स्विकार भाग 10

Story Of Newly Married Couple


स्विकार भाग १०

क्रमश : भाग ९
श्लोक " सॉरी मला तुला आणायला यायला उशीर झाला .. पण तू एक फोन करायचास ना मला .. का फोन केला नाहीस ? एवढा परका वाटतो का मी तुला ? आज तुला काही झाले असते तर .. माझा जरा विचार करायचा होतास ना .. "
कीर्ती " सॉरी .. मी तुम्हाला फोन करणारच होते पण थांबले कि तुम्ही कामात असाल .. मला या फोबियाचा कंटाळा आलाय आता "
श्लोक " अरे पण .. निदान मी बरोबर असताना असा प्रयत्न करायचास ना .. नशीब मी तिकडे वेळेत पोहचलो म्हणून आणि चिनू .. तो माझ्या आधी पोहचला होता .. त्यानेच तुला वाचवलंय खरं तर . "
कीर्ती " काय ? म्हणजे चिनू आहे का तो.. जो अजून शुद्धीत नाही आली तो "
श्लोक " हो .. "
कीर्ती च्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले
कीर्ती " कसा आहे तो ? हे काय होऊन बसले .. माझ्यामुळे तुम्हांला दोघांना किती त्रास झालाय "
श्लोक " अग.. आता कशाला रडून त्रास करून घेतेय .. आराम कर ना .. मी तुझ्या आई बाबांना बोलावू का इकडे थोडे दिवस तुझ्या जवळ राहायला .. माझ्याशी बोलायला तुला ऑकवर्ड होत असेल तर .. आई आली तर बरे पडेल नाही का .. तू झोप मी फोन करून येतो बाहेरून "
आणि श्लोक रूमच्या बाहेर जायला निघाला
कीर्ती " श्लोक .. थांब ना .. प्लिज .. नकोय मला आई बाबा .. तू आहेस ना माझ्या बाजूला तेवढे बास आहे मला .. "श्लोक दारातच थांबला पण त्याची पाठ होती तिच्याकडे ..
श्लोक " तसेही सांगावे तर लागेलच ना .. तुझा ऍक्सीडेन्ट झालाय ते .. मग येतीलच ते .. "
कीर्ती " ऐक ना श्लोक .."
कीर्ती त्याला अचानक हक्काने एकेरी हाक मारत होती
कीर्ती " ऐक ना .. प्लिज इकडे ये ना .. प्लिज .. "
श्लोक मागे फिरला तर ती पुन्हा बेड वर उठून बसली होती
श्लोक " अग काय हे .. कशाला उठतेस .. आराम कर ना .. ती सलाईन हलेल .. "
कीर्ती "श्लोक इकडे ये ना ..”
श्लोक ला काय ते समजेच ना
श्लोक " तू झोप .. मी आहे इथेच "
कीर्ती " मला सांगशील नक्की कसे झाले ते "
श्लोक " मी रस्त्याच्या त्या बाजूला गाडी पार्क केली आणि तुला घ्यायला तुझ्या ऑफिस ला येतच होतो तर मला एक ऍक्सीडेन्ट झाल्याचा आवाज आला .. मी धावत धावत आधी तिकडे गेलो .. बघतो तर चिनू ला भरधाव कार ने उडवले होते आणि ती कार समोरच्या डिव्हायडर वर आदळली होती .. गाडीतला ड्राइवर ठीक होता त्याला फक्त डो क्याला थोडी जखम झाली होती .. पण चिनू मात्र रक्ताच्या थारोळ्यात होता
मी पटकन पुढे गेलो " चिनू .. चिनू "
त्या तश्या अवस्थेत पण चिनू .. मला हाताने तू दाखवत होता .. तू हेल्पलेस .. आणि अर्धवट शुद्धीत .. कानांवर दोन्ही हात ठेवून उभी दिसलीस .. माझ्या हृदयाचा ठोका च चुकला आणि अग मला काय झाले ते कळले .. तुला वाचवण्यासाठी चिनू मध्ये आला होता आणि त्याचा एक्सीडेंट झाला ..
मी लगेच त्याला लोकांच्या मदतीने उचलले आणि कार च्या मागच्या सीट वर झोपवले आणि मग तुला हाताला धरून घेऊन आलॊ .. तर तेवढ्यात तू पण माझ्या खांद्यावर बेशुद्ध पडलीस .. तुला बेशुद्ध बघून आणि त्याला तसे रक्ताच्या थारोळ्यात बघून .. मला एक मिनिट माझे आई बाबा आठवले .. दोघांना घेऊन हॉस्पिटल ला आलो ..
तेवढयात नर्स आली
नर्स " सर .. ते तुमचे दुसरे पेशन्ट त्यांना शुद्ध आलीय "
कीर्ती " नर्स , हि माझी सलाईन काढा .. मला पण भेटायचंय त्याला "
