स्विकार भाग 21

Story Of Newly Married Couple


स्विकार भाग २१
क्रमश : भाग २०

चिनू चे ऐकूनच हिला घाम फुटत होता .. एक मन वाटे हो यार हे किती छान होईल आणि एक मन वाटेल छे ! हे काय माझ्या बस कि बात नाही .. मी सकाळ संध्याकाळ असा जेवण खाणे बनवत नाही बसणार .. मी जिम ला नाही गेले तर इतक्या मेहनतीने आणलेले ६ ऍब्स निघून जातील .. याला काय ढेर पोटयाला बोलायला .. एक्सरसाइज करणे माझे आवडीचे काम आहे .. हे कसे मी सोडू ... आणि मी अशीच आहे हे त्याला माहित होते ना .. तेव्हा तर त्याला हे सगळे माझे आवडायचे .. मला म्हणायचा तू टिपिकल मुली सारखी वागत नाहीस हीच तुझी स्पेशालिटी आहे आणि आता त्याला टिपिकल बायको पाहिजे .. असे कसे चालेल ? या सगळ्याला कारणीभूत त्याची आई .. तिला टिपिकल सून पाहिजे ...
----------------
कीर्ती आत रूम मध्ये गेली तर काल जशी ते टाकून आले होते तशीच ती रूम होती ..
कालच्या फोटोकडे तिचे लक्ष गेले .. श्लोक चे आई बाबा .. श्लोक .. आणि प्रिया .. चौघे किती आनंदात होते .. चौघे एकमेकांना बघत होते आणि श्लोक च्या हातात एक टेडी होता आणि एक प्रिया च्या हातात एक टेडी होता .. आणि दोन्ही टेडी एकमेकांकडे बघत होते .. श्लोक च्या हातातला टेडी पिंक होता म्हणजे गर्ल आणि तिच्या हातातला टेडी ब्लु होता म्हणजे बॉय .. बहुदा असेच काहीतरी कॉम्बिनेशन त्यांनी ठरवून केले असेल ..
कीर्तीने त्या फोटो वरून हात फिरवला .. टचकन पाणी आले तिच्या डोळ्यातुन .. इतक्या आनंदी माणसांना देवाने का असे केले .. किती दुःख आहे हे एकाच दिवशी एकाच ऍक्सीडेन्ट मध्ये एकाच वेळी सर्व जवळच्या व्यक्तींना .गमावणे ... अचानक असे पोरके होणे .. श्लोक च्या मनात किती यातना आहेत .. सुखी संसाराची स्वप्न त्याने बघितली असतील .. तिचे लक्ष प्रिया च्या फोटो कडे लक्ष गेले .. एकदम चुलबुली .. बबली .. हसमुख , सुंदर सुरेख .. आणि डोळे तर इतके बोलके होते कि त्या फोटोत सुद्धा तिच्या डोळ्यांत तिला श्लोक आणि त्याच्या बरोबर बघितलेली स्वप्न दिसत होती .. आणि श्लोक च्या डोळ्यात प्रिया आणि प्रिया ने पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करण्याची ओढ दिसत होती .. जसे लाईफ मध्ये एक पॉईंट येतो कि बास .. या पेक्षा वेगळे काही मला देवाने नाही दिले तरी चालेल .. हे जे आहे तेच पूरेसे आहे .. माझी झोळी भरलीय असे समाधान श्लोक च्या आई बाबांच्या डोळ्यांत दिसत होते .
कीर्ती च्या काय मनात आले काय माहित ? कीर्ती ने सगळी रूम आवरायला घेतली .. ह्या रूम ला आठवणींची रूम करायचे ठरवले .. हे आनंदाचे .. प्रेमाचे क्षण त्या रूम मध्ये असे अस्ताव्यस्त पसरलेलं आणि स्टोअर केले होते त्या क्षणांना तिने प्रेमाने सजवायचे ठरवले आणि ती कामाला लागली
