स्विकार भाग 23

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग २३

क्रमश : भाग २२

ईशा " अरे हळू .. केवढ्या जोरात ओरडतोस "
चिनू ने लगेच मोबाईल काढला आणि सासर्यांना फोन लावायला लागला
ईशा" अरे काय करतोय .. आधी ऐकून तर घे ना "आणि तिने फोन आधी त्याच्या कडून ओढून घेतला आणि कट केला "
चिनू " मी आधीच सांगतो प्लिज डोन्ट ट्राय माय पेशन्स .. हे असले काही अजिबात करायचे नाही "
ईशा " किती चिडतोयस सकाळ पासून .. कंटाळा आला मला .. एक वाक्य सुद्धा बोलून देत नाहीयेस .. प्रत्येक गोष्टीत तुला ऑब्जेक्शन आहे "
चिनू " हो मग तू मला पटेल असे काहीच वागत नाहीयेस .. मला आता आपली फॅमिली लाईफ सुरु करायचीय .. आणि हा आता नवीन विषय मला कळतोय .. नाही म्हणजे अजिबात नाही "
ईशा " चिनू .. मला तर वाटतंय तुला आता मी आवडतंच नाही ... सकाळ पासून मी बघतेय नुसत्या कंप्लेंट वर कंप्लेंट चालू आहेत "
तसा चिनू जरा नरमला
चिनू " सॉरी .. जरा जास्तच झाले माझे बहुतेक .. खरच सॉरी .. आणि तो तिचा हात हातात घेऊ लागला "
तर पटकन तिने तो मागे घेतला रागाने
चिनू " सॉरी ना यार .. चल तुझ्या आवडीचे आईस क्रिम खाऊ "
हॉटेल बिल पे करून दोघे रस्त्याने चालत जवळ असलेल्या आईस क्रीम पार्लर ला निघाले ..
इकडे किचन चे काम आवरून कीर्ती बाहेर सोफ्यावर बसली तर तिचा मोबाईल वाजला
मोबाइल बेडरूम मध्ये होता ..
कीर्ती " श्लोक .. फोन घे ना प्लिज "
श्लोक " चिनू चा आहे .. घेऊ का ?
कीर्ती " हमम.. "
चिनू " ए रडे .. काय करतेय ?"
श्लोक ला पटकन हसायलाच आले .. कारण आताच काही वेळा पूर्वी दोघे किती रडले होते .. त्यात कीर्ती खरंच रडू बाई आहे .. सारखी डोळ्यांतून पाणी येते तिच्या .. चिनू ने परफेक्ट नाव ठेवलंय तिला " रडे "
श्लोक " हॅलो .. "
चिनू " श्लोक .. तुम्ही आहे का ? रडु बाई कुठे आहे ? अक्चुअली आम्ही दोघे आईस क्रिम खायला आलोय .. तुम्ही दोघे जॉईन होतंय का आम्हाला .. विचारायला फोन केलाय "
ईशा "श्लोक .. या ना .. कीर्ती ला घेऊन .. मज्जा येईल "
श्लोक " मी विचारतो तिला .. ती थकली नसेल तर येतो दोघे "
चिनू " ठीक आहे .. मग सांगा पाच मिनिटात .. आम्ही पोहाचून जाऊ तिकडे"
श्लोक " हो ठीक आहे "
श्लोक बाहेर येऊन
श्लोक " तुला आता बाहेर जायला आवडेल का ? म्हणजे ते दोघे आईस क्रिम खायला गेलेत .. आपल्याला बोलवत आहेत "
