स्विकार भाग 11

Story Of Newly Married Couple
स्विकार भाग ११

क्रमश : भाग १०
नाईट लॅम्प च्या मंद प्रकाशात .. एकेक फोटो वर कधी आई च्या चेहऱ्यावर .. कधी बाबांच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याने सगळा अल्बम बघितला .. आज त्याला खूप ऐकटं वाटतं होते .. मनातून अस्वस्थ होता .. आज कीर्ती ला काही झाले असते तर .. या मनात येणाऱ्या अविचाराने त्याच्या अंगावरून सरसरून काटा आला .. डोळ्यांत आई वडिलांच्या आठवणींमुळे आधीच अश्रू होते .. मधेच कीर्तीकडे पहिले .. ती गोळ्यांमुळे गाढ झोपली होती .. त्याचे मन त्याला हेच सांगत होते मला कीर्तीला जपायचं .. कीर्ती माझी आहे .. आज अचानक कीर्ती वर आपला हक्क आहे असे त्याला त्याचे मन सांगू लागले होते .. पुढील काही मिनिटातच त्याने झोपलेल्या कीर्तीला त्याच्या मिठीत ओढले आणि तिला त्याच्या कुशीत घेऊन तो झोपला ..
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला . त्याने बाजारात जाऊन फ्रेश ब्रेड आणि जॅम , बटर घेऊन आला . एकीकडे कॉफी बनवली आणि मग टोस्टर ला ब्रेड स्लाइज टाकल्या आणि ब्रेक फास्ट रेडी केला ..
त्यांनंतर कीर्तीला दुपारी जेवण लागेल म्हणून त्याने डाळ भाताचा कूकर लावला . जशा कुकर च्या शिट्या होऊ लागल्या तशी कीर्तीला जाग आली .. कुकर च्या आवाजाने धावतच किचन मध्ये .. बघते तर श्लोक सॅलड कापत होता
कीर्ती " हे काय ? श्लोक ? तू कशाला करतोय हे सगळे ?"
श्लोक " अरे .. गुड मॉर्निंग .. म्हणायचं असते पहिले हे विसरलीस का ?"
श्लोक " गुड मॉर्निंग .. कसे वाटतंय तुला आता ? आर यु ओके ?"
कीर्ती ने तिच्या मोकळ्या केसांना तिच्या हातात लावलेला रबर ने बांधले आणि मग
कीर्ती " तुम्ही व्हा बाजूला .. मी करते .. "
श्लोक " नो डार्लिग .. तू जा फ्रेश होऊन ये .. मी ब्रेक फास्ट सर्व्ह करतो "
कीर्ती " श्लोक .. हो ना बाजूला .. सॉरी ना .. मला उशीर झाला उठायला .. लगेच काय एवढं सगळे "
श्लोक " अग .. तुला उठायला उशीर झाला म्हणून मी नाही करत आहे .. तुला जरा आराम मिळावा म्हणून करतोय .. आणि आता ८ दिवस तू आराम करायचास .. मग बघू बाकीचे काय ते ?"
कीर्ती " नाही हा .. एवढे दिवस मी घरात एकटी बसून काय करू ? कंटाळा येईल मला "
श्लोक " हे बघ चिनू ला डिस्चार्ज मिळाला कि त्याला इकडेच आणावे लागेल .. तो थोडे दिवस आराम केल्यावर बरा होईल .. त्यामुळे आठ दिवस तर जातील हे सगळे होयला ..
कीर्ती " अरे हो .. ते माझ्या लक्षात आलेच नाही "
श्लोक " आणि हो तू त्याच्या बायकोला इकडे बोलावून घे .. लगे हात आता त्यांची केसच सॉल्व करून टाकू "
कीर्ती " टाकू ? म्हणजे मला समजले नाही ?"