प्रत्येक गोष्टी वरच पांढर कापड काढले .. धूळ लागलेली , जाळी जळमटे तिने साफ केली .. श्लोक च्या स्टडी टेबल वर प्रिया चे आणि त्याचे पाच सहा फोटो फ्रेम होत्या .. एका फोटोत श्लोक ने प्रिया ला पाठी मागे खांद्यावर उचलून घेतलेय आणि बीच वर तिला उचलून तो चालत होता .. दोघेही खळखळून हसत होते ... कीर्तीच्या चेहऱ्यावर तो फोटो बघून स्माईल आली .. तिने ती फ्रेम साफ केली आणि त्या फ्रेम ला किस करून छान मांडून ठेवली .. एका फ्रेम मध्ये .. प्रिया श्लोक ला दोन्ही हाताने जवळ ओढत त्याच्या गालावर किस करत होती .. आणि श्लोक चे सिल्की केस त्याच्या डोळ्यांवर आले होते .. आणि थोडासा वैतागल्या सारखा दिसत होता .. त्याच्या डोळ्यांतील ते बोलके भाव बघून कीर्तीला कसतरीच होत होते .. किती क्युट होता हा .. आता एकदम शांत झालाय ..
एका फ्रेम मध्ये त्याने क्रिकेट चा ड्रेस घातलाय .. आणि हेल्मेट च्या आतून त्याचे फक्त डोळे दिसत होते .. एका फ्रेम मध्ये चेअर वर बसलाय आणि डोळे मिटून तल्लीन होऊन गिटार वाजवत होता .. आणि त्याच फ्रेम मध्ये अर्धा फोटो प्रिया चा होता .. तिने गिटार हातात घेऊन वाजवण्याची पोज दिलीय फक्त आणि ती ने श्लोक कडे बघून एक डोळा मारतेय असा कोलाज होता.. एका फोटोत श्लोक च्या हातात कसली तरी मोठी ट्रॉफी होती आणि मागे सगळे त्याचे मित्र आणि मैत्रिणी होते रिचर्ड , विकी , नेहा , माया आणि मॉमी .. आणि मध्ये श्लोक आणि त्याच्या एका हातात ट्रॉफी आणि एक साईडला प्रिया च्या खांद्यावर हात टाकला होता त्याने ..
सर्व फोटो बघून कीर्ती श्लोक चा भूतकाळ तिच्या कल्पनेच्या जगातून पाहून आली .. बोल बोलता रूम चा अवतार बदलला .. सगळी अडचण एक साइडला करून .. पसारा आवरून .. सगळ्या वस्तू छान विचार करून तिने मांडल्या .. बेड , साइड टेबल ,स्टडी टेबल छान आवरून झाले .. खिडक्यांचे पडदे वॉशिंग मशीन ला लावले.. आता दोन कपाटे होते ती लावायची राहिली होती .. घड्याळात बघितले तर ६ वाजले होते .. आता थोड्याच वेळात श्लोक येईल म्हणून ती खाली आली आणि फ्रेश होयला गेली ..
कीर्ती मनात विचार करत होती प्रिया ची जागा तर मी नक्कीच नाही घेउ शकणार.. नक्कीच तो प्रियाला कधी विसरणार नाही पण आता यापुढे तो निदान दुखी होणार नाही .. या चा नक्कीच विचार क रुन वागेन .. गेल्या जन्मात मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल कि श्लोक सारखा साथीदार मला लाभलाय .. माझ्या प्रेमाच्या ज्योती ने मी त्याच्या मनातील दुःखा च्या काळोखाला नाहीसा करून आनंदाचा उजेड पसरवायचा प्रयत्न करेन.. वर वर एवढा हसतो पण मनातून प्रिया ची जागा मला देताना त्याला किती यातना होत असतील .. त्याच्या मनात नेहमी द्वंद्व चालू असेल .. आणि शिवाय माझ्या वरही अन्याय त्याला करायचा नसतो ..
मॅडम शॉवर खाली अंघोळ करत ज्या विचारात रमल्या कि त्यांना बाहेर त्यांचा फोन खणखणतोय याचा आवाज पण नाही आला .. बराच वेळ फोन उचलत नाही म्हटल्यावर श्लोक ला जरा टेन्शन आले .. तो हातातले काम टाकून घरी निघाला .. एक मिटिंग पण त्याने पोस्टपोन केली .. आणि दहाव्या मिनिटाला घरी पोहचला .. त्याच्या कडच्या कीज ने त्याने दार उघडले आणि अल्मोस्ट धावतच घरात शिरला ..
श्लोक " कीर्ती .. कीर्ती ... काहीच रिप्लाय नाही "
मग बेडरूम मध्ये आला तर बाथरूम मधून पाण्याचा आवाज आला .. म्हणजे ती आत आहे .. तरी पण बराच वेळ झाला म्हणून त्याने बाथरूम चे दार ठोकावले .. तेव्हा हिच्या विचारांची तंद्री भंगली .. आणि तिने शॉवर बंद केला
कीर्ती " एक मिनिट .. आले मी " ती एकदम नॉर्मल बोलली .. तिला माहितीच नाही इकडे हा किती पॅनिक झा ला होता ते
