स्विकार भाग 12

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग १२

क्रमश : भाग ११
कीर्ती " अग ... तुला तर माझा फोबिया चा प्रॉब्लेम माहितेय ना .. "
ईशा " हो .. नक्कीच .. इनफॅक्ट त्या फोबिया मुळे माझ्या मागे हा कार्टून लागला ना "
कीर्ती " ऐक तर .. काल माझा ना एक मोठा ऍक्सीडेन्ट होता होता वाचला .. "
ईशा " काय बोलतेस काय ? कीर्ती .. अग .. काय हे तुझ्या नवऱ्याला काही अक्कल आहे कि नाही ? तुला एकटीला सोडून गेला कि काय तो "
कीर्ती जरा वैतागली "अग तू एक ना .. मग बोल "
ईशा " म बोल ना पटपट रापे .. किती हळू सांगतेस "
कीर्ती " अग हो .. जरा तोंड बंद ठेव ( कीर्ती एकदम ठसक्यात बोलली )
श्लोक ते ऐकून गालातल्या गालात हसला .. चिडली कसली क्युट दिसते ना .. तिच्या डोक्यावरची शीर लगेच दिसायला लागते .. तिला कळणार नाही असे तिला बघत होता तो
ईशा " कीर्ती .. बोल .. तुला काही लागल का ? जर तुला काही लागले असले ना .. तर गेला तुझा नवरा .. मी तुझ्या घरात येऊन त्याला ठोकून काढेल "
ईशा नावाचे प्रकरण हे साधे प्रकरण नाहीये .. ते म्हणजे २४ तास वादळाला सामोरे जाण्या सारखेच होते .. आणि चिनू नावाचा नावाडी त्यात आपली नाव दोन वर्ष कशी बशी चालवून आता थकला होता ..
कीर्ती " मी आता तुला एक वाजवीन हा ... यात त्यांचा काही दोष नाहीये .. कळलं "
श्लोक ला अंदाज आला होता काय चर्चा चालली असेल ते "
ईशा " त्याचा नाही म कोणाचा .. तू एकटी रस्ता क्रॉस करायची वेळ आलीच कशी ते मला सांग ? आज किती वर्ष आपण सगळे सांभाळून करतोय आणि तू .. "
कीर्ती " अरे यार ईशा .. तू जरा माझे ऐकते का ? मला जास्त महत्वाचे बोलायचंय "
ईशा " तुझ्या पुढे आणि तुझ्या या फोबिया पुढे मला काहीच महत्वाचे नाहीये माहितेय तुला "
कीर्ती " पण तू असतेस का आता माझ्या बरोबर ? नाही ना ? मग तू माहित नसताना का दोषी ठरवतेस एखाद्याला ?"
इशा " अरे यार .. "
कीर्ती " यार नाही आणि काही नाही ..काल चिनू ने मला वाचवले .. पण त्यात चिनू चा ऍक्सीडेन्ट झालाय .. तो हॉस्पिटल मध्ये आहे "
ईशा " व्हॉट ? " आणि ईशा एकदम शांत झाली .. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले ..
कीर्ती " हॅलो ... ऐक ना तू टेन्शन नको घेऊस .. तो बरा आहे .. आम्ही आताच जाऊन आलोय.. त्याला डोक्याला टाके पडलेत बाकी ठीक आहे तो .. जखम जरा खोल आहे तर उद्या रात्री डिस्चार्ज मिळेल कदाचित "
ईशा " हमम .. ठीक आहे .. पण पहिल्यांदा काहीतरी चांगले काम केलय त्या घोड्याने .. नुसता आईचा लाडोबा आहे "
कीर्ती " अग आता हि वेळ आहे का त्याचे दोष पहायची.. तू इकडे ताबडतोब निघून ये "
इशा " चल हट .. मी नाही येणार त्या माकडाला बघायला .. त्याच्या आईला फोन कर .. तिला भारी पुळका असतो त्याचा आणि त्याला पण तिचा .. त्याला मी नसले तरी चालेल पण आई पाहिजे .. मी नाही येणार ... आणि तसही दोन टाके पडल्याने काय होतय .. होईल बरा तो .. "
कीर्ती " काय हे ? मला हि अपेक्षा नव्हती तुझ्या कडून "
ईशा " त्याच लायकीचा आहे ग तो "
कीर्ती " ठीक आहे .. नको येऊस .. घेऊन बस तुझा इगो तुझ्या जवळ .. मी बघते काय करायचे ते .. तसही आम्ही दोघे आहोतच त्याची काळजी घ्यायला .. तरी पण मला वाटले तुला सांगावे .. तुला पहायला तरसलाय तो "
ईशा " मग यायचं होते ना मला घ्यायला .. का गेला मला न सांगता एवढया लांब .. तेव्हा नव्हती अक्कल .. बिन डोकं कुठला ?"
