स्विकार भाग 13

Story Of Newly Married Couple
क्रमश:
स्विकार भाग १३
क्रमश : भाग १२
आता काय आणखी सरप्राईझ आहे संध्यकाळी काय माहित ? मला या असल्या ड्रेस वर नक्की कशी हेअर स्टाईल करावी .. कसा मेक अप करावा हे पण कळत नाही .. असा विचार करतच तिला झोप लागली
बऱ्याच वेळाने दाराची बेल वाजल्यावर जाग आली .. इकडे दाराची बेल वाजली आणि इकडे मोबाईल पण खणखणला
तिने आधी मोबाईल उचलला
श्लोक " हाय .. झोपलेलीस का ?"
कीर्ती " हो .. आता उठतेय .. ऐका ना बाहेर कोणीतरी आलंय .. मी पाच मिनिटात करू का कॉल .. बेल वाजतेय "
श्लोक " हो तेच सांगायला फोन केलाय.. बाहेर पार्लर वाली आहे .. त्या ड्रेस वर साजेसा मेक अप आणि हेअर स्टाईल करून देईल ती "
कीर्ती " हो का .. बरं झाले .. मला जरा टेन्शनच आले होते .. त्याचे .. ऐक ना .. मी बाहेर येणार नाही त्या ड्रेस वर .. मला लाज वाटते "
श्लोक " लाज काय वाटायची त्यात.. मी आहे ना आणि बरोबर .. पार्टीला असेच कपडे घालायचे असतात "
कीर्ती " मी त्यापेक्षा साडी नेसू का .. ब्लँक साडी आहे माझ्या कडे .. खूप छान आहे "
श्लोक " ती नेक्स्ट टाईम नेस .. आता हाच ड्रेस घाल "
पुन्हा बेल वाजली
कीर्ती " ठीक आहे मी दार उघडायाला जातेय " आणि फोन कट केला "
कीर्तीने दार उघडले तर बाहेर अशी मुलगी होती कि तिला बघून कोणी म्हणणारच नाही कि हि पार्लर वाली आहे .. स्वतःच एक मॉडेल असावी अशी आली होती .. म्हणजे कुठल्या तरी मोठ्या प्रोफेशनल पार्लर मधून नक्कीच आली असावी .. एक मिनिट कीर्तीला वाटले मी हिच्या पुढे खूप साधी वाटतेय कि काय ?"
कीर्ती " प्लिज ये ना .. बस ना .. "
आणि कीर्तीने तिला कॉफी आणि स्वतःला कॉफी करून घेतली .. मग तिने तिला ड्रेस दाखवला
दाखवताना पण तिला ऑकवर्ड वाटत होते
पार्लर वाली " वंडरफुल ड्रेस आहे .. आणि तुम्हाला खूप छान दिसेल ..
पार्लर वालीने तिला छान तयार केले .. थोडासा मेक अप केला .. केसांना थोडे कर्ल केले . थोडीशी डार्क लिपस्टिक लावली .. कीर्ती तिला सारखी सांगत होती .. थोडी कमी लिपस्टिक कर .. तरी पण तिने हो हो म्हणत आहे तेवढीच ठेवली .. डोळ्यात काजळ , ब्लॅक स्मोकी eyes .. एकदम मॉडेल दिवसायला लागली होती कीर्ती ..
तिचा मेक अप करून झाल्यावर ती गेल्यावर हिने लिपस्टिक पुसायचे ठरवले पण नेमका श्लोक त्याच वेळेला आला
पार्लर वाली " सर , एनी सजेशन or यु वॉन्ट एनी चेंज ? प्लिज लेट मी नो "
श्लोक ने तिला पहिले आणि गालात हसला .. “ परफेक्ट .. जस्ट टाय हर हेअर्स लाइक मेस्सी बन .. आफ्टर वर्ड शी कॅन ओपन
कीर्ती आपली एखाद्या नटवलेल्या बाहुली सारखी वावरत होती . पार्लर वालीने सांगितलेले चेंजेस केले आणि निघून गेली
श्लोक पण फ्रेश झाला आणि तो पण पार्टी साठी तयार होऊ लागला .. त्याने ब्लॅक शाईन चे शर्ट आणि क्रीम पॅन्ट .. घालून मस्त परफ्युम मारून मोकळा झाला
कीर्ती ने त्याच्या साठी ही कॉफी केली .. आणि बाजूला बसून राहिली
कीर्ती " कुणीकडे जाणार आहोत आपण ?"