पाच एक मिनिटांनी बाथरोब लावून ती बाहेर आली
श्लोक " काय हे ? किती फोन केले .. इतका वेळ कोण अंघोळ करत ?" तिच्या वर तो रागाने ओरडलाच
कीर्ती ने बेडवर असलेला तिचा मोबाईल बघितला तर तिला कळले कि त्याचे १० मिस्ड कॉल आहेत .. आणि हे हि लक्षात आले कि आपण जवळ जवळ एक तास शॉवर खाली बसलोय
कीर्ती " सॉरी .. ते मी फेस पॅक लावला होता आधी .. आणि मग बाथ त्यामुळे उशीर झाला "आणि फोन बाहेर होता तर शॉवर च्या आवाजात मला आवाज नाही आला "
श्लोक " हमम.. " असे म्हणून लगेचच बाहेर जाऊन बसला .. "
राग आला तरी मोकळे पणाने चिडायचा पण नाही तो .. पण आपली किती काळजी आहे त्याला हे मात्र तिला कळून चुकले होते ..
तिने मुद्दामून त्याने दिलेली शॉर्ट जीन्स आणि टी शर्ट घातले .. नुकतेच अंघोळ केलेली त्यामुळे केसांतून पाणी ओघळत होते .. तशीच किचन मध्ये गेली आणि दोघांसाठी कॉफी करून घेऊन आली ..
श्लोक फोन वर बोलत होता .. तर समोर तिला शॉर्ट जीन्स मध्ये तिला कॉफी घेऊन येताना बघुन गोड हसला.. ती पण भुवया उंचावून त्याला जणू विचारत होती " खुश का ?"
त्याने फोन वर बोलता बोलता एक हाताने कॉफी घेतली .. आणि नजरेनेच तिला थँक यु दिले .. दोन एक मिनिटांनी त्याच कॉल संपला
श्लोक " अग .. केस पूस ना ते .. संध्याकाळची वेळ आहे सर्दी होईल .. आणि त्याने आत अजून स्वतः टॉवेल घेऊन आला आणि तिचे केस पुसू लागला ..
कीर्ती " मी पुसते .. तू कॉफी घे .. थंड होईल ती "
तसाच तो टॉवेल मागे टाकून ती पण त्याच्या शेजारी कॉफी घ्यायला बसली .. खूप काही श्लोक साठी करावं असे तिला वाटत होते पण काय आणि कसे काहीच सुचत नव्हते .. त्याला काही आवडले नाही तर .. फारसे काही माहित पण नाही .. तो जास्त त्याच्या बद्दल बोलत पण नाही .. नक्की कुठून सुरुवात करू .. ती बसल्या बसल्या पुन्हा एकटक विचारात हरवली .
श्लोक ने तिच्या डोळ्यांसमोर एक टिचकी वाजवली " हॅलो .. कसला विचार करतेय ?"
कीर्ती " अ .. नाही काही नाही .. कसा गेला आजचा दिवस .. "
श्लोक " आज खूप कामाची गडबड होती .. उद्या आणि परवा तर अजून गडबड असणार आहेत एकाच वेळी ३ केसेस च्या डेट्स आल्यात .. माझी एका क्लाएंट जवळ मिटिंग होती ती कॅन्सल करून आलो मी .. बराच वेळ झाला फोन नाही उचलास तू "
कीर्ती " सॉरी .. " असे म्हणून त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती बसली .. "
ती स्वतःहून आपल्या जवळ कशी काय आली ? तिला तिच्या घरच्यांची आठवण तर येत नसेल ना .. दिवस भर एकटीला घरात ठेवून गेलो मी .. दुपारी येणार होतो ते पण नाही आलो आणि साधा एक कॉल पण नाही केला मी " श्लोक विचार करू लागला
श्लोक ने तिच्या कपाळावर हात ठेवून तिला ताप आहे का बघितले
कीर्ती " मी ठीक आहे .. बरी आहे .. काही नाही झालंय मला .. बस मनात कसेतरी होतंय .. काहीतरी अस्वथ होतंय .. एकदा मिठीत घे ना मला प्लिज "
श्लोक ने बसल्या बसल्या त्याचा ब्लेझर काढला .. आणि तिच्या खान्द्यावरून हात टाकून तिला जवळ घेतले
श्लोक " काय झालं ? कसला विचार करतेस तू ? असे वाटतंय कि आता रडणार आहेस .. काही त्रास होतोय का तुला ?"

🎭 Series Post

View all