कीर्ती " अरे पण तू तरी का त्याला सोडून गेलीस आई कडे ?"
ईशा "अग ती बाई .. त्याची आई माझ्या डोक्यात जाते .. माझ्या समोर आमच्या दोघांचे लग्न मोडायचं असते तिला .. आता झाली ना दोन वर्ष तरी अजून तिने मला एकसेप्ट केले नाहि "
कीर्ती " अग पण यात चिनू चे हाल होतात ना? "
ईशा " आणि माझे नाही होत .. मला हे असे आई कडे रहायला काय आनंद होत असेल का ?"
कीर्ती " मग तुम्ही दोघे सेपरेट रहा ना .. कशाला बाकीच्यांचा विचार करता .. पण निदान तुम्ही दोघे तरी एकत्र पाहिजे कि नाही "
ईशा " मी बोलले त्याला .. तर म्हणतो याच गावात आई बाबा आहे तर मी दुसरीकडे राहिलो तर गावात नामुष्की होईल .. "
कीर्ती " बरोबर आहे मग त्याचे .. "
ईशा " तू त्याची वकिली करू नकोस हा माझ्या समोर .. वकिलीण बाई "
कीर्ती " वकिलीण बाई काय ? मला त्याचा मुद्दा बरोबर वाटला ते मी सांगितला "
इशा " बायको माहेरी राहिल्याने काही फरक पडत नाही का ? त्याने नामुष्की होत नाही का त्याच्या घराण्याची ?"
कीर्ती " तू एक काम कर .. तू इकडे माझ्या घरी निघून ये .. दोघी मिळून त्या चिनू च्या डोक्यात प्रकाश पाडू "
ईशा " नाही नको यार .. कीर्ती .. तूला माहित नाही .. परवा दारूच्या नशेत मला फोन वर बोलत होता " मी तुला डिवोर्स देतो .. "
कीर्ती " काय ?"
ईशा " हो .. मी म्हटले .. मी आल्रेडी मनाने डिवोर्स दिलाय तुला .. तुला काय करायचंय ते कर .. आणि मग थोड्या वेळाने त्या हॉटेल मधली मॅनेजर चा कॉल आला .. तेव्हा मागून बोलत होता ...सॉरी ईशा , मी तुला डिवोर्स द्यायचा विचार तरी कसा केला "
कीर्ती " हो असे काही तरी बोलताना ह्यांनी पण ऐकलेय "
ईशा " बघितलेस ना सगळा तमाशा करून टाकलाय त्याने आमच्या नात्याचा .. आता तुझ्या नवऱ्याला पण कळले असेल .. "
कीर्ती " अग .. हो .. पण ते हि आता आपलेच आहेत ना .. तू नको त्याचे टेन्शन घेऊस "
ईशा " ठीक आहे .. चल ठेवते मी .. "
कीर्ती " येणार आहेस का तू .. फायनल विचारते ? "
ईशा " तुला भेटायला मी नक्की येईन .. त्या माकडाला नाही "
आणि ईशाने फोन कट केला
श्लोक इकडे तोपर्यंत कोर्टात जायची तयारी करत होता ..
कीर्ती " निघालास का तू ?"
श्लोक " हो .. काय झाले ? नाही येत का ती ?"
कीर्ती " नाही येत .. ती पण तसलीच आहे आणि तो पण तसलाच आहे .. दोघे हट्टी आहेत "
श्लोक " का ?काय म्हणतेय ?"
कीर्ती " काय त्यांचे त्यांना माहित .. ती एवढी चिडलीय त्याच्यावर कि त्याला बघायला पण यायला तयार नाही "
श्लोक " जाऊ दे .. तू टेन्शन नको घेऊस .. आपण दोघे करू मॅनेज "
कीर्ती " श्लोक .. तुम्हांला माझ्या मुळे उगाचच त्रास ... "
श्लोक " काय झाले ? कसला .. विचार करतेय आता ? मला कसलाही त्रास नाहीये .. "
आणि श्लोक ने तिला पटकन त्याच्या जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर किस केले ..
कीर्ती " ते मी ... त त ..प .. प .. " आणि एकदम आश्यर्य चकित होऊन त्याच्या कडे बघत होती
श्लोक " आता मला निघायला लागेल .. मला यायला ६ तरी वाजतील .. आराम कर .. संध्यकाळी आपण चिनू ला बघायला जाऊ .. आणि मी काय सांगतो ते ऐक .. ती तुझी मैत्रीण चिन्याला बघायला येतेय कि नाही ते बघ .. अशी कुठलीच मुलगी मी तरी बघितली नाही कि नवऱ्याचा ऍक्सीडेन्ट झालाय तरी त्याच्या राग धरून बसेल "