श्लोक " म्हणजे वाघाचे पंजे .. आता बघ मी काय काय करतो ते .. आपण आपल्या प्रेमाने त्यांना त्यांची चूक दाखवून देऊ "
कीर्ती त्याच्याकडे अवाक होऊन बघतच बसली .. मनातच आपले प्रेम .. आणि हे कधी झाले "
कीर्ती त्याची नजर चुकवून आणि विषय बदलायला पाहिजे म्हणून
कीर्ती : मी आलेच अंघोळ करून येते .. झाल काम तेवढे बस झाले .. मी बाकीचे करेन "
श्लोक " तू लवकर ये .. मला भूक लागलीय आता "
कीर्ती " आलेच १० मिनिटात "
कीर्ती पटकन तिचा आपला नेहमी चा कॉलर नेक चा टॉप .. लेगिंग्स घालायला काढून अंघोळीला गेली .. १० एक मिनटात अंघोळ करून ती बाहेर आली तर बाहेर तिने घालायला काढलेले कपडे नव्हतेच .... त्या ऐवजी तिथे एक मस्त शॉर्ट जीन्स आणि त्यावर एक व्हाईट कलर चा टी शर्ट होता .. आणि त्या टी शर्ट वर लिहले होते " यु आर माय फेव्हरेट "
कीर्तीने ते बघितले आणि खुद्कन हसलीच ..
म्हणजे आता साहेबांची मी कोणते कपडे घालायचे यावर पण फर्माईश असणार वाटतं असे मनात म्हणतच तिने ते कपडे घातले ..
कपाटाला फुल्ल मिरर होता .. त्यात मागे पुढे वळून स्वतःलाच बघत होती .. एवढया शॉर्ट कपड्यात तर ती तिच्या आई समोर पण कधी गेली नव्हती .. आणि आता या कपड्यांवर श्लोक समोर कसे जायचे ? अशा विचारात ओल्या केसांवर ड्रायर फिरवला ..
बाहेरून श्लोक " कीर्ती .. आय एम हंग्री .. प्लिज फास्ट "
त्याचा आवाज ऐकून तिने हातात ला ड्रायर पटकन बंद केला आणि बाहेर धावतच आली .. ती बाहेर आली खरी .. पण डायनिंग च्या इथे आल्यावर एकदम शान्त उभी राहिली आणि तिला कळले कि आपण पटकन येण्याच्या नादात त्याच्या समोर या कपड्यात आलेलो आहे .
श्लोक वकील असल्यामुळे समोरच्याच्या मानसिकतेचा त्याचा चांगला अभ्यास असायचा .. त्याने तिला नोटीस केलंय असे दाखवलेच नाही .. कारण त्याच्या नोटीस करण्यावर तिचं अशा कपड्यात तिच्या समोर वावरणे हे अवलंबून होते . तिला बघून त्याचे होश उडाले होते तो वेगळा भाग होता ..
श्लोक " चल यार .. मला खूप भूक लागलीय .. किती वेळ लावतेस तू ?"
असे म्हणत त्याने डायनिंग टेबल वर टोस्ट , बटर , जॅम सर्व अरेंज केले .
तो आपल्याकडे नेहमी पेक्षा वेगळ्या नजरेने पाहत नाहीये ह्याची खात्री झाल्यावर ती पण गॅस जवळ गेली आणि दोघांना कपात कॉफी ओतू लागली
श्लोक ती पाठमोरी असताना तिच्या कडे बघून गालातल्या गालात हसत होता
तिने नेहमी प्रमाणे ट्रे मध्ये कॉफी घेतली आणि डायनिंग टेबल कडे आली
श्लोक " तू बटर बरोबर खाशील का जॅम बरोबर ?"
कीर्ती " मी नुसताच खाईन .. "
दोघांनी नाश्ता केला .
श्लोक " मला दुपारी ३ ते ५ कोर्टात जावे लागणार आहे .. तेवढा वेळ एकटी थांबशील का ?
कीर्ती " हो थांबेन कि ?
श्लोक " गुड .. मग आता नाश्ता झाला कि आपण जाऊन चिनू ला भेटून येऊ .. त्याला नाश्ता आणि लंच सारिका देणार आहे आणि पियुन आज दिवस भर त्याच्या जवळ थांबेल .. आपण जाऊन भेटून येऊ आणि मग मी जेवून इथूनच डायरेक्ट कोर्टात जाईन "
कीर्ती " ठीक आहे .. मी ईशाला फोन करते तोपर्यंत .. "
श्लोक " ठीक आहे "
आता अर्धा एक तास झाला होता ती त्याच्या समोर या कपड्यांमध्ये वावरत होती .. तिचा ऑकवर्डनेस हळू हळू कमी होत होता ..