कीर्ती " श्लोक आता नको ना .. मला कंटाळा आलाय .. आणि मी उद्या ऑफिस ला पण जाणार आहे "
श्लोक ला मनापासून खूप हायसे वाटले .. त्याला आता तिची सोबत हवी होती .. ती त्याच्या जवळ हवी होती .. आता बाहेर जायचा कंटाळा आला होता .. तिने जर जायचं म्हटलं तर जावेच लागले असते. तिला माझ्या मनातली गोष्ट न सांगता कळली म्हणून मनोमन खुश झाला
श्लोक " मग सांग तुझ्या फ्रेंड ला आपण उद्या भेटू आईस क्रिम साठी "
कीर्ती ने लगेच कॉल करून सांगून टाकले आज नाही जमत आहे ,, उद्या येईन "
श्लोक पण तिच्या शेजारी बसला .. आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा पडला ..
कीर्ती "चल जाऊ आत मध्ये म्हणजे झोपता येईल लगेच .. इथे अवघडेल "
श्लोक " नाही .. बघ तुला TV बघायचंय ना "
कीर्ती ने टीव्ही बंद केला ... दोघे आत आले ..
कीर्ती नाईट ड्रेस घालून आडवी पडून
कीर्ती " मला सगळं ऐकायचं .. प्रिया कुठे भेटली .. कधी भेटली ? तुम्ही काय काय करायचे ? मला सगळे तिच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल "
श्लोक " सांगेन कधीतरी आज नको .. असे म्हणत तिला कुशीत घेऊन दोघे झोपले
दुसऱ्या दिवशी जॉगिंग , नाष्टा , डबे घेऊन दोघे आपापल्या ऑफिस ला गेले ..
दुपारी तिला मेसेज आला " तुझ्या साठी एक गिफ्ट बेड वर आहे .. संध्याकाळी तयार रहा .. आपण डिनर ला बाहेर जाणार आहे "
कीर्ती " ओके .. आणि स्माईली "
संध्याकाळी घरी आल्यावर तिने बेड वरचे गिफ्ट ओपन केले तर त्यात आकाशी रंगाची साडी होती..
साडी बघून गोड हसली .. नशीब शॉर्ट ड्रेस नाहीये .. घरा बाहेर शॉर्ट ड्रेस घालून जायचे म्हणजे दिव्यच होते तिच्या साठी .. तो यायला वेळ होता म्हणून तिने थोडा वेळ आराम केला .. आणि साडी नेसून तयार झाली आणि वरच्या रूम मध्ये गेली .. कालचे धुतलेले पडदे त्यांना इस्त्री करून तिने एकेक करून लाव णार होती . कपाटातील मग सगळ्या वस्तू एकेक करून छान अरेंज करून ठेवल्या .. कपाटातल्या एका कप्प्यात तिला एंगेजमेंट रिंग दिसली .. बाजूला एक चिठ्ठी दिसली .. तीने ती ओपन केली आणि खाली पहिली तर युअर्स प्रिया असे लिहले होते .. एक क्षण तिने ती बंद केली .. अशी दुसर्याने लिहलेली लेटर वाचणे चुकीचे आहे असे वाटून तिने ती तशीच ठेवून दिली पण लगेच दुसरा विचार आला .. वाचते .. काय लिहलंय ते तरी कळेल