कीर्ती " ती तशीच आहे .. एकदम टॉम गर्ल "
श्लोक ने तिच्या गळ्यात हात टाकले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला
श्लोक " टॉम गर्ल असो नाहीतर सुपर वूमन असो .. एव्हरी वूमन ह्याज स्वीट अँड काइंड हार्ट .. असे माझि आई मला नेहमी सांगायची . इनफॅक्ट आई म्हणायची ते जे काईन्ड हार्ट असते ना तेच प्रत्येक वूमन ला सुपर वूमन बनवत असते .. "
कीर्ती त्याच्या डोळ्यात एकटक बघत होती .. बोलता बोलता तो तिच्या खूप जवळ आला होता .. दोघां चेही हृदय धावत होते एकमेकांना भेटण्यासाठी .. श्लोक तिच्या कानाजवळ जाऊन हळूच बोलला " आय लाईक व्हॉट शी कॉल्ड यु "
कीर्ती ला काही कळलेच नाही तो काय म्हणतोय तिच्या अंगावरून सर्रकन काटा आला होता .. लिटरली गुस बम्प्स
श्लोक कुजबुजत पण इतक्या जवळून कि अल्मोस्ट त्याच्यात ओठांचे स्पर्श तिच्या कानांच्या पाळ्यांना होत होते
कीर्ती " काय ?"
श्लोक "वकिलीण बाई " आणि त्याने पटकन तिच्या गालावर किस केले
आणि मागेही न वळून बघता बाहेर पडून निघून गेला
तो गेल्या नंतरही ती एक मिनिट स्तब्ध उभी होती आणि आता त्याने काय केलंय हे कळल्यावर स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवून लाजत होती..
तेवढयात तिच्या मोबाईल वर मेसेज आला
" तुझ्या साठी एक गिफ्ट ठेवलंय तुझ्या वोर्डरॉब मध्ये पुढेच ठेवलंय .. मी येईन तेव्हा रेडी रहा .. गम्मत आहे तुझ्यासाठी "
श्लोक कोर्टात निघून गेला
कीर्ती बेड वर बराच वेळ पडून राहिली .. मधेच एकटी हसत होती .. मनात काय आले ती उठली आणि तिने तिचे कपाट ओपन केले तर त्यात श्लोक ने सांगितल्या प्रमाणे एक पॅकेट होते . तिने ओपन केले तर त्यात एक पार्टी वेअर वेस्टर्न शॉर्ट ड्रेस होता . ड्रेस दिसायला खूपच भारी होता पण कीर्ती मॅडम चे तोंड पडले .. हे असले शॉर्ट ड्रेस काय ह्याला आवडतात .. त्यावरून थोडी मनातून नाराज झाली .. काल पण त्याने तिला शॉर्ट जीन्स घालायला लावली होती आणि आज तर हा असा वेस्टर्न ड्रेस
तशीच बराच वेळ बेड वर पडून राहिली .. मनात तिच्या विचार येऊ लागले .. कि ह्याने स्वतःने पसंत करून लग्नाला होकार दिलाय म्हणजे नक्कीच मी आहे तशी त्याला आवडली असेल म्हणून मी खुश होते पण प्रत्यक्षात माझे गावातील राहणीमान आणि याचे इकडचे शहरातील राहणीमान मॅच होत नाही कि काय ? काल पासून मला हे असले विचित्र ड्रेस का घालायला सांगतोय काय माहित ?काय नक्की डोक्यात चालू आहे याच्या काय माहित

क्रमश:

🎭 Series Post

View all