स्विकार भाग 19

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग १९
क्रमश : भाग २०
श्लोक " शु... एकदम शान्त .. आता काही बोलू नकोस .. एकदम शान्त हो "
कीर्ती त्याच्या छातीवर डोके ठेवून " का असे केलेत तुम्ही .. तूमच्या मनात दुसरी कोणी असताना का माझ्याशी लग्न केलेत .. का ?"
श्लोक " मी काय सांगितले .. शान्त हो बघू .. एवढं काहीही झालेलं नाहीये .. तू शांत हो आधी .. बघ तुला श्वास हि नीट घेता येत नाहीये .... "
कीर्ती " सोडा ना मला .. मला नको वाटतंय हे सगळे .. हे पाप आहे .. प्लिज सोडा "
श्लोक " अरे शोना .. असे नाहीये काही .. हे तू काय विचार करतेय .. तू चुकीच्या ट्रॅक वर जाऊन विचार करतेय "
कीर्ती " नाही मी .. चुकीच्या ट्रॅक वर लाईफ आलीय माझी .. श्लोक प्लिज सोड मला .. आणि ती त्याच्या मिठीतुन बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागली \"\"
श्लोक " कीर्ती ...काय करतेय .. शांत हो ना .. प्लिज .. शान्त हो .. त्याच्या हाताने तो तिच्या केसांवर हात फिरवत होता .. "
कीर्ती " मला सोडा "
श्लोक " सोडतो पण एक मिनिट माझ्या कडे बघ .. तिने मान वर करून त्याच्या कडे बघितले .. रडून रडून डोळे लाल झाले होते .. नाक लाल झाले होते .. खूप हर्ट झाले होते तिला .. खूप हेल्पलेस वाटत होते तिला .. टपाटप मोठं मोठे अश्रू पडत होते आणि काही केल्या थांबायला तयार नव्हते .श्लोकने तिचा चेहरा हातात घेतला ... तिच्या डोळ्यांत पाहत त्याने तिला किस केले "
कीर्तीने एक सेकण्ड डोळे मिटले .. पण दुसऱ्याच सेकंदाला ती लांब जायचा प्रयत्न करू लागली.. पण श्लोक तिला सोडतच नव्हता
कीर्ती हळू आवाजात " का ? का असे करतोय ? ज्या नात्याला काही अर्थ नाही त्याचा फायदा घेऊन प्लिज मला जगण्याच्या सुद्धा लायकीची नाही अशी नको करू प्लिज .. "
श्लोक " मी कोणत्याही नात्याचा गैरफायदा घेत नाहीये .. विश्वास ठेव माझ्यावर ... आणि पुन्हा तो तिला किस करू लागला .."
त्याला हे माहिते होते कि ती आता या गोष्टीला तयार नाहीये तरी त्याने या नात्याला पुढे नेण्यासाठी हे पाऊल उचलले होते
कीर्ती " काय करतोय तू .. आर यु आऊट ऑफ सेन्सेस "
श्लोक " अजिबात नाही .. तू शांत हो .. मगाच चा विषय अर्धवट राहिलाय .. "
कीर्ती चे डोळे त्याने दोन्ही हाताने पुसले .. आता एक अश्रू जरी आला ना तर मी खरोखर ओरडीन हा आता ..
तिला घेऊन बेडरूम मध्ये आला .. तीला बेड वर बसवले आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून आडवा पडला .. तिचा हात हातात घेऊन तो बोलू लागला .. मी जे सांगणार आहे ते तू विचार करते या पेक्षा भयानक आहे .. तू कशी रिऍक्ट करशील याचीच भीती वाटत होती मला .. पण आता जर एक गोष्ट डोक्यात ठेवून ऐकणार असशील तर च मी पुढचं सांगेन "
कीर्ती " कोणती ?"