श्लोक " कुठेच नाही .. पार्टी घरात आहे "
कीर्तीला खूप हायसे वाटले .. पण मनातून चरफडत होती .. " मग कशाला एवढे त्या पार्लर वालीला बोलावून माझा मेक अप करायला सांगितले काय माहित .. ह्याला काय मी रोज घरात अशी नटून बसलेली पाहिजे कि काय हा येईल तेव्हा "
श्लोक " हॅलो .. कसला विचार करतेय ?"
कीर्ती " नाही .. काही नाही .. "
श्लोक " छान दिसतेय तू या ड्रेस मध्ये आणि या लूक मध्ये .. "
कीर्ती " मला थोडे ऑकवर्ड होतंय .. घरातलया घरात एवढा मेक अप आणि एवढी डार्क लिपस्टिक मी एखाद्या हिंदी सिरीयल मधली व्हिलन तर नाही ना दिसत? "
श्लोक जोर जोरआत हसायला लागला " अरे यु आर लुकिंग डॅम ब्युटीफुल ... आणि एकदम हळूच हॉट ... डोन्ट वरी at ऑल "
कीर्ती " शी .. बाबा .. बायकोला कोणी हॉट म्हणते का ? काय पण तुझे ?"
श्लोक काही पुढे बोलणार तर तेवढयात बेल वाजली ..
कीर्ती तर पटकन बेडरूम मध्ये पळाली .. तिला कोणी अशा अवतारात बघायला नको म्हणून
श्लोक तिला पळताना बघून जाम हसत होता
एक जण केक घेऊन आणि पार्टी चे बाकीचे सामान घेऊन आला होता .. ड्रिंक्स .. वगैरे
एक जण बाहेर बार्बीक्यू चा सेट अप लावायला आला होता .. श्लोक ने सर्वांना सूचना दिल्या आणि मग तो बेडरूम मध्ये आला
कीर्ती " कोण आले होते .. सांग ना .. नक्की काही तरी आहे ना .. काय आहे आज ?"
श्लोक " आज डेट काय आहे .. ?"
कीर्ती " तसे नको ? काय ते सांगा मला .. मला खूप अन इझी होतंय "
श्लोक " अरे बायको .. डोन्ट टेक टेन्शन .. मी आहे ना तुझ्या सोबत "
बोलता बोलता श्लोक ने तिला आरशा समोर उभी केले .. आणि तिच्या गळ्यातले सोन्याचे मंगळसूत्र तो हाताने कढत होता..
कीर्ती " श्लोक .. काय करतोय .. नको ना .. मला नाही आवडत काढायला .. तो काही मिरवायचा दागिना नाहीये .. "
श्लोक " शु... मी करतोय ना नीट "
श्लोक ने एक बॉक्स मधून डायमंड चे मंगळसूत्र काढले आणि ते घातले .. छोटेसे मंगळसूत्र .. त्यातले हार्ट चे पेंडंट त्यात SK अशी डायमंड ने डिझाईन केलेलं होते .. डेलिकेट येट एलिगण्ट असे ते होते .. कीर्तीच्या गोऱ्या पान गळ्यात ते अजूनच छान दिसत होते . श्लोक आरशातून तिला पाहत होता आणि ती त्याच्या नजरेत कैद झाली होती .. हलकासा स्पर्श त्याच्या हाताचा तिच्या माने ला होत होता आणि त्यानेही दोघांच्या अंगावर शहारे येत होते .. श्लोक ने हळूच त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले पण ती मात्र सटकन पुढे झाली ..