श्लोक " थांब अग , मी आधी भेटून येतो त्याला .. "
कीर्ती " नको मी येते . माझ्या डोळ्याने त्याला बघितल्या शिवाय आता मला चैन नाही पडणार "
श्लोक ने डोळ्यानेच नर्स ला सलाईन काढायला सांगितली
तिला धरून घेऊन तो चिनुच्या रूम पाशी गेला
चिनू च्या डोक्याला राऊंड पट्टी बांधली होती .. आणि सलाईन लावली होती .. हाताला थोडे खरचटले होते ..
श्लोक " कसे वाटतंय .. ?"
चिनू " ठीक आहे मी आता .. "
कीर्ती " चिनू काय रे तू असा .. कशाला माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घातलास .." आणि तोंडावर हात हमसून रडायला लागली
चिनू नुकताच शुद्धीत आला होता . हळू बोलत होता
चिनू " रडकी .. गप बस की"
श्लोक " अग , आता रडू नकोस .. " आणि तो तिच्या चेहऱ्यावरचा तिचा हात बाजूला करत होता तर ती पटकन त्याच्या छातीवर डोके ठेवून पण हात अजूनही चेहऱ्यावरचा होता रडू लागली
कीर्ती " माझ्या मुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झालाय .. सॉरी .. चिनू .. सॉरी श्लोक "
चिनू " येडी कुठली .. जा झोप जा .. मी ठीक आहे .. आपण बोलू नंतर "
श्लोक " तू आराम कर चिनू .. मी हिला बेड वर झोपवून येतो "
श्लोक ने कीर्तीला परत तिच्या रूम मध्ये आणले .. तिला बेड वर झोपवले .. तिला पाणी प्यायला दिले
रडून रडून डोळे आणि नाक लाल झाले होते तिचे ..
श्लोक ने तिचे डोळे पूसले .. तिला मिठीत घेतली .. तिच्या पाठीवर थापटून तिचे सांत्वन केले .. तिच्या केसांवरून मायेने हात फिरवला
श्लोक " प्लिज रडू नको .. यात तुझा काहीही दोष नाहीये .. तू लवकर बरी हो .. तुला मी कसे सांगू तेच मला कळत नाहीये ... पण इतकच सांगतो तुझ्या डोळ्यांत अश्रू मला सहन होत नाहीत .. "
श्लोक खूप हळू आवाजात बोलत होता .. तीला अशी मिठीत घेऊन त्याला समाधान मिळत होते .. पाच एक मिनिटे त्याने तिला सोडलेच नाही .. दोघेही एकेमेकांना पहिल्यांदाच मिठीत अनुभवत होते ....
थोड्या वेळाने ती शांत झाली .. रडायची थांबली .. आणि तिला जाणवले कि आपण आता श्लोक च्या मिठीत आहोत ..
अचानक तिला मनातून लाजल्या सारखे होऊ लागले .. आणि तिची त्याच्या मिठीतुन बाहेर येण्याची चुळबुळ सुरु झाली .. पण श्लोक अजूनही तिला घट्ट मिठीत घेऊन डोळे मिटून बोलत होता .. त्याचे श्वास ... त्याची दाढी तिच्या मानेला जाणवत होती .. आणि तिच्या पाठीवर त्याच्या डोळ्यातून निघालेला अश्रू जाणवला
कीर्ती " श्लोक .. "
श्लोक " शु... प्लिज काही बोलू नकोस .. "
कीर्ती " श्लोक .. अरे तू रडतोयस का ?"
श्लोक " मला एक प्रॉमिस कर .. पुनः असा शहाणपणा तू कधीच नाही करणार .. "
कीर्ती " अरे .. श्लो...
श्लोक " शांत एकदम शांत .. मी आधीच माझ्या प्रेमाच्या माणसांना गमावले आहे .. आता तुझ्या शिवाय मला माझे असे कोणीच नाहीये .. कीर्ती प्लिज अस नको वागू यार .. मला खूप त्रास होतो ..
कार एक्सीडेंट मध्ये त्याच्या आई बाबांना त्याने गमावले होते आणि आता पुन्हा कीर्तीचा मोठा एक्सीडेंट होता होता वाचला होता ... श्लोक ला सारखे सारखे तेच आठवत होते आणि कीर्तीला गमावण्याची भीती त्याला वाटली होती .. आणि त्याच बरोबर आई बाबांची सुद्धा खूप आठवण येऊ लागली होती .. आणि त्यामुळे आपोआप अश्रू बाहेर येत होते .. आई बाबा गेल्या पासून तो खूप हळवा झाला होता ..
बराच वेळ तिला मिठीत घेऊन तिला तो सांगण्याचा प्रयत्न करत होता कि तू माझ्या साठी किती महत्वाची आहेस .. मी कसा अधुरा आहे तुझ्या शिवाय ..