हाय बेबी ,
माय स्वीटू ... उमहा ... लव्ह यु शोना .. एक गुड न्यूज आहे .. डॅड ला पटवलंय मी .. तुझी फायनल एक्साम झाली कि लगेच आपली एंगेजमेंट ठरवत आहेत ते .. मला असे झालंय कधी एकदा आपले लग्न होतंय .. पण ठीक आहे तुला नोकरी लागे पर्यंत लग्न नाही असे डॅड म्हणतायत .. पण म्हणून एंगेजमेंट करणार आहेत माझ्या साठी .. हे खूप आहे .. तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. आय एम सो एक्ससायटेट बेबी ..
ए हॅलो .. आल्यावर मला माझा किस पाहिजे आधीच सांगून ठेवते .. आणि नाही किस केलास तर कट्टी ... लग्न होयला खूप अवकाश आहे .. एक किसच तर मागते ना मी तुझ्याकडे .. कंजूष कुठला "
आय वॉन्ट माय किस " नाहीतर मी भूक हडताळ करेन
आणि एक तू येशील तेव्हा आम्ही घरी कोणीच नसू मी डॅड आणि मॉम आम्ही शपिंग ला जातोय ... कसली शॉपिंग माहितेय का ? माय एंगेजमेंट शरारा आणायला जातोय आम्ही .. तुझी अंगठी मी आणेल .. माझ्या साठी तू आणायचीस .. तुझ्या चॉईस ची अंगठी पाहिजे मला ..
ओके .. बाय .. रात्री किस चे लक्षात ठेव ..
यूअर्स जान
प्रिया
कीर्ती ने चिठ्ठी पुनः होती तशी घडी घालून ठेवली आणि खाली गेली ..
छान तयार होऊन श्लोक ची वाट बघत बसली .
म्हणजे एवढं तर तिला कळले होते कि श्लोक च्या आई वडिलांनी तिला सून म्हणून स्वीकारले होते आणि लवकरच त्यांची एंगेजमेंट होणार होती ..
श्लोक आल्यावर दोघे तयार होऊन ते दोघे बाहेर जात होते गाडी चालवता
कीर्ती " आज काल जरा जास्तच गिफ्ट्स मिळतायत मला "
श्लोक " पण आवडतात का तुला .. खरं सांगू... बाबा .. आई ला असे गिफ्ट्स द्यायचे .. रोज काही ना काही तरी संध्याकाळी बाबा आईला काही तरी गिफ्ट आणायचे .. मी तरी कधीतरी आणतो .. बाबांना वेळ नाही मिळाला तर निदान फुल किंवा फुलांचा गजरा तरी नक्कीच आणायचे "
कीर्ती " किती छान ना .. "
श्लोक " खूप दोघांचे एकेमेकांवर प्रेम होते .. तुला माहितेय कीर्ती .. आई बाबा गेले तेव्हा .. बाबांनी आईचा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता .. मेल्या नंतर हि दोघांचे हात एकमकेकांच्या हातात होते . जेव्हा अग्नी दिला ना तेव्हा दोन सरण शेजारी शेजारी लावली पण मी हात सेपरेट केले नाही .. आणि दोघांना एकदम अग्नी दिला .. आणि मग प्रियाला या हाताने अग्नी दिला मी .. " त्याचा आवाज पुन्हा जरासा जड झाला होता
कीर्ती ने त्याच्या दंडावर किस केले आणि हाताने रब केले ..
कीर्ती " यु आर ब्रेव बॉय ..” आणि त्याच्या खांद्यावर पुन्हा किस केले
श्लोक " सॉरी .. मी आता हा विषय उगाच काढला ना .. "
कीर्ती " नो .. असे अजिबात नाहीये .. आपल्या आई वडीलां बद्दल बोलायला काही वेळ काळ बघायची गरज नाहीये .. आणि प्रिया बद्दल बोलायला तर नाहीच नाही .. तु कधीही आणि केव्हाही बोलू शकता माझ्याशी .. इनफॅक्ट मीच तुला थँक यु म्हणते कि तु या विषयवार माझ्या शी बोलतोस .. हि गोष्ट शेअर केल्या बद्दल थँक यु "
श्लोक " मी किती खुश आहे काय सांगू .. तू हे सगळे इतक्या पॉझिटिव्हली घेतल्या बद्दल थँक्स "
बोलता बोलता दोघे मोठया रेस्टारंट ला आले .... छान मस्त स्पेशल कॉर्नर मध्ये बसले .. मस्त कॅण्डल लाईट डिनर चालू होते .. श्लोकच ऑर्डर वगैरे सर्व बघत होता .. काही काही गोष्टी कशा खायच्या हे पण कीर्तीला कळत नव्हते . तो तिला समजावून सांगत होता .. आणि नाही जमले तर तोच तिला भरवत होता .. खूप छान वेळ घालवत होते दोघे .. मनातून खुश होते ..
https://www.youtube.com/watch?v=SY7KIX6z7NE&ab_channel=SuperhitMusic
ये लम्हा जो ठहरा है
मेरा है ये तेरा है
ये लम्हा मैं जी लूं ज़रा
तुझमें खोया रहूँ मैं
मुझ में खोयी रहे तू
खुदको ढूंढ लेंगे फिर कभी
तुझसे मिलता रहूँ मैं
मुझसे मिलती रहे तू
ख़ुद से हम मिलेंगे फिर कभी हाँ फिर कभी

