं वाक्य पूर्ण होयच्या आधीच श्लोक ने तिच्या तोंडावर हात ठेवला
श्लोक " शु... जास्त बोलू नकोस प्लिज .. प्रियाचं काय करायचं तिला विसरायचं का आठवणीत ठेवायचं हा फक्त माझा डिसिजन असेल त्यात मला तुझा इंटरफेअर नकोय .. तू त्या बाबतीत कोणताही निर्णय नाही घ्यायचास .. तू फक्त तुझ्या आणि माझ्या बाबतीत निर्णय घेऊ शकतेस .. फक्त तुझ्या आणि माझ्या बाबतीत .. माझा भूतकाळ हा फक्त माझाच आहे त्यात तू नको लक्ष घालू "
कीर्ती " पण त्याचा भूतकाळाचा परिणाम आता आल्रेडी झालाय आपल्यावर "
श्लोक " हो होणारच ना .. कारण तुला अजून पूर्णपणे सगळे माहित नाहीये .. काल अचानक बऱ्याच दिवसांनी आणि त्या क्षणी तिचे नाव माझ्या तोंडून येण्या मागे पण कारण आहे ते फक्त मला माहित आहे ..
सांगितले ना तुला मी या आधी मी तुला आय लव्ह यु कधीच म्हंटले नाही .. आणि काल मला तेच म्हणायचे होते पण सवयी प्रमाणे माझ्या तोंडून प्रियाचे नाव आले.. मला आता तुला फक्त हेच सांगायचे आहे कि माझ्या बायको वर माझे प्रेम आहे .. आणि भूतकाळात माझी कोणीही बायको नव्हती "
कीर्ती " पण स्वप्न तर बघितली होतीसच ना तिला बायको बनवण्याची "
श्लोक " हो नक्कीच .. ठीक आहे सध्या तुला मी कितीही सांगितले तरी तुला पटणार नाही .. पण मी काय आणि कसे तुझ्याशी वागायचे हे तू नाही ठरवायचे .. मी कोणाचं असे ऐकत नाही .. मला पाहिजे तेव्हा मी .. "
कीर्ती "नाही.. म्हणजे नाही .. मी सारखी सारखी प्रिया ची माफी मागणार नाही "
श्लोक " तुला कोणी सांगितले तिची माफी मागायला .. आणि माफी मागितली असशील तर आता जाऊन सॉरी बोल .. कारण तुझ्या अशा बोलण्याने तर नक्कीच तिला वाईट वाटेल .. प्रिया रसायनच फार वेगळे होते .. सांगेल तुला कधीतरी पण तू नॉर्मल झालीस तरच सांगेन "

🎭 Series Post

View all