कीर्ती पण त्याला " सॉरी .. सॉरी म्हणत होती .. आनंद तर नाहीच पण ती वारंवार त्याला दुःख आणि काळजीच देत होती त्याची खंत तिला होऊ लागली होती .
तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते .. कीर्तीला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता .. पण चिनू ला अजून दोन दिवस तरी हॉस्पिटल मधेच थांबावे लागणार होते .
सारिका श्लोक च्या ऑफिस मधली मुलगी .. ती हॉस्पिटल ला सर्वांना डबा घेऊन आली
ओम नेआधी कीर्तीला ताट वाढून दिले आणि सारिका ला तिच्या जवळ बसवले आणि तो चिनुकडे गेला .. त्याला फ्रेश करवून त्याने प्लेट मध्ये जेवण वाढून दिले .
चिनू ने हाताने जेवून घेतले .. श्लोक ने त्याला गोळ्या खायला दिल्या ..
श्लोक " चिन्मय , थँक यु ... मी कसे तूझे आभार मानू हेच मला कळत नाहीये .. तूझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही.. “आणि श्लोक ने त्याला चक्क तिथेच मिठी मारली
चिनू " श्लोक , काय करताय हे .. प्लिज असे नका करू.. कीर्ती चे तुम्ही जरी नवरा असलात तरी कीर्ती माझ्या साठी किती महत्वाची आहे आणि किती जवळची आहे हे मी तुम्हांला शब्दात नाही सांगू शकत .. "
श्लोक " सांगायची गरजच नाहीये .. तू तुझ्या वागण्यातून हे सिद्ध केले आहेस .. "
चिनू " बर ठीक आहे .. आता नको हा विषय .. मी एकदम ठीक आहे .. तुम्ही दोघे घरी जा .. उद्या सकाळी आलात तरी चालेल .. कीर्ती ला आज एकटीला नका ठेवू .. कदाचित रात्री पुन्हा घाबरून उठेल ती .. आता थोडे दिवस पुन्हा त्या भीतीत जगेल ती . तेव्हा पण ती महिनाभर घरा बाहेर पडली नव्हती .
श्लोक " तुला माहितेय का ? म्हणजे तिला हा फोबिया कशामुळे झालाय ते .. "
चिनू " मी एकमेव साक्षीदार आहे त्या घटनेचा .. मी सांगेन तुम्हाला एक दिवस "
श्लोक " ठीक आहे .. तू आराम कर .. माझ्या ऑफिस चा पियुन रात्री झोपायला येईल तुझ्या बरोबर .. काही लागले तर त्याला बिनधास्त सांग .. मी कीर्तीला घेऊन घरी जातोय .. तू ठीक झालास कि मला खूप बोलायचंय तुझ्याशी .. लवकर बरा हो "
चिनू " बरा तर मी आताच झालोय .. आता ह्या जखमा बऱ्या होयला थोडा वेळ जाईल .. " आणि हसायला लागला
श्लोक पण गालातल्या गालात हसला आणि त्याच्या अंगावर पांघरून टाकून बाहेर पडला
श्लोक आणि कीर्ती घरी आले .. पियुन चिनू बरोबर थांबला
जेवण झाले होते म्हणून डायरेक्ट झोपायची च तयारी होती ..
श्लोक " काही लागले तर सांगशील मला .. स्वतः एकटीने करायची गरज नाहीये ....निदान आज तरी "
कीर्ती " हो "
श्लोक ने कीर्तीच्या बाबांना फोन करून काय घडले ते सांगून दिले .. पण यायची सध्या गरज नाहीये .. ती ओके आहे हे हि कळवले
श्लोक " तू .. चिनू च्या बायकोला फोन केला होतास का आज ?"
कीर्ती " नाही .. आज मला वेळ नाही मिळाला "
श्लोक " मला वाटते उद्या सकाळी तुला वेळ मिळाला कि कॉल कर आणि सांगून दे त्याचा ऍक्सीडेन्ट झालाय ते "
कीर्ती " ठीक आहे "
श्लोक " काही होतंय का ?"
कीर्ती " नाही .. झोपते आता .. "
श्लोक " ठीक आहे .. श्लोक ने तिच्या अंगावर पांघरून टाकले आणि तो बेड वर नुसताच पडून राहिला .. थोड्यावेळाने त्याने चेक केले कि कीर्ती ला झोप लागलीय .. तसा तो उठला आणि हळूच कपाटा च्या ड्रॉवर मधला त्याचा आणि त्यांच्या आई बाबांचा एक फोटो अल्बम बाहेर काढून हातात बेड वर बसला .

🎭 Series Post

View all