श्लोक " माझ्या भूतकाळाचा माझ्या वतर्मानवर आणि भविष्यावर काहीही परिणाम होयला नाही पाहिजे.. कारण मी ना भूतकाळात काही चूक केलीय ना वर्तमानात .. तुझ्या माझ्या नात्यावर माझ्या भूतकाळाचा परिणाम झाला नाही पाहिजे .. तू माझि बायको आहेस आणि ह्या घरावर आणि माझ्यावर तुझाच हक्क आहे हे आधी डोक्यात फिक्स कर म्हणजे मग पुढचे बोलता येईल "
कीर्ती \" खूप गोधळली होती .. हा असा काय बोलतोय .. नक्की याची माझ्या कडून काय अपेक्षा आहे काही कळत नव्हतं "
श्लोक "तू जरी तिला आणायचे म्हंटलेस ना तरी ती नाही येऊ शकणार .. अशा ठिकाणी गेलीय ती "
कीर्ती " तीच... लग्न झालं का ... "
श्लोक " जरा ऐकून घे ना .(पुन्हा जरासा आवाज वाढला चिडल्यासारखा ) .. " नको ते प्रश्न नकोस विचारू ना राजा (थोडा टोन बदलत ) .. आणि एक तिच्या बद्दल बोलताना प्लिज बी केअरफूल .. मला सहन नाही होत ते "
कीर्ती ने परत हुंदका भरला .. " मी कुठे काय तिला बोलले .. "
त्याच्या साठी ती किती महत्वाची आहे हे तिला सहनच होत नव्हतं ..
श्लोक " ती आणि आई बाबा तिघे एकाच गाडीत होते .. ती गाडी ड्राईव्ह करत होती .. आणि त्याच ऍक्सीडेन्ट मध्ये ती पण गेली मला कायमची सोडून " श्लोक च्या डोळ्यांतून अश्रू ओघळला .. "
श्लोक आता त्याचे अश्रू दाबायचा प्रयत्न करत होता .. हे ऐकून कीर्तीला शॉकच बसला होता .. " ओह गॉड .. एवढया लहान वयात देवाने असे का करावे तिच्या बाबतीत .. सॉरी श्लोक .. मी मगाशी खूप गैर समज करून घेतला .. सॉरी खरच सॉरी ..
श्लोक ने पटकन तिच्या पोटाला घट्ट पकडलं .. त्याच्या केसांतून ती हळुवार प्रेमाने हात फिरवू लागली ..
श्लोक " पुन्हा नाही ना म्हणणार कि मला डिवोर्स दे .. म्हणून .. मला अजिबात नाही आवडले ते वाक्य "
कीर्ती " सॉरी .. मी चुकले .. पुन्हा असे कधीच नाही म्हणणार .. सॉरी तुला हर्ट केले .. मी खरंच कधी कधी फार वेड्या सारखी वागते .. माझ्या पेक्षा दुसरे कोणीतरी प्रिय आहे तुझ्या मनात हे एक्सेप्ट च होत नव्हतं मला "
श्लोक " पण मी नाही काढू शकणार तिला माझ्या मनातून .. मला काढायची पण नाहीये तिला मनातून .. तुला माझा तिच्या सकट स्विकार करावा लागेल .. करू शकशील ना हे माझ्यासाठी ? "
कीर्ती " का नाही .. माझ्या फोबिया सकट तू मला स्विकारलेस ना मग मी एवढं तर नक्कीच करेन .. "
श्लोक " फोबिया हा काही फार मोठा प्रॉब्लेम नहिये ग .. आणि उलट बायकोचा हात धरून चालायला कोणत्या नवऱ्याला नाही आवडणार "
कीर्ती " थँक यु श्लोक तू मला किती समजून घेतोस आणि मी जेव्हा तुला एकदा समजून घ्यायची वेळ आली तर लगेच डिवोर्स पर्यंत पोहचले .. सॉरी खरंच दिल से सॉरी "
श्लोक " यु शुड बी "
कीर्ती " हमम .. "
श्लोक " ठीक आहे झोप आता .. खूप उशीर झालाय .. तुझी मैत्रीण पण आलीय ना "
कीर्ती " हो ना .. ते दोघे समोर समोर आले ना कि जीव घेतील आता उद्या .. "
श्लोक " असे काही होणार नाही .. बघ मी सांगतो .. चिन्या तर वाट बघतोय तिची .,. ती बघायला आली म्हटल्यावर नाचायला लागेल "
कीर्ती " तो नाचेल रे पण हि बया त्याला नाचवेल तो नाच आपल्याला बघायला लागणार आहे .. चिनू म्हणत होता ती लिटरली त्याच्या उरावर बसून त्याला मारते "
श्लोक " बघू आता उद्याच उद्या .. " बोलतच त्याने तिला कुशीत घेतले .. कीर्ती मात्र अजूनही खूप अस्वथ होती .. पण आता त्याच्या कुशीत तिला सेफ वाटत होते .. त्याच्या चेहर्या कडे बघत .. त्याच्या ओल्या पापण्या तिला त्रास देत होत्या ..