कीर्ती " आज काय आहे ते सांगितले नाहीस .. प्लिज सांग ना "
श्लोक " हो .. सांगतो .. आज आपल्या लग्नाला तीन महिने झाले .. म्हणून आपल्या घरी पार्टी आहे ..ऍक्च्युअली माझे सर्व फ्रेंड ला तुला भेटायचंय .. मग मी त्यांना घरीच बोलावलंय .. जास्त नाहीयेत .. सगळे मिळून 5 जण आहेत .. "
कीर्ती " काय ? मी तुझ्या फ्रेंड समोर अशी ? प्लिज नको ना .. श्लोक .. मला अजिबात कंफर्टेबल नाही होतंय .. कसे वाटतंय हा ड्रेस .. किती शॉर्ट आहे .. "
श्लोक " डोन्ट पॅनिक .. अग त्यात 3 जणी तर मुली च आहेत ..हाय सोसायटी पार्टीज मध्ये असेच जावे लागते डार्लिंग .. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर .. "
कीर्ती अक्षरश: रडवेली झाली
श्लोक " मला माहितेय तुझ्या साठी हा मेजर चेंज आहे .. एरवी मी काही बोलतो का ? फक्त आजच्या दिवस .. प्लिज .. आज माझे सगळे फ्रेंड्स येणार आहेत आणि सगळे असेच कपडे घालून येतात .. प्लिज .. आणि हे असे घाबरून येणार आहेस का बाहेर .. तू तुझ्या घरात आहेस .. म्हुणुन पार्टी मी मुद्दामून घरात ठेवली कारण तुला जास्त कंफर्टेबल वाटावे म्हणून .. आणि खरंच सांगतो .. हे छान दिसतंय .. छान काय यु आर रिअली लुकिंग गॉर्जस .. सिरिअसली "
तेवढ्यात दाराची बेल वाजली
श्लोक " गेट रेड़ी .. आले ते सगळे .. आणि त्याने तिचा ड्रेस जो दोन्ही बाजूने शोल्डर च्या खाली हवा होता तो तिने वरती करून त्याचा शो घालवला होता तो पटकन त्याने खाली सरकवून दिला " आणि बाहेर दार उघडायला गेला
कीर्ती आरशात बघून मोठे मोठे श्वास घेऊ लागली .. आरशात बघून खोटे खोटे हसून बघत होती छे.. हसताना पण रडकी दिसत होती .. सॉलिड प्रेशर मध्ये आली होती ती .. तिला बाहेरचे आवाज येत होते
श्लोक " वेलकम !!! प्लिज कम .. "
फ़्रेंड्स " हाय ... हाऊ आर यु .. लुकिंग हँडसम हा .. "
एक जण " आय हाय .. कातिल दिसतोय रे तू .. "
एक जण " अरे .. तू तर .. अजूनच हॉट दिसायला लागला .. व्हेअर इज शी ? आय एम डेस्परेट टू सी हर "
श्लोक ने सर्वांना बाहेर बसवले ..
श्लोक " ह्याव अ सीट .. मी आलोच .. "
श्लोक आत मध्ये आला तर कीर्तीच्या डोळ्यात पाणी आले होते .. आणि आता जोर जोरात रडायलाच येणार होते तिला
श्लोक " इट्स ओके .. डोन्ट क्राय .. अग का घाबरतेस .. आता मेक अप खराब होईल तुझा .. " आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतले .. " सॉरी तुला न विचारता केला मी प्लॅन .. पण तू तयार नसती झालीस म्हणून मी अचानक केला .. सॉरी तुला असे नसेल बाहेर यायचं असे तर नको येउस .. तू तुला जे आवडेल ते घालून ये बाहेर .. मी जातो बाहेर फ्रेंड्स ला असे बसवून ठेवून मी पण आत मध्ये थांबणे बरोबर नाही वाटतं ना .. ठीक आहे .. पण रडू नकोस यार .. "
आलेल्या अश्रूंचा आवंढा गिळून कीर्ती त्याच्या मिठीत डोळे मिटून शांत बसली होती ..
श्लोक " मी जाऊ का बाहेर ?कीर्ती .. सोड ना मला .. मी जाऊ का बाहेर "
कीर्ती " सॉरी श्लोक .. काय करू मी ? मला काहीच सुचत नाहीये.. तू एवढं छान प्लॅनिग केलेस ते माझ्या मुळे खराब होईल ना "
श्लोक " तुझ्या डोळ्यात पाणी आले तर सगळेच फुकट आहे .. मी उगाच बोलावले सगळ्यांना .. तुला अजून थोडा वेळ द्यायला पाहिजे होता मी "
आणि श्लोक बाहेर निघून गेला ..
कीर्ती बेड वर बसली .. काय करू ? आता त्याने सांगितलंय पाहिजे तो ड्रेस घाल .. मग चेंज करू का ?"
फ्रेंडस " अरे श्लोक .. व्हेअर इज शी ...
श्लोक " एस .. शी इज गेटिंग रेडी .. वेट फॉर ५ मिनिट्स " रुम मधून बाहेर येतच तो बोलत होता तर तेवढयात कीर्ती ने येऊन त्याचा कोपरा पासून हात पकडला .. आणि त्याच्या शेजारी एकदम गोड स्माईल देत उभी राहिली.
क्रमश :

🎭 Series Post

View all