तेवढयात एक हॉटेल चा फोटो ग्राफर आला ..
फोटो ग्राफर " सर .. हॉटेल तर्फे कॉम्प्लिमेंटरी फोटो काढून देणार आहोत .. तुम्ही दोघे इंटरेस्टेड आहेत का ?"

श्लोक " ओके "
फोटो ग्राफर " सर .. पलीकडे आमचा स्टुडिओ आहे .. तर तिथे याल का ? तोपयंत तुमचे बिल येईल "
श्लोक " ओके "
दोघे त्या स्टुडिओ मध्ये गेले तर फोटो ग्राफर ने एक रेड हार्ट शेप चा बलून श्लोक च्या हातात दिला .. आणि तिला हा बलून देताना फोटो काढू असे सजेस्ट केले ..
कीर्ती डोळ्यानेच त्याला सांगत होती "नको .. नको .. नॉर्मल एक फोटो काढू .. आणि जाऊ "
श्लोक ढोपरांवर बसला आणि दोन्ही हातात तो रेड बलून घेऊन तिच्या समोर बसला .. तिथे मागे फॅन होता म्हणून त्याचे सिल्की केस थोडेसे माथ्यावर आले होते .. डोळ्यांत वेगलीच चमक आली होती .. हि वॉज रिअल .. फोटो ग्राफर सांगतोय म्हणून नुसता नावा पुरता नव्हता.. त्याच्या डोळ्यांत दिसत होते ते भाव .. माहोल अचानक नॉर्मल कॅण्डल लाईट डिनर चा बदलला आणि एकदम रोमँटिक डेट मधेच गेला .. कीर्ती त्याच्या डोळ्यांत बघत होती .. आणि डोळ्यांत आनंदाश्रू , लज्जा भरली होती .. एक दोन मिनिटाने तिने हात पुढे केला .. तो बलून घ्यायला आणि त्या मोमेन्ट ला फोटो क्लीक झाला तेव्हा दोघें भानावर आले.
फोटो ग्राफर " मस्त .. काय पोझ दिलीत सर "
श्लोक ढोपरांवरून उठून नॉर्मल उभा राहिला आणि त्याने कीर्तीच्या फोरहेड वर किस केला .. फोटो ग्राफर ला वाटले तो अजून एक पोझ देतोय .. आणि त्याने अजून एक फोटो क्लीक केला.
दोघे हातात हात घालून त्यांच्या जागेवर येऊन बसले .. पाच मिनिटात बिल आले .. आणि फोटो ग्राफर ने लगेच ते फोटो त्याला मेल वर पाठवले .. आणि सांगितले हार्ड कॉपी तुमचा ऍड्रेस द्या तिकडे पाठवेन "
श्लोक ने ते फोटो बघितले आणि एकटाच हसला ..
प्रेम कर म्हणून एखाद्याला सांगावे लागत नाही .. जेव्हा मनात एखाद्या बद्दल प्रेम असते ना तेव्हा ते डोळ्यांत आपोआप दिसते .. समोरच्याला सुद्धा न सांगता बरोबर कळते .. कारण मनाची मनाला आवड कळलेली असते आणि निवड झालेली असते . एकदा का मनाने निवडलं कोणाला कि मग फक्त प्रेमाचा वर्षावच करायचा असतो .. तेव्हाच या मनाला शांती मिळते ..

🎭 Series Post

View all