श्लोक " कीर्ती .. झोप आता .. थकलीय तू पण माहितेय मला "
सकाळी साधारण १० वाजता "कोण तरी जोर जोरात ओरडतंय असा आवाज आला म्हणून श्लोक ला जाग आली .. एक मिनिट त्याला कळलंच नाही ... कि नक्की कसला आवाज येतोय .. पण पुन्हा जोर जोरात ओरडण्याचा आवाज
कीर्ती .. श्लोक .. वाचवा मला .. कीर्ती .. अग ए कीर्ती .. "
कीर्ती छान गाढ त्याच्या कुशीत झोपली होती .. तिला हलकेच बाजूला करून तो उठला आणि बाहेर आला .. आणि चिनू ची रूम वाजवू लागला
श्लोक " चिनू ... ए चिनू ... ईशा .. काय झालंय .. " आणि दार ठोकवू लागला
ईशा " काही नाही .. ह्याची जखम चेक करतेय .. म्हणून ओरडतोय तो "
चिनू " ए कीर्ती .. तुझ्या कडे कीज असल्या डुप्लिकेट तर दार उघड .. हि माझा जीव घेईल आज नाहीतर "
ईशा " मी जीव घेईन तुझा .. थांब आता बघतेच तुला .. "
चिनू " आई.. ग .. सोड ना नालायक हात दुखायला लागलाय माझा .. नवरा अजून पेशंट आहे कळत कि नाही "
ईशा " हेच काय ते एक चांगले काम करतोस कि कीर्तीला वाचवतोस नेहमी .. म्हणून तुझ्याशी लग्न केले ..नाहीतर .. माकडा तुला बघितले पण नसते मी "
चिनु " ओह शट अप .. मी लग्न केले नसते ना तर अजून कुवारी राहिली असतीस .. म्हणे जिम ट्रेनर .. " असे पोटाला ऍब्स काढून संसार नसतो होत .. पोटाला चिमटे काढावे लागतात "
ईशा " तू काढ ना तुझ्या दोंदल्या पोटाला .. किती सुटलय ते पोट .. अरे नालायक .. लाज वाटते मला तुझी माझा नवरा म्हणून सांगायला .. सगळीकडून सुटलायस ते .. थोडासा पण एक्सरसाईज करता येत नाही का तुला ?"
चिनू " काय करू एक्सरसाईज करून .. भूक लागली कि बाहेरचा वडापाव खातो .. त्याने सुटलय पोट माझे .. कधी डबा देतेस का पौष्टीक "
ईशा " आता काय सकाळी डबे बनवत बसू तुझ्या साठी .. आणि जिम सोडून देते "
चिनू " दे सोडून .. आणि माझ्या बरोबर इकडे ये राहायला .. मी इकडे बदली करून घेतो .. "
ईशा " बघ हा .. नंतर जर इकडे आल्यावर भांडलास ना माझ्याशी तर "
आत चिनू ने तिचा हात पिरगळला
ईशा " ए चिन्या .. हात सोड नालायका .. बायकोचा हात पिरगळतो .. लाज कोंड्या "
चिनू " तुझी तर आता .. पुन्हा जर मला सोडून एक दिवस जरी माहेरी गेलीस ना तर घरी येऊन तंगडे तोडून तुझ्या बापाच्या हातात देईन .. मला म्हणे आमच्या घरी रहा .. मी काय इतका निलाजरा आहे का .. तुझ्या बापा च्या घरी राहायला ?"
ईशा " अरे सोड ना हात .. दुखतोय .. "
चिनू " थांब अजून माझे झालेलं नाहीये बोलणे "
ईशा " बोल पण तुझी ताकद कशाला लावतोस .. जाड्या "
चिनू " ते आईचे आणि तुझे काय ते लवकर मिटव आधीच सांगतो हे आयुष्य भर आई बघू का बायको बघू मध्ये मी फसणार नाही आधीच सांगून ठेवतो .. "
ईशा " ते तू बघ .. तुझी आई आपला डिवोर्स करायला बसलीय .. मी नकोच असते त्यांना "

🎭 Series Post

View all