श्लोक " चल मग निघायचं हॉस्पिटल ला "
कीर्ती .. हो ठीक आहे .. मी चेंज करून येते "
श्लोक " का ? यु लूक डॅम गुड इन धिस .. मग का चेंज करतेय "
कीर्ती " हो पण आपण हॉस्पिटल ला जातोय ना .. तिकडे बरोबर नाही वाटणार हे असले कपडे "
श्लोक " असे नसते ग .. "
असे बोले पर्यंत कीर्ती आत मध्ये जाऊन तिचा नेहमीच ड्रेस घालून बाहेर आली . कशी बशी अर्धा तास तिने तो घातला आणि हॉस्पिटल च्या नावाखाली चेंज करून पण आली
दोघे हॉस्पिटल ला जाऊन चिनू ला भेटले .. चिनू ला तसे बघून कीर्ती चे डोळे पुन्हा पाणावले ... श्लोक ने आणि चिनू ने तिला समजावले .. मग ते घरी आले
कीर्तीने ईशाला फायनली फोन लावायला फोन हातात घेतला
कीर्ती " ए हॅलो .. कशी आहेस ? काय ग मला विसरलीस कि काय ?"
ईशा " हॅलो .. डार्लिंग .., हाऊ आर यु ?"
कीर्ती " नालायक , ऑस्टेलिया वरून येऊन किती दिवस झाले .. मला अजून भेटली नाहीस ? का साधा कॉल पण केला नाहीस ? "
इशा " हो ना यार ? नाही जमले ? ए हॅलो .. पण आपले गेट टुगेदर करू या का ?"
कीर्ती " हो .. म्हणूनच तुला कॉल केलाय मी .. प्लॅन कर ना काहीतरी यार .. मला भेटायचंय सगळ्यांना "
ईशा " विभा ला फोन लावते आणि विचारते .. "
कीर्ती " आणि आपल्या अर्पिता मॅडम चा काही चान्स आहे का भेटायचा ?"
ईशा " अग तुझ्या लग्नाला आली होती ना ती ?"
कीर्ती " हो ना .. काय मज्जा आली सांगतेय .. आणि तिचा मुलगा अक्ष तर इतका गोड आहे ना .. काय सांगू तुला ?"
ईशा " हो .. ना .. यार मला नाही भेटली ती गेल्या ३ वर्षांत "
कीर्ती " तसे माझे विभा चे झाले ग ती नालायक मला गेल्या ३ वर्षात भेटली नाही .. "
ईशा " अग .. तुला तर तर माहितेय आपली विभा .. तोंडातून शब्द बाहेर काढत नाही .. कसा संसार करते काय माहित ? "माझि एक प्रकारे जावंच आहे आता ती "
कीर्ती " हो ना .. छान झाले तिचे सगळे .. आय एम रिअली हैप्पी फॉर हर "
ईशा " हो ना ग .. पण प्रॉब्लेम असा आहे ना .. सासरचे सगळे लोक उगाचच माझ्यात आणि तिच्यात कंपेरिजन करतात .. मग ना मला जाम वैताग येतो यार .. कधी कधी विभा चा पण राग येतो .. एवढे कोणी चांगले कसे काय वागू शकते यार .. मला जमत तिच्या सारखा संसार करायला .. तुला तर माहितेय ना मी ...आय एम नॉट मॅरेज मटेरियल "
कीर्ती " हो पण आता मॅरेज तर केलेसच ना .. आणि तेही लव्ह मॅरेज केलंस तू "
आणि दोघी खी .. खी ... हसायला लागल्या "
ईशा " काय म्हणतोय आमचा कार्टून .. सध्या तुमच्याकडे पडीक आहे ना ?"
कीर्ती " पडीक नाही ग .. तो हॉटेल वर राहतो .. येतो कधी कधी "
श्लोक बाजूला बसून ऐकत होता त्यांच्या गप्पा .. आणि मधेमधे कीर्तीच्या मोहक अदांकडे बघत होता "
इशा " मग .. तुझे कसे चाललंय सांग ? तुम्ही कुठे गेला होतात हनिमून ला "
कीर्ती आता जरा अवघडली .. कारण श्लोक बाजूलाच बसला होता
ईशा " अग चक्क लाजतेस कि काय ?"
कीर्ती " नाही .. नाही .. तसे नाही ग .. तू भेट मग सांगते सगळे "
इशा " बरं ठीक आहे मी प्लॅन करते काही .. "
कीर्ती " ऐक ना .. मला काही तरी सांगायचे होते तुला .. तू फ्री आणि रिलॅक्स आहे स का आता ?"
ईशा " डार्लिंग .. बोल ना .. "
क्रमश :

🎭 Series Post

View all